(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनका संस्मरणीय आलेख चौथा कमरा। प्रत्येक साहित्यकार को जीवन में कई क्षणों से गुजरना होता है। कुछ कौतूहल के तो कुछ आलोचनाओं के; कभी प्रशंसा तो कभी हिदायतें। सुश्री प्रभा जी ने इन सभी को बड़े सहज तरीके से अपने जीवन में ही नहीं साहित्य में भी जिया है। सुश्री प्रभा जी का साहित्य जैसे जैसे पढ़ने का अवसर मिल रहा है वैसे वैसे मैं निःशब्द होता जा रहा हूँ। हृदय के उद्गार इतना सहज लिखने के लिए निश्चित ही सुश्री प्रभा जी के साहित्य की गूढ़ता को समझना आवश्यक है। यह गूढ़ता एक सहज पहेली सी प्रतीत होती है। हमारी समवयस्क पीढ़ी में शायद ही कोई साहित्यकार हो जो स्व. अमृता प्रीतम जी के साहित्य से प्रभावित न हुआ हो। संस्मरणीय आलेख में चौथा कमरा निर्मित करने की परिकल्पना अद्भुत है। सुश्री प्रभा जी का पुनः आभार अपने संस्मरण साझा करने के लिए। आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 13 ☆
☆ चौथा कमरा ☆
आयुष्य कथा, कविता ,कादंबरी कशातही न मावणारं….कथा लिहिल्या, कविता लिहिल्या….कादंबरी नाही लिहिली अजून….एक खुप जुनी कविता आठवते मी लिहिलेली….
न गीत बन सका, न गजल बनी.
पूरी न हो सकी अधूरी कहानी…
शाळेत असताना रचलेली ही कविता…कविता आयुष्यभर साथ देईल असं तेव्हा वाटलं नव्हतं!
अमृता प्रीतम…एक आवडतं व्यक्तिमत्व, आयुष्य मनःपूत जगलेली स्त्री! “चौथा कमरा” ही अमृता प्रीतम ची संकल्पना आमच्या पिढीतल्या मध्यमवर्गीय स्त्रीला विचार करायला लावणारी,
मी जेव्हा स्वतःचा विचार करते तेव्हा जाणवतं, मी ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आले आहे, तिथे शक्यच नव्हतं, कविता करणं, कार्यक्रमात भाग घेणं, मैत्रीणींबरोबर कार्यक्रमांसाठी गावोगावी जाणं.. .. ..
पण माझ्याबाबतीत स्वतंत्रवृत्तीची ही बीजं लहानपणीच रूजली होती, वाचनातून, रेडिओ सारख्या प्रसारमाध्यमातून…मी माझ्या जवळच्या अगदी जिवाभावाच्या मैत्रीणीच्या घराशी…एका ख्रिश्चन कुटुंबाशी जोडले गेले होते, ते एक सुखी, प्रेमळ आणि एकमेकांशी आदराने वागणारं कुटुंब होतं!
घरात आईवडिलांचा धाक होता.
विसाव्या वर्षी लग्न ठरलं, सासर जुन्या वळणाचं….
घर संसार हेच इतिकर्तव्य असायला हवं होतं, पण विरोध पत्करून घराबाहेर पडले…संसाराकडे थोडंफार दुर्लक्ष झालंही असेल पण सगळी कर्तव्य पार पाडली…कुचंबणा, अवहेलना, अपमान सहन करावे लागले,
पण थोडंफार मनासारखं जगता आलं ….
संधी मिळत गेल्या…साधारण १९८८ साली.. एका दिवाळी अंकाचं संपादन करायची जबाबदारी मिळाली पहिल्यावर्षी पाचशे रुपये मानधन मिळालं ते वाढत वाढत पाच हजारापर्यंत गेलं….
स्वतःचा दिवाळी अंक सुरु केला चार वर्षे चालविला पण आर्थिक गणितं जमेनात मग बंद केला!
फार काही भव्य दिव्य करता आलं नाही पण “चौथा कमरा” निर्माण करता आल्याचे समाधान निश्चितच आहे, पण ही सगळी वाटचाल एकटीची ….प्रतिकुल परिस्थितीत केलेली… छंद जपता आले…स्वतःचं वेगळेपण जपता आलं हे ही नसे थोडके….. १९८८ सालापासूनची म्हणजे लग्नानंतर दहा वर्षांनी उंबरठा ओलांडल्यानंतरची कारकीर्द समाधानी, तृप्त…!!
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११
मोबाईल-9270729503