सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ खरे-खोटे…☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆
माझ्या सभोवताली स्वार्थांध लोक जमले
त्यांना पुरून उरण्या जगणे तसेच शिकले
*
परके कधी न माझे का त्यास दोष देऊ
अपुलेच शत्रू झाले त्यांनी मलाच लुटले
*
जो दुर्जनास आधी वंदेल तो शहाणा
ही रीत ज्यास कळली जीवन तयास कळले
*
ज्यांच्या घरात आहे साम्राज्य मंथरेचे
तुटतील खांब तिथले पक्के खरेच असले
*
नाना कळा मनी पण दिसतो वरून भोळा
त्याने दिले जरीही खोटेच शब्द खपले
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खुप सुंदर
धन्यवाद मंजू
खूपच सुंदर. जगात कसे वागले जाते हे फार छान समर्पक शब्दात तुम्ही सांगितल आहे
छान! कुठली वेदना भळभळली?
धन्यवाद वसंता
रामदास स्वामी यांनी सांगितले तसे ह्या कलियुगात योग्य अशी शिकवण देणारे काव्य ज्योती आणि कविते चे नाव अगदी सार्थ 🙂
धन्यवाद प्रगती
फारच छान 👌 👌 👌
धन्यवाद पुष्करजी