मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ☆ पुस्तक “रतन टाटा.. एक दीपस्तंभ” – लेखक : शंतनू नायडू – अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆
☆ पुस्तक “रतन टाटा.. एक दीपस्तंभ” – लेखक : शंतनू नायडू – अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆
पुस्तक : रतन टाटा.. एक दीपस्तंभ
लेखक : शंतनू नायडू
अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके
प्रकाशन : मंजुळ प्रकाशन
पृष्ठे : 235
मूल्य : 399₹
नितांत सुंदर पुस्तक. रतन टाटा यांच्यासोबत ज्याने काही काळ एकत्र व्यतित केला आहे. (एकुणात श्री रतन टाटा यांच्या विषयी मनात आदरच होता परंतु, शंतनू विषयी इंटरनेटवर, काहीबाही छापून येत असे. यु ट्यूब वर रिल्स येत असत, त्यामुळे त्यांच्याविषयी वेगवेगळ्या चुकीच्या धारणा माझ्या कडून केल्या गेल्या होत्या. त्या सर्व शंकांचं निरसन हे पुस्तक वाचताना झालं. ) अशा शंतनू नायडू याने आपल्या सहज सुंदर शब्दांतून त्याचे व श्रीयुत रतन टाटा या एकमेकांचे नाते तर उलगडून दाखवले आहेच. सोबत रतन टाटा यांच्या स्वभावाची दुसरी बाजूही सुंदर मांडली आहे.
आपणाला श्री रतन टाटा हे अस्सल भारतीय व भारतीयांवर नितांत प्रेम करणारे, संकट काळात भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, कोरोनासारख्या जागतीक महामारित सरकारला मोठी देणगी देणारे, फक्त देणगी देऊन न थांबता इतरही गोष्टी द्वारे समाजसेवा करणारे, एका कुटुंबाला टु व्हिलर वरुन जात असता नॅनो कारची संकल्पना मांडणारे व ती प्रत्यक्षात आणणारे आणि बरंच काही आपणाला माहीत आहे.
शंतनू नायडू यांनी आपल्या या पुस्तकातून श्री रतन टाटा यांच्या स्वभावाचे विविध कंगोरे उलगडून दाखवले आहेत. मूळातूनच या पुस्तकाद्वारे शंतनू व श्री. रतन टाटा यांचा सहप्रवास या पुस्तकाद्वारे वाचायला हवा.
श्रीयुत रतन टाटा यांची पहिली भेट, त्याच्या स्टार्टअप मोटोपॉजचे काम, त्याचे कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण, जेथे स्वतः श्री रतन टाटा यांनी शिक्षण घेतलं आहे. तेथील अनुभव, त्या काळातील टाटांचा आधार, तेथून परत भारत, टाटा ट्रस्ट चे काम, ते त्यांचा जवळचा मित्र, ते कार्यालयातील त्यांचा खाजगी सचिव. शंतनू चे आई वडील, मित्र मंडळी, विविध मंडळींची वेळोवेळी झालेली मदत, त्याचे श्वानप्रेम आणि बरंच काही…
अतिशय नितांत सुंदर पुस्तक वाचल्याचा आनंद नक्कीच हे पुस्तक देते. आणि हो या पुस्तकातील रेखाचित्रे संजना देसाई यांनी अप्रतिम अशी रेखाटली आहेत. पुस्तकातील अनुभव वाचकांच्या मनात जीवंत करण्यात त्या या रेखाचित्रांद्वारे यशस्वी झाल्या आहेत.
एका दीपस्तंभाची कथा भावी होऊ घातलेल्या भविष्यातील दीपस्तंभाकडून लिहिलेली कथा मुळातूनच वाचायलाच हवी.
परिचय – श्री ओंकार कुंभार
श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.
मो.नं. 9921108879
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈