सौ. वृंदा गंभीर
कवितेचा उत्सव
☆ एकदातरी भेटशील ना?… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
☆
एकदा भेटायचं रे तुला
मनातील भरभरून बोलायचं
जीवनातील सुख दुःखाच्या गोष्टी
सांगायच्या…
डोळ्यातील आसवं तुझ्या खांद्यावर
रिचवायचे
भेटशील ना एकदा, देशील ना खांदा
तुझ्या प्रेमात न्हाऊन निघायचं
सोबत सगळेच आहेत पण मनाला
काय वाटत माहित नाही
तुझ्या जवळच मन मोकळं करायचं
तुझ्याकडे का मन ओढ घेत कळतं नाही
तुझ्यात काहीतरी स्पेशल दिसतं
या वेड्या मनाला काही आवरणं
होत नाही
तुझी आठवण मनातून जात नाही
तुला भेटल्याशिवाय राहवत नाही
सांग ना, एकदातरी भेटशील ना
मन मोकळं करायला थोडी जागा देशील ना?
☆
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈