सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 261
☆ तो दिवस… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
एखाद्या दिवसाकडून,
आपण केलेल्या असतात,
वेगळ्याच अपेक्षा,
खूप काही बोलायचं असतं,
ऐकायचं असतं!
*
बनवायचं असतं काही चविष्ट—
ती फोनवर उगाचच ऐकवते,
हे नको…ते नको….
आणि फसतातच सारे बेत,
तिच्या दृष्टीने !
*
आणि खरंतर तीच असते नांदी —
काही अघटित घडण्याची!
असे ओढून ताणून,
नसतातच मिळवायचे,
आनंदाचे क्षण,
ते प्रारब्धातच असावे लागतात!
सगळेच ठोकताळे..
चुकतात, हुकतात काही क्षण,
चुकवायला नकोच–
असतात असे,
तो दिवस असाच,
असतो—
ध्यानी मनी नसताना,
सोसावा लागतो!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈