श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ आनंदी मन, आनंदी तन, आनंदी जग… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆
एकेकाळी भारतात औषध म्हणूनही उपलब्ध नसलेला मानसिक आजार नावाचा रोग आता जवळजवळ प्रत्येकाच्या पाचवीला पुजल्याप्रमाणे डोके वर काढू लागला आहे. याला जबाबदार कोण ? अमेरिका, इंग्लंड की अन्य कोणी ? बघा, विचार करा ?
याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत असे आपल्या लक्षात येईल.
* आधुनिक जीवनपद्धती,
* विभक्त कुटुंब व्यवस्था,
* हातात खेळणारा पैसा,
* मी कसा आहे हे दिसण्यापेक्षा मी कसा असायला हवा हे दाखवण्याची अहमहिका आणि त्यातून स्वतःच निर्माण केलेली अनावश्यक स्पर्धा,
- नकार पचविण्याची कमी होत चाललेली क्षमता,
- मुलांना फुलझाडांसारखे न वाढवता फुलांसारखे जपणे,
- सनातन वैदिक परंपरांबद्दल अनादर…,
- सामाजिक माध्यमांचा अति आणि गैरवापर, स्वतःची क्षमता न पाहता स्वतःकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा
- वस्तुस्थिती स्वीकारण्याची तयारी नसणे.
- व्यायामाचा अभाव
- आधुनिक तंत्रज्ञानामुळे शाररिक हालचालींवर आलेली मर्यादा.
* अनावश्यक आणि चमचमीत अन्नपदार्थ
* अमली पदार्थांचे सेवन
* वेदना शामक गोळ्यांचा अतिवापर
* स्टेटस जपण्याची स्पर्धा
यात आपण आणखी काही मुद्दे जोडू शकाल…
मागील दहा वर्षांचा अभ्यास केला तर हृदयरोग आणि हृदयाला झटका येऊन गेला आहे अशा लोकांचे प्रमाण वाढत आहे. यात प्रामुख्याने ४५ ते ६० या वयोगटाचे प्रमाण जास्त आहे. आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात कोणाला तरी हृदय विकार असेल किंवा कधीतरी झटका येऊन गेल्याचे आपल्याला स्मरत असेल. त्यावेळी त्यांची झालेली मानसिक, शाररिक, भावनिक आणि आर्थिक घालमेल आणि ओढाताण आपण पाहिली असेल….
मानसिक आरोग्य उत्तम असणे ही निरामय जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे.
आपण समस्या पाहिली, आता यावर उपाय पाहूया.
- स्वतः का प्रश्न विचारा. आपल्याकडे सुख, समाधान, शांती आहे का ?
- मेंदू सशक्त हवा त्यासाठी मन आरोग्य महत्वाचे.
- शांत मन, चिडचिड नको, मानसिक आरोग्य यासाठी आनंदी रहावे
- छोट्या गोष्टीत आनंद शोधा.
- सुखाच्या मागे धावल्याने आजचे सुख गमावताय.
- प्रेमाच्या माणसांबरोबर वेळ घालवा.
- काळजीत वेळ घालवू नका.
- छंद जोपासा.
- मन मोकळे करा, नंतर करु असे नको.
- पक्षांचे (BIRDS’) आवाज आनंदी करते.
- सकाळी फिरायला जा.
- योग, प्राणायाम व ध्यान.
- हसतमुख रहा/ Be Cheerful
- मेंदूचे दोन्ही भाग वापरा कलागुण यात येते. LEFT side of BRAIN is for ROUTINE ACTIVITIES & RIGHT SIDE of BRAIN is for CREATIVE ACTIVITIES. Make more use of Right side of brain.
- मन मोकळे करा, मनांत काही ठेऊ नका.
- आध्यात्मिक विकास व्हावा ही काळाची गरज यासाठी म्हातारपणाची वाट बघू नका.
- शांत झोप ही हेल्दी मनाची पायरी.
- आत्मपरीक्षण/ Think on your DAILY ACTIVITIES. Is there any room for improvement ? मोबाईल ऊठल्या ऊठल्या नको. मोबाईल मेंदू दुषीत करतो.
- मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी श्लोक म्हणा, किंवा Utube वर लावा. त्यामुळे मेंदूत चांगल्या लहरी तयार होतील.
- नकारार्थी विचार मेंदूला दूषित करतो. 21. सकारात्मक विचार रुजवा Negative विचार दूर करा.
- कंटाळा हा शब्दच नको. सतत स्वत:ला कार्यमग्न ठेवा.
- दैवी गुण रुजवणे आवश्यक. असुरी गुण नको.
- मनाचे श्लोक आत्मसात करा. , रोज किमान १० श्लोक म्हणा.
- श्रध्दा व ऊपासना महत्वाची.
- रोज तुमचा आरसा (मनाचा) स्वच्छ ठेवा. Stay away from Negativity.
- चांगले वाचन करा. मन प्रसन्न राहील.
- मेंदूचा वापर सतत असावा.
- रोज किमान चार ओळी लिहीत जा. दिसा माजि काही लिहीत जावे…
- मागण्या कमी ठेवा. मन आनंदी राहील.
- रोजच्या रोज वेळेचे नियोजन करा
- एकावेळी एकच काम लक्षपूर्वक करा याने मेंदूतील झिज कमी होईल.
- वर्तमानात जगा. भूतकाळाचा व भविष्यकाळाचा विचार नको.
- अनुभवातून शिकणे हवे. पण त्याचा बाऊ नको.
- वाईट विचारांना तिलांजली व चांगल्या विचारांना चालना.
- चढउतार (IN LIFE) पचवणेची क्षमता वाढवा.
- मी काही चूकीचे करतोय का ? स्वत:ला विचारा. मनाचे ऐका.
- पैशांच्या मागे नको. झोप उडेल व मन दुःख:ी होणार. पैसा आवश्यक असेल तेवढाच हवा. (MONEY: साध्य नसून साधन).
- SHREESUKTA पठण व आत्मसात करा. KNOW THE REAL MEANING OF “LAKSHMI”.
- TRY TO BE A MAN OF VALUE NOT JUST A MAN OF SUCCESS.
- चांगली मुल्ये आनंदी करतात.
- श्रेयसाची वाट धरा. PREYAS will give you a short pleasure.
- रागावर नियंत्रण. मेंदूचे रसायन बदल. ANGER causes Mental as well as Physical imbalance.
- खरं बोलणे पालन. खोटे बोलणे मुळे ऊपयुक्त रसायनांत बदल.
- संस्कार जतन, चूक काय व बरोबर काय याकडे लक्ष हवे. सोंग नको. मनाला विचारणा करा.
- नात्यांचा आदर करा. एकी ठेवा. एकीतच बळ आहे. बंधनातच आनंद असतो.
- ध्यानधारणा करा व मेंदूला आराम द्या. PRANAYAM, YOGA & MEDITATION play an important role in keeping your brain cells healthy by producing dopamine like chemicals.
- आईवडिलांवर प्रेम करा व आदर करा.
- भावनांचा दिखावा नको. फसवू नका.
- नातेसंबंध दृढ करा. आपल्या आवडत्या लोकांबरोबरच रहा नावडत्यांना दुर ठेवा. Nurture Relationships.
- परस्परावर विश्वास ठेवा.
- लोकांचे आवडते बना.
- सॉरी म्हणायला शिका.
- जबाबदाऱ्या जाणा.
- गैरसमज टाळा. “आपणच बरोबर” हे नको. दुसऱ्याचे म्हणणे ऐका. आत्मपरीक्षण करा.
- विवेकाने वागायला शिका.
- माणूस बनायला शिका प्राणी नको.
- बुध्दीचे मनावर नियंत्रण हवे.
- मेधा, मती, प्रज्ञा, ऋता हे आचरण.
- चांगला दृष्टीकोन हवा.
- व्यक्त व्हा…. !
- मन आनंदी तर हृद्य आनंदी…. !
- सत्संगती
देवावर विश्वास ठेवा, आजपर्यंत ज्याने सांभाळले तो पुढेही सांभाळेल हा विश्वास मनाला उभारी देईल… !
मन करा रे प्रसन्न ।
सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन ।
सुख समाधान इच्छा ते ॥१॥
*
मनें प्रतिमा स्थापिली ।
मनें मना पूजा केली ।
मनें इच्छा पुरविली ।
मन माउली सकळांची ॥ध्रु. ॥
*
मन गुरू आणि शिष्य ।
करी आपुलें चि दास्य ।
प्रसन्न आपआपणास ।
गति अथवा अधोगति ॥२॥
*
साधक वाचक पंडित ।
श्रोते वक्ते ऐका मात ।
नाहीं नाहीं आनुदैवत ।
तुका म्हणे दुसरें ॥३॥
*
– जगद्गुरु श्रीतुकाराम महाराज
सर्वांनी आपापले मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला प्रयत्नांना प्रभू श्रीरामांनी सहाय्य करावे अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करीत आहे.
आपला
श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विशेष आभार :- या लेखास नाशिक येथील जगप्रसिध्द न्युरोलोजिस्ट डॉ. महेश करंदीकर यांच्या एका भाषणाचे सहाय्य झाले आहे.
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈