सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ तिचे घड्याळ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
घड्याळाच्या काट्या बरोबर
धावते तिचे तन-मन
सगळ्यांचा ताळमेळ
घालण्याचेच मनी चिंतन ||
काळ वेळाचे गणित हे
सोडवण्याची खटपट
घरदार करिअरची
कामे निभावी पटपट ||
प्रत्येक वेळ महत्त्वाचीच
चुकवून कशी चालेल
वेळ गाठण्यासाठी ती
मग धावाधाव करेल ||
कधीतरी अचानकच
ऑफ पिरियड मिळतो
सारे व्याप विसरून
मनाशी धागा जुळतो ||
घड्याळाची आणि तिची
कायमचीच घट्ट मैत्री
दोघेही देत रहातात
अखंड चालण्याची खात्री ||
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈