मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 75 – विजय साहित्य – सासर माहेर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 75 – विजय साहित्य – सासर माहेर  ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कधी कधी

स्वप्न ही सासरी जातात.

सासर घरी सुखानं नांदतात.

स्वप्नांचे सासरी नांदण म्हणजे

नियतीनं वाढून ठेवलेलं सत्य

बिनबोभाट स्वीकारणं….!

मग तो अगदी त्याचा तिचा

नकार असला तरीही ….!

स्वप्नांना नांदावच लागतं ….

सासर घरी…

स्वप्न अशी नांदायला लागली ना

तरचं घरात येणं जाणं सुरू रहात

यश, कीर्ती, समृद्धी आणि

अनुभव संपन्न जीवनानुभूतींच…!

स्वप्नांनी सासरीचं रहायला हवं

तरचं मिळेल सत्याला माहेर घर

पुन्हा पुन्हा माहेरी येण्यासाठी….!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हिशोब नाही ठेवला ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

 ☆ कवितेचा उत्सव ☆ हिशोब नाही ठेवला ☆ श्री उद्धव भयवाळ ☆ 

कोणी कधी छळले किती, हिशोब नाही ठेवला

मन माझे जळले किती, हिशोब नाही ठेवला

 

या इथे अन् त्या तिथे, नेम त्यांनी साधला

बाण उरी घुसले किती, हिशोब नाही ठेवला

 

जखमा जरी ओल्या उरी, हास्य नाही लोपले

तोंडामध्ये साखर अन् बर्फ शिरी ठेवला

 

विद्ध विद्ध झालो जरी,  अंतरी रडलो जरी

आसवाचा थेंबही,  नाही कुणा दावला

 

आता तर त्यांना मी,  माफही केले पुरे

द्वेषाचा लेशही,  नाही मनी ठेवला

© श्री उद्धव भयवाळ

संपर्क – १९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल – ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

ईमेल – [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 66 – स्मृती चिन्ह…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #66 ☆ 

☆ स्मृती चिन्ह…! ☆ 

कविसंमेलन गाजवून

घरी गेल्यावर

माझी माय ,

माझ्या हातातल्या स्मृती चिन्हांकडे

निरखून बघते . . . !

माझ्या चेह-यावरचा आंनद

काही क्षण डोळ्यात

साठवते … !

आणि हळूच विचारते

आज तरी . .

नाक्यावरच्या वाण्याचा

उधारीचा प्रश्न मिटणार का..?

मी चेह-यावरच आनंद

तसाच ठेऊन

दहा बाय दहाच्या खोलीत

ठेवलेल्या सगळ्या स्मृती चिन्हांवर

नजर फिरवतो,

तेव्हा वाटतं

ह्या स्मृती चिन्हांच्या बदल्यात

जर वाण्याच्या उधारीचा प्रश्न

मिटला असता तर किती

बरं झाल असतं….!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झाडे ☆ सुश्री मानसी चिटणीस

 ☆ कवितेचा उत्सव ☆ झाडे ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆ 

दिवसाच्या ऐन भरात

सळसळणारी ती….

मिटल्या पापण्यांच्या मध्यान्ही,

पांघरतात वेदनांचे पांढरेधोप शेले…

अन् रात्र होताच विरघळू लागतात

त्यांच्या सदेह सावल्यांचे पिसारे

संथ जलाशयांच्या किनारी…

झाडे,

स्थितप्रज्ञ होतात..,निमग्न होतात आराधनेत

उमलणा-या प्रत्येक प्रज्ञेच्या अस्तित्वासाठी

मांडतात आपल्या पानांची आसने…

अन् नम्र होतात

स्वतःचे कणे त्या प्रज्ञेला बहाल करून…..

तेव्हाच कदाचित…

झाडे….

बोधिवृक्ष  होतात….

 

©  सुश्री मानसी चिटणीस

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 86 – मदिरा ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 86 ☆

☆ मदिरा?☆

(हरिभगिनी मात्रा वृत्त ८+८+८+६)

मदिरेचा भरला प्याला या रंभेची मदहोश अदा

जरा बहकता या वाटेवर कायम ती देईल सदा

 

मधुशाळेची वाट दाखवी तो सांगाती हा बहुदा

फिरून यावे त्या वाटेने, एखादा भेटेल खुदा

 

खैय्यामाची मस्त रुबाई जिची जगाला चढे नशा

सुरई मधल्या सर्व कहाण्या सदासर्वदा  धुंद कशा?

 

या मदिरेचा ध्यास ज्यास तो रंक असो वा धनी कुणी

इथे रंगला, त्यास नको ते तख्त ताज वा शिरोमणी

 

रंग हजारो, या मदिरेचे  एक साजिरा सा  निवडा

स्वच्छच राहो तुमची प्रतिमा, कुठलाही जावो न तडा

 

मद्याचे गुणगान असे का? सवाल तुमचा असे खरा

गुलाम अलिच्या गजलेमध्ये अंगूरीचा कैफ पुरा

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाजी जीवाची… ☆ श्री बिपीन कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ बाजी जीवाची… ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆ 

दीन दीन ऐकून आरोळी

दाट अंधाऱ्या गडद राती |

सुन्न जाहली शिव छावणी…

आवस अवतरली चेहऱ्यावरती ||

 

चिंता रायांची बाजीला पडली,

कसा वाचवू रयतेचा वाली |

घालमेल उडाली त्या देहाची …

क्षणात नजरेत ठिणगी लकाकली ||

 

सत्य वचन जणू मुखी हुंकारले,

विजेसम अल्लद रंध्री भडकले |

अवघ्या देहात व्यापून राहिले …

सूर्यतेजा सम धरणी अवतरले ||

 

निश्चयी नेत्र भिडले शिव नेत्राला,

संकेत समजले केवळ एकमेकांना |

शिवराय उमगले  तो इशारा …

जणू हुकूम  त्या रणमर्दाचा ||

 

पाठीवर साक्षात मृत्युचा घाला

वीस कोसावरचा गड विशाळ दिसला |

आज्ञा मानुनी बाजी आलिंगिला …

जड अंतःकरणे राजा निघाला ||

 

यवनी वेढा पडता  खिंडीला,

उभ्या देही नृसिंह अवतरला |

दोनशे हातांचा चुडा फुटला …

पाहुनी बाजी बेभान झाला ||

 

रक्तरंजित त्या समशेर हातात,

नजरेतून जणू ओसंडता जाळ |

यवन टाकती अचूक फास

वर्मी बैसला लोहाचा फाळ ||

 

धिप्पाड देह कोसळला धरणी,

जणू मदमस्त गज पडती  |

काळ बिलगला  त्या देहासी…

थक्क झाला पाहुनी स्वामी-भक्ती ||

 

राजा सुखरूप विशाळ गडी,

खबर पोचली त्या नरवीरासी |

प्रसन्न हसूनी निश्चिन्त होई …

रक्तवर्णी मुजरा शिव चरणासी ||

 

लज्जित होउनी यवन माघारी,

देहावर भगवा कवटाळूनी |

रक्त-पुष्पे खिंडीत पसरुनि…

बाजी निघाला खिंड पावन करुनी ||

 

© श्री बिपीन कुळकर्णी

मो नं. 9820074205

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विशाल खंत ☆ सुश्री स्वप्ना अमृतकर

☆ कवितेचा उत्सव ☆ विशाल खंत ☆ सुश्री स्वप्ना अमृतकर ☆ 

(नेहमीपेक्षा “वसंत हा ऋतु” वेगळ्या पध्दतीने मांडला आहे. एका कैदीच्या नजरेतून हा वसंत कसा आणि का वेगळा वाटतो हे या कवितेतून तो व्यक्त करताना जाणवतो.)

 

गजाआड असताना

तुझा जन्म झाला रे

येई चैतन्याचा वारा

हितगुज करण्या रे,१

कोवळा तुझा ऋतू

जैलमध्ये डोकवायचा

कैदी मी असल्याचा

तेव्हा विसर पडायचा, २

 

लतिकेची पालवी

अप्रुप वाटे लोचनांना

रोजचे पक्षीकूजन

मधूर वाटे कर्णांना,३

 

तुझ्यासम सोशीक

कोणी कसं असावे

तळत्या उन्हांतही

धुंदीत बहरावे,४

हो आपल्यातला

संवाद लागला झुलू

जन्मठेपेची शिक्षा

कसं,केव्हां रे बोलू?,५

तुझ्यासारखे नाही

माझे निसर्गाशी नातं

पुन्हा माझा जन्म नाही

हीच विशाल खंत ,६

अढळ मोहोरचा अंत

येतो जेव्हा जवळ

वसंता तू रे रडतो

तेव्हा कुणाजवळ ,७

© सुश्री स्वप्ना अमृतकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 85 ☆ भावुक नाते ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 85 ☆

☆ भावुक नाते

तारुण्याला आज धुमारे फुटले होते

काळजात या हृदय कुणाचे रुतले होते

 

फूल सोडुनी पानावरती भुंगा बसता

भुंग्यावरती फूल गुलाबी रुसले होते

 

कोकिळ गाता कैऱ्यांनी हे झाड डवरले

अन् फांदीचे खांदे थोडे झुकले होते

 

तुला पाहुनी दयाळ पक्षी शीळ घालतो

नाही वाटत त्याचे काही चुकले होते

 

नवीन वाटा तयार झाल्या भटकंतीला

हुंदडताना भान जरासे सुटले होते

 

ओली वाळू पायावरती घरटे कोमल

भावुक नाते संसाराशी जुळले होते

 

प्रेम कोरडे कधीच नव्हते या लाटांचे

वाळूखाली बरेच पाणी मुरले होते

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्षण ☆ श्री आनंदहरी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ क्षण ☆ श्री आनंदहरी ☆ 

क्षण जे गेले क्षणी काळाच्या

क्षणांचा त्याच का मोह असावा?

विस्मरणाचे वरदान लाभले

स्मरणी का मग क्षण तो वसावा?

 

मोहविती रंग जरी प्राचीचे मना

सांजरंगी ना ती उधळण आहे

बहरता जीवनी  सांजसावल्या

उगा मनी का  घुसळण राहे

 

जाणे येणे नित अविरत चाले

क्षणा-क्षणाचे त्या आगळे देणे

जाताना का नच मन निर्मोही?

आठवण गाते जीवन गाणे

 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रत्येकच वर्ष कसं…? ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

☆ कवितेचा उत्सव ☆ प्रत्येकच वर्ष कसं…? ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

प्रत्येकच वर्ष कसं, अहो जाईल सुखाचं..?

कधी तरी माप हे, भरणारंच दु:ख्खाचं…

पाचू सारख्या वसुंधरेवर,कधी पेटते आग

तेंव्हा तरी तिचा पहा कुठे चालतो इलाज….?

 

फुफाट धावे नदी तीत ही पाणी मावत नाही

उन्हाळयात आटते इतकी थेंब ही दिसत नाही

बसते काय ती रडत सांगा? पोटात ठेवते पाणी

खड्डा खोदता मिळते पाणी येता आणिबाणी..

 

पावसाळ्यातील बहरली,झाडे ओकी बोकी

हिवाळ्यात दिसतात पहा ना फक्त त्यांची डोकी

एक ही पान झाडा वरती तेंव्हा दिसत नाही

झडी लागते तशी ती पाने जाती घाई घाई..

 

उसळणारा सागर सुद्धा ओहोटीला येतोच

किनाऱ्याला सोडून तो ही आत आत जातोच

वाट पाहतो मग किनारा येईल आता गाज

माझ्यावरती चढेल पुन्हा तुषारांचा साज…

 

पळस कित्ती लालेलाल तो उन्हाळ्यातच फुलतो

झळा झेलत तप्त उन्हाच्या किती छान तो हसतो

 

चालायाचेच असे म्हणत हो….

बघा सामोरे जावे…

जे जे येईल समोर ते ते….

आनंदाने… घ्यावे….

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि: ०५/०१/२०२१

वेळ: संध्या.. ६:५०

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print