सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ 

🏆 अ भि नं द न 🏆

हिंदीतील प्रख्यात, नामवंत, यशवंत, गुणवंत लेखक श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ यांना  नुकताच, म्हणजे मंगळवार दि.. १८ मार्च रोजी, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अ‍ॅकॅडमीतर्फे २५००० रु. रोख, कास्य पदक, सन्मानपत्र असा काका कालेलकर –जीवनी पुरस्कार प्राप्त झाला आहे.  त्यांच्या ‘रुको ना पथिक’ या आत्मचरित्राला तो मिळाला आहे.

श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ यांची मातृभाषा मराठी आहे, पण ते लेखन मात्र हिंदीत करतात. ‘ई-अभिव्यक्ती हिंदी’वर त्यांचे लेखन सातत्याने प्रसारित होत असते. त्यांची कविता, लघुकथा, दीर्घकथा, व्यंगरचना इ. प्रकारची १३ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या काही रचनांचे अन्य भाषेतही अनुवाद झाले आहेत. त्यांच्या लघुकथांचा ‘लक्षावधी बिजं’ व दीर्घकथांचा ‘प्रखर यांच्या निवडक कथा’ हे पुस्तकरूपातील अनुवाद मंजुषा मुळे आणि उज्ज्वला  केळकर यांनी केले आहेत. त्या पुस्तकांचा परिचय आपण ई – अभिव्यक्तीवर वाचलाच असेल. ते स्वत:ही उत्तम अनुवादक आहेत. त्यांनी मराठीतील ६ पुस्तके व ४० कथांचा हिंदीत अनुवाद केला आहे.

श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’यांना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याबरोबरच ४ राष्ट्रीय व ५ महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अ‍ॅकॅडमीतर्फे मिळालेले महत्वाचे पुरस्कार आहेत. त्यांच्याकडून भविष्य काळात उत्तमोत्तम लेखन घडो व त्यांना असेच महत्वपूर्ण पुरस्कार प्राप्त होवोत, या शुभेच्छा .

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments