मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नभीचा चंद्रमा ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ नभीचा चंद्रमा ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

नभीचा चंद्रमा ग सखे घरामंदी आला

कसं सांगू सये जीव येडापिसा झाला …धृ

 

उतरल्या चांदण्या , घर गेले उजळून

मंद मंद हसे चांदवा, गेले मी लाजून

अमृताचा स्पर्श त्याच्या ग नजरेला

कसं सांगू …..

 

गूज मनीचे सांगण्या, तो कानाशी लागला

शांत शांत समईही  हसे आज त्याला

चूर चूर मी गाली,लालीमा ग आला

कसं सांगू….

 

थांबली आता कुजबुज रातव्याची

वाढली गती अशी कशी श्वासांची

असा कसा चांदणसाज देऊनी तो गेला?

कसं सांगू सये…

 

रातराणी बहरली येता मला जाग

जादू कशी ही घडे सये तू मज सांग

नयनी त्याचे रूप ,चांदणं हृदयी गोंदून गेला

कसं सांगू सये…

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 56 ☆ माझे बालपण… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 56 ? 

☆ माझे बालपण… ☆

(काव्यप्रकार… अंत्य ओळ-आष्टाक्षरी…)

माझे बालपण आता

नाही येणार हो पुन्हा

पुन्हा रडतांना मग

नाही फुटणार पान्हा…

 

नाही फुटणार पान्हा

आई आता नाही आहे

सर्व दिसते डोळ्याला

तरी मन दुःखी राहे…

 

तरी मन दुःखी राहे

बाप सुद्धा माती-आड

बोटं धरून चालावे

प्रेम केले जीवापाड…

 

प्रेम केले जीवापाड

त्याची सय आता येते

छत हे कोसळतांना

मज पोरके भासते…

 

मज पोरके भासते

आई-बाप नसतांना

त्यांचे छत्र शीत शुद्ध

त्यांची स्मृती लिहितांना…

 

त्यांची स्मृती लिहितांना

शब्द हे अडखळती

कवी राज साठवतो

अशी निर्मळ ही प्रीती…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 21 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 21 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

[१०१]

कभिन्न ढगांमधून

साकळलेल्या

विक्राळ अंधकाराचे

प्रकाशाच्या ओठांनी

चुंबन घेतले

आणि

ढगांची फुलं झाली

स्वर्गीय रंगांनी

ओसंडणारी

 

[१०२]

अमर्याद सत्तेच्या मातीत

असत्याचं रोप वाढवलं

म्हणून काही त्याला  

सत्याचं फळ नाही येत …..

 

[१०३]

तलवारीच्या पात्यानं

आपल्याचा मुठीला

बोथट म्हणून चिडवावं?

 

[१०४]

जीवनाच्या

या प्रकाशमय बेटाभोवती

चारी बाजूंनी

उसळत आहे अहोरात्र

मृत्यूचे दर्यागीत

अखंड…. अनंत ….

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ||श्रावण गीत|| ☆ सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ||श्रावण गीत|| ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

चल चल ग सखी,जाऊ अंगणात

श्रावणाचे ऐकाया  गीत     

 

मोत्यासम  या जलबि॑दूतुनी

हिरव्या हिरव्या तरूपर्णातुनी

खळखळणाऱ्या सरितांमधूनी

दाही दिशातुनी गर्जे गीत

 

वनश्रीचा चुडा हिरवा

दाट धुक्यातून गंधित मरवा

सुमंगलाची सुंदर प्रभात

चैतन्याचे गाई गीत

 

तेज आगळे प्रसन्नतेचे

वसुंधरेच्या नवयौवनाचे

दिव्य प्रभेच्या  लावण्याचे

इंद्रधनुही गाई गीत

 

अमृतमय या जलधारांनी

राणी वसुधा चिंब भिजोनी

जणू न्हालेली ही सुंदर रमणी

वीज तेजस्वी ‌गाई गीत

 

अशी रूपसंपन्न धरा सुंदर

अंबर धरती मीलन मनोहर

नाचे गाई मुरली मनोहर

विश्र्व कल्याणाचे‌ गाई गीत

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ शाळेतले बालपण ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

☆ शाळेतले बालपण ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

पाटी आणि पेन्सिल

हेच होते सोबतीला

मित्र असे साथीला

शाळेतल्या गमतीला

 

निष्पाप त्या मनावर,

टेन्शन असे गृहपाठाचे

उत्तर मिळे चावून

टोक त्या पेन्सिलचे  

 

दिवाळीच्या सुट्टीतही

गृहपाठ हा असायचा

पहिल्या दोन दिवसातच

उरकून तो टाकायचा

 

क्लास नाहीतर शिकवणी

शाळे शिवाय असायची

आमच्यासारख्या मुलांना

कधी गरजच नसायची

 

गाढव , ढ शब्दाने

बहुमान खूप मिळायचा

लाज, लज्जा, शरम

ह्यांचा मागमूसही नसायचा

 

उठाबशा, ओणवे रहाणे

हे कायमच असायचे

हातावर पट्टी घ्यायला

डोळ्यांत पाणी नसायचे

 

नविन पुस्तक, गाईड ह्यांची

वानवाच घरी असायची

सेकंड हँड पुस्तकांनीच

अभ्यासात प्रगती व्हायची

 

पिंपळ पान मोरपिस

पुस्तकात कायम असे

बालपणीचा तो सुंदर

असा खजिनाच भासे

 

खाकी दप्तर अथवा पेटी

सोबती शाळेत असायचे

वह्या, पुस्तक, चिंचा, आवळे

एकत्र त्यात नांदायचे

 

अर्ध्या तासाचा डेली सोप

दफ्तर भरणे असायचा

प्रायोजका शिवाय तो

रोजच करायला लागायचा

 

सायकल भाड्याने घेऊन

स्वस्त्यात आनंद मिळायचा  

मित्राला मागे बसवून

आनंद द्विगुणित व्हायचा

 

डब्यातली मायेची पोळीभाजी

मित्रांत वाटून खायची

पिझ्झा नूडल्स समोस्याची

ओळखच आम्हाला नसायची

 

बाईना आणि सरांना

नमस्कार रोजच असायचा

टोपण नावे ठेवले तरी

त्यांना मान हा मिळायचा

 

नापास झालेली मुले

त्याच वर्गात शिकत होती

शिक्षणात मागे आहोत

म्हणून आत्महत्या करत नव्हती

 

बाहेरच्या जगात उडायला

शाळेनीच आम्हाला शिकवले

पडलो तरी उठायला

मैदानी खेळातून उमजले

 

कोणाचेच वाईट झाले नाही,

सगळेच मस्त कमवत आहेत

नापास झालेलीही मुलं आता

राजकारणात चमकत आहेत

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जरी वाजले सूप…. ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक 

? कवितेचा उत्सव ?

⭐ जरी वाजले सूप….  ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

आली आली म्हणता

येवून सरली दिवाळी,

ठेवा उचलून डब्यात

सारी शिल्लक रांगोळी !

 

चिवडा चकली शेवेचा

जर उरला असेल चुरा,

कधी करूनी मिसळ

त्याच्यात मग वापरा !

 

ताट लक्ष्मी पूजनाचे

नीट ठेवा सांभाळून,

पुढच्या वर्षी दुप्पट

भर घालायची ठरवून !

 

धुरात फटाक्याच्या

पुन्हा पैसे नका टाकू,

गरजुंना दान द्यायचे

आताच ठरवून टाकू !

 

जरी संपला दीपोत्सव

दीप स्वप्नांचे तेवत ठेवा,

करुनी साध्य स्वप्नपूर्ती

मान दुनियेत उंचवा !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तृप्त जीवन…. ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ

? कवितेचा उत्सव ?

☆ तृप्त जीवन…. ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆ 

येणा ऱ्या अश्रुना थांबवायला हवे

वजाबाकी झालेल्या आयुष्यातले उरले  भाग  शोधायला हवे

 

मिळालेली आपली माणसे  जपायला हवी

उदासीनता आणि मरगळ आता टाकायला हवी

 

उतरणीचा रस्ता सहजपणे उतरायला हवा

राग लोभाची शस्त्रे आता ठेवायला हवी

 

 ढळत्या सूर्याची जाणीव ठेवायला हवी

चंद्राची शीतलता आता मनाला हवी

येणारी संध्याकाळ समाधानाने भरून घ्यायला हवी

 

देवघरातील समई सारखे

पावित्र अखेर मनी राहावे

आणि तृप्तपणे हळूच इथून निसटून जावे

 

©  सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 80 – कहाणी माई बाबांची ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 80 – कहाणी माई बाबांची ☆

कळवळले बाबांचे मन।

माईनेही दिली  साथ

सोडून सारे मोह बंधन।

 

नाही किळस वाटली

भळभळत्या जखमांची।

फाटक्या तुटक्या कपड्यांची,

नि झडलेल्या बोटांची ।

 

सुसंस्कृतांनी बहिष्कृत

केलेल्या कुष्ठरोग्यांची ।

असाह्य  पिडीत जीवांची

जाणून  गाथा या जीवांची।

 

धुतल्या जखमा आणि

केली त्यांनी मलमपट्टी ।

घातली पाखरं मायेची

केली वेदनांशी गट्टी ।

 

अंधारी बुडलेल्या जीवांना

दिली उमेद  जगण्याची ।

पाहून अधम दुराचार

लाहीलाही झाली मनाची।

 

हजारोने जमली जणू

फौजच ही दुखीतांची।

रक्ताच्या नात्यांने नाकारले

तीच गत समाजाची ।

 

कुत्र्याची नसावी अशी 

तडफड पाहून जीवांची।

दुःखी झाली माई बाबा

ऐकून कहानी कर्माची ।

 

पोटच्या मुलांनाही लाजावे

अशी सेवा केली सर्वांची ।

जोडली मने सरकानेही

दिली साथ मदतीची ।

 

स्वप्नातीत भाग्य लाभले। 

नि उमेद आली जगण्याची।

आमच्यासाठी आनंदवन उभारले।

माणसं मिळाली हक्काची ।

 

अंधारच धुसर झाला नि

प्रभात झाली जीवनाची ।

देवही करी हेवा अशीच

करणी माई आणि बाबांची ।

 

आम्हालाच किळस येते

तुमच्या कुजट  विचारांची।

 तुमच्या कुजट विचारांची।

 तुमच्या कुजट  विचारांची ।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बेधुंद…. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ बेधुंद…. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

अंधार दाटला चोहीकडे

मन झाले उदास

सूर आले भरभर जुळुनी

छेडिताना बिभास

 

प्रकाशल्या दशदिशा

बेधुंद मी खयालात

नुरले भान कशाचे

हरवले स्वर तरंगात

 

कलरव चाले विहगांचा

उडती स्वैर आकाशी

स्वच्छंदपणे भूमीवरती

खेळते मी सुरांशी

 

नव्हते कसले बंधन

वेळ काळाचे

जादुभर्‍या स्वरांना

फक्त कवटाळायाचे

 

सुरात असते भक्ति

सुरात असते शांति

विसरते देहभान

लाभे कशी मनःशांति

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 100 – माझे आजोबा……! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 100 – विजय साहित्य ?

☆ माझे आजोबा……! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(काव्य प्रकार – पंचाक्षरी काव्य)

यशाचे बोट

प्रेम अलोट

माझे आजोबा

हिरवी नोट….!

 

प्रेमळ मित्र

हळवे चित्र

माझे आजोबा

संस्कार सत्र….!

 

शांत गाभारा

लाभे निवारा

माझे आजोबा

अमृत धारा….!

 

समाज प्रेमी

साहित्य प्रेमी

माझे आजोबा

कुटुंब प्रेमी….!

 

चंद्र हजार

सुखी संसार

माझे आजोबा

जीवनाधार…..!

 

सुर्य कलता

हात हलता

माझे आजोबा

मंत्र जाणता….!

 

हवे हवेसे

रजे मजेचे

माझे आजोबा

नाते उषेचे…!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares