मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 246 ☆ संचित… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 246 ?

☆ संचित… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

बाहेर पाऊस पडतोय,

मी सोफ्यावर बसून,

मोबाईल वरच्या घडामोडींवर,

करतेय तुरळक कमेंट!

 

माझी बाई आवरतेय माझं घर,

तिनं केल्या भराभर चपात्या,

घासली भांडी, कपडे धुतले,

धूळ झटकून,

 फरशी झाडून, पुसून घेतली !

 

तिच्या गैरहजेरीत,

मी मुळीच करू शकत नाही,

हे सारं!

 

तिच्या अनेक दिवसांच्या,

गैरहजेरीत नवीन बाई पाहिली,

अमराठी,

तिला म्हटलं,

“तुमको सब कुछ करना पडेगा,

मैं कुछ नही करती, ये सब ऐसा ही

पडा रहता है ।”

 

ती म्हणाली, “हाँ… हाँ…. चलेगा ।”

एक महिना काम करून,

घरात रूळत असतानाच,

ती डेंग्यू नं आजारी,

इस्पितळात दाखल!

पुन्हा येऊ लागली,

पहिलीच……

“मदतनीस ” हा शब्द वापरतात,

हल्ली कामवाली साठी !

पण मला “कामवाली” वाटतं,

परफेक्ट!

कारण सारी कामं तिच करत असते,

 निगुतीनं, रितसर, पद्धतशीर,

 

अलिकडे छळतोय मला,

माझाच स्थायीभाव स्पष्टच,

इतकंही नसावंच, आळशी,

निष्क्रिय,

आरामशीर….

कुठल्याच वयात!

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रतनजी टाटा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ रतनजी टाटा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

कर शिस्तीचा, देशाभिमानाचा 

कर्मचाऱ्यांसाठी केला सक्तीचा 

करद्वय जुळती आपसूक

भाव त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा ||

*
सर केली उद्योगाची शिखरे 

सर त्याची ना येतसे कोणाला 

सर तुम्हास मानाचा मुजरा 

सर कर्तृत्वाचा कंठी शोभला ||

*
मानव तुम्ही आदर्श देशाचे 

जगात नारे उद्योजगतेचे 

मान व कणा ताठच आमचे 

रत्न आमच्या हे अभिमानाचे ||

*
वर तुम्हा त्रिदेवांचा लाभला 

स्वतःसवे तो जगास वाटला 

वर नेले भारतास आपल्या 

कार्यातून तुम्ही आता उरला ||

*
रत न कार्यात पळभरही 

घडले असे आजवर नाही 

रतन नाव हे सार्थ करूनी

भारतमातेच्या मुकुटी राही ||

*
टाटा करतेय जग तुम्हाला 

प्रेम ज्योतीच्या ओवाळून ताटा 

टाटा रतन तुम्ही चिरंजीव 

प्रगतीत तुमचा मोठा वाटा ||

*

पोरका झाला आता देश सारा 

तुम्ही उद्योगाची माऊली तात 

पोर का? वृद्धही जपती मनी 

ऋण फिटेल ना शतजन्मात ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुखी माणसाचा सदरा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

सुखी माणसाचा सदरा !  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“मीच जगी सर्वात सुखी” 

मंत्र जपा सतत मनात,

ठेवा असं आपलं वागण 

सदा होई वाहवा जनांत !

*

हात सढळ तुमचा ठेवा

यथाशक्ती मदतीसाठी,

बना काठी आंधळ्याची

दिन दुबळ्या लोकांसाठी !

*

हाकून शेळ्या उंटावरूनी

उगा उपदेश करू नका,

जरी दिसला झगडा समोर 

तरी नाक खुपसू नका !

*

करून कर्तव्य गृहस्थाश्रमी 

भाजा भाकऱ्या लष्कराच्या,

चुकवू नका कधीच तुम्ही 

संधी कुठल्या लोकसेवेच्या !

*

मिळून मिसळून लोकांमध्ये 

सन्मार्गाने जीवन आचरा,

मग लोकं मागती मनापासूनी 

द्या तुमचा सुखी सदरा !

द्या तुमचा सुखी सदरा !

© प्रमोद वामन वर्तक

१२-१०-२०२४

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोजागिरीची लावणी – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ कोजागिरीची लावणी – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

रात अवघी प्यायली, चांदणं हो पुनवेचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*
चांदोबाही हसला, आला खुशी-खुशीतच

लाडात आला खाली, धरतीच्या जवळच

जमवून चटकचांदण्या, आवतन मैत्रीचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*
धरती म्हणाली त्याला, तू चंद्रमा एकच

ये तूच जरा खाली, निमित्त आहे प्रेमाचं

दिसलं केशरी दुधात, बिंब हो चंद्राचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*
मित्र जमले अवघे, चांदणं पूनवेचं

लुटू या सारे मजा, देणं लाभलं आनंदाचं

आजच्या दिवसाला हो, महत्व जागरणाचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*

रात अवघी प्यायली, चांदणं पुनवेचं 

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निखळला तारा… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ निखळला तारा… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

निखळला तारा अद्भूत एक

जयाची गगनावेरी झेप..

 निखळला….

 

अस्सल होती प्रीत तयाची

सेवा करी भारतमातेची

नीतिही होती त्याची नेक…

 निखळला….

 

आदर्शाचा महान मेरू

उभा ठाकला जणू कल्पतरू

उद्धरूनी गेले ते कित्येक..

 निखळला…

 

माणुसकीचा खराच पाझर

कल्पतरू तो होता सागर

चालला, वापरून विवेक…

 निखळला….

 

जन्म घेई बा पुन्हा एकदा

तू होता तर नव्हत्या आपदा

देशिल… पुन्हा का तू संकेत…

 निखळला….

© प्रा.सौ.सुमती पवार 

 दि: १० ॲाक्टोबर २०२४

नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभिजात भाषा-मराठी ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

अभिजात भाषा-मराठी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

आज भाषा मराठी ठरे अभिजात 

लाभे सन्मान तिला अखिल विश्वात

गीतेचे सार थोर घुमतसे जगता|त

होतसे मराठी अभिमानास पात्र ||१||

*
ज्ञानदेवे रचिलासे पाया

तुकयाने केला कळस

मराठीचा तो नामघोष

कळू दे आता जगास ||२||

*
सारस्वत थोर-थोर

वर्णिती तिची गाथा

नतमस्तक. मी होते

मराठीचे गुण गाता ||३||

*
मराठीचा परिमल दरवळे

शब्दफुले लेती लेणे

साहित्याची मांदियाळी 

शब्दातुनी गाती गाणे ||४||

*

मराठीचे गुण महान

गाती मुखे थोर-सान

अमृताते पैजा जिंके

मराठीची अशी शान ||५||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृतार्थ मी अन् कृतार्थ तूही… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? कवितेचा उत्सव ?

☆ ✍️ कृतार्थ मी अन् कृतार्थ तूही…. ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

तो माझा अन् मी त्याची दुग्धशर्करा योगच हा 

मनी वसे ते स्वप्नी दिसे भगवंताचा खेळच हा…

*

“सोहम् सोहम्” शिकवून मजला धाडियले या जगतात 

“कोहम् कोहम्” म्हणोनी अडलो उगाच मायापाशात..

*
अंतर्चक्षू प्रदान करुनी रूप दाविले हृदयात 

कमलपत्र निर्लेप जसे नांदत असते तीर्थात..

*

सुखदुःखाची जाणीव हरली, ईश्वर चरणी भाव जसा

तसेच भेटे रुप तयाचे, गजेंद्राशी विष्णू तसा…

*
महाजन, साधूळ संत सज्जन काय वेगळे असे तिथे?

प्रेमाची पूर्तता व्हावी, हे ध्येय निश्चित तिथे…

*
“ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः”।

वचन तुझे रे अनुभव घ्यावा, हीच आस रे तुझी पहा…

*
निजानंदी रंगलो मी तव हृदयाशी भेटता 

आतच होता, आहे, असशी 

जाणीव याची तू देता…

*
कृतार्थ मी अन् कृतार्थ तूही 

जन्माचा या अर्थ खरा

आनंदाचा कंद खरा तू 

(मम)हृदयाचा आराम खरा…

*
कृष्ण सखा तू, रामसखा तू प्रेमाचा अवतार सख्या 

अयोनिसंभव बीज अंकुरे 

सात्विक, शुध्द हृदयी सख्या..

*
प्रशांत निद्रा प्रशांत जीवन देहात पावले मज नाथा

प्राणांवर अधिराज्य तुझे रे

केशव देतो (जसा)प्रिय पार्था…

*

आदिशक्ती अंबाबाई शक्तिरुपाने वसे इथे

त्याच शक्तीने जाणीव होते भगवंत असे जेथे…

☆ 

🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नवदुर्गा — नारीशक्तीचे रूप… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ नवदुर्गा — नारीशक्तीचे रूप… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

एकरंगी रंगात रंगुनी

नवदुर्गेचे पुजन करा

श्रीसुक्त लक्ष्मीस्तोत्र

देवीचे जपजाप्य करा

*
एकरंगी वस्त्रे लेऊन

नको फक्त फोटोसेशन

सनातनी उत्सव मोठा

करूया धर्मवर्धीत वर्तन

*
 वरवरच्या प्रसाधनाहून

 आचरणी भक्ती मोठी

 नवदुर्गेच्या नव रूपांची

 नावे असोत आपल्या ओठी

*

 नवरात्रीची नऊ रूपे ही

 स्त्री वाढीची रूपे असती

 कौमार्य ते परिपूर्णता 

 या रूपातून दर्शन देती

*

 नारीशक्तीच्या या रूपाला

 अंतःकरणी जपून घ्यावा

 फक्त सनातन धर्मच जपतो

 सणांमधून हा अमुल्य ठेवा

*

 मोल सणांचे जाणून घेऊ

 इव्हेंट नको दुर्गोत्सव हा

 नवरूपातील देवी पुजुनी

 नंतर दांडियात गर्क व्हा

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय मराठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ माय मराठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

माय मराठी तुला हवा तो मान मिळाला 

सरस्वतीने तुझ्या मस्तकी टिळा लावला

*

परंपरागत मराठमोळा 

साज तुझा तर खराच होता

महाराष्ट्रातील किती पिढ्यांनी 

तुझा गिरवला आहे कित्ता 

ऐश्वर्याला तुझ्या खुलवण्या 

इथे नांदल्या अनेक सत्ता

तुझ्या लाडक्या सहवासाने

समाज येथे सुखी नांदला………

*

जुन्या पुराण्या लोककलाना

सामर्थ्याने तूच जगवले

संतांनी तर भक्ती करण्या

मनोबलाने तुला निवडले

अमृतवाणी तुझी ऐकता

देवमुखातून तेज प्रगटले

तुझेच त्याना रूप भावले 

कधीच नाही मार्ग बदलला…….

*

अविट गोडी तुझ्या लाघवी 

रचने मधली

लळा जिव्हाळा माया ममता

यानी आहे तेजस झाली 

समृद्धीच्या वाटेवरती 

गती मतीने पुढे चालली

आता नाही चिंतित काही

वैभव आले तुझ्या रूपाला……..

*

कर्तृत्वाचा तुझा दाखला

सर्व जगाला माहीत झाला

तुझ्यामुळे जीवदान मिळाले

इतिहासाला 

तुझ्या कीर्तीचा भगवा झेंडा

नित्य फडकला

राज्य हिंदवी स्थापायाचे 

तेज लाभले तलवारीला………

*

आता नाही चिंता काही

प्रगती पथावर दौडायाची

आस लागली असे आम्हाला

शिखरावरती पोहचायाची

करू तयारी जबाबदारी 

पूर्णपणाने पेलायाची

मानमरातब देऊ मिळवून

 सदैव सुंदर महाराष्ट्राला………

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रार्थना… ☆ सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆

सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रार्थना… ☆ सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆

हे जगदीश्वरी हे जगदंबे जननी तू जन्मदा 

लीन होउनी पदकमलांशी वंदिन तुज शतदा ।

नकोच मजला धनसंपत्ती नको रूपसंपदा 

हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥

*

तुझ्यासंगती जगकल्याणा व्हावे उमा शिवानी

निर्दाळावे दुष्ट होउनी महिषासुरमर्दिनी 

हरण्या दुःखे दीनांची मी असावे कामदा 

हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥

*

कधी अन्नपूर्णेच्या रूपें भुकेजल्या घरी धान्य भरावे 

अन्यायी जन समोर येता उग्र चंडिका काली व्हावे 

ज्ञानदीप उजळावे जगती होउनिया शारदा 

हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥

*

तुझ्या निवासें आदिशक्ति गे जीवन माझे सार्थ ठरावे 

धूपकांडीसम जळता जळता विश्व सुगंधित करून जावे 

अंती मोक्ष दे मोक्षदे मला पुरव कोड एकदा 

हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥

© सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर

मुंबई

ईमेल – [email protected] मोबाइल – ९९२०४३३२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print