श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ सवाल ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

सामान्य माणसाचा साधा सवाल आहे

हा राजकारणी का जळता हिलाल आहे?

 *

सत्तांध होत कोणी सेवा कशी विसरतो

इतके कसे कळेना तुमची कमाल आहे

 *

जनता तुम्हास भजते आदर्श भावनेने

पण का तुम्हीच येथे झाला दलाल आहे

 *

विसरू नका कुणी ही साधी सुधी विधाने

हा काळ माणसांचा वैरी कराल आहे

 *

कर्तव्य लाभकारी तुमच्या कडून व्हावे

तुमचीच आज येथे ख्याती विशाल आहे

 *

जपण्यास या प्रजेला व्हा सावधान आता

उधळायचा सुखाचा आता गुलाल आहे

नेते बनून तुम्ही सुखरूप वाट शोधा

तुमच्या समर्थ हाती आता मशाल आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

खूप छान गझल सर.हिलाल म्हणजे काय नाही समजले