सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री सचिन पाटील
🏆 अ भि नं द न 🏆
🏆 श्री सचिन पाटील यांना रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार-२०२५ जाहीर 🏆
प्रसिद्ध लेखक, चित्रकार सुरेन्द्र पाटील यांनी साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वाचन चळवळ-भाषा वृद्घीसाठी सातत्याने धडपडणाऱ्या लेखक, व्यक्ती यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी वडिलांच्या नावाने “रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार” देण्याचे ठरवले. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी कसलीही प्रवेशिका नाही की समारंभ नाही. हा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीपर्यंत स्वतः जाऊन सन्मानाने दिला जाईल. रोख ५००० रुपये, शाल, ग्रंथभेट, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पहिला पुरस्कार सांगली जिल्ह्यातील कर्नाळ येथील श्री सचिन वसंत पाटील यांनी संपादित केलेल्या ‘मायबोली रंग कथांचे’ या पुस्तकास जाहीर केला आहे. २२ बोली भाषेतील कथा या पुस्तकात त्यांनी संपादित केल्या आहेत. कथाकार पाटील यांनी एका अपघातात दोन्ही पायातील शक्ती गमावली. कमरेखालचा भाग कायमचा निर्जीव झाला; परंतु पुस्तक वाचनाने त्यांच्या जगण्याला बळ मिळाले. लेखनकार्यात त्यांनी स्वत:ला गुंतवून सांगावा, अवकाळी विळखा, पाय आणि वाटा अशा दखलपात्र पुस्तकांची निर्मिती केली आणि वॉकरवर जिद्दीने पुन्हा उभे राहिले… त्यांचे जीवन अनेकांना प्रेरक आहे, म्हणून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, श्री सुरेन्द्र पाटील यांनी पुरस्काराची घोषणा केली आहे.
लवकरच युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्री कादंबरीकार देविदास सौदागर समवेत श्री सचिन पाटलांच्या घरी जाऊन हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
💐✒️🙏ई अभिव्यक्ती मराठी ‘ चे लेखक श्री.सचिन पाटील यांचे समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा🙏✒️💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈