मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झाड… ☆ सुश्री नीलाम्बरी शिर्के

सुश्री नीलाम्बरी शिर्के

☆ कवितेचा उत्सव ☆ झाड… ☆ सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆ 

आई नावाच्या झाडाला

वात्सल्याचा सदाच मोहर

वय वाढे पण मोहर ताजा

चिरंतन  असे त्याचा दरवळ

 

मुले कितीही होवो मोठी

झाडापासून  दूर जाहली

प्रेमभारल्या वात्सल्याची

डोईवर दे सदा सावली

 

या झाडाच्या देहावरती

नियतीने जरी दिलेच काटे

गरजवंताच्या डोईवर

शांत शितलशी छाया वाटे

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – राजमाता जिजाऊ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य ☆ राजमाता जिजाऊ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

 राजमाता जिजाऊने

इतिहास घडविला

सिंदखेड गाव तिचा

कर्तृत्वाने सजविला.. . . !

 

उभारणी स्वराज्याची

शिवबाचा झाली श्वास

स्वाभिमान जागविला

गुलामीचा केला -हास.. . . !

 

सोनियाच्या नांगराने

जनी पेरला विश्वास

माता, भगिनी रक्षण

कर्तृत्वाचा झाली ध्यास.

माय जिजाऊची कथा

मावळ्यांचा काळजात

छत्रपती शिवराय

दैवी लेणे अंतरात.. . !

 

वीरपत्नी , वीरमाता

संघटीत शौर्य शक्ती

भवानीचा अवतार

चेतविली देशभक्ती.. . . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आमराईतली पहाट ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ कवितेचा उत्सव ☆ आमराईतली पहाट ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

(माझ्या भावाने मला आमच्या आमराईतल्या पहाटेचा फोटो पाठवला होता. तो फोटो पाहून मला ही कविता सुचली.)

झाली पहाट पहाट

दिशा घरे शांत शांत

प्रभा फाकत फाकत

मित्र येई अंबरात

उगवला नारायण

आधी आला माझ्या राना

फैलावले स्रोत त्याने

श्वास आला पाना पाना

विविधरंगी सडा त्याने

अंबरी या सांडला

उजळूनी सुखावला

माझा सारा शेतमळा

दुरुनच दिसे मला

नाजुकशी पायवाट

आज वाटे हुंदडावे

मन मोकाट मोकाट

मोहरले झाड झाडं

जन्मा आले फळ

तनातूनी मनातूनी

येई सुखाची कळ

धुंद सारा आसमंत

मन भरल भरलं

माहेरीच्या सुखाला ग

मन आसावलं

परतुनी माझे मन

झेप घेई माहेरा

अन् वाटे हुंगावे

डोळे मिटून मोहरा

गर्द अशा आमराईत

असे दाट छाया

बघ आली मन भरून

माहेरची दाट माया

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुंफण ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ गुंफण ☆ श्रीशैल चौगुले ☆

हृदय माझे-तुझे

हृदय याचे-त्याचे

भावनां प्रेम भाषा

हृदयात फक्त साचे.

 

ऋणानुबंध जडे

मनाचे अंतरीत

व्यक्त-अव्यक्त श्वास

हृदयी क्षण वेचे.

 

जन्म-जन्मांचे धागे

स्पंदनात गुंफण

मृत्यूही हृदयविधी

जीवसृष्टीत नाचे.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवा…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील 

☆ कवितेचा उत्सव ☆ देवा…. ☆श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

मातलेले संपवा वेताळ देवा

द्या जगाला मोकळे आभाळ देवा

 

मागण्यांना आज माझ्या कौल द्यावा

तू मलाही अंतरी सांभाळ देवा

 

धर्म जाती भेद सारे फार झाले

तेवढे आता तरी गुंडाळ देवा

 

दु:ख भोळ्या काळजाला त्रास देते

अंतरंगी तू जरा गंधाळ देवा

 

भक्त सारे रंक होते शांत होते

तेच झाले रे तुझे गोपाळ देवा

 

भावना कपटी मनाला तू दिलेल्या

त्याच सा-या पापिणी हेटाळ देवा

 

दाखले ते भामट्यांचे जीवघेणे

सांगण्याला केवढे लडिवाळ देवा

 

चांगली होती किती बिघडून गेली

माणसे झाली कशी चांडाळ देवा

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 80 ☆ माणसा तू महान आहेस ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 80 ☆ माणसा तू महान आहेस ☆

माणसा तू महान आहेस

तू भुंकू शकतोस कुत्र्यासारखा

तू कावळ्यांसारखी कावकावही करतोस

कधीकधी डोमकावळ्या सारखाही वागतोस

खरंच माणसा तू महान आहेस…

 

मोरासारखा पदरपिसारा फुलवून नाचू शकतोस

डूख धरून बसू शकतोस नागासारखा

चित्त्याच्या वेगाने धावतोय तुझा मेंदू

खरंच माणसा तू महान आहेस…

 

शाखाहारी प्राण्यांसारखा पालाही खातोस आणि

सिंहासारखं मांस भक्षणही करतोस

हिंस्त्र प्राणी शिकार करतात पोटासाठी

तू मात्र स्वतःच्या स्वार्थी अहंकारापोटी

चालतोस गोळ्या, असहाय्य प्राण्यांवर,

कधीकधी आपल्या आप्तांवर सुद्धा

खरंच माणसा तू महान आहेस…

 

खरंच माणसा तू माणूस आहेस का जनावर ?

हेच कळत नाही, अजून आम्हा प्राण्यांना

पण तरीही

खरंच माणसा तू महान आहेस…

कारण संशोधनाची किमया

देवानं फक्त तुलाच बहाल केली आहे

म्हणूनच तू महान आहेस

म्हणूनच तू महान आहेस…!

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंद धन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ आनंद धन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आनंदाचा मळा बहरला

विश्वाच्या या खुल्या अंगणी

लखलख तारे तेज फाकती

चंद्र विकसित नभांगणी  !!

 

रवी तेजाने प्रकाशिला हा

जगताचा भव्य गाभारा

साऱ्या चराचरा उल्हासितो

झुळझुळणारा मंदवारा !!

 

झाडाझाडातूनी विहरती

मंजुळ गाणारे किती पक्षी

हिरव्या मखमालीवरती

फुले रेखिती सुंदर नक्षी !!

 

कड्यावरुनी झेप घेतसे

प्रपात शुभ्र जलधारांचा

जीवन फुलते जळातूनी

घडा भरतो सुखस्वप्नांचा !!

 

निसर्ग किमया पाहुनीया

पारणे फिटतसे नेत्रांचे

झोळी भरुनी मुक्तपणे

ओघळते धन आनंदाचे !!

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विश्व सारे सुखी व्हावे ☆ प्रा. अशोक दास

प्रा. अशोक दास

 ☆ कवितेचा उत्सव ☆ विश्व सारे सुखी व्हावे ☆ प्रा. अशोक दास ☆ 

काळ अनंत आहे,अजर अमर आहे!

त्याच्या उदरात दिवस, महिने, वर्षे

वर्षे येतील तशी जातील चिंता कशाला?

उगीचच भूत, भविष्याचा विचार कशाला?

 

प्रत्येक नवे वर्ष वर्तमान घेऊन येते

काळ त्याला आशिर्वाद देतच असतो ना ?

कालच्या वर्षातील सारे वाईटपण संपावे

उत्तमोत्तम होते ते सगळे मनात साठवावे.

 

मागचे वर्ष आपल्याला खूप काही शिकवून गेले

चांगल्याचे,वाईटाचे धडे सर्वांना देऊन गेले

अहो, पानगळ होणार म्हणून झाड कधी रडते का?

नवी पालवी नक्की येणार, मनास विश्वास नसतो का ?

 

कडकडीत उन्हाळे येतात, सर्वांना भाजून जातात

पण वर्षाऋतू येतोच येतो, सर्वांना थंड करतोच ना ?

कालचे वाईट विसरूया, चांगले ते ध्यानी धरूया

नव्याने स्वागत करताना मने उदार ठेवूया.

 

कल्याण व्हावे सर्वांचे, हीच अपेक्षा ठेवूया

विश्व अवघे सुखी व्हावे, एक आकांक्षा बाळगुया.

 

© प्रा. अशोक दास

..इचलकरंजी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवनपट ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ जीवनपट ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ 

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती

माझे,माझे म्हणती सारे

फोलता ही नच, कुणाही ठावे

 

क्षणभंगुरता कळेल का परी

उरते अंगी मृत्तिका जरी

यात्रिक सारे सममार्गावरी

नियतीचीही मिरासदारी

 

नियतीचीही सर्व खेळणी

कुणा छत्र, कुणी अनवाणी

श्वासासंगे श्वास येई रे

दुजा न कोणी सांगाती

 

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 32 ☆ गंध मातीचा… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 32 ☆ 

☆ गंध मातीचा… ☆

गंध मातीचा, हृदयस्पर्शी

गंध मातीचा, मातृस्पर्शी

 

गंध मातीचा, सप्तरंगी

गंध मातीचा, चिरा चौरंगी

 

गंध मातीचा, मनास भुलवी

गंध मातीचा, तेज वाढवी

 

गंध मातीचा, मातृस्पर्श जैसा

गंध मातीचा, मोगरा फुलला तैसा…

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print