श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
नेताजी सुभाषचंद्र बोस…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
नेताजी सुभाषचंद्र बोस,
धगधगते यज्ञकुंड!
स्वातंत्र्याचा ध्यास घेतला,
आयुष्य वाहिले अखंड!… १
*
जशास तसें उत्तर दयावे,
क्रांतीचा मार्ग आंगिकारला!
आझाद हिंद सेना पाहून,
युनियन जॅक तेव्हा घाबरला!… २
*
तुम मुझे खून दो,
मै तुम्हे आझादी दूंगा हा नारा!
अहवानास पेटून उठला,
हिंदुस्थान साथ द्यायला सारा!… ३
*
दुसरे महायुद्ध पेटले,
स्वातंत्र्याची संधी आली चालून!
ब्रिटिशांशी लढा उभारला,
आझाद हिंद सेनेने दंड थोपटून!… ४
*
स्वातंत्र्याच्या लढ्यातले,
सुभाषबाबू अढळ ध्रुव तारा!
आजच्या या दिनी विनम्रतेने,
अभिवादन करतो भारत सारा!… ५
*
आजवर रहस्यच राहिलंय,
सुभाष बाबुंचे काय झाले पुढे!
शंकाकुशंका दाटले धुके,
गुलाब चाचांच्या कर्माचे पाढे… ६
☆
© श्री आशिष बिवलकर
दि. 04 मार्च 2025
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈