मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वज्रदेही ☆ श्री प्रकाश लावंड

☆ कवितेचा उत्सव ☆ वज्रदेही ☆ श्री प्रकाश लावंड ☆ 

ब्रॅन्डेड कपड्यांना जेव्हा

गृहिणी बोतरं म्हणते

तेव्हा समजून घ्यावं

तिच्या पुढ्यात

चार बादल्या धुणं पडलंय

 

ती चहाचा कप

दणकन् टेबलावर आपटते

तेव्हा पोपरातून डोकं वर काढून समजावं

हाताशी सांडशी नसल्यानं

चहाचं उकळतं पातेलं

तिनं हातानंच उचललंय

 

तिच्या मोबाईलची रिंग

वाजून वाजून गप्प झाल्यास

पलिकडच्यानं समजून जावं

तिचे हात कणीक तिंबण्यात

गुंतले आहेत

 

दारावरची बेल वाजवून ही

दार उघडलं नाही तर

लक्षात घ्यावं

ती बाथरूममध्ये आहे

 

तिनं कडक इस्त्री केलेले

कपडे अंगावर चढविताना

तिच्या सुरकुतलेल्या

ब्लाऊज आणि साडीकडं

एकतरी कटाक्ष टाकावा

 

दुपारी जेवणाच्या सुट्टीत

तिनं दिलेला परिपूर्ण डबा

फस्त करण्यापुर्वी

ती जेवली असेल का  ?

की अजून तिचं

घरकामच आटोपलं नाही

याचा विचार करावा

 

रात्री जेव्हा ती

कपाळाला वेदनाशामक लावून

डोकं कापडानं बांधून

बेडवर लवंडते

तेव्हा काही न बोलता

हळुवार हातानं

तिचं डोकं चेपावं

 

महिन्यातून एखाद्या दुसऱ्यांदा

ती गाढ झोपी गेल्याची खात्री करून

हळूच उठावं

तिच्या चुरगळलेल्या

साड्यांना इस्त्री करून ठेवावी

 

सकाळी तिला बसलेला गोड धक्का

मिश्किल व प्रेमळ नजरेनं

अनुभवावा

 

ती मुळची वज्रदेही आहेच

पण

आपुलकीचं

जिव्हाळ्याचं

तेलपाणी केलं नाही तर

वज्रालाही गंज चढतो

हे ध्यानात घ्यावं

 

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.#e-abhivyakti

मोबा 9021497977

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 76 ☆ अंधार पसरला ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 76 ☆ अंधार पसरला  ☆

रात्रीचा अंधार पसरला

वाट कुणाची बघतो आहे

अंधाराचे बोट धरून हा

जीव कशाला जगतो आहे

 

तारुण्याची हिरवळ होती

टाळ कधी ना धरला हाती

उतार वय हे झाले देवा

तुझी पायरी चढतो आहे

 

आकाशातील चंद्र चांदणे

नकोच त्यांच्यासाठी थांबणे

अंधारातील प्रवास माझा

पडतो आहे उठतो आहे

 

कणा पाठीचा धनुष्य झाला

देऊ काठीचा आधार त्याला

जवळच्याच या पल्ल्यासाठी

पुन्हा चालणे शिकतो आहे

 

रात्र रात्र मी उगा जागतो

कसली आहे सजा भोगतो

निद्रा घ्यावी म्हणतो तरीही

सूर्य कुठे हा ढळतो आहे ?

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाबूजी आणि आण्णा ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ कवितेचा उत्सव ☆ बाबूजी आणि आण्णा ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

शब्द,सूर हे इथे नाचती

गळ्यात घालून गळा

बघता बघता बहरून येतो

संगीताचा मळा !!

 

बाबूजी अन् आण्णा जणू

बाजू दोन नाण्याच्या

देती रसिका भरभरून ते

ओंजळी दिव्य गाण्याच्या !!

 

बाबूजींचा स्वर मधुरसा

भीडे हृदयांतरी

जणू घंटानाद घुमतसे

गाभारी मंदिरी !!

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पोटापुरता पसा …. महाकवी ग.दि. माडगूळकर ☆ कवितेचे रसग्रहण☆ प्रस्तुति – सौ. अमृता देशपांडे

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म – 1 ओक्टोबर 1919  मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆

☆ कवितेचा उत्सव ☆ पोटापुरता पसा …. महाकवी ग.दि. माडगूळकर  ☆ कवितेचे रसग्रहण ☆ प्रस्तुति – सौ. अमृता देशपांडे ☆ 

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी

देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

 

हवाच तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी

चोचिपुरता देई दाणा माय माऊली काळी

एकवेळच्या भुकेस पुरते तळहाताची खाळी ll

 

महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया

गरजे पुरती देई वसने जतन कराया काया

गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी ll

 

सोसे तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा

सौख्य देई वा दु:ख ईश्वरा रंक करी वा राजा

अपुरेपणहि न लगे, न लगे पस्तावाची पाळी

 

देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ll

गीतकार- महाकवी ग.दि. माडगूळकर

चित्र : साभार Gajanan Digambar Madgulkar – Wikipedia

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

प्रस्तुति –  सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गदिमा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ गदिमा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म नाव: गजानन दिगंबर माडगूळकर

टोपणनाव: गदिमा

तुम्ही लिहीले सहजपणाने शब्दांची काव्ये झाली

तुमच्या नुसत्या करस्पर्शाने लेखणी लीलया स्त्रवली.

 

मऊ मुलायम मधाळ भाषा तुमच्या ओठावरती

खेळविले तुम्ही सहज तियेला शब्द रांगले तुमच्या पुढती.

 

डफ कडकडला शाहिराचा तुमच्या कवनामधुनी

वसंत फुलला काव्यलतेवर खुलली अमृतवाणी.

 

आम्रवनातून मोर नाचले ॠतूमागूनी ऋतू चालले

मानवतेचे बांधून मंदिर जगण्याचे तुम्ही मर्मही कथिले.

 

असीम तुमच्या कर्तृत्वाला सीमित शब्दांची ही पूजा

सर्वांगाने बहरून गेला सिद्धहस्त कुणी इथे न दुजा.

 

रामजानकी गीतांमधूनी रामायण तुम्ही सहज गाईले

प्रतिभेचे तुम्ही बांधून तोरण माय मराठी विश्व सजविले.

 

चित्र : साभार Gajanan Digambar Madgulkar – Wikipedia

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महाराष्ट्राचा महाकवी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

 ☆ कवितेचा उत्सव ☆ महाराष्ट्राचा महाकवी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म नाव: गजानन दिगंबर माडगूळकर

टोपणनाव: गदिमा

आहे का कुणी असे?

गदिमा, नाव तुमचे माहीत नसे?

महाराष्ट्राचे तुम्ही वाल्मिकी असती

गीत रामायण अजोड काव्यनिर्मिती…..

 

शेटफळे ही तुमची जन्मभूमी

नि पंचवटी असे कर्मभूमी

ओळख तुमची कवी,पटकथाकार

आणि कधी कधी अभिनय कलाकार…..

 

“एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्र माणसा तुझिया आयुष्याचे”

“पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा”

कथिती तत्वज्ञान जीवनाचे………….

 

शीघ्र काव्य तुमचे, स्वीकारती आव्हान

“ळ” मुळाक्षरांची गुंफण करून

“घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा”

जन्मास घातले तुम्ही अजरामर भक्तिगान……

 

गदिमा बाबूजी छान जमली जोडी

काव्यरसांत तुमच्या त्यांच्या भावभावनांची गोडी

विजेते तुम्ही साहित्य कला अकादमीचे

पद्मश्री तुम्ही भारतभूचे…………….

 

साहित्यासह घेतले व्रत समाजसेवेचे

होऊनी सभासद महाराष्ट्र विधान परिषदेचे

तुमचा माझा परिचय झाला विधानसभेत

एकोण्णीशेपाासष्ट साली असता मी शासनसेवेत

 

नाही लाभले दीर्घायुष्य तुम्हासी

अवघ्या पंचदश नि आठव्या वर्षी

निरोप दिधला जगाशी

महाराष्ट्राचे महाकवी तुम्ही वंदन चरणाशी….

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 28 ☆ दशपदी काव्य… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 28 ☆ 

☆ दशपदी काव्य… ☆

तूच सामावलेला, कृष्णा माझ्या अंतर्मनात

व्यापून राहिला बघ,  पूर्ण तनामनात… ०१

 

तुझ्या-विना नाहीच कुणी, प्राचीवर मजला

सतत मारतो हाका, हे मनोहर तुजला… ०२

 

भवसागर भारी, अन्याय सर्वत्र फोफावला

सत्य लोप पावताना, नात्याला मार बसला… ०३

 

क्षणभंगुर जीवनात, आधार ना कधी सापडला

आस केली जेव्हा, हात सर्वांनी आखडला… ०४

 

म्हणौनि सांगणे हेच देवा, केशवा माधवा श्रीधरा

अंतिम समयाला माझ्या, यावे तूच दामोदरा… ०५

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री  हरी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ कवितेचा उत्सव ☆ श्री  हरी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे 

शब्द मंजिर्या खुडीत होते,

रामप्रहरी मी तुळशीच्या!

तुळशीपत्रात मज दिसू लागला,

श्रीहरी प्रसन्न पहाटेचा !

 

शिरावरी मोरपीस खुललेले,

स्मीत तयाच्या गालावरी !

तुलसीच्या पावित्र्य बंधनी,

गुंतुनी गेला तो श्रीहरी!

 

बासरी त्याची अखंड वाजे,

अधरावरती स्थान तिचे!

सोबत राधेची ही असता,

‌  एकतानता मला दिसे !

 

सृष्टीच्या खेळास असे

साक्षीदार  तो मनहारी!

माणसाची खळबळ पहाता,

गुढ हास्य त्याच्या मुखावरी!

 

झाडावरती फळे-फुले अन्

आनंदे विहरती पशुपक्षी!

मुक्त स्वच्छंदी बागडताना,

पाहून खुलला तो सुख साक्षी!

 

अवघे जगत ही सारी किमया,

त्याचाच खेळ हा पृथ्वीवरी!

अवकाशातून न्याहाळीत तो,

दूर राहुनी नियंत्रित करी!

 

थांबव आता तुझा खेळ हा,

जाणीव  मानवा होई मनी!

तुझ्याशिवाय हे व्यर्थ असे,

वंदिते तुज मी क्षणोक्षणी!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 57 – अभंग – अहंकार ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 57 – अभंग – अहंकार ☆

सोडी अहंकार

व्यर्थ बडीवार

मिरविशी फार

सदोदीत…./१/

 

प्रसिद्धीची हाव

वृथा धावाधाव

मनाचा घे ठाव

थांब थोडा……/२/

 

अहंभाव वारे

शिरताच कानी

बुद्धी मनमानी

करितसे…./३/

 

अपुऱ्या ज्ञानाचे

उगा प्रदर्शन

अज्ञान दर्शन

जगतास…./४/

 

योग्यतेची जाण

कुवतीचे भान

ज्ञानियांचा मान

चित्ती हवा …./५/

 

ज्ञानार्जन ध्यास

प्रयत्नांची कास

सचोटी विश्वास

अंगी बाण…./६/

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ कोरोनाला पळवूया ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

☆ कोरोनाला पळवूया ☆

पूर्वी गावं होती लहान

पण माणसं होती महान !

आज गावं झाली मोठी

अन् माणसं झाली छोटी!!२!!

 

वाडा संस्कृतीत होता एकोपा !

आज झाले फ्लॅट प्रत्येकाचा वेगळा कप्पा !

कुणाशी ना गप्पा ना टप्पा !!३!!

 

पूर्वी माणसं असायची भजनपूजनात दंग !

आज आम्ही सारे मोबाईलमध्ये गुंग !!

विषाणूंनी बांधला चांगला चंग!

आमच्या सुखी आयुष्याचा केला भंग !!४!!

 

अहो जगरहाटीत काय होइल सांगता येईना !

त्यात सगळ्या जगाला छळायला आलाय कोरोना!

अहो कोरोनाने माणसं केली वेडी !

धास्तावलीत मोठमोठी गाव आणि खेडी!!५!

 

कोरोनाला अजिबात घाबरायचं नस्त !

खायचे आवळे चिंचा पेरु बोरं मस्त!

रहायचं साऱ्यांनी मजेत चुस्त!

करोनाला पळवायला एक नामी युक्ती!

ठणठणीत ठेवायची सर्वांनी प्रतिकारशक्ती!!

 

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print