ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ स्मृतिशेष डॉ. राजकुमार तिवारी ‘सुमित्र’ विशेष ☆ हेमन्त बावनकर ☆

💐 ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ स्मृतिशेष डॉ. राजकुमार तिवारी ‘सुमित्र’ विशेष ☆ हेमन्त बावनकर 💐

हेमन्त बावनकर

प्रिय मित्रों,

एक वर्ष के बाद भी ऐसा नहीं लगता कि सुमित्र जी नहीं रहे। ऐसा लगता है कि उनसे कल ही तो बात हुई थी। किन्तु, मृत्यु तो अटल सत्य है जिसे अस्वीकार नहीं किया जा सकता। वे अपने स्वजनों को शारीरिक रूप से अवश्य छोड़ कर चले गए किन्तु, उनकी स्मृतियाँ सदैव उनकी पीढ़ी एवं वर्तमान पीढ़ी के मस्तिष्क में आजीवन रहेंगी।

सुमित्र जी से पहली मुलाक़ात मेरे स्व. पिताश्री टी डी बावनकर जी (सुमित्र जी के मित्र) के साथ 1982 की एक शाम को उनके निवास पर हुई। उसके बाद एक ऐसा संबंध बना जो आजीवन चलता रहेगा। उनके द्वारा प्रकाशित मेरी प्रथम कहानी “चुभता हुआ सत्य’ नवीन दुनिया के पाक्षिक तरंग के प्रवेशांक में प्रकाशित हुई थी। उनके पत्र एवं तरंग की प्रति मेरे पास अभी तक सुरक्षित है।

मेरी उपरोक्त स्मृति तो मात्र एक प्रतीकात्मक उदाहरण है, उनसे जुडने वाले अनेकों मित्रों का जिन्हें उन्होने आजीवन अपना आत्मीय स्नेह और मार्गदर्शन दिया है। ऐसी अनेक कहानियाँ और संस्मरण आपको संस्कारधानी के साहित्य जगत में ही नहीं अपितु सारे विश्व के कई मित्रों में मिलेगी।

ई-अभिव्यक्ति के प्रथम अंक के लिए उनके आशीष स्वरूप प्राप्त कविता उद्धृत कर रहा हूँ जो मुझे ई-अभिव्यक्ति के सम्पादन में सदैव सकारात्मक मार्गदर्शन देती रहती है।

संकेतों के सेतु पर

साधे काम तुरंत |

दीर्घवयी हो जयी हो

कर्मठ प्रिय हेमंत

काम तुम्हारा कठिन है

बहुत कठिन अभिव्यक्ति

बंद तिजोरी सा यहां

दिखता है हर व्यक्ति

मनोवृति हो निर्मला

प्रकटें निर्मल भाव

यदि शब्दों का असंयम

हो विपरीत प्रभाव ||

सजग नागरिक की तरह

जाहिर हो अभिव्यक्ति

सर्वोपरि है देशहित

बड़ा न कोई व्यक्ति|

स्थान – दिल्ली 15 /10/18

मित्र श्री संतोष नेमा जी ने हाल ही में ‘सुमित्र संस्मरण’ प्रकाशित किया है। जिसमें 60 से अधिक लोगों के संस्मरण प्रकाशित किए गए हैं। श्री नेमा जी के शब्दों में ही “साहित्य के गंभीर अध्येता, अद्भुत रचनात्मकता, माधुर्य व्यवहार के चलते उनके हजारों चाहने वाले हैं जिनके दिलों में राजकुमार की तरह राज करते हैं. इस बात से अंदाजा लगाया जा सकता है कि उनकी श्रद्धांजलि सभा में भीड़ में उपस्थित हर एक आदमी अपनी भावांजलि देने के लिए आतुर था. जब मैंने यह देखा तब उसी क्षण मेरे मन में यह विचार आया की क्यों ना एक सुमित्र संस्मरण का प्रकाशन किया जाए जिसमें उनके प्रति सभी साहित्यकारों के संस्मरण एवं भाव समाहित किए जा सकें.”

सुमित्र जी के अनेकों स्वजनो के अनेकों संस्मरण हैं जो आजीवन उनकी याद दिलाते रहेंगे। उनकी प्रथम पुण्यतिथि पर यह विशेष संस्करण भी मात्र एक प्रतीक ही है।

इस प्रयास में हम आपके संस्मरणों/विचारों को श्रद्धासुमन स्वरूप स्मृतिशेष डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’ जी को समर्पित करते है।  

बस इतना ही।

हेमन्त बावनकर, पुणे 

वर्तमान में बेंगलुरु से 

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “महाशिवरात्र“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ महाशिवरात्र ☆ श्री सुहास सोहोनी

(वृत्त : कटाव)

श्री सोमेश्वर, आदिनाथ तू,

गौरीहर तू, सांब सदाशिव …

🌺

झर झर नादे गंगा वाहत ..

डम डम डमरू ध्वनि उच्चारित ..

नाद घुमत जणु अनाहताचा ..

त्रिलोक व्यापी हुंकाराचा ..

🌺

भस्मविलेपित काया बळकट

त्रिशूलधारी हस्तहि दणकट

रुद्र रूप तव क्रुद्ध भयंकर

तड तड तांडव हलवि चराचर

🌺

चंद्रकोर मस्तकी विराजित

नागफणा कंठाला वेष्टित

रुद्राक्षांची माला शोभत

व्याघ्रचर्म हे वस्त्र लपेटित

🌺

उत्कर्षाप्रति विनाशातुनी

सृजन साधण्या विलयामधूनी

करि निर्दालन दुष्ट खलांचे

हीच प्रार्थना मम तव चरणी

🌺

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

दि. २६-२-२०२५.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पंचारती… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “पंचारती…” ☆  डॉ. शैलजा करोडे

(अष्टाक्षरी)

माय मराठी आमची

झाली आज अभिजात

ओवाळून पंचारती

करू तियेचे स्वागत

*

अमृताते पैजा जिंके

ज्ञानदेव वर्णी ख्याती

तुकयाच्या अभंगाची

काय वर्णावी महती

*

नाणेघाटी शिलालेख

लेणी पर्वती मिळाले

भाषा आहे ही प्राचीन

किती द्यावेत दाखले

*

माय मराठी आमची

मना मनात वसते

गोडी अवीट अमिट

जना जनात रूजते

*

संत साहित्य ते थोर

तुकाराम ज्ञानेश्वर

सारस्वती मांदियाळी

गडकरी खांडेकर

*

जन मानस मराठी

महाराष्ट्री संस्कृतीस

ओवाळून पंचारती

करू साजरे क्षणास

© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आरती खऱ्या खोट्याच्या सीमारेषेवर घुटमळत होती… “समीरच्या सगळ्या आठवणी मनात रुतून बसल्यात हो माझ्याs. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी मिटल्या डोळ्यांसमोर हात पुढे पसरुन माझ्याकडे येण्यासाठी झेपावत असतो तोss! आपल्याला मुलगा झाला तर तो समीरच आहे कां हे फक्त मीच सांगू शकेन.. तुम्ही कुणीही नाहीss.. ” भावनावेगाने स्वतःलाच बजावावं तसं ती बोलली आणि ऊठून आत निघून गेली.. !!

आता या सगळ्यातून बाहेर पडायला ‘लिलाताई’ हे एकच उत्तर होतं! जावं कां तिच्याकडे?भेटावं तिला? बोलावं तिच्याशी?.. हो.. जायला हवंच…!…

मी पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहू लागलो…!)

तिच्याकडे जायचं. तिला भेटायचं. तिच्याशी मोकळेपणाने बोलायचं. समीरबाळाच्या जाण्यानंतरचं पुत्रवियोगाच्या दु:खानं झाकोळून गेलेलं माझं मन:स्वास्थ्य आणि नंतर तिच्या पत्रातील माझं सांत्वन करणाऱ्या आशेच्या किरणस्पर्शाने स्थिरावलेलं माझं मन.. हे सगळं कोणताही आडपडदा न ठेवता सांगून टाकायचं… असं सगळं मनाशी ठरवूनच मी त्या पौर्णिमेच्या दिवशी घराबाहेर पडलो. नृसिंहवाडीला जाऊन आधी दत्तदर्शन घेऊन थेट कुरुंदवाडची वाट धरली. तिच्या घराबाहेर उभा राहिलो आणि मनात चलबिचल सुरु झाली. तिचेही वडील नुकतेच तर गेलेत. तीसुध्दा त्या दु:खातच तर असणाराय. तिला आपलं दुःख सांगून त्रास कां द्यायचा असंच वाटू लागलं. मग तिला कांही सांगणं, विचारणं मनातच दडपून टाकलं. तेवढ्यांत दार उघडून दारात तीच उभी. आनंदाश्चर्याने पहातच राहिली क्षणभर….

“तू.. ! असा अचानक?.. ये.. बैस.. ”

ती मोकळेपणाने म्हणाली. आतून पाण्याचं तांब्याभांडं आणून माझ्यापुढे ठेवलंन्.

“लिलाताई, मी आज आधी न कळवता तुला भेटायला आलो ते दोन कारणांसाठी.. ” मी मुद्द्यालाच हात घातला.

“होय? म्हणजे रे.. ?”

“समीरचं आजारपण, त्याचं जाणं.. हे सगळं घडलं नसतं तरी मी तुमचे नाना गेल्याचं समजल्यावर तुला भेटायला आलो असतोच हे एक आणि समीर गेल्याचं तुला माझ्या आईकडून समजल्यानंतर तू सांत्वनाचं जे पत्र पाठवलं होतंस ते वाचताच क्षणी मला जो दिलासा मिळालाय त्याबद्दल तुझ्याशी समक्ष भेटून बोलल्याशिवाय मला चैनच पडत नव्हतं म्हणूनही आलोय. “

“नाना गेल्याचं समजलं तेव्हा तू न् आरती दोघेही माझ्या आईला भेटायलाही गेला होतात ना? आईनं सांगितलंय मला. “

“हो. त्यावेळी खूप कांही सांगत होत्या त्या मला. विशेषत: तुझ्याबद्दलच बरंचसं… “

“आईपण ना… ! माझ्याबद्दल काय सांगत होती?”

“माझ्या बाबांसारखी

तुलाही वाचासिद्धी प्राप्त झालीय असं त्या म्हणत होत्या. “

ती स्वत:शीच हसली. मग क्षणभर गंभीर झाली.

“माझी आई भोळीभाबडी आहे रे. तिला आपलं वाटतं तसं. बोलाफुलाला गाठ पडावी असेच योगायोग रे हे. बाकी कांही नाही… “

“माझे बाबाही असंच म्हणायचे. पण ते तेव्हढंच नव्हतं हे तू स्वत:ही अनुभवलंयस”

तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. काय बोलावं तिला समजेना. मग विचारपूर्वक स्वतःशी कांही एक ठरवल्यासारखं ती शांतपणे म्हणाली,

“आईनं तुला जे सांगितलं ते योगायोगाने घडावं तसंच तर होतं सगळं. ते ज्यांच्या बाबतीत घडलं ते आमचे नाना आणि माझा मोठा भाऊ आण्णा यांच्यासंबंधातलं. जायच्या आधी नाना आठ दिवस खूप आजारी होते. तब्येतीच्या बाबतीत चढउतार सुरूच असायचे. मुद्दाम सवड काढून असंच एकदा आम्ही दोघेही त्यांना भेटायला गेलो होतो. पण तेव्हा ते पूर्णतः ग्लानीतच होते. आम्ही येऊन भेटून गेलोय हे त्यांना समजलंही नाहीये ही रुखरुख तिथून परत येताना माझ्या मनात रुतूनच बसली होती जशीकांही. मला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अंथरुणाला पाठ टेकली की मनात विचार यायचे ते नानांचेच. ते कसे असतील? ते बरे होतील ना? हे असेच सगळे. त्यादिवशी रात्री डोळा लागला होता तोही याच मानसिक अस्वस्थतेत. आणि खूप वेळाने जाग आली ती डोअरबेल वाजल्याच्या आवाजाने. हे घरी नव्हते. कांही कामासाठी परगावी गेले होते. ते परत यायला अद्याप एक दोन दिवस अवकाश होता. तरीही तेच आले असतील कां असं मला वाटलं न् बेल दुसऱ्यांदा वाजली तशी मी पटकन् उठलेच. दार उघडून पाहिलं तर दारात नाना उभे. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना…

“नानाs, तुम्ही.. ? असे एकटेच.. ? बरे आहात ना?.. “

“हो अगं. काल वाडीला दर्शनाला आलो होतो. आज परत जायचंय. जाण्यापूर्वी तुला भेटून जावं असं वाटलं म्हणून आलोय. “

“बरं झालं आलात. बसा हं. मी पाणी देते न् चहा करते लगेच. “

“एs.. तू बस इथं. मी तुला भेटायला आलोय. चहा प्यायला नाही. मला जायचंय लगेच.. “

मी थोडावेळ बसले. बोलले त्यांच्याशी. मग चहा करायला म्हणून उठले. आत जाऊन पाण्याचं तांब्याभांडं घेऊन बाहेर आले तर नाना तिथं नव्हतेच. दार सताड उघडंच. मला भास झाला कीं स्वप्नच हे?.. असा विचार मनात आला तेवढ्यांत फोनची रिंग वाजली. फोन आण्णाचा.. मोठ्या भावाचा होता. नाना नुकतेच गेलेत हे सांगणारा.. !!

पहाटेचे पाच वाजले होते. ऐकलं आणि सरसरुन काटाच आला अंगावर.. ! सोफ्याचा आधार घेत कशीबशी खुर्चीवर टेकले.

ते स्वप्न नव्हतं. तो भासही नव्हता. नाना खरंच आले होते. त्यांची भेट न झाल्याची त्या दिवशीची माझ्या मनातली रूखरुख कमी करण्यासाठी ते जाण्यापूर्वी खरंच इथे येऊन मला भेटून गेले होते. हे एरवी कितीही अशक्य, असंभव, अविश्वसनीय वाटेल असं असलं तरी माझ्यापुरतं हेच सत्य होतं! नाना जाताना मला भेटून लाख मोलाचं समाधान देऊन गेले होते हेच माझ्यासाठी ते गेल्याच्या दु:खावर फु़ंकर घालणारं होतं.. !!”

मी भारावल्या सारखा ऐकत होतो.

“आणि.. तू आण्णाच्या दीर्घ आजारपणात त्याला दिलेल्या औषधाने तो झटक्यात बरा झाला असं तुझ्या आई सांगत होत्या त्याचं काय?तो चमत्कार नव्हता?”

“नाना गेले त्याआधीच्या चार-पाच महिन्यांपूर्वीची ती गोष्ट. मी अशीच नानांनाच भेटायला माहेरी गेले होते. तेव्हाच्या गप्पांत आईनेच आण्णाच्या आजारपणाबद्दल सांगितलं होतं. ते आजारपण वरवर साधं वाटलं तरी आण्णासाठी मात्र असह्य वेदनादायी होतं. दुखणं म्हणजे एक दिवस त्याच्या हातापायांची आग व्हायला सुरुवात झाली आणि हळूहळू ती अंगभर पसरली. डॉक्टरांची औषधं, इतर वेगवेगळे उपाय सगळं होऊनही गुण येत नव्हता. तो रात्रंदिवस असह्य वेदनांनी तळमळत रहायचा. आईकडून हे ऐकलं त्याक्षणी मी थक्कच झाले. कारण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. ते असंबध्दच वाटलं होतं तेव्हा पण ते तसं नव्हतं जाणवताच मला आश्चर्याचा धक्काच बसला.

“आई, तुला खरं नाही वाटणार पण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नांत आण्णा माझ्या घरी आला होता. त्याला काय त्रास होतोय ते सगळं अगदी काकुळतीने मला सांगत होता. ‘कांहीही कर पण मला यातून बरं कर’ असं विनवीत होता. मी त्याला दिलासा दिला. ‘माझ्याकडे औषध आहे ते लावते. तुला लगेच बरं वाटेल’ असंही मी म्हटलं. परसदारी जाऊन कसला तरी झाडपाला घेऊन आले. तो पाट्यावर बारीक वाटून त्याचा लेप त्याच्या सगळ्या अंगाला लावून घ्यायला सांगितलं आणि तो लेप लावताच आण्णा लगेच बराही झाला… ” मी हे सगळं आईला सांगितलं खरं पण तो झाडपाला कसला हे मात्र मला आठवेना. त्यांना काटेही होते. ती पानं चिंचेच्या पानासारखी होती पण चिंचेची पानं नव्हती कारण चिंचेच्या झाडाला काटे नसतात. तिथून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि हे दोघेही नेहमीप्रमाणे सकाळी नित्यदर्शनासाठी नृ. वाडीला जाऊन परतीच्या वाटेवर आम्ही नेहमी पाच मिनिटं एका पारावर बसायचो तसे बसलो. बोलता बोलता हाताला चाळा म्हणून त्या पारावर पडलेल्या वाळक्या काड्या उचलून मी मोडत रहायचे. त्यादिवशीही तसं करत असताना बोटाला एक काटा टोचला. पाहिलं तर त्या काडीवरचा वाळलेला पाला चिंचेच्या पानांसारखाच दिसला. मी नजर वर करून त्या झाडाकडे पाहिलं. ते शमीचं झाड होतं. शमी औषधी असते हे ऐकून माहित होतं म्हणून मी आण्णाच्या घरी फोन करून वहिनीशी बोलले. रोज शमीचा पाला वाटून त्याचा लेप लावायला सांगितलं. ती रोज तो लेप आण्णाला लावू लागली आणि तीन दिवसांत त्याचा दाह पूर्ण नाहीसा झाला. ” लिलाताई म्हणाली.

सगळं ऐकून मी पूर्णत: निश्चिंत झालो.

“लिलाताई, मला दिलासा देणारा असाच एक चमत्कार माझ्याही बाबतीत घडलाय. “

“कसला चमत्कार?” तिने आश्चर्याने विचारलं.

“तू मला पाठवलेलं ते सांत्वनपर पत्र हा चमत्कारच आहे माझ्यासाठी. ” मी म्हंटलं. तो कसा ते तिला सविस्तर समजावून सांगितलं.

” समीरचा आजार असा बरा होण्याच्या पलिकडे गेला होता‌. ते आमच्या घरीही माझ्या खेरीज कुणालाच माहित नसताना तुला नेमकं कसं समजलं? याचं आश्चर्य वाटतंय मला. कारण ‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला असल्याने तो बरा होऊन परत येण्यासाठी देवाघरी गेलाय यावर विश्वास ठेव’ असं तू लिहिलं होतंस. आठवतंय? हे अशाच शब्दात लिहिण्याची बुद्धी तुला कशी झाली ही उत्सुकता आहे माझ्या मनात. “

हे सगळं ती भान हरपून ऐकत होती. मी बोलायचं थांबलो तशी ती भानावर आली. शांतपणे उठली आणि आत गेली. ती येईल म्हणून मी वाट पहात राहिलो. मग उठून उत्सुकतेने आत डोकावून पाहिलं तर ती देवापुढे हात जोडून बसलेली आणि तिच्या मिटल्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. काय करावं ते न समजून मी खाल मानेनं बाहेर आलो. तिची वाट पहात बसून राहिलो. कांही क्षणात ती बाहेर आली. अंगाऱ्याचं बोट माझ्या कपाळावर टेकवलंन.

“तुझ्या डोळ्यांत पाणी का गं? माझं कांही चुकलं कां?”.

“नाही रे. तुझं कांहीही चुकलेलं नाहीय. मी रडत नाहीय अरे, हे समाधानाचे, कृतार्थतेचे अश्रू आहेत. “

“म्हणजे?”

“तुझ्या आईकडून समीर गेल्याचं मला समजलं त्या क्षणापासून खूप अस्वस्थ होते रे मी. तू हे सगळं कसं सहन करत असशील याच विचाराने व्याकुळ होते. घरी येताच सुचतील तसे चार शब्द लिहून पत्र पोस्टात टाकलं तेव्हा कुठे थोडी शांत झाले होते. खरं सांगू? मी काय लिहिलं होतं ते विसरूनही गेले होते. आज तू आलास, मनातलं सगळं बोललास तेव्हा ते मला नव्यानं समजलं. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरे होण्याच्या पलीकडे गेलेला असल्याचं शप्पथ सांगते मला नव्हतं माहित. ते सगळं ‘मी’ लिहिलेलं नव्हतंच तर. ते दत्तगुरुंनी माझ्याकडून लिहून घेतलं होतं हे आज मला समजतंय. त्यांना दिलासा द्यायचा होता तुला आणि त्यासाठी मध्यस्थ म्हणून मी त्यांना योग्य वाटले हे लक्षात आलं आणि मी भरून पावले. सगळं कसं झालं मला खरंच माहित नाही. पण हा दत्तगुरुंचाच सांगावा आहे असं समज आणि निश्चिंत रहा.. !”

सगळं ऐकलं आणि मी पूर्णत: निश्चिंत झालो.

तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. मन शांत होतं पण… या सगळ्या अघटीतामागचं गूढ मात्र उकललं नव्हतंच. ते माझ्या मनातल्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात लपून अधिकच गहिरं होत चाललं होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ Happy Birthday to… लेखक – श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ Happy Birthday to… लेखक – श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

Happy Birthday to – – – – 

आज २४ फेब्रुवारी. मी आज सकाळी आपल्या सगळ्यांच्या म्हणजे अगदी सगळ्यांच्या खास मित्राला Happy Birthday अशा शुभेच्छा पाठवल्या.

आणि आश्चर्य म्हणजे मित्राकडून लगेच म्हणजे अगदी दुसऱ्या क्षणाला – Thanks a lot. We will always be in touch. Keep smiling all the time. असे उत्तर पण आले.

कोण असेल असा हा आपल्या सगळ्यांचा कॉमन मित्र ? Any guess!

One… two… & three… लक्षात येत नाही ना !

अहो, आपल्या सगळ्यांचा म्हणजे – तरुण स्त्री-पुरुष, लहान मुलं मुली, वयस्कर स्त्री-पुरुष, अगदी तान्ही बाळं, असे सगळे सगळे आणि अशा सगळ्यांना रोज दिवसातून अनेक वेळेला भेटणारा आपला जवळचा मित्र म्हणजे व्हॉट्सअप. त्याचा २४ फेब्रुवारी ला वाढदिवस असतो.

Brian Action आणि Jan Koum यांनी २००९ मधे WhatsApp या मित्राला जन्म दिला. आणि २४ फेब्रुवारीला कॅलिफोर्निया मध्ये त्याचे What’s up असे नामकरण करण्यात आले.

व्हॉट्सअप ला मी शुभेच्छा पाठवल्यानंतर उत्तरादाखल व्हॉट्सअप नी सगळ्यांना सांगण्याकरता एक छोटासा संदेश पण मला पाठवला आणि लिहिले, की – तुमचा संपर्क परिवार खूप मोठा आहे, त्या सगळ्यांना माझा हा संदेश अवश्य पाठवा, हा त्यांच्याच फायद्यासाठी आहे.

व्हॉट्सअप चा संदेश असा आहे – 

सुधीर आणि मित्रहो, माझ्या संपर्कात जरूर जरूर रहा. कुणाला काही महत्वाचे निरोप द्यायचे असतील, काही महत्वाची डॉक्युमेंट्स पाठवायची असतील, काही छान फोटो / व्हिडीओ शेअर करायचे असतील, शुभेच्छा द्यायच्या आहेत, मोकळ्या वेळेत मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत, आमने सामने बोलायचे आहे, किंवा कुणाकडून काही छान माहिती तुम्हाला आली असेल तर ज्यांना ती उपयोगी होईल अशांना ती शेअर करा, वगैरे, अशाकरिता मला अवश्य बोलवा. 24 * 7 तुम्ही क्लिक केलं कि यायला मी तयार आहे.

पण एक सच्चा मित्र म्हणून माझी एक विनंती आहे. तुमची तब्येत छान राहावी / घरच्यांशी घरामधे सगळ्यांशी छान संवाद असावेत, वगैरे, या करता काही पथ्य मात्र आपण अवश्य पाळावीत, अशी माझी विनंती आहे.

ती पथ्य अशी आहेत – कुठलीही गाडी चालवत असाल तर तेव्हा मला बोलवू नका. वॉकिंग करत असाल, ऑफिसचे काम करत असाल, अभ्यास करत असाल, टॉयलेट मध्ये असाल, पूजा करत असाल, जेवत असाल, तर अशा वेळेस मला बोलावू नका. गादीवर आडवे असाल तर मला बोलावू नका, तुमच्याकडे तुम्हाला कुणी भेटायाला आले असेल, तर मला बोलावू नका. कुणाकडून काही माहिती / व्हिडीओ / फोटो तुमच्याकडे आले तर ते धडाधड सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड करू नका. कुणाला ते पाठवावेत यावर थोडा विचार करा आणि मगच ते आवश्यक त्या ठिकाणी फॉरवर्ड करा. आणि महत्वाचे म्हणजे मला बोलावण्याचा अतिरेक तर नक्कीच टाळा.

जेंव्हा असा अतिरेक होतो तेव्हा तुम्ही शरीराची काहीही हालचाल न करता एका ठिकाणी तासंतास बसून असता किंवा बेडवर आडवे असता. यामुळे आजार वाढतात, डोळ्यांवर ताण पडतो, आणि रेडिएशन चा त्रास तर वेगळा होतोच.

माझी फेसबुक, गुगल, युट्युब, इंस्टाग्राम या माझ्या मित्रांशी नेहेमीच भेट होत असते. मी वर जे माझे मनोगत मांडले आहेत, तेच त्यांचे पण विचार आहेत. यावर जरूर जरूर विचार करा.

तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यामुळे आपला चक्क एकमेकांशी असा छान आणि वेगळा संपर्क झाला. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. माझी “मन की बात” पण मला तुमच्याबरोबर शेअर करता आली. आणि तो एक वेगळाच आनंद पण मला मिळाला.

तुमच्या मित्र मैत्रिणींना / नातेवाईक मंडळींना माझे मनोगत जरूर सांगा. त्यांना नक्कीच त्याप्रमाणे बदलायला आवडेल, अशी आशा करतो. शेवटी – “पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना” हे तर आहेच !

चलो, बाय बाय सुधीर.

तुमचा मित्र – व्हॉट्सअप

मंडळी व्हॉट्सअप नी पाठवलेला संदेश आपल्याच फायद्याचा आहे. आपण सगळे जण यावर जरूर विचार करू आणि अंमलात आणूच आणू. आपल्या सगळ्या ग्रूप्स वर पण जरूर फॉरवर्ड करा.

लेखक : श्री सुधीर करंदीकर

मोबा 9225631100, ईमेल <srkarandikar@gmail. com>

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “लोखंड्या…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ लोखंड्या… ☆ प्रा. भरत खैरकर 

लोखंड्या, आपल्या गल्लीमध्ये, गळपु-यात कधीच चोरी करायचा नाही.. तो कुणाच्या धाकदपटशाला ऐकणारा नव्हता. तो पक्का चोर होता. पण चोरी आपल्या एरियात काही करायची नाही. रिस्पेक्टफुल राहायचा, मानाधनाने राहायचा.. गावातले सारे त्याला लोखंड्या म्हणायचे! पंधरा सोळाव्या वर्षांपासून चोरी केल्यामुळे पोलिसांनी पकडून पकडून त्याला कित्येकदा मारमार मारले होते. पण तो लोखंडासारखा मजबूत आणि निगरगट्ट झाला होता. पोलिसांनी मारून मारून त्याचे समोरचे दात पाडून टाकले होते. इतका तो मार खायचा! त्याचं नाव एरियामध्ये लोखंड्या असंच पडलं होतं.. वास्तविक त्याचं नाव अशोक होतं. पण पुढे जाऊन त्याला ‘असक्या’ किंवा अटक होते म्हणून ‘अटक्या’ असेही त्याला म्हणायचे..

असक्याची अंगकाठी दादा कोंडके सारखी होती.. तो दिसायलाही बराचसा तसाच होता.. त्याची कटिंग अगदी दादासारखीच.. चेहरा मात्र थोडासा रुंद होता.

आजीच्या घराला लागूनच त्याचं घर होतं.. आजीच्या घराच्या जाळीच्या खिडकीतून लोखंड्याचं घर आरपार दिसायचं. पण उलट्या बाजूने बघितल्यावर मात्र काहीही दिसायचं नाही. फक्त कोणीतरी उभा आहेस वाटायचं. त्यामुळे लोखंड्याच्या घरी काय चाललं आहे? हे सगळं दिसत होतं.. पण आजी खिडकीत उभे राहू द्यायची नाही. ‘काय त्या चोराचं घर बघायचं?’ म्हणून ती रागवायची! आमच्या खिडकीतून.. त्याची खिडकी आणि पुढचं भलं मोठा अंगण.. असं सगळं आरपार घर दिसायचं!

ज्या दिवशी त्या अंगणात गहू सुकायला टाकले.. त्यादिवशी समजायचं याने रात्री कुणाच्यातरी गव्हावर हात मारला, जेव्हा केव्हा तुरी पसरलेल्या दिसल्या तर समजायचं लोखंड्यानं रात्री कुठेतरी डाळ शिजवली!

आजूबाजूचे शेजारी असक्याकडून हा माल विकत घ्यायचे.. कमी किमतीत हा माल मिळायचा. आणि लोखंड्याही तो साठवून ठेवणे परवडायचं नाही!

कंट्रोलचे गहू घेण्यापेक्षा किंवा ते दुसरीकडे विकून असक्याकडून हे धान्य घ्यायला शेजाऱ्यांनाही परवडायचं!

खिडकीतून पलीकडचं सगळं दिसायचं.. पण आजी खिडकीमध्ये जावू द्यायची नाही. चुकून जर आजीला दिसलो की आपण पलीकडे असक्याच्या घरात बघत आहो तर आपली शामत आली म्हणून समजायची!

तो घराला वर्षातून कितीदा पेंट करायचा माहिती नाही.. कुठून बिचारा एवढे पेंट आणायचा माहित नाही.. दर महिन्याला त्याच्या घराला नवीन रंग दिलेला असायचा.. घर एवढं टापटीप असायचं की कोणीही हे चोराचं घर आहे असं म्हणणार नाही. येऊन जाऊन तो घराला सारखा पेंट करायचा.. घर अगदी चकचक दिसायचं.. महिना दोन महिन्यात घराचा रंग बदललेला असायचा..

त्याच्या घराच्या आतील जिना वेडावाकडा होता म्हणे.. जेणेकरून पोलीस आल्यानंतर त्यांना चकमा देऊन त्याला पळता यावं! त्याने तो स्पेशली बनवून घेतला होता. एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोलिसांनी त्याला सर्व मोह्हल्यामध्ये वरात काढून चांगला फोडून काढला होता! गावात काहीही झालं तरी पहिला टारगेट लोखंड्याच असायचा!

मात्र तोही इतका अट्टल गुन्हेगार होता की सगळ्या वस्तू तो जागच्या जागी रफादफा करायचा.. ह्या कानाची त्या कानाला खबर नाही लागू द्यायचा.. मात्र एरियातील लोकांना माहिती होतं.. ते बऱ्याच वेळा दहशती खाली राहायचे.. कारण हा शेतातीलही उभं पिक रात्री बेरात्री जाऊन कापून आणायचा. त्याच्या भीतीने काहीही कारण नसताना लोक शेतावर जागलीसाठी जायचे! तो अट्टल चोर होता.. रात्री त्याची सायकल वाजली.. की आजी म्हणायची, ” निघाला असक्या ड्युटीवर!”

रात्री चोरून आणलेल्या कोणत्याही मशीन, सायकली, शेतावरचे मोटर पंप, इत्यादी रात्रीच खोल खोल करून रफा दफा करण्यामध्ये लोखंड्याचा हातखंडा होता. कुऱ्हाडी, फावडे, सब्बल, लोखंडी सळ्या, मिळेल तो भंगार त्यातलं काहीही त्याला चालायचं.. रात्रभर त्याच्या घरामध्ये खुळ खुळ खुळ खुळ असा आवाज यायचा. रात्री बारा एक वाजता आणलेला माल पहाटेपर्यंत तोडताड करून व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचे काम चालायचे.

तो कधीकधी रात्र- रात्रभर लाकडं तोडत राहायचा.. आरा मशीन वरून चोरलेले मोठमोठे लाकडाचे ओंडके.. तो छोट्या छोट्या तुकड्यात तोडून सरपण म्हणून भरून ठेवायचा ! त्याच्या घराच्या टीनावर भरपूर सारा माल पडलेला असायचा.. जोवर विकायचा जुगाड जुळत नाही.. तोवर त्या वस्तू त्याच्या गच्चीवर पडलेल्या असायच्या.. त्याही फक्त तीन-चार दिवस!

रात्री एकेक वाजता तो टेम्पो बोलावून लाकडं आणि त्या वस्तू रफादफा करायचा.. कुठे पाठवायचा माहित नाही.. पण त्याचा ठरलेला टेम्पोवाला होता.. मागील पंधरा-वीस वर्षापासून त्याचा हाच व्यवसाय होता. आजी त्याच्या आईला म्हणायची “लहानपणी याचे कान टोचले असते, तर असा असक्या निपजला नसता.. “पण आता उपयोग नव्हता. “लहाणपणी वस्तू चोरून आला होता तेव्हा तू मारलं नाही आता रडून काय उपयोग ?असं आजी त्याच्या आईला समजावायची.. पण चोरीच्या भरोशावर त्याने आपल्या बहिणीचं लग्न केलं.. स्वतःचं लग्न केलं.. घर चालवतो म्हटल्यावर त्याची आई पण त्याला काही बोलायचे नाही…

त्याच्या घरी कोणी आल्यावर असं म्हणणारच नाही की ‘हे चोराच घर आहे. ‘इतकं सुंदर घर त्याने ठेवलं होतं. घर जुनच होतं वडिलोपार्जित.. पण इतका चकाचक ठेवायचा की आपण कल्पना करू शकत नाही.

कोणत्याही लग्न समारंभात गेल्यानंतर इतका अपटूडेट आणि खाटखूट जायचा.. की कोणी संशय घेऊ शकणार नाही.. दाढी, कटिंग एकदम खटाखट, एकदम पॉश आणि टॉप टीप असे त्याचे कपडे असायचे. तो जेवण बी करायचा आणि हात बी मारायचा! पण त्याच्या पेहरावावरून कोणीही त्याच्यावर आरोप करू शकत नव्हते.. हे सर्व कार्यक्रम तो शेजारच्या गावांमध्ये करायचा.. आजी बरोबर ओळखायची की “आज असक्यान कुठेतरी डाव मारला!”

आता लोखंड्या थकला आहे.. नातू पणतू झाले आहेत त्याला.. ईवाया -जावयाचा झाला आहे तो. शरीरही आता त्याला साथ देत नाही.. आणि आता तसली कामही त्याला शोभत नाही.. अलिकडे दिवस-रात्र तो चंडीकेच्या मंदिरात पडलेला असतो.. आयुष्यभर केलेल्या चुकांची माफी देवीच्या दारात मागत असतो आणि तिच्यात पायऱ्यांवर आपला जीव जावा अशी त्याची इच्छा आहे..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ ती… ☆ श्री सुनील देशपांडे

आमच्या आईच्या वयाची (आमची नातवंडं आता रोमँटिक सिनेमा पाहायच्या वयात आलीत) 

तरीही ती आमची लाडकी रोमँटिक हिरोईन.

तिचं नाक नाजुक आणि धारदार होतं?

छे हो नाजूक कसलं, थोडं जाडंच. धारदार तर अजिबात नाही.

तिचे ओठ नाजूक होते?

ते हो नाजूक कुठले आकाराने सुंदर परंतु थोडे जाडेच नाही का? 

जिवणी नाजूक? नाहीच.

डोळे माशा सारखे म्हणजे मीनाक्षी हो! छे ते तसेही नव्हते.

सिंहकटी ? न न् नाही.

मग होतं काय तिच्यात?

आधी तुम्ही ते मासे, त्या चाफेकळ्या त्या गुलाबाच्या पाकळ्या यांचे लोणचे घालून टाका.

सौंदर्याच्या सर्व पारंपरिक कल्पनांना झुगारून देऊन तिने जे आपलंसं केलं

तेच खरं चिरसौंदर्य ठरलं!

ते भावुक, अथांग, काळेभोर डोळे! त्यामध्ये एक खट्याळपणाची झाक!

डोळ्यांचे आणि भुवयांचे विभ्रम!

त्या सुंदर ओठांची मोहक हालचाल! 

त्या नाकाच्या शेंड्यावर बेफिकीरपणाची एक झाक!

त्या भव्य कपाळावरून केस सरकवण्यातील एक वेगळीच विलोभनीयता! 

त्या निरागस चेहऱ्यावरील खोडसाळ हास्य! 

ती अभिनेत्री कधी वाटलीच नाही. तिच्या चेहऱ्यावर जे दिसलं तो अभिनय कधी वाटलाच नाही!

सतत बदलणारे चेहऱ्यावरचे भाव! 

संवादातील आणि गाण्यातील शब्दांना न्याय देणारे ते विभ्रम! ती शब्दांची फेक, आणि त्या शब्दांमध्ये मिसळलेली भावगर्भता!

आमचे काही दोस्त त्या विभ्रमांना अदा असे म्हणत!

परंतु एकदा दाखवलेली अदा पुन्हा परत नाही. सतत नवीन नवीन विभ्रम! 

एकदा सादर केलेली अदा पुन्हा परत नाही, नो रिपीटिशन!

हाता पायांच्या सर्व शरीराच्या हालचालींमधील सहजता, मोहकता! 

 निरागसता, खोडसाळपणा, छद्मीपणा या साऱ्यांचं मिश्रण एका मोहक पद्धतीने सतत चेहऱ्यावर जाणवत राहतं आणि मग तेथून नजर हटत नाही.

मधाळ आणि बालिश या दोन्हीचे अफलातून मिश्रण म्हणजेच 

मधुबाला!!

तिचा वाढदिवस आणि व्हॅलेंटाईन डे या दोन्हीचे एकाच दिवशी असणे हा मधुनवनीतशर्करा योगच की! 

तिचा वृद्धापकाळ काळालाही सहन झाला नसावा म्हणून तरुण वयातच तो तिला घेऊन गेला! 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या एका ॲपवर मी एक इमॅजिनेशन टाकली 95 वर्षाची मधुबाला कशी दिसेल? 

पण त्याने उत्तर दिले,

I can’t imagine!

दुसऱ्या एका ॲपला हाच प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने विचारला 

आज मधुबाला जिवंत असती तर कशी दिसली असती ? 

त्याने रेखाटलेले चित्र यासोबत मी जोडले आहे.

आज मधुबाला जिवंत असती तर ती 93 वर्षाची असती!

त्या चिरतरुण स्मृतीला वंदन! 

तिच्या आठवांचे सतत मनावर बंधन!

अशी मधुबाला पुन्हा न होणे!!!

म्हणूनच वसंत बापट त्यांच्या कवितेत म्हणाले होते 

मधुबाला ती मधुबाला!

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव.

– – गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. “मराठी” भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते.

त्यांचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे.

आल्यागेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे..

 

महाराष्ट्रात होता एक भाग… “मुंबई” त्याचं नाव… 

मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले की इथलेच होऊन राहत होते.

“अतिथी देवो भव… !” या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.

हळूहळू परिस्थिती बदलू लागली.

“अतिथी” जास्त आणि “यजमान” कमी झाले.

मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली.

सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. – – मराठी आपली वाटत नव्हती.

 

प्रश्न मोठा गहन होता, पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.

त्यांना एक युक्ती सुचली… दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली.

त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील.

सर्वांचाच, अगदी “महाराष्ट्राचा” ही विकास होईल,

म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.

आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.

आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली.

…. मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना.. मराठी कोणीच बोलेना.. बोलीभाषा ही बदलली.

सगळ्याचा नुसता काला झाला… शुद्ध सुंदर मराठीचा लोप झाला.

 

अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर.. माफ करा हं… आपल्या ‘मम्मी’ बरोबर एकदा वाचनालयात गेला. चुकून त्याचा हात पुस्तकावर पडला. त्यानं ते उघडलं…..

…. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली.

त्यांना वाटलं निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.

 

इतक्यात त्या मुलानं विचारलं,

“Which language is this? “

 

‘मम्मी’ खूप सजग होती, मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.

पुस्तक जागेवर ठेवत म्हणाली,

“अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस “मराठी भाषा” प्रचलित होती;

आता कोणी नाही ती बोलत. ” 

 

पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले; पण – –

हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं… कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं!

 

महाराष्ट्राची शान “मराठी” भाषा!

मला एकाने विचारले “ तू मराठीत का ‘पोस्ट’ टाकतोस? “

आणि, मी त्यांना एवढंच म्हटलं – – 

 

– – “ आमच्या घरात “तुळस”आहे, ‘Money plant’नाही.

आमच्या स्त्रिया “मंदिरात” जातात, ‘PUB’ मध्ये नाही.

आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो, त्यांच्या गळ्याला मिठी मारत नाही.

आम्ही “मराठी” आहोत, आणि मराठीच राहणार !

तुम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय मराठीतूनच देतो,

याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही. ” 

 

अरे गर्व बाळगा तुम्ही – – मराठी असल्याचा.

“काकी” ची जागा आता ‘Aunti’ घेते

‘वडील’ जिवंतपणीच “डेड” झालेत.

“भाऊ” ‘Bro’ झाला… !!

आणि “बहीण ” ‘Sis’… !!!

दुध पाजणारी “आई” जिवंतपणीच ‘Mummy’ झाली.

घरची “भाकर” आता कशी आवडणार हो.. ५ रु. ची ‘Maggi’ आता किती “Yummy” झाली.

 

मराठी माणूसच “मराठी” ला विसरू लागलाय…. आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करावा… 

*आजपासूनच शक्‍यतोवर मराठी लिहिण्याचा प्रयत्न करूया. *

 

आज २७ फेब्रुवारी.. आज मराठी भाषा दिवस आहे.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘जीभ…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘जीभ…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

जिभेला कधीच सुरकुत्या पडत नाहीत.

जिभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे.

माणूस हवा तेवढा वृध्द होवो, देहावर कितीही सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे, पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच टिकून राहतो !

जिभेचं रूप-स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रियावर विजय मिळवणं, कठीणातलं कठीण काम आहे

मुख-म्यानात राहणारी जीभ ही दुधारी तलवार आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसविलेले आहेत. पण जीभ अशी जबरी आहे की, कालांतराने दातांनादेखील उखडून टाकते तशीच तोडूही शकते.

कुणाला ती घायाळ करते,

तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते.

तिच्यातून अमृत झरते,

तसेच हलाहल विषदेखील निर्माण होते.

जिभेची जमीन अशी विचित्र आहे की, तिथे फुले फुलतात, तसेच काटेही उगवतात.

अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही. अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळविणे हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर उत्तम ताबा मिळवू शकतात, तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात. कटू, पण त्रिकाल सत्य…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मधुबाला… ☆ सुश्री शीला पतकी ☆

 सुश्री शीला पतकी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ “मधुबाला…” ☆  डॉ. शैलजा करोडे

ठाऊक नाही यातील काही /

गोड गोड मधुबाले /

तुझ्या हृदयाला यौवनात ग /

छेद कशाने झाले//

*

कुरळे कुरळे केस तुझे हे/

असंख्य त्यातील वाटा /

कितीक गुंतले किती हरवले/ 

चेहऱ्यावरच्या बटा //

*

मोहक सुंदर दंतपंक्ती ती /

रसरशीत ओष्ठ कमान /

नयन निरागस बालकापरी /

तरी यौवनाचे आव्हान //

*

जीवणी मोहक जीवघेणी ती /

आरक्त गाल ते छान/

 भुवयांची ती महिरप सुंदर /

वर सुंदर भव्य कपाळ//

*

कित्येकाने स्वप्नात ठोकले/

 तव हृदयाचे द्वार /

त्या साऱ्यांच्या ठोक्यांनी मग /

झाले छिद्र तयार? //

*

जीवघेणी ही ठोकाठोकी/ 

हृदयस्पंदने चुकली /

अन रसिकांचा ठोका चुकून /

मृत्यू पुढे ही झुकली//

*

नको आभूषण नको विशेषण/ 

तुझ्यासारखी तूच /

देवाने ही पुन्हा न केले/

 कॉपी-पेस्ट हे रूप //

*

पुन्हा न होणे ऐसे रूपडे /

पुन्हा न ऐसा भाव/

 सौंदर्याला समान शब्द हा /

मधुबाला हे नाव!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares