सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 255
☆ तिळगुळ… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
संक्रातीच्या गोड दिवसाच्या ,
अनेक आहेत आठवणी,
हेडसरांच्या घरी,
मिळायची मोठ्ठी तिळवडी!
आईच्या चंद्रकळेवर,
चांदण्याची खडी ,
संक्रातीचा दिवस खूपच छान,
लहानपणी नव्हतंच कसलं भान !
आत्ताच आला ,
बालमैत्रीणीचा फोन,
“तिळगुळ घे गोड बोल”
म्हटलं, “तिळगुळ घे गोड बोल”!
“ओवसून आलीस का ?”
म्हटलं , “नाही गं , तसलं काही नाही करत !”
पूर्वी हे सर्व केलंय रूढी परंपरेनं,
अंतर्मुख झाले तिच्या फोन नं !
पारंपरिक जगणं,
सोडून माणूस म्हणून,
जगण्याचा ध्यास घेतला —
तेव्हापासूनच आयुष्य,
मुक्त होत गेलेलं!
जगण्याचे दोन प्रवाह,
समांतर!!
बदललं आयुष्य पण—
तिळ आणि गुळ तोच —
जीवनाची गोडी वाढवीत,
दरवर्षीच तो संदेश देणारा–
तिळगुळ घ्या गोड बोला
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈