मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 105 ☆ शांताबाई ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 105 ?

☆ शांताबाई ☆

शांताबाई शांताबाई

तुम्ही म्हणजे रानजाई ॥

 

साधेसुधे राहणीमान

मराठमोळे परिधान

डोईवरचा पदर छान

तुम्ही म्हणजे सुरेल तान ॥

 

शांतादुर्गा म्हणू की म्हणू

वाङेश्वरीची लेक लाडकी

करून गेलात मैफल पोरकी

तुम्ही म्हणजे शब्दसखी ॥

 

लाखमोलाचे तुमचे शब्द

उपकार केलेत अब्ज अब्ज

लिहिल्या कविता नव नीत

तुम्ही म्हणजे फक्त प्रीत ॥

 

नित्य स्मरू अन् सदैव वंदू

वाणी गोड बोलणे मृदू

साहित्यातला ज्ञानसिंधू

तुम्ही म्हणजे स्वप्न मधू ॥

ज्येष्ठ कवयित्री/साहित्यिक स्व.शांता शेळके यांना विनम्र अभिवादन

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कात्यायनी ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ कात्यायनी… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

शिवोपासक कात्यायन

त्यांची पुत्री तूच महान

तीन नेत्र तू चतुर्भुजा

सहावे दिनी तुझी पूजा !

सिंह वाहिनी स्वाभिमानी

सर्व सुखांची तू जननी

हातात तलवार कमल

भक्तांचे इच्छिसी कुशल !

दृढनिश्चयी राहो मन

ऐसे देई आशीर्वचन!

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शांताबाई शेळके यांची कविता – लिंब ☆ स्व शांताबाई शेळके

स्व शांताबाई शेळके

? कवितेचा उत्सव ?

☆ लिंब ☆ स्व शांताबाई शेळके 

(१२ अक्टूबर १९२२ – ६ जून २००२)

निळया निळ्या आकाशाची

पार्श्वभूमी चेतोहार

भव्य  वृक्ष हा लिंबाचा

शोभतसे तिच्यावर

 

किती रम्य दिसे याचा

पर्णसंभार हिरवा

पाहताच तयाकडे

लाभे मनाला गारवा

 

बलशाली याचा बुंधा

फांद्या सुदीर्घ विशाला

भय दूर घालवून

स्थैर्य देतात चित्ताला

 

उग्र जरा परी गोड

गन्ध मोहरास याच्या

कटु मधुर भावना

जणू माझ्याच मनीच्या

 

टक लावून कितीदा

बघते मी याच्याकडे

सुखदुःख अंतरीचे

सर्व करीते उघडे!

 

माझ्या नयनांची भाषा

सारी कळते यालाही

मूक भाषेत आपुल्या

मज दिलासा तो देई 

 

स्नेहभाव आम्हांतील

नाही कुणा कळायाचे

ज्ञात आहे आंम्हालाच

मुग्ध नाते हे आमुचे !

 

    चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia

स्व. शांताबाई शेळके

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 107 ☆ बा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 107 ☆

☆ बा ☆

या घराचे दार आहे ठेंगणे

शिकविले त्यानेच ताठा सोडणे

 

पाय लागे उंबऱ्याला सारखा

टाळले त्याने तरी ना भेटणे

 

कौल होउन सोसतो सूर्यास ‘बा’

म्हणत नाही शक्य नाही सोसणे

 

माणसे साधीच ही माझ्या घरी

पण तिथे संस्कार आहे देखणे

 

तावदानाची गरज नाही मला

मुक्त वाऱ्याचे पहावे नाचणे

 

सूर्यही येतो सकाळी अंगणी

अर्घ्य देउन हात त्याला जोडणे

 

चार भिंतीच्या घराचे थोरपण

ज्या ठिकाणी सभ्यतेचे नांदणे

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हर देश में  तू….. ☆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

( ३०/०४/ १९०९ – ११/१०/ १९६८)

? कवितेचा उत्सव ?

☆ हर देश में  तू….. ☆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆

हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक, तू एक ही है ।

तेरी रंगभूमी यह विश्वम्भरा , सब खेल में , मेल में तू ही तो है ।।

 

सागर से उठा बादल बनके, बादल से फटा जल हो करके ।

फिर नहर बनी नदियां गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है ।।

 

चींटी से भी अणु-परमाणु बना , सब जीव जगत का रूप लिया ।

कहीं पर्वत वृक्ष विशाल बना , सौंदर्य तेरा , तू एक ही है ।।

 

यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया ।

तुकड्या कहे कोई न और दिखा, बस ! मैं और तू सब एक ही है ।। 

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्कंदमाता ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ स्कंदमाता… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

चर्तुभुज सिंहवाहिनी

तव पूजा पाचवे दिनी

कार्तिकेयाची तू गे माता

अससी बुध्दीची देवता !

तुज आवडे पीत रंग

उपासनेत भक्त दंग

सूर्यमंडल अधिष्ठात्री

चैतन्य निर्मिसी तू गात्री !

होवो पूर्ण मम मानस

स्कंदमाते देई आशीश !

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुझ्यामुळे ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराण

? कवितेचा उत्सव ?

☆ तुझ्यामुळे……… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

आनंदी जगतो आम्ही

कविता तुझ्यामुळे !!धृ! !

 

बेधुंद या व्यथांना

शब्दांत खोलतो आम्ही

कविता तुझ्यामुळे             !!१ !

 

लाथाडणा-याला

वठणीवर अाणतो आम्ही

कविता तुझ्यामुळे               !!२!!

 

वैफल्या भावनांना

हर्षित करतो आम्ही

कविता तुझ्यामुळे                  !!३!!

 

अंधाऱ्या या वाटेवर

प्रकाश पेरतो आम्ही

कविता तुझ्यामुळे                    !!४!!

 

वादळ पाऊस धारा

झेलीत नाचतो आम्ही

कविता तुझ्यामुळे                    !!५!!

 

हिरवेडोंगर झाडी

चैतन्य पहातो आम्ही

कविता तुझ्यामुळे                    !!६!!

 

संकटाचे घाव झेलीत

फुलासवे जगतो आम्ही

कविता तु्झ्यामुळे .                 !!७!!

 

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 51 ☆ प्रेम… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 51 ? 

☆ प्रेम… ☆

प्रेम आंधळं असतं

म्हणायला सोप्प जातं

झाल्यावर मात्र

गोड सुद्धा कडू लागतं…०१

 

प्रेम आंधळं असतं

ते कुठे ही होतं

काळी गोरी बोबडी

प्रेम मानत नसतं…०२

 

प्रेम आंधळं असतं

हे कसं पटवायचं

घरच्यांसमोर सांगा

सामोरं कसं जायचं…०३

 

प्रेम आंधळं असतं

पुरावे आहेत बारा

तरी सुद्धा पहा हो

नाही होत कमी तोरा…०४

 

प्रेम आंधळं असतं

नाही कधी करायचं

पण प्रेम होऊनच जातं

अलिप्त कसं रहायचं…०५

 

प्रेम आंधळं असतं

गणित खूप कठीण प्रेमाचं

भले भले इथे शूर थकले

न उलगडे कोडं प्रेमाचं…०६

 

माझे प्रेम तुला अर्पण

मीरा वदली कान्हाला

विष पिऊन दिला दाखला

प्रेमाचा असा बोलबाला…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुष्मांडा…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ कुष्मांडा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

 

आदिशक्ती तू ब्रह्मांड निर्माती

चौथे दिनी भक्त तुज पूजती

 तव ध्याने असते एकाग्रता

अनाहत चक्रामध्ये असता !

सूर्यमंडलात तुझीच वसती

सूर्यासम दैदिप्यमान दिप्ती

सिंहवाहिनी तू अष्टभुजा

मनोभावे होते तुझी पूजा !

 शुद्ध चारित्र्याची मानसिकता

हाच आशीश देई मज माता !

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आदिशक्ती ☆ सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ? आदिशक्ती ?☆ सौ. विद्या वसंत पराडकर

आदिशक्ती तू असे माऊली

अनादि अनंतकाळाची साऊली

 

अनुपम रूप तुझे त्रिभुवन सुंदरी

तान्हुली विनवी मम चित्ती वास करी

 

फुलांपरी तू सुकोमल प्रसन्न

परी धर्म  रक्षण्या होशी वज्र

 

नवरात्री असुरांशी समर करून

दिले विजयादशमीचे दिव्य दालन

 

विश्व तारावया येशी भूवर

भक्तांची नौका करी पार

 

कधी अमरावती ची अंबाबाई

तर कधी माहूरगडची रेणुकामाई

 

महालक्ष्मी तू कोल्हापूर ची

कुलदैवत तू आमच्या कुळीची

 

पूजन करते सदाचाराचे

मांगल्य  आणि पावित्र्याचे

 

शक्ती युक्ती चा संगम करूनी

दुष्ट  भावनेचा विनाश करूनी

 

विराट दर्शन भक्ता दाखवुनी

विश्व नाचवले आंनदी होऊनी

 

देहरुपी तबकात माझ्या

पंचप्राणाचे  दीप लाविते

 

चारी वाणीची आरती ओवाळीते

षड्विकारांची फुले अर्पिते

 

जग्जननी तू विश्व रंजिनी

ऊत्सव करितो भावभक्तीनी

 

शक्ती देवतेशी समरस होऊनी

विनम्र तेने माथा ठेवी तव चरणी

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares