मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 117 – बाळ गीत – सुंदर माझी शाळा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 117 – बाळ गीत – सुंदर माझी शाळा

सुंदर माझी शाळा, लाविते लळा ।

वाजवूनी घंटा ही खुणावते बाळा ।।धृ।।

 

मोठ्या या मैदानी जमले ताई भाऊ।

खूप खूप नाचू आणि गाणी गाऊ ।

नियमित या सारे नको कानाडोळा ।।१।।

 

मधोमध फुले कशी छान फुलबाग।

फुलपाखरां मागे मुलांची ही रांग ।

फुला भोवती होती मुले सारी गोळा ।।२।।

 

ताईनेही आता सोडून दिली छडी।

म्हणतच नाही घाला हाताची घडी।

खूप खूप खेळणी वाटेल ते खेळा ।।३।।

 

जवळ घेत मला बोले लाडेलाडे ।

म्हणत नाहीत नुसते पाठ करा पाढे।

बिया मणी खडे केले आम्ही गोळा ।।४।।

 

अकं अक्षर गाडी जोरदार पळते ।

चित्राची गोष्ट कशी झटपट कळते।

शब्द डोंगराकडे आता थोडे वळा ।।५।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – किती दिवस श्रावण आहे? – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – किती दिवस श्रावण आहे?   ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

श्रावण  महिना संपायला

का लागतोय उशिर

किती दिवस राहीलेत बघतो

मनपसंत  खायला उंदीर

सुरवाती बर वाटल

 जिभेने लपलप दुध प्यायला

कधी कधी चपातीही मिळे

 कुसकरून  मस्त  खायला

पण आता नको वाटत तेच

तोंडाचीच गेलीय चव

किती दिवस श्रावण  आहे

म्हटल कॅलेंडर तरी पहाव

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मधुमास श्रावण ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ मधुमास श्रावण ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

आला श्रावणाचा महिना

सणासुदीचा तो राजा

येती लेकी माहेराला

काय आनंद  वर्णावा

 

झुला झुलण्याचा सण

झोके घेती गं ललना

करती वंदन नागराजा

सण नागपंचमीचा आला

 

गोकुळाचा तो गं कान्हा

जन्मे श्रावणाच्या अष्टमीला

दहीहंडी फोडण्याला

गल्ला चालला मुलांचा

 

भावाबहिणीचे बंधन

नाते पवित्र निर्मळ

राखी बांधून भावाला

म्हणे रक्षणा माझ्या रहा सदा

 

मंगळागौरीची आरास

नवविवाहिताचा हा असे सण

दुर्वा,पत्री वाहून मागे

पतीसाठी गं आयुष्य

 

सोमवारचा उपवास

करती मनोभावे शिवपुजन

बेल वाहून शिवाला

हात जोडती मनोमन

 

याच श्रावणात येतो

स्वातंत्र्याचाही उत्सव

करुन झेंडावंदन

सलाम करती तिरंग्यास

 

किती बाई हा अनोखा

श्रावणाचा हा महिना

जीवा वाटतो सौख्याचा

बारा महिन्याचा राजा

 

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #139 ☆ श्रावण डहाळी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 139 – विजय साहित्य ?

☆ श्रावण डहाळी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(रोज एक श्रावण कविता)

आली श्रावणाची सय

देई कवितेस थारा

शुष्क देहात नांदतो

आठवांचा ओला वारा..!

 

बघ श्रावणाची मौज

करी चित्राला साकार

प्रतिबिंब जाणिवांचे

रेखाटतो चित्रकार….!

 

झाला श्रावण अनंग

जपे भावनांचा रंग

उलगडे अनवट

कलावंत अंतरंग…!

 

बघ श्रावण सौंदर्य

राखी झाडाशी ईमान

सुकलेल्या कायेतून

देते झाडा जीवदान…!

 

एक श्रावण डहाळी

जोजवते तीन काळ

गर्द हिरव्या क्षणांची

तिच्या काळजात माळ…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

१९/८/२०२२

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावणधारा…  ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

अल्प परिचय

सांगली आकाशवाणी केंद्रात काँपेरर म्हणून पाच ते सहा वर्षे काम केले आहे.

त्यानंतर दैनिक दक्षिण महाराष्ट्र केसरी वृत्तपत्रात उपसंपादिका म्हणून सुमारे११वर्षे काम.

आकाशवाणीवरून प्रतिबिंब मालिकेसाठी लिखाण, जिल्हा वार्तापत्र,तसेच बाल नाट्य, ललित लेख,कविता यांचे प्रसासण. वृत्रपत्रासाठीसुध्दा लेखन .प्रासंगिक, कविता, लेख आदी. तसेच महिलांसाठी सखी पुरवणीसाठी काम केले आहे.

‘काही तुझ्या काही माझ्या’कथासंग्रह, ‘आरसे महाल’बालकथा संग्रह, तसेच ‘स्पर्शगंध’कविता संग्रह असे साहित्य प्रकाशित झाले आहे.

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावणधारा…  ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

श्रावण धारा अलबेली

वेड लावूनिया गेली

दिठी फुलूनिया आली

उमले एक एक पाकळी

 

लावण्याची तू गं खाण

नाही तुला जगाचे भान

पदी पैंजण झाले बेभान

खग विसरले गं तान

 

नादमयी तू पावन सरिता

कुंतल  पाठीवरी रुळता

मोत्यांच्या लडी ओघळता

खळीदार हास्य फुलता

 

चमकते हे चांदणगोंदण

साज पाचूचे लाजे दर्पण

मोहमयी गे तुझे नर्तन

अवघी धरा दिली आंदण

 

शोभते ही सुवर्ण कांती

जशी गं वीज तळपती

आत्ममग्न तू सळसळती

उन्हे कोवळी तुला स्पर्शिती

 

गंधमळे  फुलले अंगी

परिमळ ओला सुरंगी

इंद्रधनूच्या सप्तरंगी

रंगलीस तू अनुरागी

 

कवेत ये ना जरा साजणी

स्पर्श मलमली जावे भिजूनी

कायेचा ओला दरवळ मनी

ठेवतो मनतळी साठवूनी

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #123 – कान्हा…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 123 – कान्हा…! ☆

कान्हा वेणू नाद काळजात असा

दिसतोस जसा घननीळ…!

 

कान्हा भाव रंग येई आठवण

सुखाची पेरण जन्मांतरी….!

 

कान्हा शब्द श्वास कवितेत येतो

अंतरी राहतो चिरंतन….!

 

कान्हा तुझा मित्र भक्ती निजरूप

उधळीला धूप जीवनाचा…!

 

कान्हा जन्मोत्सव आनंद स्वरूप

कृष्णमय रूप डोळ्यांमध्ये ..!

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – झाडे लावा झाडे जगवा – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – झाडे लावा झाडे जगवा   ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

झाडे लावा झाडे जगवा

संदेश फिरवीत गावोगावा

फिरते वाहन केविलवाणे

लादुन कितीतरी झाडांच्या शवा—

दणकट शरिरे छोटे अवयव

 रचून ठेविले योजकतेने

 दोरखंड वर घट्ट आवळला

पडू नये या कल्पकतेने—

विरोधाभास हा पाहून येते

डोळ्यामध्ये आपसूक पाणी

झाडे लावा झाडे जगवा

ओठी कोंडती जीवनगाणी —

झाड कापले जाते तेव्हा

सावलीही  हरवून जाते

फांद्यावरच्या घरट्यांशी

पक्षांचेही तुटते हृदय-नाते

फळाफुलांची तर ती होते

झाडागर्भीच भ्रुणहत्या

निर्घृणतेचे पाप मानवा

लिहिले जाते वहीत कोणत्या ?

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आला श्रावण श्रावण ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🌴 आला श्रावण श्रावण ! 🌿🦚  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

आला श्रावण श्रावण

पडे पावसाची सर

नव्या नवरीच्या मनी

नाचे आनंदाने मोर

 

आला श्रावण श्रावण

सय येई माहेराची

दारी उभी वाट पाहे

माय माझी कधीची

 

आला श्रावण श्रावण

साऱ्या सख्या भेटतील

होतो सासरी का जाच

लाडे लाडे पुसतील

 

आला श्रावण श्रावण

सण ये मंगळागौरीचा

पुजून देवी अन्नपूर्णेला

रात खेळून जागायचा

 

आला श्रावण श्रावण

व्रत वैकल्याचा मास

ठेवून ताबा जिभेवर

चला करुया उपवास

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 147 ☆ गज़ल ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 147 ?

☆ गज़ल ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(वृत्त-मंजुघोषा)

(गालगागा  गालगागा गालगागा)

आज आला अंगणी हा धुंद श्रावण

वेड लावी साजणी हा धुंद श्रावण

 

पैठणीचा रंग माझ्या खास होता

भासला की बैंगणी हा धुंद श्रावण

 

अंग माझे चिंब भिजले पावसाने

पाहिला मी दर्पणी हा धुंद श्रावण

 

साजणाची याद आली चांदराती

पौर्णिमेच्या पैंजणी हा धुंद श्रावण

 

चालताना तोल गेला ऐनवेळी

काच पिचता काकणी हा धुंद श्रावण

 

नीज आली सूर्य येता तावदानी

घेत आहे चाचणी हा धुंद श्रावण

 

रात्रभर मी जागले त्याच्याच साठी

आज झाला पापणी हा धुंद श्रावण

 

 या विजेने बांधले की चाळ पायी

गात आहे लावणी हा धुंद श्रावण

 

 का “प्रभा” नाराज तू  आहेस येथे

  करतसे  वाखाणणी हा धुंद श्रावण

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण भय… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण भय… ☆ श्रीशैल चौगुले ☆

थांबेल का रे नाव

कुठे एका किनारी

वादळाचे हे घाव

वेदनाच जिव्हारी.

 

श्रावण वद्य पक्ष

पौर्णिमेचे ऊधाण

इंद्रधनूत रंगतो

ऋतूराज प्रधान.

 

लाटा भव्य डोंगर

भय मनात ऊसळे

ढग जणू गिळून

नाव सागरी मिसळे.

 

आठवणी पुन्हा भेटी

ही वाट वाटते खोटी

काळजाची ही कसोटी

सावरण्या ‘ शब्द ‘धोटी.

 

झुले, फुल- फळे,गंध

श्रावण धारांचा धुंद

भाव अतृप्त तृष्णा

डोळ्यात आभाळ स्पंद.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares