श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 281 ?

☆ फुलले कमळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वाकड्या वाटेवरी तो चालला इतका सरळ

राजकारण खेळले जे पाढरे झाले उखळ

*

झाकता उखळास येणे ही कला जमली तया

लक्षवेधी मांडली मग त्यास तर दिसता कुसळ

*

काल दलदल फार होती गाळ होता साचला

एवढ्या चिखलातुनीही छानसे फुलले कमळ

*

केतकीवर प्रेम त्याचे रान त्याने पोसले

भोवताली नाग होते ओकला नाही गरळ

*

हिरवळीवर झोपणारा तो फुलावर भाळला

बाभळीच्या दूर गेला रान केले ना जवळ

*

चोर इतका पुष्ट होता जीव घेउन धावला

लागला मागे शिपाई भावना नव्हती चपळ

*

साठवावे नीर थोडे त्यास नाही वाटले

कोरडे दिसले मला जे पात्र ते होते उथळ

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments