कवी श्री सुजित कदम.
मोबाइल एक चिंतन. . . .
(e-abhivyakti में श्री सुजित कदम जी का स्वागत है। प्रस्तुत है उनका मोबाइल फोन पर एक आलेख)
मोबाइल फोन्स हे आजच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे.मोबाईल . . . एक जीवनावश्यक वस्तू. जितके फायदे तितके तोटे. आपली मुले या तंत्रज्ञान विश्वात हुशार झाली आहेत. पूर्ण वाक्य स्पष्ट पणे बोलू न शकणारा तीन वर्षाचा छोकरा आज चित्रे पाहून हवी ती गेम डाऊनलोड करून खेळत बसू शकतो. हा मोबाईल एकमेकांशी होणारा संवाद कमी करतो पण मेसेज मधून यात्रीक किंवा छापील संवाद साधतो.
ज्या दिवसांमध्ये मोबाइल फोनला लक्झरी वस्तू म्हणून मानले गेले ते दिवस गेले. मोबाईल उत्पादकांमधील वाढत्या स्पर्धेमुळे मोबाईल फोन्सच्या किमती इतकी कमी झाल्या आहेत की आजकाल मोबाईल फोन खरेदी करणे फारसे काही नाही. फक्त काही पैसा खर्च करा आणि आपण मोबाइल फोनचा गर्व मालक आहात. आजच्या काळात, मोबाईल फोन नसलेल्या व्यक्तीस शोधणे फार कठीण आहे. लहान गॅझेट ही जीवनाची मूलभूत गरज आहे. पण मोबाईल फोनची मूलभूत गरज म्हणून टॅग का करतात? आपल्या आयुष्यातील मोबाईल फोनचे महत्व काय आहे? येथे उत्तर आहे.
काही वर्षापूर्वी चिठ्ठी, संदेश, पत्र यातून संपर्क साधला जात असे. बिनतारी संदेश यंत्रणा अस्तित्वात आली. टेलिग्राम युगानंतर निवासी दूरध्वनी लॅन्ड लाईन अस्तित्वात आले. यानंतर वायरलेस फोन ची संकल्पना कार्यरत झाली. त्याची जागा आता मोबाईल, स्मार्ट फोन यांनी घेतली आहे.
आजच्या युगात मोबाईल हे मनोरंजनाचे महत्त्व पूर्ण साधन बनले आहे. सावली पेक्षा ही जास्त जवळची वस्तू म्हणून मोबाईल ने स्थान पटकावले आहे. हा मोबाईल चा वापर सवयी चा गुलाम बनला आहे. 1973 मध्ये पहिला मोबाईल अस्तित्वात आला. भारतात त्याचे आगमन 1995 साली झाले. हा भ्रमणध्वनी आता केवळ संपर्क साधण्याचे माध्यम नसून गजराचे घड्याळ, विविध समारंभाची क्षणचित्रे, चित्रफीती, व्हिडिओ गेम्स, विविध सोशल नेटवर्किंग चे संदेश, ई मेल यंत्रणा, आणि जुन्या नव्या काळाची, कलेची, साहित्याची सांगड मोबाईल ने घातली आहे.
आज खेळण्याची जागा मोबाईल ने घेतली आहे. मुलांना मोबाईल दिला की घर शांत रहाते हे आजचे वास्तव आहे. क्षणभरात हव्या त्या विषयावर मार्गदर्शन, माहिती हा मोबाईल पुरवतो. मोबाईल टेक्नॉलॉजी कडे वैज्ञानिक चमत्कार म्हणून पाहिले जाते. नव्या जुन्या मित्रांना एकत्र येण्याची संधी या मोबाईल ने दिली आहे.
एखाद्या गावी जाताना स्वतःचे वाहन घेऊन निघालो की हा मोबाईल जगभरातील कुठल्याही ठिकाणी आपल्याला सुरक्षीत पोचवू शकतो. शालेय अभ्यास क्रमा व्यतिरिक्त अवांतर कला,क्रीडा, विज्ञान चे अद्ययावत ज्ञान हा मोबाईल देतो. हे फायदे मोबाइल चे जगाचा वेध घरबसल्या घेत आहेत . आज दूर राहूनही आपण एकमेकाच्या संपर्कात आहोत ते मोबाइल मुळे.
मोबाइल मुळे गुन्हे गारी विश्वात वचक बसला आहे. सी सी टि व्ही यंत्रणेने तपास कार्यात सोयी सुविधा निर्माण झाली आहे.
अस मोबाइल कौतुक होत असले तरी सर्वात जास्त नुकसान शालेय विद्यार्थांचे होत आहे. अभ्यासातील लक्ष कमी होऊन अनेक गेम्स, व्हिडिओ यातून शालेय शिक्षणापासून आपला पाल्य दुरावण्याची भिती निर्माण झाली आहे. वेळेचा अपव्यय या मोबाईल मुळे होतो आहे. आपण पालकांनी मोबाइल चा काळजीपूर्वक वापर केला तरच नवी पिढी मोबाईल चा अतिरेक टाळेल.
आपण मुलांना घडवताना चिऊ काऊचा घास भरवायचो. मोबाइल टॉवर च्या रेडिएशन मुळे या पाखरांची संख्या कमी झाली आहे. मोबाईल किरणांचा दुष्परिणाम विविध मानसिक ताणतणावात होतो आहे.
घरातले खेळीमेळीचे वातावरण या मोबाईल मधल्या खेळांनी हिरावून घेतले आहे. लहान वयात पाल्यांना चष्मा लागण्याचा धोका या मोबाईल मुळे निर्माण झाला आहे.
अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मुले हट्टी झाली आहेत. मोठय़ांचा अनादर करण्याची वृत्ती मुलांमध्ये बळावलीआहे. खोट बोलण्याची सवय या मोबाईल ने आबाल वृद्धांना लावली आहे. कॅशलेस व्यवहारात मोबाइल खूप महत्त्व पूर्ण कामगिरी बजावतो आहे.
हा मोबाईल जीवलग तर आहेच त्याला जीव किती लावायचा हे मात्र जागरूक नागरिक आणि जागरूक पालक या नात्याने आपण ठरवायची वेळ आली आहे. .
© सुजित कदम. पुणे
मोबाइल 7276282626.