दिवस तिळातिळाने वाढत असतो. सबंध वातावरणात भरुन असलेली गोड-गोड गुलाबी थंडी आता विरळ होऊ लागलेली असते. हिवाळाभर पसरुन राहिलेल्या शिशिर ऋतूचा सोहळा आणिक काही कालावधीनंतर संपून जाणार असतो. आभाळभर पसरलेली शुभ्र धुक्याची वेल सूर्याच्या प्रखर दाहाने वितळायला लागलेली असते. एखाद्या लोखंडी गोळ्याला उष्णता दिल्यावर तो जसा खदिरांगारासारखा दिसतो तशी अवस्था भास्कराच्या उष्णतेने येणार असते. पण तशाही अवस्थेत तो आभाळगोल आपला उष्ण प्रवास निरंतर सुरु ठेवत असतो.
होळीचा सण हा शिशिरातला सण! शिशिरात कसं मस्त-मस्त वातावरण असतं! जंगलांनी पळसाचे लालसर केशरी रंग आपल्या अंगाला माखून घेतले असतात. एखाद्या लावण्यवती प्रमदेनं मत्त शृंगार करुन आपल्या प्रियकराशी भेटायला आतुर व्हावं, तशी ती पळस झाडं आपल्याच फुलांचा शृंगार करुन हजार रंगांनी रंगोत्सुक होणाऱ्या होळीच्या सणाला भेटायला आतुर झालेली असतात, उत्सुक झालेली असतात. रंगात रंग नि भांगेत भांग मिसळवून टाकण्याचा हा क्षण नि सण असतो. आणिक सोबतीला शिशिरातलं हवंहवंसं, मिश्किलसं वातावरण खुलत असतं.
पळसफुलांचा रंग एकमेकांच्या अंगावर बरसवून आपण प्रेमाची देवाणघेवाण करत असतो. आणिक जंगलात पळसाची झाडं आपल्या फुलांचा रंगमय शृंगार पाहून कृतकृत्य झालेली असतात. झाडांच्या मनी दुःख असतं ते केवळ आपली फुलं खुडली गेली याचं. फुलांना जन्म देणाऱ्या सर्वच झाडांचं तसं असतं. एखाद्या नवसौभाग्यवतीच्या अंगावरचा दागिना हरविल्यावर तिनं व्याकुळ नजरेनं तो दागिना इतस्ततः शोधण्याचा प्रयत्न करावा, तशी ती फुलं खुडलेली झाडं करत असतात. आपल्याच खुडल्या गेलेल्या फुलांना पुन्हा-पुन्हा शोधत असतात. मला याचंच सगळ्यात जास्त दुःख होतं. झाडांचं आणिक फुलांचं दुःख मी नाही पाहू शकत. त्यापेक्षा हजार फुलांचे घाव आपल्यावर व्हावेत असं वाटू लागतं नि नेमकं तसं घडत नसतं.
आपली फुलं माणसांच्या हवाली करुन अश्रू ढाळणारं जंगल पाहायला एकदा मी धावतच जंगलात गेलो होतो. आताशा नुकतीच कुठं शेंदरी रंगाची फुलं पळस झाडाला लागली असतील नसतील, पण ती लागतात नं लागतात तोच त्या फुलांवर ‘मानवी गिधाडं’ तुटून पडलीत, असा आर्त दुःखाचा भाव जंगलाच्या चेहऱ्यावर मी स्पष्टपणे वाचला. आपल्या सभोवार फुललेल्या पळसफुलांची आरास माणसांनी विस्कटून टाकली म्हणून जंगल जणू रडत होतं नि जंगलाचं रडू पाहून मलाही रडू येत होतं.
माथ्यावरचा मार्तंड खूप तापला. सर्वांगाला खूप चटके बसले. मी भानावर आलो नि माझं रडू थांबलं. मग मला सूर्याचा मनस्वी संताप आला. वाटलं, हा आभाळगोल स्वतःला देव म्हणवतो ना! पौषातल्या रविवारी आईच्या पूजेच्या ताटात हा सूर्य येऊन बसतो ना! मग तरीही हा देव खोटा का? खरा देव तर कृपाळू असतो. साऱ्या पृथ्वीवर वैशाखवणवा पेटवून देणारा हा सूर्य म्हणजे एक महाराक्षस आहे. जंगलातील फुलं माणसांनी तोडून नेल्याचं दुःख नि माझ्या प्रियतम जंगलावर आग ओकणाऱ्या सूर्याचा राग मनात मावेनासा झाला तेव्हा प्रेयसीच्या रसिल्या ओठांवर प्रियकरानं ओठ टेकावेत तसे आभाळाच्या ओठांवर सूर्याने आपले ओठ टेकवले नि हळूहळू सूर्य आकाशाच्या मिठीत विलीन झाला.
☆ एका कर्जाची परतफेड – भाग २ – सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर☆
(मागील भागात आपण पाहिले – ती गेल्यानंतर मॅडम म्हणाल्या, `ही चोरी आहे. विशुद्ध चोरी. पैसे परत नाही मिळणार. लिहून ठेव. आता प्रश्न असा , की पुढे काय करायला हवं?’ आता इथून पुढे)
‘ती पुन्हा पैसे मागवायला तयार नाही.’ मी म्हंटलं.
‘ती तयार झाली, तरी मी तिला मागवू दिले नसते. असा विचार करा, हा आपल्या संस्थेवर कलंक आहे.’ त्या म्हणाल्या.
`मग काय करायचं? दहा –पंध्रा रुपयाची गोष्ट असती, तर…’
`तू पण दिले असतेस, होयनं? मग मी नाही का देऊ शकणार? पण हा काही समस्येवरील उपाय नाही झाला. बरं असं करा, प्रार्थनेनंतर सगळ्या मुलींना थांबायला सांग. मी येईन.’
मी घाईघाईने हॉस्टेलवर परत आले आणि प्रार्थना हॉलचं निरीक्षण केलं. या महिन्यात प्रार्थना हॉलची जबाबदारी किरणवर होती. ती मोठ्या भक्तिभावानेसगळी तयारी करत होती. मोठ्या मॅडम येणार आहेत हे कळल्यावर तिने धूप-दीप पात्र आणखी चमकवली. दोन-चार उदबत्त्या जास्तीच लावल्या. भजन करण्यासाठी निशा आणि माणिकची निवड केली. त्यामुळे भजन जरा नीट ताला-सुरावर म्हंटलं जाईल. मॅडमचं काय सांगाव? कधी गुपचुप येऊन बसतील कळणारही नाही. कारण प्रार्थनेच्या वेळी कुणी तरी उठून त्यांना सन्मानाने बसवावं, हे त्यांना आवडतनसे. नेहमी गुपचुप येऊन बसायच्या.
प्रार्थना संपल्यावर बघितलं, मॅडम येऊन खिडकीत बसल्या आहेत. ती त्यांची आवडती जागा होती. त्यांनी तिथूनच बोलायला प्रारंभ केला. प्रथम या चोरीसाठी त्या सगळ्यांवर खूप रागावल्या. रामकुँवरच्या निष्काळजीपणाबद्दल तिलाही थोड्याशा रागावल्या. सदाचाराबद्दल एक चांगलंसं भाषण दिल्यानंतर म्हणाल्या, ` चोरी हॉस्टेलमध्ये झालेली आहे आणि चोर सापडला नाही. तेव्हा ही आपल्या सगळ्यांची सामुहिक जबाबदारी आहे. याचा दंड आपल्या सर्वांना द्यावा लागेल. सगळ्यात आधी तुमच्या दीदीला या दंडात सहभागी व्हावं लागेल. त्या असताना अशी घटना घडली, ही मोठी शरमेची गोष्ट आहे. माझी अशी इच्छा आहे, की त्यांनी दहा रुपये माझ्यापाशी जमा करावे.’
मुली अगदी स्तब्ध, शांत झाल्या. मला जरा तिरक्या मजरेने मॅडमकडे पहावसं वाटलं, पण हसू फुटलं, तर सगळा मुद्दामहून केलेल्या बनावाचा प्रभाव संपून जाईल.
`तुम्हा मुलींनाही या नुकसानीतला थोडा वाटा उचलावा लागेल. आपल्याकडे ७२ मुली आहेत. एक रामकुँवर आणि प्रायमरी स्कूलमधल्या मुली सोडल्या, तर संख्या होते ६०. प्रत्येक मुलगी उद्या सकाळी आठ आठ आणे दीदीपाशी जमा करेल.’ आणि मग माझ्याकडे बघत म्हणाल्या, `उद्या नऊवाजेर्पंत माझ्याकडे पैसे आले पाहिजेत. दहा रुपये दंड मी भरेन. माझ्या अनुशासनात जरूर काही तरी कमतरता राहिली असणार, म्हणून आपल्याला अशी खोडी काढाविशी वाटली. मी आशा करते, की भविष्यात मला भारी दंड भरावा लागणार नाही.’
मॅडम जाताच मुलींच्यात खुसफुस सुरू झाली. कुणी मॅडमची प्रशंसा करत होतं, कुणी चोराला शिव्या-शाप देत होतं. कुणी कुणी ही रामकुँवरचीच चलाखी आहे असे म्हणत होत्या. कुणी कुणी हे अन्यायकारक आहे, असेही म्हणत होत्या पण मॅडमनी खरोखरच इतकी सुंदर व्यवस्था केली होती, की दुसर्या दिवशी ९ वाजेपर्यंत सगळी रक्कम जमा झाली आणि रामकुँवरच्या फॉर्म भरण्यात कुठलीच अडचण आली नाही.
त्या दिवशी मॅडमच्या भाषणानंतर रामकुँवरच्या चेहर्यावर विषादाचे जे ढग जमा झाले, ते हटले नाहीत. तिच्या चेहर्यावर नेहमी विलसणारा प्रसन्नपणा कुठे तरी लोप पावला होता. ती विझल्या विझल्यासारखी झाली होती. मॅडमनी आपल्या कल्पनेप्रमाणे सर्वांना सांकेतिक शिक्षा केली होती, पण प्रत्यक्षात रामकुँवरच केवळ शिक्षा भोगत होती. असहाय्य मानसिक व्यथेने तिचं व्यक्तिमत्व करुण बनलं होतं. माझ्या अनुपस्थितीत मुली काही उपहासदेखील करत असतील, पण माझ्यापर्यंत काही तक्रार आली नाही.
जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात, दर महिन्याप्रमाणे तिच्या भावाची दहा रुपयाची मनीऑर्डर आली. तोच मालगाडीसारखा पत्ता.
नेहमीप्रमाणे मी हसत हसत रामकुँवरला बोलावलं. तिने सही केली. नोट घेतली. पण आपल्या खोलीत न जाता तिथेच उभी राहिली.
मी नेहमीप्रमाणे टेबलवर हिशेबाचं रजिस्टर पसरून बसले होते.
`दीदी’ तिने माझं लक्ष वेधून घेतलं.
`काय?’
तिने काही न बोलता पैसे टेबलावर ठेवले.
`हे काय?’
`आपले पैसे. आपण माझ्या फीसाठी त्यावेळी दिले होते.’ ती चाचरत म्हणाली.
`वेडीच आहेस! अग, तो तर माझा दंड होता. तो काय कुणी परत देतं? ‘
`मला माहीत आहे, तो कसला दंड होता. ती माझ्यासाठी वर्गणी गोळा केली जात होती. आपण माझे पैसे नाही ठेवून घेतलेत, तर मला खूप वाईट वाटेल.’
`तुला वेड लागलय. मला पैसे देऊन तू तुझा खर्च कसा चालवशील? आणि असं बघ, मी एकटीनं तर दिला नाही नं? बरोबर आहे नं?’
मी कदाचित तिच्या मर्माला स्पर्श केला. ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली. `सगळ्यांनी दिले. मला माहीत आहे. मी त्यांच्यासाठी काही करू शकणार नाही. त्यांच्या उपकाराची फेड कधीच करू शकणार नाही. दीदी, आपल्याला कल्पना नाही, मी या गोष्टीचा किती विचार करते. मी खरोखर कशाच्या तरी लायक असते…’
बाप रे! ही गोष्ट तिच्या मनात इतकी आतपर्यंत जाऊन बसली असेल, याची कल्पना नव्हती. योयोगाने मॅडम त्याच वेळी राउंडला आल्या होत्या आणि माझ्या खोलीच्या उंबरठ्याशी उभं राहून सगळं दृश्य बघतहोत्या.
`आता काय?’ माझ्या नजरेला नजर भिडवत त्यांनीविचारलं.
` या बुद्दूरामला समजावत होते. कशी बहकल्यासारखी बोलते आहे.’ असं म्हणत मी सगळी स्थिती समजावून सांगितली.
राउंड अर्धवट टाकूâन त्या माझ्या खोलीत येऊन बसल्या.
`रामकुँवर’
`जी…’
`वाल्मिकी रामायण वाचलयस?’
`अं… नाही.’ ती म्हणाली.
मला आश्चर्य वाटलं. आता हे रामायण मधेच कुठून टपकलं. मॅडम विनाकारण तर काही बोलणार नाहीत.
`आणखी थोडी मोठी झालीस की जरूर वाच. खूप चांगलं काव्य आहे्. अनेक हृदयस्पर्शी प्रसंग त्यात आहेत. जसं हा एक प्रसंग! हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेऊन लंकेतून परत येतो, तेव्हा श्रीराम गद्गद् होऊन म्हणतात, याच्या उपकाराची फेड कशी करावी? त्यांना काही कळत नाही. शेवटी ते म्हणतात, ‘उपकाराचं ओझं वागवत राहणंच चांगलं, कारण जेव्हा आपण उपकाराची परतफेड करू इच्छितो, तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे उपकारकर्त्यावर विपत्ती, संकट येवो, अशी कामना करतो, कारण का, तर उपकाराची परतफेड करता येईल. म्हणून उपकाराच्या परतफेडीची भावना सोडून दिली पाहिजे.’
‘कळलं ना रामकुँवर!’ मॅडम बोलायचं थांबताच मी म्हंटलं. `आता असले मूर्खपणाचे विचार मनातून काढून टाक आणि आभ्यासाला लाग. यावेळी टेस्टमध्ये तुला कमी मार्क मिळाले होते. ही काही चांगली गोष्ट नाही.’
यावर काहीच न बोलता ती हळूहळू खोलीबाहेर पडली. मला वाटलं, मॅडमनी किती सुंदर शब्दात तिला समजावून सांगितलं, कारण यानंतर हळूहळू तिचा चेहरा, तिचा व्यवहार पहिल्यासारखा सहज होऊ लागला. तिचं मनमोकळं हसू हॉस्टेलभर गुंजत राहिलं. मलाही सुटका झाल्यासारखं वाटलं.
फेब्रुवारीत अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी लिव्ह सुरू झाली होती. तसंही फायनलला असलेल्या मुलींवर माझा जीव जरा जास्तच जडतो. या सुट्टीच्या काळात चांगलं रामराज्य स्थापन व्हायचं. दिवसाचे चोवीस तास तर अभ्यास करणं शक्य नसायचं. मोठ्या मुश्किीलीने त्या दोन वाजेपर्यंत अभ्यास करायच्या. मग तर्हेतर्हेचे नाश्ते बनत, किंवा मग मागवले जात. छोटी छोटी प्रहसनं, नाटकं, नकला होत. रामकुँवर नेहमी मोठा घुंघट ओढून एक लोकनृत्य करायची, तेव्हा मुलींची हसून हसून पुरेवाट व्हायची. मला वाटलं, ती आता वर्गणी एकत्र केल्याची गोष्ट विसरून गेलीय. पण तो माझा भ्रम होता. लवकरच ही गोष्ट माझ्या लक्षात आली.
छोट्या वर्गातली एक मुलगी कुठून कुणास ठाऊक गालगुंडाचा आजार घेऊन आली. बघता बघता वसतिगृहात अजाराची रिले रेस सुरू झाली. त्यासगळ्यांची सुश्रुषा करता करता माझी आणि इतर स्टाफचीदमछाक झाली. खूप प्रयत्न करूनही आम्हाला प्रायव्हेट नर्स मिळाली नाही आणि सरकारी हॉस्पिटलच्या नरकात मुलींना पाठवायला मॅडम तयार नव्हत्या.
एक दिवस रामकुँवर मला म्हणाली, `दीदी, मला आपली मदत करू द्या नं!’
मी नेहमीप्रमाणेच तिला मधुर असं फटकारत म्हंटलं, `तुझी परीक्षा डोक्यावर येऊन ठेपलीय. अभ्यासाठी तसाही वेळ पुरेसा होत नाही आणि तुला इन्फेक्शन झालं तर?’
`आपण इन्फेक्शनची चिंता करू नका. मी या बाकीच्यांच्या प्रमाणे नाही. मला आजपर्यंत कधी ताप आला नाही. राहिली अभ्यासाची गोष्ट. मला फर्स्ट क्लास आजपर्यंत कधी मिळाला नाही. आताही मिळणार नाही. सेकंड क्लासची गॅरेंटी देते.’
तरीही नकारार्थी मान हलवली, तर ती धरणंच धरून बसली.
`ठीक आहे. मग मी पण अभ्यास करणार नाही. फेल झाले, तरी चालेल.’
या अनोख्या जिद्दीची गोष्ट मॅडमच्याही कानावर गेली. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मग मला म्हणाल्या, `जया तिच्या अबोध मनात सगळ्यांसठी काही ना काही करण्याची इच्छा घर करून राहिलीय. तिचं मन मोडू नको. . तिला सांग, की तिने तिच्या वर्गातील मुलींना अभ्यासात मदत करावी.’
क्रमश: २
मूळ लेखिका – सुश्री मालती जोशी
मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
२०२२ च्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीलाच लिखाण बंद करून मॅरेथॉनसाठी धावायचा सराव चालू केला. एक महिन्यापूर्वीच डेंगू आजारातून बाहेर आल्याने धावतांना जरा अशक्तपणा जाणवत होता. सुरवातीला खूपच कठीण वाटत होते. लिखाणासाठी रात्रीचे जागरण करायची सवय झाल्याने पहाटे पाच वाजता उठून धावायला जाणे जरा कठीणच जात होते, धावायला सुरवात केल्यावर जरा २०० मिटर ते ३०० मिटर धावल्यावर दमायला होत होते. पहिला आठवडा जरा तणावातच गेला. १६ फेब्रुवारी २०२० ला ठाण्यामध्ये ठाणे हिरानंदानी ही शेवटची २१.०२ किलोमीटर ची मॅरेथॉन धावलो होतो, त्यांनतर मार्चपासून लॉकडाऊन चालू झाले आणि आणि पुढची अडीच वर्षे म्हणजेच नोव्हेंबर २०२२ पर्यंत एकही मॅरेथॉन झाली नाही आणि मॅरेथॉन नसल्याने धावायची सवयही गेली होती. ह्या लॉकडाऊन काळात खूप लिखाणआणि चालणे झाले, तरी धावणे मात्र बंद झाले होते.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला, २० नोव्हेंबर २०२२ ला नेव्ही मॅरेथॉन मुंबईचा मेसेज आला आणि डोक्यात परत मॅरेथॉन धावायचे चक्र चालू झाले. मनात मॅरेथॉन धावायचे येणे आणि प्रत्यक्षात मॅरेथॉन धावणे ह्यातले अंतर कितीतरी कोसाचे आहे. तरीही दुसऱ्याच दिवशी पहाटे ५ वाजता उठून साडेपाचला धावण्याच्या सरावाला सुरवात केली. वाटले होते तेवढे सोप्पे नव्हते. जरा धावलो तरी थकायला होत होते. धावायचा सराव नसल्याने सगळेच अवघड वाटत होते. सुरवातीचा आठवडा असाच, नुसते सकाळच्या चालण्यातच गेला.
रोज डोळ्यासमोर आधी मिळालेली मॅरेथॉन मेडल्स दिसत होती. वयाच्या ५४ व्या वर्षी धावायला सुरवात करून डिसेंबर २०१४ ला गोव्याला १० किलोमीटर धाऊन मिळालेले माझे पहिले मॅरेथॉन मेडल मला खुणावत होते. त्याच्या बाजूला असलेले जानेवारी २०१५ ला स्टॅंडर्ड चार्टर्ड २१ किलोमीटर धावलेले मेडल मला स्फूर्ती देत होते. गेली दोन वर्षे मॅरेथॉन स्पर्धा झाल्या नसल्यातरी ऑक्टोबर २०२२ पर्यंत मिळालेली सगळी मिळून ४६ मेडल्स आणि दोन ट्रॉफी ह्यांचे प्रत्येकाचे एक स्वतःचे वजन होते, स्वतःचा संघर्ष होता, स्वतःची अशी एक गोष्ट होती. त्या प्रत्येक मेडल्सनी त्यांच्यासाठी मी घेतलेली मेहनत जवळून नुसती बघितली नव्हती तर त्यांनी माझ्या बरोबर ती अनुभवली होती आणि माझ्या प्रत्येक सेलिब्रेशनला माझ्या गळ्यात राहून मला साथ दिली होती. ती मेडल्स मला जोशात सांगत होती, “थांबू नकोस, हार मानू नकोस अजून ४ मेडल्ससाठी मेहनत घे म्हणजे आमचा ५० चा अर्ध शतकाचा टप्पा गाठल्याचे आम्हांला समाधान मिळेल.”
मोठ्या उत्साहाने दुसऱ्या दिवशी धावायला निघालो पण गती काही मिळत नव्हती. एखादे किलोमीटर धावलो तरी थकायला होत होते. ऑक्टोबर २०२२ महिन्याच्या मध्यावर आलो तरी मनासारखे धावणे होत नव्हते. २० नोव्हेंबरला आता एकच महिना उरला होता. २१ किलोमीटर मॅरेथॉन न करता १० किलोमीटर धावावे आणि एक मेडल घेऊन यावे असे मनात आले होते पण त्याच वेळी एकदा का १० किलोमीटर धाऊन खालच्या पायरीवर आलो तर परत २१ किलोमीटर धावणे कधीच जमणार नाही ह्याची भीती होती आणि… आणि शक्य होईल का नाही ह्याचा काहीही विचार न करता, जो वेड्यासारखा विचार, वयाच्या ५४ व्या वर्षी २०१४ ला केला होता त्याचेच पुन्हा अनुकरण करून नेव्ही मॅरेथॉन २१ किमी धावण्यासाठी रजिस्ट्रेशन केले. आता काहीही झाले तरी २१ किलोमीटर धावयाचेच असे मनाशी पक्के केले आणि दुसऱ्या दिवशीपासून जोमाने सरावाला सुरवात केली.
२०१४ ला धावणे जसे चालू केले होते तसेच म्हणजे हळूहळू दर दोन दिवसांनी, एक तर किलोमीटरमध्ये एक एक किलोमीटरची वाढ करायची किंवा किलोमीटर सारखे ठेवून, कमी वेळेत ते पार करायचे. असे करत पुढच्या १५ दिवसांत मी १० किलोमीटर पर्यंत पोचलो आणि माझा २१ कि मी धावण्याचा हरवलेला आत्मविश्वास मला परत मिळाला. पहिल्यासारखे जलद धावणे जमत नसले तरी २१ कि मी मॅरेथॉन मी पुरी करू शकतो ह्याची मला खात्री आली.
२० नोव्हेंबरला २०२२ नेव्ही मॅरेथॉन मुंबई, मी २१ कि मी धावायला सुरवात केली. सुरुवातीचे काही कि.मी. मी जोरात न पळता मध्यम गतीने धावत होतो. शक्तीचा जोर लाऊन धावायचे मी टाळत होतो. १५ किलोमीटर पर्यंत मला कसलाही त्रास नव्हता. थकायला झाले होते पण जिद्दीने मी स्वतःला पुढे नेत होतो पण १६ व्या कि मी नंतर अंगातली शक्ती गेली आणि पुढचा ५ कि मी चा रस्ता मला खुप कठीण गेला. कसे बसे मी २१ किलोमीटरची अंतिम रेषा गाठली तेव्हा वेळ नोंदवली गेली, २ तास ५५ मिनिट्स. आत्तापर्यंतच्या माझ्या मॅरेथॉन धाऊन नोंदविलेल्या वेळेचा तो नीचांक होता. माझे ४७ वे मॅरेथॉन मेडल माझ्या गळ्यात घातले गेले. ह्या ४७ व्या मेडलचे महत्व माझ्यासाठी, माझ्या २०१४ च्या पहिल्या मेडल सारखेच होते, फरक फक्त वयाचा होता आणि वयानुसार मिळालेल्या टायमिंगचा होता. माझे पहिले २१ कि मी मॅरेथॉन मी २ तास १४ मिनिटात पुरे केले होते. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण कसे धावतो ह्याला महत्व नसते तर तेथे जायचे, धावायचे आणि आपल्याला लक्ष असलेले अंतर धाऊन पुरे करून अंतिम रेषा गाठणे हेच खरे असते.
पुण्याहून आलेल्या माझ्या एका मैत्रिणीला मुद्दामून कारवारी जेवण खाऊ घालावे म्हणून कानडी मैत्रिणीकडे गेले. चित्रान्न (विशिष्ट प्रकारचा कानडी तिखट भात), केळय़ाच्या गोड पोळय़ा, तमळी (बेलाची कढी), कच्च्या पपईची मूगडाळ घातलेली कोशिंबीर, एकही थेंब तेल नसलेलं लोणचं असं बरंच काही तिने खाऊ घातलं आणि आपली व्यथा व्यक्त केली, ‘‘ मला स्वच्छ मराठी बोलता येत नाही याचं वाईट वाटतं ! मला लोक अजूनही मी ‘कानडी’ आहे म्हणून पाहतात. माझे मराठी हेल कानडी येतात. त्यांनी मला ओळखता कामा नये, मी मराठीच वाटले पाहिजे ’’.
आश्चर्याने केळय़ाच्या पोळीचा घास माझ्या हातातच राहिला. तुम्ही जन्माने कानडी आहात तर तसंच ओळखलं गेलात तर वैषम्य कसलं? तुमचे कानडी हेल ही तर श्रीमंती आहे. तसं तर संवादाच्या गरजेतून अनेकदा इतर भाषकांनी केलेले मराठी बोलण्याचे प्रयत्न हा मराठी भाषेचा एक आगळावेगळा साज आहे. त्या त्या भाषिकांच्या मातृभाषांचा गंध त्या त्या प्रदेशाचे हेल आणि उच्चार घेऊन आलेली मराठीची ही रूपं मला तरी श्रीमंत वाटतात!
कानडी घरात लग्न होऊन गेल्यावर मराठी स्त्रिया किती काळात कानडी शिकतील याचा अंदाज घेतला तर दोन-चार वर्षांत माझी बहीण, मैत्रीण शिकलेय असं पाच-सहा जणांनी सांगितले. महाराष्ट्रात लग्न होऊन आलेल्या, खेडय़ापाडय़ातल्या कानडी स्त्रिया मराठी हळूहळू शिकतात आणि सहज बोलू लागतात हा मात्र सर्वाचा अनुभव आहे. भाषेचा जन्म संवादाच्या गरजेतून झाला आहे. अशा इथं आलेल्या, या मातीशी एकरूप झालेल्या स्त्रिया हळूहळू का होईना मराठी शिकतात, हे किती अनमोल आहे. त्यांची मुलं दोन भाषा शिकतात, ही आणखी जमेची बाजू !
भले तुकाराम महाराजांनी ‘कानडीने केला मराठी भ्रतार एकाचे उत्तर एका न ये’ असा अभंग रचला असला तरी सुरुवातीचा हा काळ सरल्यावर ही कानडी स्त्री कर्माने मराठी होतेच की! गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमांचा सहवास मराठी भाषेला आहे. स्वाभाविकपणे त्या त्या सीमावर्ती महाराष्ट्रात जी मराठी बोलली जाते त्यात या भाषाभगिनींचा प्रभाव जाणवणारच.
जी. ए. कुलकर्णीच्या साहित्यातून कानडी शेजार डोकावतो. तसेच प्रकाश नारायण संत यांचा लंपन या भाषेतील अनेक शब्दांची ओळख आपल्याला करून देतो. ‘तो मी नव्हेच’मधील निपाणीचा व्यापारी लखोबा लोखंडे त्याच्या कानडी-मराठीने आपल्या लक्षात राहिलेला आहे. कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ येथील शिलालेखात ‘श्री चावुण्डराये करवियलें..’ हे वाक्य आढळलेले आहे.
मराठी भाषेला किमान सात-आठ शतकं झपाटून टाकणारी व्यक्तिरेखा कानडी आहे असं सांगितलं तर काय वाटेल? पण तसं खरंच आहे. मराठी संतकाव्याची सत्त्वधारा ज्या भक्तीपात्रातून वाहते तिच्या उगमस्थानी तर एक थेट ‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु’ असा कानडी माणूस निघाला ! नुसता माणूस नव्हे तर थेट राजाच ! तोही पंढरीचा ! ‘भाषा ही माणसाचं जीवन सहज, सुलभ आणि सजग करण्याचे साधन आहे. जीवन असह्य करून मिळवणारे साध्य नाही. तुमच्या कानडी जेवणाइतकीच मधुरता तुमच्या बोलण्यात आहे.’ असे त्या कारवारी मैत्रिणीला सांगितल्यावर ‘मुद्दुली चिन्ना’ म्हणून तिने माझ्यावर जे प्रेम केले ते मला मराठीइतकेच गोड भासले.
☆ सत्संग म्हणजे काय — ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना सहज विचारले- — ” देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय हो महिमा?”
यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले-
“सत्संगाचे काय फळ आहे तुला माहित आहे का?”
—कीटकाने त्यांचेकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला.
प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णाकडे आले, म्हणाले, “ देवा तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा.”
देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले, आणि ते म्हणाले, ” तेथे पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे. ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.” नारदमुनी त्या पोपटाचे पिलाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचेकडे पहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच.
नारदमुनी मनाशीच विचार करू लागले ‘ काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे. कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला? ते मृत्यू पावले.’
अत्यंत दु:खी होऊन ते पुन्हा श्रीकृष्णापाशी आले. म्हणाले, “देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू. पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत – अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात ?”
तेव्हा देव त्यांना म्हणाले, ” त्याची चिंता तू करू नकोस. तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा, नुकताच तिथे एका गाईने बछड्याला जन्म दिलाय.. तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.”
दु:खी अन्त:करणाने नारदांनी तेथे जावून त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला. त्यानेही नजर वळवून त्यांचे कडे पहिले आणि ते तेथेच लुढकले.
नारद मुनी घाबरून देवांकडे कडे परत आले. तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले, “राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आला आहे. त्याचे कडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल.”
नारदांनी विचार केला, ‘आतापर्यंत कीटक, पोपट, व बछड्याच्या मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही.. पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येवू शकतात.’
तथापि देवाचे भरवश्यावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले – “ सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो? “
प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला, “ मुनिश्रेष्ठ अजून आपण नाही समजलात ?
अहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो..आपण मला हा प्रश्न विचारला
आणि मी मेलो आणि पोपट झालो. नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो आणि मला बछड्याचा देह प्राप्त झाला. पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहामध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला — आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले. हे सर्व आपल्यासारख्या संतांच्या दर्शनाचेच फळ आहे. ज्यांना आपल्या सारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत.”
— नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाही कळला.
“नारायण नारायण” म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले, ” देवा जशी आपली लीला अगाध
तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आहे “
******म्हणून मित्रांनो जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे
**बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात.
**या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो.
**ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला.
**श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला.
**याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला.
***** आपण ज्या सोबत रहातो त्याच्या विचारांचा,रहाणीचा, वागणीचा, अंमल हा आपल्यावर होत असतो.
**संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात . संगत कशी हवी याचा विचार करावा…
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ अवकाळी विळखा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – श्री महादेव बी. बुरुटे ☆
कथासंग्रह: अवकाळी विळखा
लेखक: सचिन वसंत पाटील.
प्रकाशक: गवळी प्रकाशन, इस्लामपूर
पाने: २०४
किमंत: ३१० रुपये
श्री सचिन वसंत पाटील
शेतकऱ्यांच्या काळीज व्यथा : अवकाळी विळखा
विळखा म्हणजे मिठी ! या मिठीचे अनेक प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या कंबरेभोवती पडलेला अनेक संकटांचा विळखा म्हणजे जणू मगरमिठीच ! कितीही धडपड केली तरी सैल न होणारा अजगराचा विळखाच तो . हाडं खिळखिळी करुन त्यांचा भुगा केल्याशिवाय तृप्त न होणारा अक्राळविक्राळ…!! असाच प्रकर्षाने अनुभव येतो तो कथाकार सचिन वसंत पाटील यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला “अवकाळी विळखा” हा कथासंग्रह वाचताना. शेती, माती आणि शेतकरी यांची जीवा – शिवाची नाळ जन्मताच जुळलेली असते. कुठल्या ना कुठल्या विळख्यात ती आवळत जाते. बळीराजा या उपाधीने गौरवलेला बळीराजा नवीन अर्थव्यवस्थेत भरडला जातो, चिरडला जातो. आतल्या आत झुरत राहतो. त्यामुळे बळीराजा ही उपाधीच हास्यास्पद ठरली आहे कि काय, असे वाटू लागते.
या संग्रहातील सर्वच कथा शेतकऱ्यांच्या डोक्यावर लटकणाऱ्या टांगत्या तलवारीची भिषण सत्य वास्तवता अधोरेखित करत वाचकांना विचार करायला लावणाऱ्या आहेत. या अवकाळी विळख्यात ‘घुसमट’ कथेत आपणास परिस्थितीचे चटके सोसत द्विधा अवस्थेत होरपळणारा विलास भेटतो. शेती मातीवर आईप्रमाणे श्रद्धा असणारा विलास शेत विकण्याच्या सल्ल्याने काळजात फाटत जातो. पैसेवाल्यांच्या त्याच्या दारिद्र्याच्या जखमांवर मिठ चोळणारे उग्र शब्द आणि व्यवहाराने अंतरबाह्य घुसमटून जातो. कथा वाचताना तो विलास म्हणजे आपण कधी होतो हे कळतच नाही.
शेतीत पीक पेरुन त्याचं उत्पन्न हातात येईपर्यंत कोणकोणत्या दिव्व्यातून शेतकऱ्यांना जावे लागते. डोक्यावरील अनेक समस्यारुपी टांगत्या तलवारींचा प्राणपणाने सामना करावा लागतो. त्यातून तावून सुलाखून निघालं तर कुठे चार पैसे हातात पडतात, . मजुरांची टंचाई हाही अलिकडे भेडसावणारा प्रश्न, अर्थात विळखाच झाला आहे. निसर्गाचे तांडव आणि मजूर समस्या यात हवालदिल झालेला नामा ‘टांगती तलवार’ या कथेत बरंच काही सांगून जातो.
मातीत जन्मलेला आणि मातीतच विलीन होणारा एक सच्चा शेतकरी नारुकाका ‘सुर्यास्त’ या कथेत भेटतो. एक सच्च्या भुमिपुत्र असलेल्या नारुकाकाच्या भयानक वास्तववादी जगण्याची ही शोकांतिका आहे. पिढीतील अंतर आणि काळानुसार होणाऱ्या बदलात, निसर्ग बदलात त्या त्या पिढीतील लोकांची होणारी घुसमट या कथेत वाचून मन हेलावते. शेती-मातीवर नितांत श्रद्धा असलेल्या शेतकरी जीवनाचा अचूक वेध घेणारी ही कथा साहित्यिक मुल्ल्याच्या दृष्टीने अतिशय उच्च दर्जाची आहे.
कृत्रिम टंचाई आणि काळा बाजार ही तर नेहमीचीच समस्या ! ‘उद्रेक’ या कथेत रासायनिक खताची ऐन मोक्याच्या वेळी कृत्रिम टंचाई होते. शासकीय भ्रष्टाचारावर वैतागलेल्या शेतकऱ्यांच्या मनात कसा संताप येतो आणि त्यातून होणारा त्यांचा उद्रेक कसा व्यक्त होतो हे दाखविले आहे.
तसेच शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करुन पिकवलेल्या मालाचा फायदा दलाल उठवतात हे ‘तुपातली वांगी ‘ या कथेत दिसून येते. कर्ता धर्ता बळीराजा भिकेकंगाल राहतो हे सांगत असतानाच सचिन पाटील यांनी जर शेतकऱ्यांनी ही मधली दलालांची फळी मोडून काढली आणि आपला माल आपणच विकला तर शेतकरी व ग्राहक या दोघांनाही ते फायद्याचे ठरणार असल्याचा भविष्यकालिन दृष्टिकोण कथन केला आहे. आणि महत्वाचे म्हणजे तसा शेतकऱ्यांचा दृष्टिकोणही आज उदयास येताना दिसतो आहे.
या कथासंग्रहात ‘वाट’ कथेत ऊस शेतीची परिस्थिती आणि इतरांनी त्यात जाणून-बुजून नाडलेला हतबल पांडबा भेटतो. त्याची घरसंसाराचा मेळ घालण्यासाठी होणारी घुसमट पाहून मन द्रवते. ‘दिवसमान’ कथेत राबराब राबून मुलांच्या जवानीत आपल्याला सुख मिळेल या आशेवर वाटचाल केलेला महादेवबापु भेटतो. उतारवयातही पोरांच्या अविचारी कर्तव्याने त्याची पोटासाठी चाललेली धडपड पाहून अंतःकरण व्यथीत होते. ‘कष्टाची भाकरी’ कथेत द्राक्ष बागेतील नुकसानीने वैफल्यग्रस्त होवून व्यसनात बुडालेल्या विनायकला जेंव्हा शिक्षणाची खोटी प्रतिष्ठा सोडून कोणतेही काम करुन कष्टाची भाकरी मिळवण्यातली गोडी लागते हे वाचून मनाला दिलासा मिळतो.
नानाची कुस्तीतली ‘लढत’ ही खरी कुस्तीतली लढत नसून संसाररुपी कुस्ती जिंकण्याचा त्याचा प्राणपणाने चाललेला लढा असल्याचे जाणवते. घर फिरले की घराचे वासेही फिरतात याची प्रकर्षाने प्रचिती येते. तर ‘मैत्री’ कथेत अलिकडे फोफावलेल्या फसव्या स्किमा, त्यात होणारी फसगत, व्यसनाधिनता, नामदेवसारख्या स्वच्छ मनाच्या माणसाची मित्राने केलेली फसवणूक पहायला मिळते. ‘बुजगावणं’ कथेमध्ये झटपट मिळणाऱ्या पैशासाठी शेत एम. आय. डी. सी. ला देणारा अधुनिक पोरगा आणि या धक्क्याने वेडा झालेला वृद्ध शामूतात्या आहे.
‘सांभाळ रे… ‘ कथेत पंढरीच्या विठ्ठलाला भेटायला गेलेल्या विकाची विठ्ठलाभोवती पडलेल्या संधीसाधुंच्या गराड्यात होणारी घोर निराशा पहायला मिळते. पवित्र चंद्रभागेची केलेली गटारगंगा, श्रद्धा- अंधश्रद्धांच्यात अजूनही अडकलेला समाज वाचून मन उद्वीघ्न होते. याउलट ‘रान’ कथेत रानमातीच्या सुगंधासाठी असुसलेला सखाराम भेटला की मन आनंदते. शिर्षक कथेत अवकाळी विळख्यात बेचीराख झालेली शेती पाहिली की अंतःकरण करपल्याशिवाय राहत नाही. पण या अवकाळीला वृक्ष तोड हीच कारणीभूत असून आता झाडे लावली पाहिजेत हा विचार ऐकला की दिलासाही मिळतो.
या पुस्तकातील प्रसंग वाचताना लेखकाच्या सुक्ष्म निरीक्षण आणि वर्णन करण्याची खुबी वाचकाला खिळवून ठेवते. काही कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत. त्यातला आशय पुन्हा पुन्हा गडद होत वास्तवता अधोरेखित करत वाचकांना विचार करायला लावतो.
असा हा अतिशय बोलके आणि समर्पक मुखपृष्ठ असलेला कथासंग्रह ‘अवकाळी विळखा’. यातील शेतकरी अनेक संकटात अडकुन सुद्धा शेती माती व शेतकरी यांची नाळ तुटू न देता सुखेनैव वाटचालीची बीजे रुजवणारा आहे. हा कथासंग्रह नक्कीच वाचनीय आणि विचारप्रवर्तक झाला आहे हे मला अभिमानपुर्वक नमूद करावेसे वाटते.
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख अनुभव और निर्णय। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 173☆
☆ अनुभव और निर्णय☆
अगर आप सही अनुभव नहीं करते, तो निश्चित् है कि आप ग़लत निर्णय लेंगे–हेज़लिट की यह उक्ति अपने भीतर गहन अर्थ समेटे है। अनुभव व निर्णय का अन्योन्याश्रित संबंध है। यदि विषम परिस्थितियों में हमारा अनुभव अच्छा नहीं है, तो हम उसे शाश्वत् सत्य स्वीकार उसी के अनुकूल निर्णय लेते रहेंगे। उस स्थिति में हमारे हृदय में एक ही भाव होता है कि हम आँखिन देखी पर विश्वास रखते हैं और यह हमारा व्यक्तिगत अनुभव है–सो! यह ग़लत कैसे हो सकता है? निर्णय लेते हुए न हम चिन्तन-मनन करना चाहते हैं; ना ही पुनरावलोकन, क्योंकि हम आत्मानुभव को नहीं नकार सकते हैं?
मानव मस्तिष्क ठीक एक पैराशूट की भांति है, जब तक खुला रहता है, कार्यशील रहता है–लार्ड डेवन का यह कथन मस्तिष्क की क्रियाशीलता पर प्रकाश डालता है और उसके अधिकाधिक प्रयोग करने का संदेश देता है। कबीरदास जी भी ‘दान देत धन न घटै, कह गये भक्त कबीर’ संदेश प्रेषित करते हैं कि दान देते ने से धन घटता नहीं और विद्या रूपी धन बाँटने से सदैव बढ़ता है। महात्मा बुद्ध भी जो हम देते हैं; उसका कई गुणा लौटकर हमारे पास आता है–संदेश प्रेषित करते हैं। भगवान महाबीर भी त्याग करने का संदेश देते हैं और प्रकृति का भी यही चिरंतन व शाश्वत् सत्य है।
मनुष्य तभी तक सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम, सर्वगुण-सम्पन्न व सर्वपूज्य बना रहता है, जब तक वह दूसरों से याचना नहीं करता–ब्रह्मपुराण का भाव, कबीर की वाणी में इस प्रकार अभिव्यक्त हुआ है ‘मांगन मरण एक समान।’ मानव को उसके सम्मुख हाथ पसारने चाहिए, जो सृष्टि-नियंता व जगपालक है और दान देते हुए उसकी नज़रें सदैव झुकी रहनी चाहिए, क्योंकि देने वाला तो कोई और…वह तो केवल मात्र माध्यम है। संसार में अपना कुछ भी नहीं है। यह नश्वर मानव देह भी पंचतत्वों से निर्मित है और अंतकाल उसे उनमें विलीन हो जाना है। मेरी स्वरचित पंक्तियाँ उक्त भाव को व्यक्त करती हैं…’यह किराये का मकान है/ जाने कौन कब तक ठहरेगा/ खाली हाथ तू आया है बंदे/ खाली हाथ तू जाएगा’ और ‘प्रभु नाम तू जप ले रे बंदे!/ वही तेरे साथ जाएगा’ यही है जीवन का शाश्वत् सत्य।
मानव अहंनिष्ठता के कारण निर्णय लेने से पूर्व औचित्य- अनौचित्य व लाभ-हानि पर सोच-विचार नहीं करता और उसके पश्चात् उसे पत्थर की लकीर मान बैठता है, जबकि उसके विभिन्न पहलुओं पर दृष्टिपात करना आवश्यक होता है। अंततः यह उसके जीवन की त्रासदी बन जाती है। अक्सर निर्णय हमारी मन:स्थिति से प्रभावित होते है, क्योंकि प्रसन्नता में हमें ओस की बूंदें मोतियों सम भासती हैं और अवसाद में आँसुओं सम प्रतिभासित होती हैं। सौंदर्य वस्तु में नहीं, दृष्टा के नेत्रों में होता है। इसलिए कहा जाता है ‘जैसी दृष्टि, वैसी सृष्टि।’ सो! चेहरे पर हमारे मनोभाव प्रकट होते हैं। इसलिए ‘तोरा मन दर्पण कहलाए’ गीत की पंक्तियाँ आज भी सार्थक हैं।
दोषारोपण करना मानव का स्वभाव है, क्योंकि हम स्वयं को बुद्धिमान व दूसरों को मूर्ख समझते हैं। परिणामत: हम सत्यान्वेषण नहीं कर पाते। ‘बहुत कमियाँ निकालते हैं/ हम दूसरों में अक्सर/ आओ! एक मुलाकात/ ज़रा आईने से भी कर लें।’ परंतु मानव अपने अंतर्मन में झाँकना ही नहीं चाहता, क्योंकि वह आश्वस्त होता है कि वह गुणों की खान है और कोई ग़लती कर ही नहीं सकता। परंतु अपने ही अपने बनकर अपनों को प्रताड़ित करते हैं। इतना ही नहीं, ‘ज़िन्दगी कहाँ रुलाती है/ रुलाते तो वे लोग हैं/ जिन्हें हम अपनी ज़िन्दगी समझ बैठते हैं’ और हमारे सबसे प्रिय लोग ही सर्वाधिक कष्ट देते हैं। ढूंढो तो सुक़ून ख़ुद में है/ दूसरों में तो बस उलझनें मिलेंगी। आनंद तो हमारे मन में है। यदि वह मन में नहीं है, तो दुनिया में कहीं नहीं है, क्योंकि दूसरों से अपेक्षा करने से तो उलझनें प्राप्त होती हैं। सो! ‘उलझनें बहुत हैं, सुलझा लीजिए/ बेवजह ही न किसी से ग़िला कीजिए’ स्वरचित गीत की पंक्तियाँ उलझनों को शीघ्र सुलझाने व शिक़ायत न करने की सीख देती हैं।
उत्तम काम के दो सूत्र हैं…जो मुझे आता है कर लूंगा/ जो मुझे नहीं आता सीख लूंगा। यह है स्वीकार्यता भाव, जो सत्य है और यथार्थ है उसे स्वीकार लेना। जो व्यक्ति अपनी ग़लती को स्वीकार लेता है, उसके जीवन पथ में कोई अवरोध नहीं आता और वह निरंतर सफलता की सीढ़ियों पर चढ़ता जाता है। ‘दो पल की है ज़िन्दगी/ इसे जीने के दो उसूल बनाओ/ महको तो फूलों की तरह/ बिखरो तो सुगंध की तरह ‘ मानव को सिद्धांतवादी होने के साथ-साथ हर स्थिति में खुशी से जीना बेहतर विकल्प व सर्वोत्तम उपाय है।
बहुत क़रीब से अंजान बनके निकला है/ जो कभी दूर से पहचान लिया करता था–गुलज़ार का यह कथन जीवन की त्रासदी को इंगित करता है। इस संसार म़े हर व्यक्ति स्वार्थी है और उसकी फ़ितरत को समझना अत्यंत कठिन है। ज़िन्दगी समझ में आ गयी तो अकेले में मेला/ न समझ में आयी तो भीड़ में अकेला…यही जीवन का शाश्वत् सत्य व सार है। हम अपनी मनस्थिति के अनुकूल ही व्यथित होते हैं और यथासमय भरपूर सुक़ून पाते हैं।
तराशिए ख़ुद को इस क़दर जहान में/ पाने वालों को नाज़ व खोने वाले को अफ़सोस रहे। वजूद ऐसा बनाएं कि कोई तुम्हें छोड़ तो सके, पर भुला न सके। परंतु यह तभी संभव है, जब आप इस तथ्य से अवगत हों कि रिश्ते एक-दूसरे का ख्याल रखने के लिए होते हैं, इस्तेमाल करने के लिए नहीं। हमें त्याग व समर्पण भाव से इनका निर्वहन करना चाहिए। सो! श्रेष्ठ वही है, जिसमें दृढ़ता हो; ज़िद्द नहीं, दया हो; कमज़ोरी नहीं, ज्ञान हो; अहंकार नहीं। जिसमें इन गुणों का समुच्चय होता है, सर्वश्रेष्ठ कहलाता है। समय और समझ दोनों एक साथ किस्मत वालों को मिलती है, क्योंकि अक्सर समय पर समझ नहीं आती और समझ आने पर समय निकल जाता है। प्राय: जिनमें समझ होती है, वे अहंनिष्ठता के कारण दूसरों को हेय समझते हैं और उनके अस्तित्व को नकार देते हैं। उन्हें किसी का साथ ग़वारा नहीं होता और एक अंतराल के पश्चात् वे स्वयं को कटघरे में खड़ा पाते हैं। न कोई उनके साथ रहना पसंद करता है और न ही किसी को उनकी दरक़ार होती है।
वैसे दो तरह से चीज़ें नज़र आती हैं, एक दूर से; दूसरा ग़ुरूर से। ग़ुरूर से दूरियां बढ़ती जाती हैं, जिन्हें पाटना असंभव हो जाता है। दुनिया में तीन प्रकार के लोग होते हैं–प्रथम दूसरों के अनुभव से सीखते हैं, द्वितीय अपने अनुभव से और तृतीय अपने ग़ुरूर के कारण सीखते ही नहीं और यह सिलसिला अनवरत चलता रहता है। बुद्धिमान लोगो में जन्मजात प्रतिभा होती है, कुछ लोग शास्त्राध्ययन से तथा अन्य अभ्यास अर्थात् अपने अनुभव से सीखते हैं। ‘करत- करत अभ्यास के जड़मति होत सुजान’ कबीरदास जी भी इस तथ्य को स्वीकारते हैं कि हमारा अनुभव ही हमारा निर्णय होता है। इनका चोली-दामन का साथ है और ये अन्योन्याश्रित है।
(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “आराधना…”।)
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मर्यादापुरुषोत्तम श्रीराम को समर्पित आपदां अपहर्तारं साधना गुरुवार दि. 9 मार्च से श्रीरामनवमी अर्थात 30 मार्च तक चलेगी।
💥 इसमें श्रीरामरक्षास्तोत्रम् का पाठ होगा, साथ ही गोस्वामी तुलसीदास जी रचित श्रीराम स्तुति भी। आत्म-परिष्कार और ध्यानसाधना तो साथ चलेंगी ही।💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈