मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 93 – आक्रंदन पिडीतांचे ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 93 – आक्रंदन पिडीतांचे ☆

गगनांतरी भिडाले

आक्रंदन पिडीतांचे।

झांजावाती निघाले

तांडव महापूराचे।

 

ओठाता स्तब्ध झाल्या

निःशब्द भावना या।

निजधाम सोडूनिया

कित्येक गेले विलया.

अशूंचे गोठ नयनी

आक्रंदतात कोणी।

शून्यात नेत्र दोन्ही

स्वप्नेच गेली विरूनी।

 

देईना साथ कोणी

थारा न देई धरणी।

जावे कुठे जीवांनी

घरट्याविना पिलांनी

भांबावल्या मनांना

समजावूनी कळेना।

सेल्फीत दंग मदती

जगण्याची प्रेरणा ना।

  

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उपवर दुहिता ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ उपवर दुहिता ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

ऊपवर दुहिता वय अठराची

दर्पणी बघते आहे

“श्रृंगार करते मनरमणा”

वाट पाहते आहे….१

 

कुंकुम तिलक लाविते भाळी

रंग लाल बुंद

तुझ्या विचारे झाला माझा

मनमोरच धुंद….२

 

तुझ्याचसाठी भरजरी शालू

मोतियांचा साज

करांत कंकण कानी झुंबर

कशी मी दिसते आज….३

 

दूरदेशी गेलास साजणा

किती लोटला काळ

येशील आता परतुनी म्हणुनी

कंठात घातली माळ….४

 

करुनी सुबक कुंतल रचना

खोवले त्यावरी फूल

भांगामध्ये बिंदी लावुनी

मलाच पडली भूल….५

 

पुरे जाहली आता प्रतीक्षा

प्रियकर माझा येणार

चालुनी सप्तपदी सह त्याच्या

ह्रदय स्वामिनी होणार….६

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्मृतिगंध ☆ श्री विजय अभ्यंकर ☆

? कवितेचा उत्सव ?

🌺 स्मृतिगंध 🌺  श्री विजय अभ्यंकर ☆ 

मातीच्या सुगंधाचं  तुझ्या आवडीचं

अत्तर होऊन आलीस , अन्

स्मृतिगंध माझ्या श्र्वासात भरुन

आसमंत भारुन गेलीस…पण आता

वळवाच्या त्या सरींसारखी

नकळत अवचित येऊ नको ,

आठवणींच्या सरीत भिजवून

हुरहुर लाऊन जाऊ नको.

हस्ताच्या त्या सरींसम परि

गरजत बरसत येऊन जा ,

जलधारांच्या वर्षावानी

विरह वेदना पुसून जा.

श्रावणातल्या सरींसारख्या

आठवणींच्या रेशिम धारा,

सुखद स्मृतींचा मोर पिसारा

फुलवित दोघे चिंब भिजू.

मृद् गंधा , बरसानी वा श्रावणी तू

तुझ्या सवे ‘ मल्हार ‘ जगू दे ,

निखळ आपुले प्रेम पाहुनी

निसर्गाचा ‘षड्जʼ लागू दे.

 

– श्री विजय अभ्यंकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता # 115 – फुले ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 115 – विजय साहित्य ?

☆ फुले  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

फुले फुलतात वाऱ्याने

कधी रंगीत वसनाने

फुले जगतात गंधाने

परागी गंधकोषाने..!

 

फुले हा आहेर मदनाचा

फुले ‌हा शृंगार सृजनाचा

फुले संवाद सुखदायी

रतीचा सहवास फलदायी..!

 

फुले ही दौलत झाडांची

आभुषणे तृणपात्यांची.

फुले ही झुलत्या वेलींची

निशाणी हळव्या भेटीची..!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आकाश मोकळे सारे ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ आकाश मोकळे सारे ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

 तू मार भरारी आता

 आकाश मोकळे सारे,

 पंखात वादळी वारे

 घेऊन वेच तू तारे

 

 तेजोमय दिव्यत्वाची

 मानसी पेटवी ज्योत,

 तव उदंड कर्तुत्वाला

 माहित नसावा अंत

 

 आभाळी भिरभिरताना

 स्मरणात असावी माती

 भूमीवर जोजविलेली

  हळूवार जपावी नाती

 

 अक्षरे देऊनी गेली

 ज्ञानाचे अमृत तुजला

 हे अमृत पाजीत जा तू

 जो तृषात आहे त्याला

 

 प्रगतीच्या वाटेवरुनी

 क्षण वळून बघ तू मागे,

 देतील प्रेरणा तुजला 

 नात्यातील नाजुक धागे

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ कवितेचा उत्सव ☆ वजन ☆ स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

? कवितेचा उत्सव ?

☆ वजन ☆ कवी…कुसुमाग्रज ☆

(10मार्च पुण्यतिथी)

एकदा रेशन संपल्यावर

घरातली रद्दी विकायला काढली

तेव्हा तू हसत म्हणालीस,

तुमच्या कवितांचे कागद

यात घालू का ?

तेवढंच वजन वाढेल !

मी उत्तरलो,

जे काम काळ उद्या करणार आहे

ते तू आज करू नकोस.

तुझ्या डोळ्यात

अनपेक्षित आसवं तरारली

आणि तू म्हणालीस,

मी तर नाहीच

पण काळही ते करणार नाही.

 

– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #103 – तू आणि मी…!  ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 103  – तू आणि मी…! 

तू आणि मी

मिळून पाहिलेली सारीचं स्वप्नं

आजही …

मनाच्या अडगळीत

तशीच पडून आहेत

तू आलीस की

आपण ती स्वप्न झटकून

पुन्हा त्यात नवे रंग भरूया…

फक्त तू येताना…

तुझ्याही मनाच्या अडगळीतली

सारीच स्वप्न घेऊन ये…!

कारण…

माझ्या मनातल्या

अडगळीतले

काही स्वप्नांचे रंग

आता..,रंगवण्याच्या

पलीकडे गेलेले आहेत…!

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस असा पडावा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस असा पडावा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

पाऊस असा पडावा

जुना शिशिरही कळावा.

पानगळीच्या वृक्षांशी,

स्नेह नव्याने जडावा.

 

पाऊस असा पडावा,

रक्तात मल्हार न्हावा.

मैफलीत सांगतेच्या,

स्वर आतला कळावा .

 

पाऊस असा पडावा,

पाऊस असा जडावा.

अव्यक्त सार्‍या व्यथांचा,

अभिव्यक्तीने व्यक्त व्हावा.

 

पाऊस असा पडावा ,

पाऊस असा कळावा.

थेंब होउन छोटा,

पापणीत बंद व्हावा.

 

पाऊस असा पडावा,

मृदगंधाचा सुगंध यावा.

मृगदुग्धांच्या सरींनी ,

अर्थ आईचा कळावा.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रवास स्त्री – जीवनाचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रवास स्त्री – जीवनाचा … ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

शतकानुशतकांचा होता स्त्रीस बंदिवास !

स्त्री मुक्तीचा तिने घेतला सतत ध्यास !

घेऊ लागली आता जरा मोकळा श्वास !

उपभोगीत आहे स्त्री म्हणून मुक्त वास!

 

स्त्री आणि पुरुष निर्मिले त्या ब्रह्माने !

विभागून दिली कामे  त्यास अनुरूपतेने!

जनन संगोपन यांचे दायित्व दिले स्त्री ला!

आधार पोषणाचे कार्य मिळे पुरुषाला !

 

काळ बदलला अन् पुरुषी अहंकार वाढला!

पुरुष सत्तेचा जुलूम जगी दिसू लागला !

स्त्री अबला म्हणून जनी मान्य झाली!

अगतिक  दासी म्हणून संसारी ती जगली !

. . . . . . . . . . . 

 

स्त्री शिक्षणाचा ओघ जगी या आला!

स्त्री चा चौफेर वावर जनी वाढला!

चिकाटी, संयम जन्मजात लेणे तिचे !

चहू अंगाने बहरले व्यक्तिमत्व स्त्रीचे !

 

सर्व क्षेत्रात मान्य झाली स्त्री पुरुष बरोबरी !

दोन पावले पुढेच गेली पण नारी!

न करी कधी ती कर्तव्यात कसूर !

जीवन जगण्याचा मिळाला तिलाच सूर!

 

स्त्री आणि पुरुष दोन चाके संसाराची !

समान असता वेगेची धाव घेती !

एकमेकास पूरक राहुनी आज संसारी!

दोघेही प्रयत्ने उंच नभी घेती भरारी !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || महिला दिन || ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ || महिला दिन || ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

फक्त तिच्या संसाराला

सारे आयुष्य देतसे

एक दिसाचा सन्मान

तिच्या वाट्याला येतसे ||

 

तिने कुठे मागितली

संसारातून ही मुक्ती

तिला कशाला कोंडता

तीच आहे दैवी शक्ती ||

 

तिच्या वाचूनी अपुरा

आहे विश्वाचा पसारा

तिला सृजनाचा वसा

जन्म येतसे आकारा ||

 

रोज नवे नवे छळ

रोज नवा अत्याचार

मुक्ती मिळावी यातून

हाच सुयोग्य सन्मान ||

 

तिच्या माणूसपणाची

जाणीव जागी राहावी

तिच्या आत्मसन्मानास

ठेच ना पोहोचवावी ||

 

संसाराचे उध्दरण

शिव शक्तीचे मिलन

तिला अभय देणे हा

खराच महिलादिन ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares