सौ. अर्चना गादीकर निकारंगे
कवितेचा उत्सव
☆ पांगारा… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
☆
अंगावरून तुझ्या अलगद ओघळलेली ती,
पाण्यातून पावसाच्या मार्गस्थ होत होती.
अंगार्यासम भासणारी जरा पाण्यात सुखावली,
जलस्पर्शाने आनंदित ती, नयनसुखानेआंनदित मी
जणू एकच वाटत होतो.
गळलेल्या फुलांकडे पाहून जणू काही
पागोळ्यांतूनन तुझे रुदन चालले होते
भारदस्त विशाल देह धारण कर्ता तू
पण मन मात्र खूपच हळवे वाटत होते.
एक दिवस असा उजाडला की नकळत तुझ्या
तुझी आंतरिक शक्तीक्षीण होऊ लागली होती,
भारदस्त, विशाल म्हटल्या जाणार्या तुझ्या मुळांनी
जमीन सोडली
आणि तू जीवंतपण.
तुझ्या विना त्या जागेला जाणवत राहील रितेपण.
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈