मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सखे🍃… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सखे🍃 सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

शब्द मूक जाहले, तू शांत शांत का

भेटू ग सांजवेळी, मनी आकांत का ?

 

ओळख मनातले तू

हवा शब्दांचा उच्चार का

भावस्वप्न पाहताना

सखे अशी क्लांत का?

 

सांजसंध्या बहरली अन्

छळतो  एकांत का?

क्षितीजावरील सांजरंग

तव मुखी विश्रांत का ?

 

नभी उधळे चांदण्याचा

चुरा निशेचा कांत का?

खुलून ये जवळी, अता

सुखाची सखे भ्रांत का?

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 107 ☆ हे विश्वची माझे घर…. ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 107 ? 

☆ हे विश्वची माझे घर… ☆

हे विश्वची माझे घर

सुबुद्धी ऐसी यावी 

मनाची बांधिलकी जपावी.. १

 

हे विश्वची माझे घर

औदार्य दाखवावे 

शुद्ध कर्म आचरावे.. २

 

हे विश्वची माझे घर

जातपात नष्ट व्हावी 

नदी सागरा जैसी मिळावी.. ३

 

हे विश्वची माझे घर

थोरांचा विचार आचरावा 

मनाचा व्यास वाढवावा.. ४

 

हे विश्वची माझे घर

गुण्यगोविंदाने रहावे 

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे.. ५

 

हे विश्वची माझे घर

नारे देणे खूप झाले 

आपले परके का झाले.. ६

 

हे विश्वची माझे घर

वसा घ्या संतांचा 

त्यांच्या शुद्ध विचारांचा.. ७

 

हे विश्वची माझे घर

`सोहळा साजरा करावा 

दिस एक, मोकळा श्वास घ्यावा.. ८

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बेपत्ता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ बेपत्ता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(षडाक्षरी)

          कढ अंतरीचे

          आटलेले सारे

          निचऱ्यात आता

          साठलेले सारे

 

          शमलेले सारे

          व्यथांचे क्रंदन

          ह्रदी शिणलेले

          मौनाचे स्पंदन

 

          दाह लौकिकाचे

          शांत शांत आता

          उरे काळजात

          स्मशानशांतता

 

          कधीमधी जागी

          आठवांची भूते

          अर्थशून्य भास

          तेवढ्यापूरते….

 

          काल होतो तसा

          आज झालो असा

          दावितो वाकुल्या

          चक्क हा आरसा

 

          होतो जेव्हा माझा

          माझ्याशीच द्रोह

          कवेत घ्यावया

          साद घाली डोह

 

          जमा इतिहासी

          आयुष्याचे टप्पे

          सुने  हळूहळू

          काळजाचे कप्पे

 

          स्मृतिभ्रष्ट कोणी

          निनावी गर्दीत

          आपुलाच पत्ता

          हिंडतो शोधित !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ती आयुधं… !  ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? ती आयुधं… ! ? ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

कधी

बसवलेस घट

कधी

फिरलीस अनवाणी ,

कधी

केलास उपवास

कधी

गरब्यातली गाणी.

कधी

केलास हरजागर

कधी

भक्तीत भिजलीस ,

कधी

केलास उदो उदो

कधी

रंगात सजलीस.

कधी

मातीत रुजलीस

कधी

हत्यारं पुजलीस.

पण…

बाई म्हणून सहन करताना

आता

तुझ्यातली दुर्गा होऊन जग,

आणि

तुझ्याच रक्षणासाठी

ती आयुधं ;

आता तरी चालवून बघ.

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ योगी… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ योगी … ☆ सौ राधिका भांडारकर

मातीतल्या बीजाला

अंकुर फुटतो

धरणीला आनंद होतो

पावसाचे शिंपण होते

अन् रोप उलगडते

हळुहळु त्याचा

वृक्ष होतो

तो बहरतो, फुलतो, फळतो

आनंदाची सर्वत्र पखरण करतो

मग आयुष्याचा तो क्षण येतो

पानगळीचा…

एक एक पान गळू लागते

फांदीला सोडून धरणीवर उतरते

त्याचवेळी आभाळाची ओढ सरते

ज्या मातीतून उगवले

तिथेच परतीची पाऊले

विलग पानांचा होतो पाचोळा

वार्‍यावर उडतो कचरा सोनसळा

वृक्ष होतो बोडका

तरी भासतो योग्यासारखा

गळणार्‍या पर्णांना निरोप देताना

उभा ताठ, ना खंत ना वेदना

कर्मयोगी निवृत्तनाथ

ऋतुचक्राशी असे बद्ध

एकाकी हा कातरवेळी

संवाद करी पानगळी

हा शिशिर सरेल

पुन्हा वसंत फुलेल

नव्या जन्मी नवी पालवी

हिरवाईने पुन्हा नटेल..

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 129 – तुझे रूप दाता ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 129 – तुझे रूप दाता ☆

तुझे रूप दाता स्मरावे किती रे ।

नव्यानेच आता भजावे किती रे।

 

अहंकार माझा मला साद घाली ।

सदाचार त्याला जपावे किती रे।

 

नवी रोज स्पर्धा इथे जन्म घेते।

कशाला उगा मी पळावेकिती रे ।

 

नवी रोज दःखे नव्या रोज व्याधी।

मनालाच माझ्या छळावे किती रे।

 

कधी हात देई कुणी सावराया।

बहाणेच सारे कळावे किती रे ।

 

पहा सापळे हे जनी पेरलेले ।

कुणाला कसे पारखावे किती रे ।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #151 ☆ धुंद झाले मन माझे…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 151 – विजय साहित्य ?

☆ धुंद झाले मन माझे…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

धुंद झाले मन माझे

शब्द रंगी रंगताना

आठवांचा मोतीहार

काळजात गुंफताना…….॥१॥

 

धुंद झाले मन माझे

तुझें मन ‌वाचताना

प्रेमप्रिती राग लोभ

अंतरंगी नाचताना……..॥२॥

 

धुंद झाले मन माझे

हात हातात घेताना

भेट हळव्या क्षणांची

प्रेम पाखरू होताना……..॥३॥

 

धुंद झाले मन माझे

तुझ्या मनी नांदताना

सुख दुःख समाधान

अंतरात रांगताना……….॥४॥

 

धुंद झाले मन माझे

तुला माझी म्हणताना

भावरंग अंगकांती

काव्यरंगी माळताना……॥५॥

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “प्रिय…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे 

? कवितेचा उत्सव ?

☆ “प्रिय…” ☆ श्री आशिष मुळे ☆

पहाटेच्या गार वाऱ्यात अर्धोंमिलीत माझ्या डोळ्यात अन् शिणलेल्या माझ्या मनात दिसलीस तू सूर्यकिरणांच्या तेजात..   किती वर्ष झाली तुला दूर जाऊन काळही गेला आता वेळ विसरून दिसलीस का मग अशी अचानक जाताना तर गेली होतीस तुझं मन सावरून..   विचारायला जमलं नाही तुलाही अन मलाही पण आज विचारायला हरकत नाही माझ्यातली हिंमत आजही तीच आहे पण तुझ्यातली भीती काही गेलेली दिसत नाही..   म्हणून विचारतो, खरंच काय मिळवलस? जनरिती समोर तेव्हा झुकून आणि विचार कर काय गमावलस वादळात माझा हात सोडून..   दोष नाही देत तुला, डोळ्यातून पाणी काढू नकोस आता तरी मनातलं, जिभेवर आणायला लाजू नकोस आजही मित्रच आहे तुझा, तुझ वाईट कधी चिंतणार नाही दुखलं तुला काही तर आजही डोळ्यात पाणी थांबणार नाही..   आज मीही लूजर नाही आणि तूही विनर नाही याचा मला खरंच आसुरी आनंद होत नाही कारण जातानाही तू मला काही देऊनच गेलीस जिंकायच्या ऊर्मीला माझ्या ज्वाळा बनवून गेलीस..   त्याच आगीवर आजही जगतो आहे जगता जगता इतरांनाही ऊर्जा देतो आहे आता परत येऊ नकोस अन भडकलेली माझी चिता अशी मधूनच विझवू नकोस…  

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निसर्ग ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ गत जन्मीचे… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

गत जन्मीचे हिशोब चुकते करायचे तर

हवी कशाला व्यर्थ सुखाची मार्ग प्रतीक्षा?

अशा पापण्या भिजवायला हव्या तुला तर

दिलीं कशाला एकांताची जबरी दीक्षा?

पद चिन्हावर शिंपशील नयनातील पाणी

म्हणून चालतो याच पथावर मी अनवाणी

मार्ग चालता पुढे पुढे मन वळते मागे

अन पायाला घट्ट बिलगती कच्चे धागे

आशेचा तू वृक्ष लाविला होता दारी

कैक दिसानी आज बहरला मागील दारी

या वृक्षाचा बहर भिडावा. नील नभाला

मिळो सावली क्षण सौख्याची पांथस्थाला

गर्द सावली विस्ताराची भूल जगाला

भार तोलते मुळी तियेची खंत कुणाला?

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #136 ☆ संत निवृत्ती नाथ… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 136 ☆ संत निवृत्ती नाथ… ☆ श्री सुजित कदम ☆

दिली गहिनीनाथांनी

दिक्षा निवृत्ती नाथांस

बंधू थोरले ज्ञानाचे

गुरू लाभले सर्वांस…! १

 

धन अध्यात्मिक सारे

दिले निवृत्ती नाथांनी

दिला आदेश ज्ञानाला

लिही गीता दृष्टांतांनी…! २

 

जगामध्ये गांजलेले

सुखी केले हीन दीन

संत निवृत्तीनाथांची

सिद्धयोगी  कर्मवीण…! ३

 

ज्ञाना सोपान मुक्ताई

केला सांभाळ स्नेहाने

आधाराची कृपाछाया

दिली निवृत्ती नाथाने…! ४

 

कृष्ण तत्व गीता सार

अभंगांचे मुळ रूप

कार्य निवृत्ती नाथांचे

परब्रम्ह निजरूप…! ५

 

ग्रंथ निवृत्ती ‌साराने

गीता टीकेस उत्तर

ग्रंथ निवृत्ती देवी हा

अद्वैताचे मन्वंतर…! ६

 

योगमय अद्वैताची

गाथा कृष्ण‌भक्तीपर

तीन चारशे अभंग

हरीपाठ सुखकर…! ७

 

हस्त लिखितांची ठेव

आहे कैवल्याचे लेणे

संत निवृत्तीनाथांचे

आहे आशीर्वादी देणे….! ८

 

वारकरी संप्रदाय

असे समता संदेश

वसा विश्व कल्याणाचा

देई निवृत्ती निर्देश…! ९

 

ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी

शोकाकुल परीवार

नाथ निवृत्त जाहले

संजीवन निरंकार…! १०

 

ब्रम्हगिरी पर्वताच्या

पायथ्याशी अंतर्धान

नाथ समाधी मंदिर

वैष्णवांचे श्रद्धास्थान…! ११

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares