मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनपाखरा…..! ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मनपाखरा…..! ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

मनपाखरा रे मनपाखरा

झेप गगनी यशाचे घे जरा.

                                 

संकटांत पंखा ठेव खंबीर

दुःख जाणीवा सुखाचे या घरा

मनपाखरा रे मनपाखरा.

 

ऊंच-ऊंच ध्येया पार करिशी

हिम्मत ना सोडी तुझ्या भरारा.

मनपाखरा रे मनपाखरा.

 

मनानेच जिंकीले हे भूलोक

स्वप्न वारुळ मुंगीचे निर्धारा

मनपाखरा रे मनपाखरा.

 

मागे न फिरशी विहार पूर्ण

अलौकिक जीवनी सार्थ फेरा.

मनपाखरा रे मनपाखरा.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #143 ☆ शुद्र माशा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 143 ?

☆ शुद्र माशा  

भांडताना राग झाला जर अनावर

टाकतो देऊन त्याला मी सुळावर

 

गोडधोडाला जरा झाकून ठेवू

शुद्र माशा नजर त्यांची तर गुळावर

 

ज्ञान गीतेचे दिले भाषेत सोप्या

केवढे उपकार ज्ञानाचे जगावर

 

एवढा ताणून धरला प्रश्न साधा

येत नाही अजुन गाडी ही रुळावर

 

काळजाचे कैक तुकडे तूच केले

तेच तुकडे प्रेम करती बघ तुझ्यावर

 

तिमिर आहे फक्त आता सोबतीला

चंद्र गेला डाग ठेउन काळजावर

 

कर्म संधी चल म्हणाली सोबतीने

ज्योतिष्याच्या राहिलो मी भरवशावर

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पितृ दिना निमीत्त – तीर्थ… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पितृ दिना निमीत्त – तीर्थ… ☆ सौ राधिका भांडारकर

गेली ती गंगा

राहिलं ते तीर्थ

पपांचं हे वाक्य

जीवनी किती सार्थ!..

 

नाही झालात वृक्ष

तर व्हा लव्हाळी

मुळे त्यांची घट्ट

राहती वार्‍या वादळी…

 

कशास दु:ख हरल्याचे

का होशी निराश

पहा पुढे नको मागे

घेई कवेत तू आकाश..

 

ओझे तुझे तूच वहा

वाट बिकट चाल नेटाने

वाटेतल्या बोचर्‍या कंकरांना

लाथाळूनी दे धीराने..

 

संस्कार शिदोरी बापाने

बांधून दिली प्रेमाने

जगण्याच्या वाटेवर

चालले म्हणून मी मानाने….

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जयहिंद आणि जय जवान… ☆ श्री भाऊसाहेब पाटणकर ☆

?  कवितेचा उत्सव ? 

☆ जयहिंद आणि जय जवान… ☆ श्री भाऊसाहेब पाटणकर ☆

(नामवंत गझलकार आणि शायर म्हणून लोकप्रिय असलेले श्री भाऊसाहेब पाटणकर यांनी शायरीच्याच ढंगात लिहिलेले एक देशभक्तिपर गीत —–)

ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला

नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला—

 

वीरतेची भारती या ना कमी झाली कधी

आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी

 

तीच आहे हौस आम्हा व्हावया समरी शहीद

बाजी प्रभूही आज आहे आज तो अब्दुल हमीद

 

बोलला इतुकेच अंती आगे बढो आगे बढो

देऊन गेला मंत्र जसा आगे बढो आगे बढो

 

धर्माहुनी श्रेष्ठ आपल्या देशास जो या समजला

मानू आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला

 

जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला

अध्यात्मही या भारताच्या युद्धात आहे जन्मला

 

कुठला अरे हा पाक याचे नावही नव्हते कुठे

कळणारही नाही म्हणावे होता कुठे गेला कुठे

 

हे म्हणे लढणार यांच्या दाढ्या मिश्या नुसत्या बघा

पाहिली नसतील जर का बुजगावणी यांना बघा

 

पाहण्याला सैन्य त्यांचे जेव्हा आम्ही गेलो तिथे

नव्हते कोणीच होते फ़क्त पैजामे तिथे

 

आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची

फ़क्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची

 

हाच आहे ध्यास आता अन्य ना बोलू आम्ही

बोलू आम्ही जयहिंद आणि जयजवान बोलू आम्ही —–

 

© श्री भाऊसाहेब पाटणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वट पौर्णिमा… ☆ डॉ. स्वाती पाटील ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ वट पौर्णिमा… ☆ डॉ. स्वाती पाटील

कशाला हवेत सात जन्म,

या जन्मात च उत्सव करू जगण्याचा

एकमेकांसाठी असण्याचा,……

रुजू आपण पारंबी पारंबी त

विस्तारु प्रेमात अन् मुळांच्या रुपात,

एकमेकांची स्वतंत्र आस्तित्व जाणीव

जपु एकमेकांच्या परिघात,

असू आपण सदैव एकमेकांचे

जिव्हाळ्याच्या हळव्या क्षणांसाठी

आणि ठेवूया भान सहजीवनाचे

जपून एकमेकांची मने,

कशाला हवेत सात जन्म,

या जन्मातच उत्सव करू जगण्याचा,

एकमेकांसाठी असण्याचा,

घे कधी  कवेत मला तुझ्या 

येते वेळ जेव्हा हरण्याची

मी ही देईन साथ आश्वासक

जागवू उर्मी पुन्हा जिंकण्याची,

येतील अवघड कोडयांच्या परीक्षा

हरवतील वाटा आणि  संपतील आशा

होवु  मूक दिलासा एकमेकांचा

मनाच्या संवेदनशील आर्त स्पंदनांचा,

कशाला हवेत सात जन्म,

या जन्मातच उत्सव करू जगण्याचा,

एकमेकांसाठी असण्याचा,

आताशा होतात दगडी मने

गोठते माया होई  काळीज मुके

आपल्यातला  निर्झर खळाळता

ठेवूया  शेवटापर्यंत वाहता,

येतील मोहाचे  बेधुंद क्षण

आणि कातरवेळा फसव्या

सावरू निसरडा तोल एकमेकांचा

आधारवड होवू आपण एकमेकांचा, h..

कशास हवेत सात जन्म

या जन्मातच उत्सव करू जगण्याचा,

एकमेकांसाठी असण्याचा

© डॉ.स्वाती पाटील

सांगली

मो.  9503628150

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #85 ☆  अर्थ असेल काही जर तर… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 85 ? 

☆  अर्थ असेल काही जर तर… ☆

कसे सांगू सांगा तुम्ही, गोड महिमा भक्तीचा

भक्ती-विना होत नाही, मार्ग मोकळा मुक्तीचा…!!

 

 मार्ग मोकळा मुक्तीचा, करा धावा श्रीप्रभुचा

तोच आहे वाली आता, अन्य कोणी न कामाचा…!!

 

 अन्य कोणी न कामाचा, सर्व लोभी इथे नांदती

अर्थ असेल काही जर तर, मैत्री मग आग्रहे साधती…!!

 

 मैत्री मग, आग्रहे साधती, धर्म हा लोप पावला

अंध-वृत्ती वर आली,  सुज्ञ इथेच  वेडावला…!!

 

 सुज्ञ इथेच  वेडावला, पाश-मोह आवळला

जाण इतुकीही न आता,  ज्ञान-दीप मावळला…!!

 

 ज्ञान-दीप मावळला,  राज सहज बोलला

कृष्ण-भक्ती सोज्वळ, स्मरा श्रीगोविंदाला…!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 16 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 16 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

[२३]

माझ्या मित्रा! या वादळी रात्री,

दूर देशाच्या प्रेमाच्या प्रवासात तू आहेस ना?

 

आकाश निराश होऊन उच्छ्वास टाकते आहे

 

आज रात्रभर मला झोप नाही,

पुन्हा पुन्हा मी दार उघडतो,

अंधाराकडे पाहतो

 

मला तर काहीच दिसत नाही

 

कुठं बरं असेल तुझा रस्ता?

 

कुठल्या काळ्या नदीच्या

किनाऱ्यानं तू येत असशील?

 

भितीनं गोठवणाऱ्या रानाच्या आणि

भयचकित करणाऱ्या

कोणत्या दु:खमय दरीच्या

माझ्याकडं येणाऱ्या वाटेने तू येत असशील?

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || माऊली || ☆ श्री आनंदराव रघुनाथ जाधव ☆

श्री आनंदराव रघुनाथ जाधव

परिचय 

आनंदराव (नंदकुमार) रघुनाथ जाधव – सारस्वत बँक निवृत्त कर्मचारी

कार्यकारी मंडळ सदस्य – महात्मा गांधी ग्रंथालय वखारभाग सांगली

सदस्य – जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सेंट्रल

कार्यवाह – छत्रपती श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळ सांगली…

सम्प्रत्ति – कविता लिहण्याची आवड, साहित्य संमेलन सहभाग, सामाजिक कार्याची आवड, महात्मा गांधी ग्रंथालय येथ, काव्य संमेलन आयोजित करण्याचे नियोजन, गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, वृक्षारोपण, रक्तदान, इत्यादी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग

? कवितेचा उत्सव ?

☆ || माऊली || ☆ श्री आनंदराव जाधव ☆

सुर्य अंगणी तुळस

शुभ सकाळी नमन

कर जोडोनी वंदन

प्रेम सुगंधी सुमन

 

दारी रंगली रांगोळी

दिप देव्हारी तेजला

घर सुमंगल झाले

मनी आनंद सजला

 

माय माऊली गंगाई

हाती कंकण वाजते

गाते मधूर भूपाळी

पायी पैंजण शोभते

 

धूप कापूर ‌आरती

टाळ टाळी ही घुमते

नाम देवाचे मंजुळ

सुख गोकुळीं नांदते

© आनंदराव रघुनाथ जाधव

पत्ता  – खणभाग, भारत चौक, शिवगर्जना मार्ग, “श्री ज्योतिर्लिंग”, २०७, सांगली.. संपर्क…८८३०२००३८९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संपले ते दिवस… ☆ मेहबूब जमादार ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ संपले ते दिवस… ☆ मेहबूब जमादार ☆

दोघांतचं बोलू कांही

पण संपले ते दिवस

पुनव चाखल्या यौवनी

आली आता अवस

 

दोघांच्या मिटीत सजणे

रात्रीही भुलून गेल्या

पहाटेचा झाला इषारा

पाकळ्या फुलून गेल्या

 

असता मिठीत दोघे

भोवतीची नव्हती जाण

उशीरा कळले आपणां

पाखरानीं सोडले रान

 

कित्येक गेले दिवस

दोघानां आठव रातीचा

यौवनांत भुलूनी गेलो

अर्थ न कळे जगण्याचा

 

चाखली मजा ती गेली

अन यौवन सरून गेले

तळमळत्या या रातींना

बघ,सारे स्मरून गेले

 

सखे स्मरते सारे,पण

पाय गळाया लागले

झाली जीवनाची सांज

सरण दिसाया लागले…

 

 – मेहबूब जमादार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हॕलो..sss मी वड बोलतोय..! आवाज येतोय ना…! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? कवितेचा उत्सव ?

☆ हॕलो..sss मी वड बोलतोय..! आवाज येतोय ना…! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

मी खूप गुदमरलोय, दमलोय आज, मलाच

आॕक्सीजनची कमतरता जाणवू लागली आहे.

माझ्याभोवती किती ही गर्दी…!

कोरोना विषाणू नाही गेला ना अजूनही..!

सोशल डिस्टन्सींग तर दिसतच नाही

मास्क सुद्धा कुणाच्या तोंडावर मी पाहिला नाही.

मला कोंडल्यासारखं वाटतंय

श्वास घेणं अवघड झालंय

ही कोण सावित्री ? सत्यवानाची सावित्री

कधी माझ्या सावलीत आली..!

ती माझ्याच सावलीत का आली ?

सावली शोधत असेलही आली माझ्या सावलीत..!

मुर्च्छित तिच्या पतीला मिळाला असेल विसावा !

खूप हैराण होतोय मी दरवर्षी या दिवशी..

माझ्या सावलीत आणि माझ्या सारख्या अनेकांच्या

सावलीत सावित्रीजोतीबांची काही दिवस

मुलींची शाळा भरली होती हे मला आठवतंय..!

रविंद्रनाथ टागोरांची शाळा… शांतिनिकेतनही

आमच्या सारख्यांच्या सावलीतच की हो..!

ते खूपच छान, उत्साही, आशादायी दिवस.

मुलांचं बागडणं, पारंब्यांशी झोका घेणं

लपंडावात माझ्या भल्या खोडामागं लपणं

वाह..वाह.. ! खूप अफलातून वाटायचं तेव्हा..!

नका गुंडाळू मला दोऱ्याने

नका करु माझी पूजा

विनातक्रार सात पावलंतरी चाला

जोडीदाराच्या सुखदुःखात सहभागी व्हा !

प्रेमपूर्वक जगण्याचा उत्साह वाढवा..!

मरेपर्यंत एकमेकांना आनंदी ठेवण्याचा

प्रयत्न मिळून करा..!

रोगमुक्त करुन जीवदान देणारे डॉक्टर्स, नर्सेस्

तुमचा अंत काहीकाळ लांबणीवर टाकणारे

हाॕस्पीटलस् यांना आदर द्या..!

दवाखान्याचा खर्च गरीबांना परवडावा यासाठी

काही पावलं उचला..!

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, हे प्रश्न कुठे सुटलेत अजून !

विधायक कामासाठी, अनेकांच्या भल्यासाठी

मानवतेकडील वाटचालीसाठी

चर्चेच्या, संवादाच्या अनेक फेऱ्या मारा..!

ग्लोबल वाॕर्मिंग वाढतंय मित्र-मैत्रींणींनो

झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल साधा

तुम्ही माणसं ग्रेट आहात तुमच्या हातात बरंच काही

काही चुकल्यास क्षमा करा

धन्यवाद …!

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

24/06/2021

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares