सुश्री नीलांबरी शिर्के
☆ तहान… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆तिला पाण्याची तहान
त्याला तहान ज्ञानाची
पाणवठी तिला पाणी
त्याची तहान पुस्तकपानाची
*
परिस्थितीशी झगडता
मुळी मागं नाही सरायचं
भविष्याचे स्वप्न सत्यात
कर्तव्य करत फुलवायचं
*
मनामधे जिद्द असेल तर
आपोआप मिळते वाट
असतील दगडधोंडे काटे
पण यशाची नक्की पडते गाठ
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈