सौ. वृंदा गंभीर
कवितेचा उत्सव
☆ भूपाळी… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
☆
उठा उठा देवा आता पहाट झाली
देवा पहाट झाली
जमले पहा तुमचे भक्त मंडळी…
पुरी झाली निद्रा आता देवा उठावे
आता देवा उठावे
भक्तांना तुमचे श्रीमुख दाखवावे…
बहू मातला कली देवा रक्षण करावे
देवा रक्षण करावे
भक्तांसाठी देवा सज्ज व्हावे…
आल्या दिंड्या पताका घेऊन
वैष्णव नचती देवा वैष्णव नाचती
तुझ्या चरणी देवा मस्तक ठेवती…
चंद्रभागे स्नान करुनी भजनासी यावे
देवा भजनासी यावे
करुणा कृपेने आम्हासी पहावे…
वृंदा गाई भूपाळी एकादशी दिनी देवा एकादशी दिनी
विनंती करिते उठावे निद्रेतुनी…
☆
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈