मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीपांडुरंगाचा फराळ ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

??️ श्रीपांडुरंगाचा फराळ ?️?

खा..ऽ..रे विठ्ठला उपासाची खिचडी..

खा…रे विठ्ठला..खा..!!धृ.!!

 

करायला घेतली उपासाची खिचडी!

साबूदाणा शेंगदाण्याने केली फाकडी !

किसून घातली त्यात मी काकडी!

खा…ऽ.रे विठ्ठला उपासाची खिचडी!!१!!

 

घेतले शेंगदाणे खमंग भाजून !

गूळ वितळवला तूप घालून!

चिक्की बनवली पाटावर थापून!

खा..ऽ..रे विठ्ठला गोड गोड चिक्की !!२!!

 

वरईचा तांदूळ तुपात भाजला !

खुमासदार छान शिजवून घेतला!

चिंच गुळाचा कोळ केला!

दाण्याच्या आमटीला कोळ घातला!

झाली चवदार तांदूळ आमटी!

खा..ऽ.रे विठ्ठला.. वाटी वाटी !!३!!

 

खजूर सोलली बिया काढूनी!

बदाम बेदाणे पिस्ते घालुनी!

मिरची मीठ चवीस घालुनी!

त्याची केली चवदार चटणी!

खा..ऽ..रे विठ्ठला.. खजूराची चटणी!!४!!

 

पिकलेली ती लिंबे आणली!

फोडी करुनी उकडून घेतली!

तिखट मीठ साखर टाकली!

झाले तयार चवदार लोणचे!

खा..ऽ.रे..विठ्ठला उपासाचे लोणचे!!५!!

खा..ऽ ..रे विठ्ठला..खा..ऽ..

 

दिनांक:-१६-११-२०

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नका येऊ बांधावर ☆ श्री शुभम अनंत पत्की

श्री शुभम अनंत पत्की

जीवन परिचय 

  • स्थापत्य अभियंता.
  • युवा पिढी चा कवी.
  • काव्य आणि अभिनय याची आवड.

☆ कवितेचा उत्सव ☆ नका येऊ बांधावर ☆ श्री शुभम अनंत पत्की 

नाही मिळाला कसला न्याय,

नुसते झाले सरकारी दौरे

पाहणी करून उपयोग काय,

इथं उपाशी बसलेत मोहरे

 

मागं पळून तुमच्या जोरात,

दुखु लागले हताश पाय

कुजलेलं पिक दाखवून तरी,

पाहिलं मदत मिळेल काय

 

इथं सोन्याला येई झळाळी,

शेअर मार्केटला उसळी

पण शब्द घुमतो महगाई,

जेव्हा फुलते माती काळी

 

परत नका येऊ बांधावर,

राहुदे आम्हाला जरा शांत

तुम्ही फक्त भेटा चॅनेलवर,

आता अर्णब आधी सुशांत

 

© श्री शुभम अनंत पत्की

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – साकारली गझल ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य – साकारली गझल ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

अंधार वेधण्याला सोकावली गझल

पाहून दीप दारी, वेडावली गझल…!

 

एकेक माणसांला, वाचीत चाललो

सा-या स्वभाव दोषा, नादावली गझल…!

 

अंधार अंतरीचा, वाटून टाकला

सोशीक यातनांना, लोभावली गझल…!

 

होकार देत गेलो,  प्रत्येक याचका

ते घाव झेलताना, आकारली गझल…..!

 

आसूत नाहलो नी, हासूत थांबलो

शब्दात मांडताना, साकारली गझल….!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घालमेल ☆ श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ घालमेल…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

पुस्तकांनी हात ओले

करावे म्हंटले

मनाच्या तळव्यावर,

शब्दांच्या मेहंदीची

पानेतर कुठे सापडतात

कळजातल्या आठवांच्या

झोपडीत ?

भावनांनी रंगवावी

असे जीवनच नाही राहीले

स्वप्नांचे !

पेक्षा ढसढसणारी प्रतिभा

घरीच असते

कवितेच्या पदराशिवाय

ऊगीच रिमोटवर काहीबाही

चाळत-बाळत.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विसाव्याचे क्षण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ विसाव्याचे क्षण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे 

उरात रुतले काटे काही,

शल्य त्याचे टाकून देऊ!

आयुष्याच्या अंतिम अंकी,

रिक्त, मुक्त होऊन जाऊ!

 

जरी अंत हा माहीत नाही,

मरणाचे राही मनात स्मरण!

किती दिवस अन् किती वर्षेही,

मनात मोजी प्रत्येक क्षण क्षण!

 

मानव देह हा दिला प्रभूने,

काही करावे त्याचे सोने!

येता विसाव्याचे क्षण हे,

संपत जाई कणाकणाने!

 

स्मृतीत चिरंतन क्षण वेचावे,

मनीची खळबळ मनी रहावी!

एकांताच्या क्षणी रमावे,

अंतर्यामी  गुंतून जावे!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 55 – हौताम्य पूजन ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

  1. ☆ रंजना जी यांचे साहित्य # 55 – हौताम्य पूजन  ☆

 

क्रांती कारकांचे, करूनी स्मरण

हौताम्य पूजन,  लवलाही…!

 

भगतसिंगाचे, प्रेम, दिलदार

सुखदेव यार,  राजगुरु….!

 

त्रिकूट मैत्रीचे, स्वातंत्र्याचे दूत

भाग्यवान पूत,  क्रांतीकारी….!

 

भारत मातेचे, पुत्र भाग्यवंत

जाणुनिया खंत, माऊलीची

 

तोडण्या शृंखला, तव चरणाच्या,

सुखे मरणाच्या, दारी जात…..!

 

वंदे मातरम , होता जयघोष,

उडाले ते होश, जल्लादाचे.,….!

 

केले प्राणार्पण, गेलें फासावर

निष्ठा कार्यावर,  सेवाव्रती….!

 

तेवीस मार्चचा, बलिदान  दिन,

आक्रोशले जन, भारतीय …..!

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 73 – गझल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 73 ☆

☆ गझल ☆

नको राग मानूस,बांधील हो तू

विसर सर्व काही ,क्षमाशील हो तू

 

इथे दाटला  फार अंधार आहे

प्रकाशास सांभाळ,कंदील हो तू

 

कुणाची कुणाला नसे आज चिंता

कशाचा तुला  घोर, गाफील हो तू

 

असा एकटा तू रहाशील कुठवर

प्रवाहात ये ,पूर्ण सामील हो तू

 

”प्रभा” कोण देतो सदा साथ येथे?

गझल तू , स्वतः एक मैफील हो तू

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्मृतीयात्रा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ स्मृती यात्रा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

 मनाच्या प्रांगणावर उतरला पक्षी

उसवू लागला,स्मृतीरुप नक्षी

स्मृती आनंददायी

गात्रे गात्रे सुखविणार्य

स्मृती दुःख दायी

अंतःकरणास भिडणार्या

स्मृती निरोपाच्या

भावविश्व हलविणार्या

स्मृती स्वागताच्या

स्नेह जोपासणार्या

स्मृती सणवारांच्या

उत्साहास उधाण आणणार्या

स्मृती नातेसंबंधांच्या

कडु गोड बनलेल्या

स्मृती अशाही चिवट

नको नकोशा वाटणार्या

मन बनविणार्या बोथट

धारदार जिव्हेच्या

एकामागोमाग एक

जीवनपट उलगडणार्या

आपले नि परके यातील

सीमारेषा शोधणार्या

स्मृती यात्रा ही अपार

मनरुपी वारुवर

वेगाने होई स्वार

नेई मजला दूरवर.

 

सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.

 © सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 72 ☆ दीप अंगणात ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 72 ☆

दीप अंगणात

दीप अंगणात जळो

सारी इडापिडा टळो

आहे सण दिवाळीचा

सुख समाधान मिळो

 

दीपावलीचा पाडवा

त्याच्या नावात गोडवा

पंख फुग्याचे बांधुनी

दीप आकाशी उडवा

 

आल्या चांदण्या या खाली

रंग लावुनी या गाली

दारूकाम हे मोहक

फुलो आकाशात वेली

 

शेत पिको हे जोमात

माल विको हातोहात

अन्नदाता बळीराजा

राहो माझा आनंदात

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राहुंन गेलं बोलायचं नसतं ☆ श्री विद्याधर काठे

☆ कवितेचा उत्सव ☆ राहुंन गेलं बोलायचं नसतं ☆ श्री विद्याधर काठे ☆

कसं जगायचं, कसं जगायचं,

हे कुणालाच माहीत नसतं…

न उमगणारं कोडं, उमगलेलं अगदी थोडं…

आयुष्य असं असतं…

राहुंन गेलं बोलायचं नसतं

 

जगतांना फक्त जगायचं असतं…

एकेक क्षण निसटतांना पहायचं असतं…

हसायचं, रडायचं, धडपडल्यावर पुन्हा उठून उत्साहाने चालायचं असतं…

कळलेलं, न कळलेलं, पण त्या वेळेशी सूर जुळलेलं…

आयुष्य असं असतं…

राहुंन गेलं बोलायचं नसतं

 

देत असतं की नेत असतं, काही केल्या कळत नसतं…

दोन क्षणांचं गणित कधीच जुळत नसतं…

साठवायचं की आठवायचं, हे ही ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं…

कधी मैफल रंगलेलं, कधी खूपंच मरगळलेलं…

आयुष्य असं असतं…

राहुंन गेलं बोलायचं नसतं

 

कसं जगायचं विचारतांना, जगणं विसरायचं नसतं…

प्रवास चुकला की काय, म्हणून वाटेतच उतरायचं नसतं…

गोंधळलेल्या क्षणी बावरलेलं, पण आपण सावध होऊन सावरलेलं…

आयुष्य असं असतं…

राहुंन गेलं बोलायचं नसतं

 

आपणच घडवलेलं आयुष्य फक्त प्रश्न नसतं…

स्वतःत दडवलेलं, बाहेर शोधायला लावणारं उत्तर असतं…

प्रश्न एकच ठेवून , अनेक पर्याय देणारं,पण उस्फुर्तपणे सामोरं जायचं असतं

आयुष्य असंच असतं…

आयुष्य असंच असतं…

राहुंन गेलं बोलायचं नसतं

 

© श्री विद्याधर काठे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print