श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 280 ?

☆ साठलीत जळमटे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

लपून चार बाजुला थांबलीत जळमटे

घराघरात जाउनी शोधलीत जळमटे

*

करून रामबाण हा पाहिला इलाज मी

इलाज पाहुनीच हा फाटलीत जळमटे

*

सुरुंग आज लावला ठोकशाहिला जुन्या

नवीन कल्पने पुढे वाकलीत जळमटे

*

भयाण वाटली तरी जाळु सर्व संकटे

मनात आग पाहुनी पेटलीत जळमटे

*

हळूहळूच हे किटक आत पोचले पहा

चिवट बरीच जात ही थाटलीत जळमटे

*

कुणी न काल रोखले हे कुणा न वाटले

दिसेल घाण त्या तिथे लटकलीत जळमटे

*

लगेच साफ व्हायची आस ही नका धरू

प्रमाणबद्धतेमुळे साठलीत जळमटे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments