सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंदाचे शिंपण ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त कविता)

 ☆

माझे जीवनगाणे गमते

तृप्त मनाचे गायन मजला

मागे वळुनी पाहता दिसे

मळा समाधानाचा फुलला ||

 *

संसार करावा निगुतीने

नाती जपावी आत्मियतेने

कर्म चांगले सत्शील वृत्ती

समाजसेवा ध्यास मनाने ||

 *

वृथा कुणाला ना हिणवावे

उगा कुणाला ना दुखवावे

प्रेमभराने जीव लावुनी

स्नेहबंधही घट्ट करावे ||

 *

अहंकार कर्मास नासवी

अभिमान स्नेहास संपवी

तरतम भावा जाणुनिया

विवेकपूर्णा कृती असावी ||

 *

आला क्षण आपुल्याच हाती

मनमुक्त जगावे आनंदाने

आनंद वाटावा सकलांना

हसतमुखाने शुद्ध मनाने ||

 *

मायबाप हृदयी पूजिता

त्यांची शिकवण आचरते

असेच माझे जीवनगाणे

आनंदाचे शिंपण करते ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments