सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ अभिजात भाषा-मराठी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

आज भाषा मराठी ठरे अभिजात

लाभे सन्मान तिला अखिल विश्वात

गीतेचे सार थोर घुमतसे जगता|

होतसे मराठी अभिमानास पात्र ||||

*

ज्ञानदेवे रचिलासे पाया

तुकयाने केला कळस

मराठीचा तो नामघोष

कळू दे आता जगास ||||

*

सारस्वत थोर-थोर

वर्णिती तिची गाथा

नतमस्तक. मी होते

मराठीचे गुण गाता ||||

*

मराठीचा परिमल दरवळे

शब्दफुले लेती लेणे

साहित्याची मांदियाळी

शब्दातुनी गाती गाणे ||||

*

मराठीचे गुण महान

गाती मुखे थोर-सान

अमृताते पैजा जिंके

मराठीची अशी शान ||||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments