मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दुली….. ☆ सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

☆ कवितेचा उत्सव ☆ शब्दुली….. ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆ 

आकाशात    अचानक

ढग भरूनीया आले

आणि डोळ्यातून माझ्या

असे कसे कोसळले?

*

चार शब्द तुझे आणले

चार  शब्द माझे आणले

बांधला त्याचा झुला

अन् आभाळपर्यंत पोचले

*

प्रत्येक नव्या ओळखीतून

नवे नाते अंकुरले

आणि मग नकळत

जीवन उमलून आले.

*

असे कसे मन माझे

रानावनात रमते

माणसांच्या गर्दीतही

मुके मुकेच राहते.

*

नको माणसांचा संग

नको घराचा निवारा

गच्च हिरव्या रानात

फुटे सुखाला धुमारा.

*

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 62 – सांजवारा ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #62 ☆ 

☆ सांजवारा ☆ 

अताशा अताशा जगू वाटते

तुझा हात हाती धरू वाटते.

 

नदीकाठ सारा खुणा बोलक्या

तुझ्या सोबतीने फिरू वाटते.

 

किती प्रेम आहे,  नको सांगणे

तुझी भावबोली,  झरू लागते.

 

कितीदा नव्याने तुला जाणले

तरी स्वप्न तुझे बघू वाटते.

 

छळे सांजवारा,  उगा बोचरा

नव्याने कविता,  लिहू वाटते. . !

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ हुर्डा पार्टी ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

?? हुर्डा पार्टी  ??

लोकमान्य हास्य योग संघाच्या !

साऱ्या सख्या निघालो पार्टीला!

अहो ! कसल्या पार्टीला  ?

हुर्डा पार्टीला  ऽ.ऽ..!!

 

अहो बसा बसा लौकर गाडीत !

जाऊ मस्त गप्पा त्या ठोकीत !

चिमणचारा चाखीत !

हास्य विनोदाला येई ऊत!!

 

सोडून घरादाराची काळजी !

आज आम्ही आमच्या मनमौजी!

 

गाण्यांच्या रंगल्या की हो भेंड्या !

एकमेकींवर करतोय कुरघोड्या !!

 

गुळभेंडी ज्वारीच्या शेतातली !

खुडून कणसं आम्हीआणली !!

 

शेणकुटांची आगटी पेटवुनी !

घेतली कणसं आम्ही भाजूनी !!!

 

खाया बसलो मांडा ठोकुनी !

हुर्ड्याला दही लसनीची चटनी !

ताव मारतोय मस्त साऱ्याजनी !!

 

भन्नाटच हुर्डा पार्टी रंगली !

गाडीवाल्याची हाक कानी आली !

चला चला निघायची वेळ झाली !

अहो..चला चला निघायची वेळ झाली!!

 

लागलो एकमेकींना उठवायला !

हुर्डा खाऊन जडपणा आला !!

 

पण. ! मस्त झाली आपली हुर्डा पार्टी !

सख्यांनो..सांगा बरं.ऽऽऽ..

पुढली कुठं रंगणार आपली पार्टी !!

अहो पुढली कुठं रंगणार आपली पार्टी……हा..हा..हा..हा..

 

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

दिनांक:-९-१-२०२१

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कसे जगावे…. ? ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले

सुश्री स्नेहा विनायक दामले

 ☆ कवितेचा उत्सव ☆ कसे जगावे…. ? ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆ 

कसे जगावे, कसे जगावे ?

कसे जगावे, कसे जगावे ?

असे जगावे, असे जगावे.

 

जन्मदात्यांचा अभिमान असावे,

जोडीदाराची खंबीर साथ व्हावे,

मुलांसाठी कर्तव्यदक्ष सावली असावे,

नातवंडांसाठी प्रेमळ हाक व्हावे,

इष्टमित्रांसाठी मदतीचा हात असावे,

कुणाच्या पाठीवरची प्रेरक थाप व्हावे..

 

ईश्वराचे लाडके होऊन रहावे,

पडणार्‍यास आधार असावे ,

चुकलेल्यास वाट व्हावे..

 

चंदनाचा वृक्ष व्हावे,

आसमंतास सुगंधित करावे,

पोळलेल्यास सुखवावे..

 

मंडळी,

असे जगावे, असे जगावे,

सत्श्रद्धा जपत,

श्रद्धास्थानच होऊन जावे,

जगण्याचा आदर्श व्हावे.

 

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – आद्य पत्रकार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

स्व बाळशास्त्री जांभेकर जयन्ती निमित्त 

(जन्म  – 6 जानेवारी 1812 – मृत्यु – 18 मे 1846)

☆ विजय साहित्य ☆ आद्य पत्रकार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

बाळशास्त्री जांभेकर

आद्य पत्रकार थोर

वृत्तपत्र दर्पणाने

जगी धरलासे जोर……!

 

सहा जानेवारी रोजी

वृत्तपत्र प्रकाशीत

शोभे पत्रकार दिन

ख्याती राहे अबाधीत…..!

 

शास्त्र आणि गणितात

प्राप्त केले उच्च ज्ञान

भाषा अकरा शिकोनी

केले बहू ज्ञानदान…..!

 

छंद शास्त्र , नीतीशास्त्र

व्याकरण, इतिहास

पाठ्य पुस्तके लिहोनी

ज्ञानमयी दिला ध्यास….!

 

पुरोगामी विचारांनी

केले देश संघटन

विज्ञानाचे अलंकार

अंधश्रद्धा उच्चाटन….!

 

स्थापियले ग्रंथालय

ज्ञानेश्वरी मुद्रांकीत

शोध निबंध जनक

नितीकथा शब्दांकित …!

 

दिले ज्ञान वैज्ञानिक

केले कार्य सामाजिक

पुनर्विवाहाचे ध्येय

ज्ञानदान अलौकिक….!

 

भाषा आणि विज्ञानाचा

केला प्रचार प्रसार

दिली समाजाला दिशा

तत्वनिष्ठ अंगीकार…..!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नियम सृष्टीचा ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ कवितेचा उत्सव ☆ नियम सृष्टीचा ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 

हृदयाच्या गर्भातील लाव्हा

जेव्हा  जेव्हा उसळतो

बांध मनीचा बघ कसा

माघारी त्या फिरवितो.

 

पण उद्रेक त्याचा होई जेव्हा

जीव वेडा तळ मळे.

सुख वेदनांचे काय असते

तेही बघ, तेव्हाची कळे

 

जलाशयाच्या आत्म्याला

तो ग्रीष्म जेव्हा तपवितो

बाष्प रूप करण्या धारण,

जीव कसा हो तळमळतो

पण बरसताच जलधारा

मनमोर कसा  नाचतो

मोद नवयौवनाचा वसुंधरेला  तेव्हाची कळे.

 

धरतीच्या पोटात

बीज वृक्षाचे जेव्हा पडते

उष्म्याच्या प्रभावी

बघ ते कसे गुदमरते

जलधारा त्या मृगाच्या

अंगार कसा हो शमविते

अंकुरण्याचा, तरू बनण्याचा आनंद मग

तेव्हाची कळे

 

तळमळणे, गुदमरणे.

अंकुरणे, बहरणे

सळसळणे, डोलणे

नियमसृष्टीचे सत्य असे

वेदनेविना सुख न मिळे

हेच खरे

हो हेच खरे

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शाईचा रंग ☆ श्रीओंकार कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ शाईचा रंग ☆ श्रीओंकार कुलकर्णी ☆

शाईचा रंग कोणता?

कोण आहे जाणता?

 

कुणी कापले किती

अन कुणी मारले किती

कोणास काय भीती

शाईचा रंग कोणता

कोण आहे जाणता?

 

भोगत्या झाल्या माद्या

अन बाल्य पोरके झाले

घास झाला सांडता

शाईचा रंग कोणता

कोण आहे जाणता?

 

झाले तह किती ते

अन फौजा सरल्या किती त्या

ईतिहास चक्र चालते

शाईचा रंग कोणता

कोण आहे जाणता?

 

©  श्री ओंकार कुलकर्णी

20-12-2018

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 80 – नवीन वर्षा …. ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 80 ☆

☆ नवीन वर्षा …. ☆

नवीन वर्षा नवीन  आशा घेवून ये आता

मनात माझ्या सदैव श्रद्धा होवून ये आता

 

जुनाट झाल्या पहाट वेळा  सूर्यास सांगा ना

उन्हात ओल्या दवास ताज्या प्राशून ये आता

 

खुणा सुखाच्या किती विखुरल्या सांडून दुःखाला

तसाच तू ही उनाड वारा होवून ये आता

 

मलाच ठावे कशा कुणाच्या नजरा विषारी त्या

पियुष मिळावे तुझे दयाळा धावून ये आता

 

नवीन वर्षा नकोच आहे फुकटी उधारी ती

तुला हवी ती लगेच रोकड पेरून ये आता

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नगण्य ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी

☆ कवितेचा उत्सव ☆ नगण्य ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

तुझ्या एका अश्रूबिंदूने,  माझ्या हृदयात प्रलय होतो

तुझ्या एका हास्याने, तेथेच कधी स्वर्ग फुलतो.

गालावरच्या खळीने तूच खोलवर हृदयात शिरतेस

एका शब्दाने कधी कधी, तू माझे आकाश पेलतेस.

तुझ्या एका स्पर्शाने, माझ्यात अनंत सतारी वाजतात.

तुझ्या एका कटाक्षाने, हृदयात असंख्य दिवे लागतात.

 

पण….हा फक्त भासच…

 

या साऱ्या “तुझ्या” मध्ये मी कुठे असतो?

तुझ्या भोवतालच्या गर्दीमधलाच मी एक असतो.

वेड्या मनाला किती वेळा सांगितले,

तू परमाणूतलाच एक आहेस,

आकाशातल्या बिजलीसाठी उगाचच झुरतो आहेस.

“ती” कधीतरी अशीच चमकून जाईल.

ओलावल्या धरणीचे “फोटो ”

काढेल, त्या फोटोत तरी तू असशील का ?

 

आता तरी झुरायचं सोडशील का ?

 

© डाॅ.व्यंकटेश जंबगी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 79 ☆ आसवांशी वैर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 79 ☆ आसवांशी वैर ☆

का हजारो आसवांशी वैर केले ?

हे कसे गर्भात त्यांचे खून झाले ?

 

आसवे ही वाढती तुमच्याच देही

हा खरातर आसवांचा दोष नाही

 

ह्या मिठाला जागणाऱ्या आसवांना

पाहिले मी गूढ काही सांगतांना

 

भावना ह्या आसवांना भेटल्यावर

भेटल्याची खूण दिसते पापण्यांवर

 

हर्ष होता आसवांच्या हालचाली

जाणुनी घेण्यास आली ती खुशाली

 

हुंदका दाटून येता ती प्रवाही

सोडली ना साथ त्यांनी ही कधीही

 

वार देहावर कुठे झाला तरीही

भार वाही फक्त होती आसवे ही

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print