‘सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 💐

तितीक्षा इंटरनॅशनल ने आयोजित केलेल्या श्री गणेश या विषयावरील काव्य स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे यांना ह्रदयस्पर्शी या गटात पुरस्कार प्राप्त झाला आहे. इ अभिव्य्क्ती परिवाराकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. !

– आजच्या अंकात वाचूया त्यातील त्यांची एक पुरस्कारप्राप्त कविता – “गणेश – जन्म…”

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

? कवितेचा उत्सव  ?

☆ गणेश – जन्म… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गणांचा अधिपती, तू आहेस गणराय !

जन्म माघ चतुर्थीचा, असे मंगलमय !.. १

 *

 पार्वती पुत्र तू, भोळा शंकर तुझा पिता!

असशी तू बुद्धिवंत, तनय एकदंता… २

 *

तुझी जन्म कथा ऐकतो, असे तीही न्यारी !

लाभले गजमुख तुला, सकाळच्या प्रहरी !… ३

*

अवज्ञा तू केलीस, साक्षात श्री शंकराची!

शिरच्छेद केला त्याने, परिसीमा क्रोधाची !… ४

*

 माता पार्वती दुःख करी, पुत्र तिचा गुणी !

आणून द्या त्याचे शीर, माता बोले तत्क्षणी!… ५

*

पश्चात्ताप करी सांब, मातेचे दुःख पाहुनी!

पहिले शीर आणीन, निश्चय केला मनी !… ६

*

 प्रातःकाली दृष्टीस पडे, गजाचे आनन!

गणेशास मिळे पुनर्जन्म, झाला गजवदन!.. ७

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments