सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ सखी कवितेस… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
(मुक्त छंद)
☆
कविते, तू आहेस तरी कोण ?
माझ्या भावना जाग्या करून
मुक्त करणारी सखी?
तू आहेस म्हणून तर मी जगतेय!
तुझा हात धरून हळुवार फिरतेय
*
सखी कविते, तूच माझी
जीवनदायिनी आहेस!
तूच माझे अस्तित्व टिकवलेस!
मी उन्मळून गेले तेव्हा,
तूच मला सावरलेस!
सखी कविते, तू आहेस अथांग!
लपतेस तू अंतरंगात !
भावनांचा कल्लोळ करताना,
घेतेस शब्दांचा आधार!
तुझे वर्णन मी काय करणार?
सखे, तू तर जीवनाधार!
मनाच्या अथांग सागरी तरंगतेस
अन् माणिक मोत्यासारखी
येतेस!
माझ्या लेखणीत,
सजीव जीव बनून!
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈