श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ मनापासुनी मनास अपुल्या ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

स्वतःत रमता भान कशाला बेभान होऊनी जावे

कोशामधला किडा तसे विश्वाला विसरुन जगावे

*

शोधित जावे आत स्वतःला भेदून सा-या भिंती

ढवळून सारा डोह दिसावी तळात नितळ कांती

*

वळवळ सारी जावी संपून शांत मनाला करीत जावे

सोडुन सा-या ईर्ष्या, इच्छा पिसापरी मन झोके घ्यावे

*

स्वतःस शोधून बघता बघता व्यक्तीत्वाचे भान सरावे

संवाद सरावा देहबोलीचा, मनबोलीला शब्द फुटावे

*

आत दिसावा एक आरसा प्रतिबिंबाला निरखीत जावे

मनापासुनी मनास अपुल्या वेळोवेळी घडवीत जावे

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments