मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १ ते ७ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १ ते ७ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मण्डल १ – सूक्त २५ (वरुणसूक्त) – ऋचा १ ते ७

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – वरुण 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंचविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी वरुण देवतेला आवाहन केलेले  असल्याने हे वरुणसूक्त म्हणून ज्ञात आहे.  आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या सात ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद ::

यच् चि॒द्धि ते॒ विशो॑ यथा॒ प्र दे॑व वरुण व्र॒तम् । मि॒नी॒मसि॒ द्यवि॑द्यवि ॥ १ ॥

वरूण राजा तुमची प्रजा अज्ञानी आम्ही

तुमची आज्ञा आम्हा अज्ञा उमगत ना काही

अवधानाने उल्लंघन झाले अमुच्या आचरणे

विशाल हृदयी क्षमा करोनी हृदयाशी घेणे ||१|| 

मा नो॑ व॒धाय॑ ह॒त्नवे॑ जिहीळा॒नस्य॑ रीरधः । मा हृ॑णा॒नस्य॑ म॒न्यवे॑ ॥ २ ॥

आज्ञेच्या अवमानासाठी  देहान्त शासन 

कोप करोनी आम्हावरती नका करू ताडण 

झाला आज्ञाभंग तरी तो केला ना बुद्ध्या 

नका देऊ हो बळी अमुचा तीव्र अपुल्या क्रोधा ||२|| 

वि मृ॑ळी॒काय॑ ते॒ मनो॑ र॒थीरश्वं॒ न संदि॑तम् । गी॒र्भिर्व॑रुण सीमहि ॥ ३ ॥

वेसण घालूनिया वारूला योद्धा बांधून ठेवी

स्तोत्रे तशीच अमुची वेसण मना जखडूनि ठेवी

सुखा मागण्या तुमच्या ठायी बद्ध आम्ही होतो

तव चरणांवर अर्पण करुनी श्रद्धा  निरुद्ध करतो ||३||

परा॒ हि मे॒ विम॑न्यवः॒ पत॑न्ति॒ वस्य॑इष्टये । वयो॒ न व॑स॒तीरुप॑ ॥ ४ ॥

द्विजगण अवघे घेत भरारी अपुल्या कोटराते

मनोरथांची कल्पना तशी तुम्हाकडे पळते

तुमच्या चरणी आर्त प्रार्थना आलो घेऊनिया  

सुखलाभाच्या वर्षावाचे दिव्य दान मागण्या ||४||

क॒दा क्ष॑त्र॒श्रियं॒ नर॒मा वरु॑णं करामहे । मृ॒ळी॒कायो॑रु॒चक्ष॑सम् ॥ ५ ॥

चंडपराक्रम अलंकार हा तुमचा वरूणदेवा

प्रसन्न होऊन अमुच्यावरती यज्ञी झडकरी धावा

तुष्ट होऊनीया भक्तीने आम्हाला वर द्यावा

जीवनात अमुच्या वर्षाव सुखतृप्तीचा व्हावा ||५||

तदित्स॑मा॒नमा॑शाते॒ वेन॑न्ता॒ न प्र यु॑च्छतः । धृ॒तव्र॑ताय दा॒शुषे॑ ॥ ६ ॥

उभय देवता अती दयाळू स्वीकारून घेती

समसमान वाटुनिया अमुच्या हविर्भागा घेती

आज्ञाधारक यजमानावर प्रसन्न ते होती

वरदायी होती, तयाला निराश ना करिती ||६||

वेदा॒ यः वी॒नां प॒दम॒न्तरि॑क्षेण॒ पत॑ताम् । वेद॑ ना॒वः स॑मु॒द्रियः॑ ॥ ७ ॥

मुक्त विहंगत व्योमातुनिया द्विजगण अगणित

मार्ग तयांचा कसा जातसे  हे जाणुनि आहेत  

निवास यांचा सागरावरी सदैव नि शाश्वत

तारु तरंगत कैसे जात ज्ञात यांसि वाट ||७||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)  

https://youtu.be/YfxdaAdbE_8https://youtu.be/YfxdaAdbE_8

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 1-7

 

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब पाकिस्तानात आहे …. पुण्याच्या सदाशिव पेठेतील जोशी वाड्यात श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर आहे. या जोश्यांपैकी श्री अनंत जोशी यांना पाकिस्तानने त्यांच्या देशात येण्यास परवानगी दिली म्हणजेच व्हिसा दिला आणि हे जोशी मार्च २००४ मध्ये पाकिस्तानात गेले. 

जिथे भगवान नरसिंह अवतरीत झाले, श्रीविष्णू यांचा हा अवतार ज्या ठिकाणी प्रकट झाला ती जागा त्यांना बघायची होती आणि ही त्यांची इच्छा पूर्ण झाली. श्री जोशी पाकिस्तानी पंजाबच्या मुल्तान भागात आले. येथील प्रल्हादपुरी मंदिरात ही पावन जागा आहे. या फोटोत जो स्तंभ दिसत आहे, तो तोच स्तंभ आहे ज्यातून श्रीनरसिंह, श्रीविष्णू यांचा पाचवा अवतार प्रकट झाला होता. 

बर्‍याच जोशी कुळांचं श्रीनरसिंह हे कुलदैवत असतं. कदाचित या जोश्यांचंही असेल आणि आपल्या कुळाच्या ईष्ट दैवताचं मूळ स्थान बघण्याची यांची इच्छा असेल. फोटोत बहुतेक ते कुलदैवताच्या मूळ स्थानी जिथे हा स्तंभ फाकलेला आहे, म्हणजेच जिथून श्री नरसिंह स्तंभ फाडून बाहेर आले तिथे जलाभिषेक करत असावेत. 

या जोश्यांचे अनेक आभार कारण त्यांच्यामुळेच हा खांब फोटोत का होईना बघता येत आहे. त्यांच्या या मुल्तान भेटीत त्यांच्यासमोर मुन्शी अब्दुल रहमान खान यांनी लिहिलेलं आणि उलूम-इस्लामिया-चाहलक यांनी प्रकाशित केलेलं “तारीख-ए-मुल्तान” नावाचं एक उर्दू पुस्तक प्रस्तुत करण्यात आलं. यातील थोडी अनुवादित माहिती मध्यंतरी वाचनात आली होती. 

सप्तपुरी म्हणजेच काशी, अयोध्या, उज्जैन, मथुरा, हरिद्वार, द्वारका, कांची अशी अतिशय पावन ठिकाणं आज आपल्या देशात आहेत, असंच एक ठिकाण होतं मूलस्थान म्हणजेच मुल्तान. श्रीविष्णू आणि सूर्यदेव यांची भूमी असलेल्या या आद्यस्थानाचा (आद्यस्थान हे या मुल्तानचं कितीतरी नावांपैकी एक नाव) इतिहास खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. आज श्रीमंत देवस्थानांमध्ये तिरुपती बालाजी, पद्मनाभ स्वामी मंदिर यांची नावे घेतली जातात. पण यांच्यापेक्षाही संपन्न देवस्थान जर कुठलं होतं, तर ते हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचं असणारं आदित्याचं देवालय – मुल्तानचं सूर्य मंदिर.

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।।गङ्गा दशहरा।।… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

सौ. यशश्री वि. तावसे

? इंद्रधनुष्य ?

।।गङ्गा दशहरा।।☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी पर्यंत गंङ्गा नदीचा जो उत्सव करतात, त्याला दशहरा किंवा गङ्गोत्सव म्हणतात.

भगीरथांच्या प्रदीर्घ प्रयत्नांती , ज्येष्ठ शुद्ध दशमीस, मंगळवारी, हस्त नक्षत्रावर गङ्गा नदीचे पृथ्वीवर अवतरण झाले.

या १० दिवसांमधील,  गङ्गा- स्नानाच्या योगाने 10 पातकांचे, रोज एक याप्रमाणे क्षालन होते, म्हणून याला “दश-हरा” म्हणतात.

यालाच “गङ्गावतरण” असेही म्हणतात. गङ्गेचे अवतरण, हिंदू लोक, हा “दशहरा-काल” एक  सण म्हणून साजरा करतात.  गङ्गेचे, स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले.  हा सण दहा दिवस साजरा केला जातो.  ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी.

माँ गङ्गा नदीला, संपूर्ण विश्वात सर्वात पवित्र नदी मानले जाते. 

सर्व नद्यांचे , मनुष्य जातीवर खूपच उपकार आहेत.  सर्व नद्या पवित्र व साक्षात जलदेवता आहेत.  त्यांचे प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी, नद्यांची पूजा केली जाते. 

गङ्गा नदीने आपल्या पिताश्रींना,  म्हणजे श्री शिवजींना विचारले,  की सर्व लोक माझ्या मध्ये येऊन स्नान करून आपली पापे धुवून टाकतात.  माझ्याकडे, साठलेल्या या सर्व पापांचे,   निर्मूलन करण्यासाठी, मी काय करू?  तेव्हा श्रीशिवजींनी सांगितले,  की तू श्रीनर्मदा- मैया मध्ये जाऊन स्नान कर.  व त्यायोगे, तू , स्वतःला शुद्ध करून घेऊ शकशील;  कारण श्रीनर्ममदा ही स्वतःच पापनाशिनी आहे.  त्यामुळेच या दशहराच्या कालखंडात श्री नर्मदा मैया मध्ये स्नान केल्यामुळे गङ्गास्नानाचेही पुण्य लाभते. 

काही ऋषींनी असेही पाहिले आहे की, श्री श्रीगङ्गा- मैय्या ही काळ्या गाईच्या रुपाने,  श्री नर्मदा मैया मध्ये स्नानासाठी येते व परत जाताना ती शुभ्र रंगाची होऊन जाते.  म्हणून या गङ्गा दशहराच्या काळात, गङ्गामैया,  नर्मदा मैया किंवा त्यांच्या किनारी जाणे शक्य नसेल, तर कोणत्याही नदीमध्ये त्या दोघींचे नाव घेऊन स्वतःच्या पापनाशनासाठी स्नान करावे.  पुण्यशालिनी अशा सप्त नद्यांचे स्मरण करावे.

आपल्या निवासाच्या ठिकाणी जी नदी आहे, तिचेसुद्धा आपल्यावर खूप मोठे ऋण असते.  तिची पूजा करावी.  मैय्याला खस (वाळा), कापूर, सुगंधी द्रव्ये अर्पण करावीत. ओटी भरावी.  नैवेद्य दाखवावा.  ऋतुकालोद्भव अंबा अर्पण करावा. मैय्याला भरवावे.  काठावर दिवे लावावे.   त्यांची स्तोत्रे म्हणावीत.  

गावातील सांडपाणी नदीत जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत.

आद्य श्री शंकराचार्यांनी गङ्गाष्टक, गङ्गा स्तोत्र,  यमुनाष्टक, नर्मदाष्टक,  मणिकर्णिकाष्टक अशा स्तोत्रांची रचना केलेली आहे.  नद्यांवरती इतरही बरीच काही स्तोत्रे आहेत.  त्यांचे पठण करावे.  श्री जगन्नाथ पंडित यांनी गङ्गालहरी स्तोत्र याची सुंदर रचना केलेली आहे. श्री शंकराचार्य व श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी नर्मदा लहरींची रचना केलेली आहे.  श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी कृष्णा लहरींची पण रचना केलेली आहे. या स्तोत्रांमध्ये या नद्यांची स्तुती केलेली आहे, महती सांगितलेली आहे व फलश्रुती पण सांगितलेली आहे.  तरी या दहा दिवसात अशा प्रकारे उपासना करून स्वतःचा उद्धार करून घ्यावा.  श्री जगन्नाथ पंडितांनी गङ्गा लहरी रचताना गङ्गास्तुतीच्या सहाय्याने स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहेच.  ज्या लोकांना, योग मार्गाने आपल्या शरीरातील नाड्यांची शुद्धता करून घेता येणे जवळ जवळ अशक्य असते,  त्यांना या नद्यांच्या उपासनेमुळे, स्तवनामुळे,  त्या प्रकारची नाडी शुद्धी प्राप्त करून घेता येत असते, असे शास्त्र वचन आहे,  भागवत पुराणात याचा उल्लेख आहे.  या काळामध्ये नदीमध्ये स्नान, जप जाप्य उपासना व दान करणे या गोष्टींमुळे उच्च दर्जाची अध्यात्मिकता प्राप्त होते. 

पूर्वीचे काळी, म्हणजे सुमारे 60-70 वर्षांपूर्वी, मंदिरांमधून, जसे आपण नवरात्र साजरे करतो, तसे गङ्गा दशहरा काळांत,  दहा दिवस कीर्तन, जागरण, भागवत श्रवण, भगवत्कथा, जप जाप्य, अभिषेक होत असत.

माझी आई  “मंगला कुलकर्णी”  ही, कीर्तनकार असल्याने या दशहराच्या काळात लहानपणी,  तिची कीर्तने अनेक वेळा ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते.  कारण मी तिला पेटीची साथ करत असे.  ती उच्च  विद्या विभूषित असल्याने व प्रोफेसर असल्याने तिचे अर्थार्जन बऱ्यापैकी उच्च प्रतीचे होते.  कीर्तनातून मिळालेले पैसे,   स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरायचे नाहीत,  असे तिने ठरवले असल्याने, त्या संपत्तीचा, तिने विविध प्रकारच्या दानांसाठी विनियोग केला होता. 

अशा दशहराच्या काळात, एक प्रकारचे वाचिक तप म्हणून, कोणाचीही निंदा तसेच चहाडी, न करणे यांसारखी बंधने,  स्वतःवर लादून घेणारी बरीच मंडळी असतात.

या दहा दिवसांच्या काळात प्रामुख्याने श्री गङ्गामैया, श्री नर्मदा मैया, श्री शिवशंभू व भगवान श्री विष्णू यांची उपासना जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रघात आहे. अशाप्रकारे या पवित्र कालावधीमध्ये जास्तीत जास्त उपासना करून आपण आपला अध्यात्मिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करू या. 

या काळात ज्या सोप्या मंत्रांचा जप करावा ते असे…

१) हरगङ्गे भागीरथी।।

२) नर्मदे हर।।

३)  नमः शिवाय।।

४) राम कृष्ण हरी गोविंद।।

ज्यांना येते त्यांनी इतर विविध प्रकारची गीते,  स्तोत्रे, मंत्र यांचे पठण करावे.

या काळात गंगाकिनारी किंवा नर्मदा किनारी स्थित असलेल्या तीर्थस्नानांचे दर्शन घ्यावे. 

तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एखाद्या ज्योतिर्लिंगाचे आणि श्री महाविष्णूंच्या एखाद्या प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घ्यावे.

ज्यांना यज्ञयाग इ. पुण्यकर्मे करणे, कोणत्याही कारणांमुळे करणे अशक्य असेल त्यांनी निदान अशी कर्मे जिथे नेहमी/ मोठ्या प्रमाणात केली जातात, अशा ठिकाणी स्वतःच्या आर्थिक कुवतीनुसार त्या हवनासाठी ज्या वस्तू लागतात, त्यांचे दान अवश्य करावे. 

तेही खूप पुण्यवर्धक असते.

२० मे ते ३० मे पर्यंत या वर्षीचा गंगा दशहराचा पुण्यकाल आहे.

© सौ. यशश्री वि. तावसे

पुणे

दूरभाष क्र.  9552906006

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “I want to be able to be alone” ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “I want to be able to be alone” ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे 

I want to be able to be alone, to find it nourishing- not just waiting. –SUSAN SONTAG

साधारणपणे साठपासष्ठीच्या वयाच्या व्यक्ती कोणत्याही कारणाने एकत्र आल्या तरी त्यांच्या बोलण्यात एकटेपणाचा विषय आल्याशिवाय राहत नाही. —- या दृष्टीने सध्याचे समाज जीवन पाहिले तर त्यात सरळ सरळ दोन गट दिसून येतात. वेगाने बदलत चाललेल्या जीवनशैलीची नवी मूल्ये, नवे विचार अगदी सहजी आत्मसात करून, भावनिक गोष्टींमध्ये  न गुंतता स्वतःला जो विचार सोयीचा आणि फायद्याचा वाटतो तो पटकन स्वीकारून पुढे चालणारा एक गट- तरुण आणि मध्यमवयीन लोकांचा !…… तर झपाट्याने बदलत चाललेली परिस्थिती समजत असली, अनुभवाला येत असली, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून, पुढे सर्व काही ठीकच होणार आहे -असणार आहे असा सोयीचा विचार करून, काळाची पावले न ओळखता, बेसावधपणे  जगणारा एक गट— अर्थातच वृद्धांचा !  

हे प्रकर्षाने जाणवण्याचे कारण म्हणजे, ६ मे २०२३ च्या  टाइम्स ऑफ इंडियाचा अग्रलेख ! विषय आहे–  एकाकीपणा —- Loneliness.  संपादकीयामधे  त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, ‘ Young people prefer new age autonomy over some idealised  intergenerational families cohesion’. 

वृद्ध, मुले आणि नातवंडे सगळ्यांनी एकत्र बरोबर राहणे आता जवळजवळ नाहीसे होताना दिसते. एवढेच नव्हे तर एका शहरात किंवा एका देशात पण ज्येष्ठांबरोबर रहात असणारे तरुणांचे प्रमाण प्रचंड वेगाने कमी होताना दिसते आहे.  भारतामध्ये  तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे जो फायदा देशाला आणि मुलांना होतो आहे, त्याच्या चर्चा होताना आपण वाचतो आणि ऐकतो आहे. तरुणांची, काम करणाऱ्यांची संख्या इतर देशांमध्ये खूप कमी झाली आहे. त्यामुळे ज्यांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना अक्षरशः रेड कार्पेट ट्रीटमेंट आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या पार्श्वभूमीवर मनाने अजूनही भूतकाळातच राहणाऱ्या, आपले म्हातारपण विनात्रासाचे जाणारच आहे असा ठाम विश्वास असणाऱ्या वृद्धांनी खरोखरीच जागे होण्याची गरज आहे. अमेरिकेच्या वैद्यकीय क्षेत्रात सर्वात उच्चपदस्थ व्यक्ती म्हणजे US Surgeon General. सध्याचे सर्जन जनरल विवेक मूर्ती  (एम.डी) यांनी एक ॲडव्हायझरी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, धूम्रपानासारखाच आणि तितकाच, एकाकीपणाही  धोकादायक आहे. त्यामुळे व्यक्तीला हृदयविकार, अर्धांग वायू, डिमेन्शिया यासारखे रोग होण्याची शक्यता वाढते. पण सध्या  घरात बोलायला माणसे नाहीत आणि असली तरी त्यांना गप्पा मारायला वेळ नाही अशी परिस्थिती ! मग वेळ घालवण्यासाठी वृद्ध मोबाईलच्या विळख्यात  सापडतात. अशा व्यक्तींना मानसिक रोग होण्याचा धोका अधिक आहे हे स्वतः ज्येष्ठांनी लक्षात घ्यायला हवे. 

घरात माणसे उपलब्ध नसतील तर आपल्याला चार चौघांमध्ये सुरक्षितपणे राहता येण्यासाठी  निवासाचे काही वेगळे पर्याय शोधण्याची गरज आहे. तसेच जे या क्षेत्रात काम करत आहेत त्यांनीही वृद्धांना ती जाणीव प्रकर्षाने करून द्यायला हवीच आहे. ही जाणीव केवळ आर्थिकच नाही, तर अनेक स्तरावर करून घेणे आवश्यक आहे.  मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बरोबर कोणीतरी असणे, किंवा अशी व्यक्ती वेळेवर उपलब्ध होणे,  ही आजची मोठी गरज आहे.  पण त्याची शक्यताही कमी होत चाललेली आहे. त्यासाठी सुरक्षितता आणि सोय यांची सांगड घालून पुढची वाटचाल करायला हवी आहे. यासाठीचा सध्या उपलब्ध असलेला एक मार्ग म्हणजे ‘ वृद्ध – निवास ! ‘  पूर्वी त्याला वृद्धाश्रम म्हणत.  पण आता मात्र वृद्धाश्रमापेक्षा वृद्धनिवासच म्हणणे योग्य ठरेल….   वृद्धनिवासांबद्दल एक नकारात्मक अशी भावना सर्वांच्याच मनात आहे. वृद्धांच्या , मुलांच्या आणि समाजाच्याही मनामध्ये ! त्याचं कारण म्हणजे  वृद्धाश्रमात राहिले तर मुले काळजी घेत नाहीत असा अर्थ काढून जगाकडून  आपल्या मुलांना/कुटुंबाला नावे ठेवली जातील अशी भीती वृद्धांना वाटते. ही भीती खरी आहे का नाही हे सुद्धा तपासून पाहण्याची गरज कोणाला वाटत  नाही..

यासाठी खरंतर वृद्ध- निवासाचा पर्याय नेमका  कसा आहे?..तो जास्त सुखकर आणि सोयीचा कसा होऊ शकतो? ते समजून घेणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती मिळाली  तर वेळ आल्यावर असा निर्णय घेणेही  सोपे होऊ शकते ..

(हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन यासाठी ‘वृद्धनिवास‘ या विषयावर ‘सनवर्ल्ड फॉर सिनीयर्स‘ या संस्थेतर्फे दि. २६ मे २०२३ रोजी पुण्यामध्ये  सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. —

मार्गदर्शक:- वृद्ध कल्याण शास्त्र तज्ञ, वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनावर पीएच.डी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. रोहिणी पटवर्धन.—- स्वतः वृद्धांनी, पन्नाशीच्या पुढच्या होऊ घातलेल्या वृद्धांनी, वृद्ध सेवा क्षेत्रात  काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी ही माहिती जाणून घेणे नक्कीच उपयुक्त ठरेल.) 

संपर्क :  प्रमोदिनी  8806180011  मृणालिनी 8767628468 ) — केवळ वाचकांच्या माहितीसाठी. 

माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-8… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-8…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

परमात्मवस्तु स्वानंदरूप

स्वयंस्फूर्त अन् प्रकाशरूप॥३६॥

 

पुत्र तू वटेश्वराचा असशी

परमात्म्याचा अंश असशी

कर्पुराच्या कणी कर्पुरगुण

आत्म्याठायी परमात्मगुण

साधर्म्य तुझ्या माझ्यातले

ऐक सांगतो तुज पहिले॥३७॥

 

दोघे आहो परमात्म्याचे अंश

माझ्या उपदेशी तुझा सारांश

जणु आपुल्या एका हातासि

मिठी पडे दुसर्‍या हाताची॥३८॥

 

शब्दे ऐकावा शब्द जसा

स्वादे चाखावा स्वाद जसा

उजेडे पहावा आपुला उजेड जसा

मी उपदेश तुवा करावा तसा॥३९॥

 

सोन्याचा मुलामा सोन्यावर देण्या

मुखाचाच आरसा मुख पाहण्या

तैसा आपुला संवाद शब्दहीन

आत्मा आत्म्यात विलीन॥४०॥

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “न्यूयॉर्क मँगो पल्प पार्टी” ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

न्यूयॉर्क मँगो पल्प पार्टी ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

इतिहासात डोकावताना “न्यूयॉर्क मँगो पल्प पार्टी” बद्दल समजले ते असे —-

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या येथील काही होतकरू तरुणांनी अमेरिकेतील बाजारपेठेत आमरस निर्यात करायचा ठरवला होता. त्या लोकांसाठी नवीन असणारा हा पदार्थ तिकडे हातोहात खपेल आणि आपल्या पदरी चार पैसे पडतील अशी त्यांची अपेक्षा होती. आपल्या येथील तेव्हाची सुप्त बाजारपेठ आणि भरघोस येणारे आंबे बघता त्यांची अपेक्षा काही चुकीची नव्हती. त्याकाळी अमेरिकेत आपला  व्यवसाय स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात असणारे श्री. नानासाहेब जवळकर यांनी, त्या रसाचे वितरण अमेरिकेत करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारतातून पाठवलेले आमरसाचे पिंप जेव्हा न्यूयॉर्क किनारी आले, तेव्हा खुद्द नानासाहेब त्यांची डिलिव्हरी घ्यायला गेले होते. तिथल्या कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं “ हे काय आहे ? “ 

नानासाहेबांनी रसाची इत्यंभूत माहिती त्यांना दिली आणि त्याची चव घेण्याचा आग्रह केला. आमरस चाखल्यावर कस्टम अधिकारी विचारात पडले आणि नानासाहेबांना म्हणाले, “ हे प्रकरण भलतंच चविष्ट आहे आणि याचं व्यसन जर इतद्देशिय लोकांना लागले तर आमचे कष्टाचे डॉलर तुमच्या देशात जाऊन तुमची अर्थव्यवस्था उभारी घेईल. आमच्या देशाच्या हितासाठी हा रस इकडे विकायची परवानगी मी देऊ शकत नाही. मला माफ करा. “ नानासाहेबांनी बऱ्याच विनवण्या केल्या पण अधिकारी बधले नाहीत. त्यांनी आमरसाची सगळी पिंपं नाल्यात ओतून दिली. या घटनेला तिकडे  “न्यूयॉर्क मँगो पल्प पार्टी”  म्हणून ओळखले जाते. त्या घटनेचा फोटो आज मी इथे पोस्ट करत आहे. आमचे मित्र उद्योगभूषण यदुनाथ जवळकर यांचे नानासाहेब हे पणजोबा. त्यांच्याकडून आम्हाला ही घटना ज्ञात झाली.

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सखे… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सखे… 🧚 ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

मन रानात-वनात

मन श्रावण थेंबात

मन  प्रतिबिंब माझे

तुझ्या डोळ्यांच्या ऐन्यात

 

मन सावळ्या मेघात

मन आकाशी ताऱ्यात

मन निवांत हे संथ

तुझ्या मनाच्या डोहात

 

मन पावसाची धारा

मन खट्याळसा वारा

मन गुंफले गं माझे

त्या ओलेत्या रुपात

 

मन  आठवांचे तळे

मन गंधाळले मळे

माझे हळवे गं गीत

तुझ्या केशर ओठात

 

मन भिजते दंवात

मन प्राजक्त गंधात

मन पाणीदार मोती

तुझ्या मनी कोंदणात

 

मन माझे गं ओढाळ

मन चांदणं मोहोळ

मन घुटमळे सखे

तुझ्या चाहूल वाटेत

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंतरराष्ट्रीय मातृदिन – एक बाजू अशीही… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आंतरराष्ट्रीय मातृदिन – एक बाजू अशीही…  ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

Anna Reeves Jarvis

नमस्कार मित्रांनो,  

आंतरराष्ट्रीय मदर्स डे (मे महिन्याचा दुसरा रविवार) अर्थात मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

हा मातृदिन आजच्याच दिवशी का साजरा करतात, या प्रश्नाचा मी मागोवा घेत असता काही मनोरंजक तसेच विचारणीय माहिती हाती लागली. मदर्स डेचा सर्वात जुना इतिहास ग्रीसशी जोडल्या जातो. तिथे ग्रीक देवी देवतांच्या आईची आदराने पूजा केल्या जात होती. हे मिथक असल्याचे देखील बोलल्या जाते. मात्र आज अस्तित्वात असलेल्या मदर्स डे ची सुरुवात करण्याचे श्रेय बहुतेक जण अॅना रीव्ह्ज जार्विस (Anna Reeves Jarvis) हिलाच देतात. तिचे आपल्या आईवर (अॅन मारिया रीव्ह्ज- Ann Maria Reeves) नितांत प्रेम होते. जेव्हां तिच्या आईचे ९ मे १९०५ ला निधन झाले, तेव्हा स्वतःच्या आईबद्दल आणि सर्वच मातांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस असावा असे तिला प्रकर्षाने वाटायला लागले. यासाठी तिने खूप पाठपुरावा करून वेस्ट व्हर्जिनियामध्ये चळवळ सुरू केली. तीन वर्षांनी (१९०८) अँड्र्यूज मेथोडिस्ट एपिस्कोपल चर्चमध्ये प्रथम अधिकृत मदर्स डे सेलिब्रेशन आयोजित केल्या गेला. १९१४ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अॅना जार्विसच्या कल्पनेला मान्यता देत मे महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या रविवारी राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता देणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली. हा दिवस मग हळू हळू अमेरिकेतून युरोपीय आणि इतर देशात आणि नंतर जगभर आंतरराष्ट्रीय मदर्स डे म्हणून मान्यता पावला.

कवी आणि लेखिका ज्युलिया वॉर्ड होवे (Julia Ward Howe) हिने या आधुनिक मातृदिनाच्या काही दशके आधी वेगळ्या कारणासाठी ‘मातृशांती दिन’ साजरा करण्याचा प्रचार केला. अमेरिका आणि युरोप मध्ये युद्ध सुरु असतांना हजारों सैनिक मारले गेले, अनेक प्रकाराने नागरिक पोळले गेले आणि आर्थिक हानी झाली ती वेगळीच. या पार्श्वभूमीवर एखादा दिवस युद्धविरोधी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मातृदिन साजरा करण्याची कल्पना जगभरात पसरली पाहिजे असे ज्युलियाला वाटत होते. तिची कल्पना होती की महिलांना वर्षातून एकदा चर्च किंवा सोशल हॉलमध्ये एकत्र येण्यासाठी, प्रवचने ऐकण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी, ईश्वरभक्तीची गीते सादर करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित करावे व त्यांच्यासाठी असा एखादा दिवस नेमून द्यावा. या कृतीमुळे शांतता वाढेल आणि युद्धाचे संकट टळेल असे तिला वाटत होते.

मात्र ‘एकसंध शांतता-केंद्रित मदर्स डे’ साजरा करण्याचे हे सुरुवातीचे प्रयत्न मागे पडले, कारण तोंवर व्यक्तिगतरित्या मातृदिन साजरा करण्याची दुसरी संकल्पना रुजली. याला कारण होते व्यापारीकरण! नॅशनल रिटेल फेडरेशनच्या २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार, आजकाल मदर्स डे हा अमेरिकेत $२५ अब्ज इतका महागडा सुट्टीचा दिवस बनला आहे. तिथे लोक या दिवशी आईवर सर्वात जास्त खर्च करतात. ख्रिसमस आणि हनुक्का सीझन (ज्यू लोकांचा ‘सिझन ऑफ जॉय’) वगळता मदर्स डेसाठी सर्वात जास्त फुले खरेदी करण्यात येतात. या व्यतिरिक्त गिफ्ट कार्ड, भेटवस्तू, दागिने यांवर $५ अब्ज पेक्षाही अधिक खर्च केल्या जातो. या शिवाय विविध स्कीमच्या अंतर्गत स्पेशल आउटिंग सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे.

अॅना रीव्ह्ज जार्विसला याच कारणास्तव तिच्या मातृप्रेमावर आधारित कल्पनेबद्दल खेद वाटत होता. तिच्या हयातीत, ती फ्लोरिस्ट्स (फुले विकणारी इंडस्ट्री) यांच्या आक्रमक व्यापारीकरणाविरुद्ध एकाकी लढली. मात्र दुर्दैवाने त्यासाठी तिलाच तुरुंगवास घडला. या निमित्ताने मातेप्रती असलेल्या भावभावनांचा राजनैतिक गैरवापर करणे, धर्मादाय संस्थांच्या नांवाखाली निधी गोळा करणे, हे प्रकार सुद्धा तिच्या डोळ्यादेखत घडत होते. जार्विसने १९२० साली एक अत्यंत महत्वपूर्ण विचार मांडला. ती म्हणाली, ‘हा विशेष दिवस आता बोजड आणि फालतू झालाय. आईला महागडे गिफ्ट देणे, हा मदर्स डे साजरा करण्याचा योग्य मार्ग नाही.’  १९४८ साली, वयाच्या ८४ व्या वर्षी, जार्विस एका सॅनेटोरियम मध्ये एकाकी रित्या मरण पावली. तोवर तिने आपला सर्व पैसा मदर्स डे च्या सुट्टीच्या व्यापारीकरणाविरुद्ध लढण्यासाठी वापरून खर्च केला होता. मातृदिनानिमित्त मी या धाडसी आणि प्रगत विचारांनी समृद्ध अशा वीरांगना स्त्रीला नमन करते. तिचे छायाचित्र लेखाच्या सोबत जोडले आहे.

मैत्रांनो, मी ही माहिती वाचली तेव्हां माझ्या मनांत विचार आला की, खरंच या दिवशी आईची ही अपेक्षा असते कां? खरे पाहिले तर निरपेक्ष प्रेम करणे हाच स्थायी मातृभाव असतांना ते व्यक्त करण्यासाठी या तद्दन व्यापारी मनोवृत्तीला खत पाणी घालणे योग्य आहे कां? बहुतेक मातांना वाटत असते की, या दिवशी त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी फक्त वेळ काढावा, त्यांच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलावे, आईबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणींना उजाळा द्यावा, गप्पा गोष्टी कराव्या अन सोबत असावे, बस! यात काडीचाही खर्च नाही.  माझ्या मते हेच सर्वात बहुमूल्य गिफ्ट असावे मदर्स डे चे अर्थात मातृदिनाचे !  

धन्यवाद !   

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ११ ते १५ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ११ ते १५ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ (अनेक देवतासूक्त)

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : ऋचा ११ – १५ : देवता वरुण 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील चोविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले  असल्याने हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिली ऋचा प्रजापतीला, दुसरी ऋचा अग्नीला, तीन ते पाच या ऋचा सवितृ देवतेला आणि सहा ते पंधरा या ऋचा वरुण देवतेला  आवाहन करतात. 

आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या अकरा ते पंधरा  या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद ::

तत्त्वा॑ यामि॒ ब्रह्म॑णा॒ वन्द॑मान॒स्तदा शा॑स्ते॒ यज॑मानो ह॒विर्भिः॑ ।

अहे॑ळमानो वरुणे॒ह बो॒ध्युरु॑शंस॒ मा न॒ आयु॒ः प्र मो॑षीः ॥ ११ ॥

नमन करोनीया स्तवनांनी तुमच्या समीप येतो

अर्पण करुनी हविर्भाग हा भक्त याचना करतो

क्रोध नसावा मनी आमुच्या जवळी रहा जागृती 

दीर्घायू द्या तुमची कीर्ती दिगंत आहे जगती ||११||

तदिन्नक्तं॒ तद्दिवा॒ मह्य॑माहु॒स्तद॒यं केतो॑ हृ॒द आ वि च॑ष्टे ।

शुनः॒शेपो॒ यमह्व॑द्गृभी॒तः सो अ॒स्मान्राजा॒ वरु॑णो मुमोक्तु ॥ १२ ॥

अहोरात्र उपदेश आम्हा सारे पंडित करिती

मना अंतरी माझ्या हाची कौल मला देती

बंधबद्ध शुनःशेप होता तुम्हा आळविले

तुम्हीच आता संसाराच्या बंधनास तोडावे ||१२||

शुन॒ःशेपो॒ ह्यह्व॑द्गृभी॒तस्त्रि॒ष्वादि॒त्यं द्रु॑प॒देषु॑ ब॒द्धः ।

अवै॑नं॒ राजा॒ वरु॑णः ससृज्याद्वि॒द्वाँ अद॑ब्धो॒ वि मु॑मोक्तु॒ पाशा॑न् ॥ १३ ॥

शुनःशेपाचे त्रीस्तंभालागी होते बंधन 

धावा केला आदित्याचा तोडा हो बंधन 

ज्ञानवान या वरूण राजा कोण अपाय करीत 

तोच करी या शुनःशेपाला बंधातुन मुक्त ||१३||

अव॑ ते॒ हेळो॑ वरुण॒ नमो॑भि॒रव॑ य॒ज्ञेभि॑रीमहे ह॒विर्भिः॑ ।

क्षय॑न्न॒स्मभ्य॑मसुर प्रचेता॒ राज॒न्नेनां॑सि शिश्रथः कृ॒तानि॑ ॥ १४ ॥

शांतावावया तुम्हा वरुणा अर्पण याग हवी

तुम्हा चरणी हीच प्रार्थना आम्हा प्रसन्न होई

रिपुसंहारक ज्ञानःपुंज वास्तव्यासी येई

करोनिया क्षय पातक आम्हा पुण्य अलोट देई ||१४||

उदु॑त्त॒मं व॑रुण॒ पाश॑म॒स्मदवा॑ध॒मं वि म॑ध्य॒मं श्र॑थाय ।

अथा॑ व॒यमा॑दित्य व्र॒ते तवाना॑गसो॒ अदि॑तये स्याम ॥ १५ ॥

ऊर्ध्वशीर्ष मध्यकाया देहाच्या खाली 

तिन्ही पाश आम्हा जखडती संसारी ठायी

शिथिल करा हो त्रीपाशांना होऊ पापमुक्त

आश्रय घेण्याला अदितीचा आम्ही होऊ पात्र ||१५||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/hDxy0-AHmcg

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 11-15

Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 11-15

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य – भाग – ३… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

सौ. यशश्री वि. तावसे

? इंद्रधनुष्य ?

☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – ३ … ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

(त्यामुळे काम या पुरुषार्थाशी माझा दूरान्वयानेही संबंध आला नाही.  मला सहा महिन्यांचा कालावधी द्या. मी सहा महिन्यांचे आत कधीही येईन.) – इथून पुढे —

भारती-माता, यांचे दुसरे नाव सरस्वती होते. दुर्वास ऋषींच्या शापामुळे सरस्वती देवींना भूलोकी जन्म घ्यावा लागला होता.  भगवान शिव जेव्हा भूलोकी जन्म घेतील,  तेव्हा त्यांच्या दर्शनाने या सरस्वती देवी मुक्त होतील,  असा श्री विष्णूंनी भारती देवींच्या वडिलांना दृष्टांत दिला होता.  आचार्य दुसऱ्या दिवशी महिष्मती सोडून निघणार होते.  त्या रात्री मंडन अत्यंत शांत व मूक होते.  त्यांच्या मनात कोणतीच शंका उरली नव्हती. कोणत्याच कामाची आसक्ती उरली नव्हती. त्यांनी मनाने केव्हाच संन्यास स्वीकारला होता.  त्या रात्री भारतीने आपल्या मुलाची करावी तशी आचार्यांची सेवा केली.  ती मनोमन समजली होती की आता आपले जीवन संपले आहे.  आचार्यांना निरोप देण्यासाठी रस्ते सजवले होते. सारे याज्ञिक, वेदज्ञ, प्रतिष्ठित नागरिक, ईश्वर भक्त मंडन मिश्रांच्या निवासाकडे आले होते.

आचार्य पुढे जात असता, अमृतपूरच्या राजाचे निधन झालेले दिसले. पर्वतावरील एका गुहेत आचार्यांनी , मी, देह ठेवणार असल्याचे व त्या राजाच्या शरीरात मी प्रवेश करणार असल्याचे सुखाचार्य, पद्मपादाचार्य व हस्तामलकाचार्य या तीनच शिष्यांना सांगितले.  त्या गुहेत त्यांच्या शरीराचे रक्षण करण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवली.  कोणत्याही संकटाची चाहूल लागली तरी मला म्हणजे राजाला येऊन एक श्लोक सांगितला तो म्हणा.  त्याक्षणी मी माझ्या शरीरात प्रवेश करेन.

तिकडे राजाचे अंत्यदर्शनासाठी राजाला फुलांचे गादीवर ठेवले. इतक्यातच राजाने हालचाल केल्याचा भास झाला.  झोपेतून उठावे तसे राजा उठून बसला अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांनी प्रसंगावधान दाखवून कणकेची प्रतिमा करून तिचे दहन केले.  सर्व राज्यात आनंद झाला. दुसऱ्या दिवशी राजपुरोहिताने योग्य तो अभिषेक केल्यावर, राज्यकारभार सुरू झाला.  वेळच्यावेळी राज्यसभा सुरू व्हायची. पटापट निर्णय दिले जायचे.  राज दरबारात नवचैतन्य निर्माण झाले होते.  राज्यातील प्रजेत अपूर्व आत्मविश्वास निर्माण झाला.  सर्वजण चांगले वागू लागले. मंदिरांचे पुनरुज्जीवन झाले.  हरिभक्ति फुलून जाऊ लागली.

राणी पहिल्याच भेटीत मोहरून गेली.  राजा प्रेमाने वागतो, पण तो अलिप्त असल्याचे तिला जाणवत होते.  राजा पूर्वीप्रमाणे दासींकडे  पहात नसे.  त्यामुळे राणी स्वतः सर्व सेवा करू लागली.  

हळुहळू मंत्रिमंडळाला संशय येऊ लागला की आपला राजा इतका कसा बदलला?  वीस दिवसांनी मंत्रिमंडळाने गुप्त बैठक घेतली. त्यांना जाणवले की कोणीतरी योग्याने राजाच्या शरीरात प्रवेश केला असावा.  मच्छिंद्रनाथांनी जसे आपले शरीर लपवून ठेवले होते,  तसे काही घडले का?  असे त्यांना वाटू लागले.  त्यामुळे गुप्तपणे शोध घेण्याचे व अशा योग्याचे ते शरीर शोधून अग्नी दिला पाहिजे,  म्हणजे हा योगी राजाचे शरीर सोडून कुठेही जाणार नाही व आपला राजा चक्रवर्ती होईल असे त्यांनी ठरवले.

ही बातमी चित्सुखानंदांनी राजवाड्यात येऊन,  ठरल्याप्रमाणे खुणेचा श्लोक म्हणून,  राजाला सांगितली.  आचार्य काय समजायचे ते समजले व परत गुहेत ठेवलेल्या शरीरात प्रवेश करून त्या स्थानापासून दूरवर निघून गेले.

हे शरीर ठेवले होते, ती जागा, नर्मदेकाठी, मंडलेश्वर या गावी, गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे आहे. 

दीड-दोन महिन्यातच ते परत महिष्मतीला आले. चर्चेमध्ये आचार्यांनी भारती देवींचे पूर्ण समाधान केले.  त्या म्हणाल्या,  आपण साक्षात सदाशिव आहात.  आपणास माझा नमस्कार. आपण साक्षात जगद्गुरुच आहात.  मी माझ्या पतीला संन्यास दीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे.  आचार्यांनी मंडन मिश्रांना संन्यास दिला.

त्या काळात काश्मीर म्हणजे पंडितांचे आगर होते.  श्रीनगर मध्ये फार पूर्वी सर्वज्ञ पीठ स्थापन झाले होते.  त्या पीठाचे, तीन दिशांचे दरवाजे उघडलेले होते.  पंडितांनी तो मान मिळवला होता.  पण दक्षिणेकडचा दरवाजा बंद होता.  आचार्य दक्षिणेकडून आले होते. तेथील विद्वानांमध्ये चर्चा होऊन,  आचार्यांसाठी दक्षिणेकडील दार उघडले गेले व त्या सर्वज्ञ पिठावर बसण्याचा त्यांना मान मिळाला.  

बौद्ध व जैन पंथीय आचार्यांनी शंकराचार्यांना मनोमन मान्यता दिली.  पण सभा सोडून चालते झाले.  

नंतर त्यांनी द्वारकेमध्ये पहिल्या  धर्मपीठाची स्थापना केली. द्वारकेमध्ये श्रीकृष्णांचे दर्शन घेतले.  तेव्हा अच्युताष्टकाची रचना केली.  नंतर प्रभास व उज्जैनीस भेट दिली. नेपाळला दर्शनासाठी गेले.  वैदिक सनातन धर्माच्या पताका, नेपाळच्या सर्व मंदिरांवर उभारल्या.  आचार्य यांना कैलास पर्वतावर जाऊन शिवदर्शनाची ओढ लागली होती. त्यांनी केलेल्या प्रार्थनेवर प्रसन्न झालेल्या दत्तगुरूंनी, आचार्य यांचा उजवा हात धरला व आपल्या योगसामर्थ्याने एका क्षणात त्यांना भगवान शिवांच्या समीप कैलासावर आणले.  तिथे शतश्लोकी शिवानंद लहरींची रचना झाली.  आचार्यांनी केलेल्या, या भक्तीमय स्तोत्राने प्रसन्न झालेल्या भगवान शिवांनी आचार्यांना पाच स्फटिकलिंगे दिली व सांगितले,  यांच्या पूजनाने तुला अमोघ ज्ञान प्राप्त होईल.

आचार्यांनी जगन्नाथ पुरी येथे मठ स्थापन केला. 

नंतर आचार्य,  महाराष्ट्रातल्या वैकुंठाकडे म्हणजेच पंढरपूरला आले. पांडुरंगाचे दर्शन होताच पांडुरंगाष्टक म्हणून प्रार्थना करू लागले.

आचार्यांनी चौथ्या 

धर्मपीठाची स्थापना शृंगेरी येथे केली. 

शेवटी, कांची येथे 

धर्मपीठाची स्थापना केली. 

अशा प्रकारे चार दिशांना चार धर्मपीठांची स्थापना केली. 

कांचीमध्ये कोण,  कोणत्या धर्मापीठावर राहील,  ते सांगितले.

त्यांनी धारण केलेला दंड,  नर्मदा मातेने पावन केलेला कमंडलू,  त्यांच्या पादुका…. यांच्यावर कोणाचा हक्क राहील,  हे सांगितले.

ते म्हणाले माझा बहिश्चर प्राण, म्हणजे कैलासावर भगवान शिवांकडून प्राप्त झालेल्या त्या सौंदर्य लहरी,

माझ्या शिवानंद लहरींसह,  प्राणरूपाने आपणा सर्वांसाठी ठेवून जात आहे. व आपल्या मधुर वाणीने 

भज गोविंदम् 

भज गोविंदम।।

हे आपल्या गुरूंचा उल्लेख असलेले व गुरुगोविंदयतींना प्रिय असलेले भजन म्हणायला सुरुवात केली. 

सर्व शिष्यांच्या एका सुराने कांची मठाचा आसमंत भरून गेला. एका क्षणी धून थांबली; व सर्वत्र, नीरव शांतता पसरली. कारण आचार्य आसनावर नव्हते.

दंड तेजाळला होता. कमांडलू प्रभावी दिसत होता.

पादुका तेजःपुंज दिसत होत्या. 

आणि सौंदर्य लहरीच्या पोथीतून व त्याखाली असलेल्या शिवानंद लहरींच्या पोथीतून, दिव्य असा,  शीतल प्रकाश बाहेर पसरत होता. 

आचार्यांचे आसन रिकामे होते. 

चित्सुखाचार्य कातर स्वरात म्हणत होते….

चिदानंद रूप, शिवोsहम्  शिवोsहम।।

— समाप्त —

(संदर्भ ग्रंथ…. “जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य “ – लेखक… श्री.अविनाश महादेव नगरकर.)

© सौ. यशश्री वि. तावसे

पुणे

दूरभाष क्र.  9552906006

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print