श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ रिक्त मडके… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
तिने अाणल्या पावसात,
मलाही भिजायचे होते.
तिच्या प्रेमाच्या सावलीत,
मलाही निजायचे होते.
*
अनाकलनीय तिची ती माया.
गूढ, अतर्क्य जी तितिक्षा.
वाट्याला माझ्या केवळ,
आली घोर उपेक्षा.
*
सरी आल्या बरसून गेल्या,
ठेऊन मडके रिक्त.
पावसात शोधणे आता,
हटवादी शैशव फक्त.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈