मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अवचित मेघ ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

 ☆ कवितेचा उत्सव ☆ अवचित मेघ ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

रेघावर रेघ

दाटूनीया मेघ

मनाचा ऊद्वेग

पाऊस रंगीत.

 

टपोरते थेंब

मोतीयाचे बिंब

अवकाळी चिंब

काळीज भिजरे.

 

आठवणी धनू

सप्तरंग वेणू

वार्यातच जणू

भावनांचे गाणे.

 

पाने-फुले धुंद

झुले शब्दगंध

धरेशी संबंध

अवेळी प्रणय.

 

वसंत फुलवा

पाऊस भुलवा

निसर्ग जलवा

अतोनात प्रीत.

 

कोकीळेचा गळा

ऋतूसंगे मेळा

पाऊसच खुळा

बरसून काव्य.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चिमण्या ☆ श्री प्रदीप कासुर्डे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ चिमण्या ☆ श्री प्रदीप कासुर्डे ☆ 

(20 मार्च जागतिक चिमणी दिवस निमित्ताने कविता)

आजी सांगायची गोष्ट

चिमणीचं घर मेणाचं

कावळ्याचं घर शेणाचं

चिऊताई चिउताई दार उघड

आज माझी आईं

माझ्या मुलीला  कोणती गोष्ट सांगेल ?

 

आई म्हणायची गाणं

एक घास चिउचा

एक घास काऊचा

आज माझी बायको

मुलीसाठी कोणतं गाणं म्हणेल ?

 

बहिणाबाईंच्या कवितेत

आम्ही वाचायचो

अरे खोप्यामधी खोपा

सुगरणीचा चांगला

देखा पिल्लासाठी तिने

झोका झाडाले टांगला

आज आमची मुलं

कोणत्या कविता वाचतील ?

 

आज कुठे आहेत चिमण्या

लेकींप्रमाणे माहेरी तर गेल्या नाहीत ना?

 

© कवी प्रदीप कासुर्डे

नवी मुंबई

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 79 – विजय साहित्य – सासू सून नात द्वाड.. . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 78 – विजय साहित्य  ✒सासू सून नात द्वाड.. . . !✒ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

सासू सून नातं द्वाड

आपसात चढाओढ

हक्क राखण्या शाबूत

प्रसंगाला होई गोड. . . . !

 

सासू सून नातं द्वाड

विळी भोपळ्याची जोड

सख्य नसताना होई

तू तू में  में  सडेतोड. . . . !

 

सासू सून नातं द्वाड

विचारांची तोडफोड

स्वार्थासाठी होत असे

रागलोभ धरसोड. . . . !

 

सासू सून नातं द्वाड

कुरघोडी बिनतोड

नाही आजार तरीही

डोस औषधांचा गोड. . . !

 

सासू सून नातं द्वाड

वादातीत डोकीफोड

जुन्या नव्या बदलात

रोज नवी चिरफाड. . . . !

 

सासू सून नात द्वाड

जशी लोणच्याची फोड

जसे मुरते तसे रे

होई संसार तो गोड. . . . !

 

सासू सून नात द्वाड

जसे बाभळीचे झाड

काट्याकाट्यात फुलते

सुखी संसाराचे बाड. . . . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ असं जगणं ☆ श्री प्रकाश लावंड

☆ कवितेचा उत्सव ☆ असं जगणं ☆ श्री प्रकाश लावंड ☆

या ठेप्यावर थांबू दोस्ता

भूतकाळाकडं वळून बघू

शिवारात धावाधाव करू

धूळमातीत मळून बघू

 

उन्हात तळू पावसात भिजू

अंग माखून घेऊ चिखलात

काळ्या आईच्या कुशीत लोळू

बसून बघू हिरव्या मखरात

बहरलेल्या शिवारावर

फांद्यांच्या चवऱ्या ढाळून बघू

 

मधाचे पोळे हुडकत जाऊ

हावळा हुरडा कणसं खाऊ

चिंचा बोरं कैऱ्या भोकरं

दोन्ही खिशांत भरून घेऊ

गाभुळलेला रानमेवा

जिभेवरती घोळून बघू

 

घडीभर विहिरीत डुंबत राहू

काठावरनं मुटका मारीत राहू

सुरपारंब्या शिवणापाणी

दांडूनं विट्टीला कोलत राहू

वयाला डालू डालग्याखाली

जरा पोरांसारखं चळून बघू

 

संकटांच्या अंगावर धावून जाऊ

अडचणींना कोंडीत पकडू

घटाघटा पिऊ महापुराला

दुष्काळाला फासात जखडू

भिती दाखवून मरणाला

असं जगणं खळखळून जगू

 

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.

मोबा 9021497977

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संक्रमण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ संक्रमण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

आज अचानक दिसला गुलमोहर,

केशरी फुलांचा गुच्छ घेऊनी!

हिरव्या पानातून शिशिर बहर,

चाहूल देई पाने सळसळूनी!

 

आम्र मोहर हा गंधित करूनी,

इवल्या इवल्या मधुर  तुर्यानी!

ऐकू येईल दूर कोठूनी,

कोकिळेची त्या मंजुळ गाणी!

 

अवचित चाहुली वसंत येईल,

कोवळी तांबूस पाने फुलतील!

सुकल्या, करड्या त्या खोडातील,

हळुच आपुले सृजन दावतील!

 

शिशिरा ची ही थंडी बोचरी,

खेळू लागली ऊन सावली!

पानगळ ही करडी पिवळी,

झाकून गेली जमीन सावळी!

 

कधी कसे हे चक्र बदलते,

संक्रमण होई दिवसामाशी !

नवलाने नतमस्तक होते,

अन् गुंग होई मति माझी !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 70 – मला वाटले भेटशील एकदा …. ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #70 ☆ 

☆ मला वाटले भेटशील एकदा …. ☆ 

मला वाटले, भेटशील एकदा नंतर नंतर

कळले नाही, कसले तूझे हे जंतरमंतर…!

 

येते म्हणाली, होतीस तेव्हा जाता जाता

किती वाढले, दोघांमधले अंतर अंतर…!

 

रोज वाचतो, तू दिलेली ती पत्रे बित्रे

भिजून जाते, पत्रांमधले अक्षर अक्षर…!

 

तूला शोधतो, अजून मी ही जिकडेतिकडे

मला वाटते, मिळेल एखादे उत्तर बित्तर…!

 

स्वप्नात माझ्या, येतेस एकटी रात्री रात्री

नको वाटते, पहाट कधी ही रात्री नंतर…!

 

उभा राहिलो, ज्या वाटेवर एकटा एकटा

त्या वाटेचाही, रस्ता झाला नंतर नंतर…!

 

विसरून जावे, म्हणतो आता सारे सारे

कुठून येते, तूझी आठवण नंतर नंतर…!

 

मला वाटले, भेटशील एकदा नंतर नंतर

कळले नाही, कसले तूझे हे जंतरमंतर…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 90 – ☆ कमळखुणा ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 90 ☆

 ☆ कमळखुणा  ☆ 

आठवणी आता पुसट होत  चालल्यात सखी,

गढुळ पाण्यातल्या प्रतिबिंबासारख्या !

त्याच पाण्यात फुलल्या होत्या कधी,

शुभ्र कुमुदिनी,

आकांक्षेचं नीळं कमळ,

याच पाण्यात पाहिलं होतं ना आपण?

एक डोळा बंद करून,

कॅलिडोस्कोपमध्ये दिसणारी

हसरी, नाचरी, रंगीबेरंगी

असंख्य काचकमळं

फेर धरून नाचत रहायची!

 

रविवारची साद….

चर्चच्या घंटेचा नाद

एक भावणारा निनाद,

जाईच्या मांडवाखाली

पसरलेल्या वाळूत

काच लपविण्याचा खेळ

“काचापाणी”

तेव्हा ठाऊक तरी होतं का ?

भविष्यात पायाखाली

काचाच काचा अन् डोळाभर

पाणीच पाणी !

आठवणी आता पुसट होत चालल्या तरी,

कमळखुणा खुपतात ग काळजापाशी!

© प्रभा सोनवणे

(अनिकेत काव्यसंग्रह १९९७)

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ‘लस’श्वी भव ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ कवितेचा उत्सव ☆ ‘लस’श्वी भव | ? ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

यूट्यूब लिंक >> एक लाजरन साजरा मुखड़ा

 

एक लाजरा न साजरा मुखडा, चंद्रावाणी फुलला ग

राजा मदन हसतोय असा की ‘मास्क’ आता सुटला ग

या लसीकरणाचा तुला इशारा कळला ग ?

‘लस ‘ आडवी येते मला की जीव माझा दुखला ग ?

 

नको राणी नको लाजू, दंडावर आता घेऊ

इथं तिथं नको जाऊ, सेंटरला सरळ जाऊ

का?

टोचत्यात ??

 

वाफेचा विळखा घेऊन सजणा नको तो घसा धरु

खसाखसा हात धुवून भोळं फसलंय फुलपाखरु

आता मिळावा पुन्हा ‘लसीचा’ मोका दुसरा ग

 

राजा मदन हसतोय असा की’मास्क’ आता सुटला ग ?

 

डोळं चोळून, पाणी पिऊन, झुकू नका हो फुडं

पटकन पटकन, आवरून सगळं जाऊ या तिकडं

लई दिसान सखे आज या, “ओळी” जमल्या ग?

 

राजा मदन हसतोय असा की ‘मास्क’ आता सुटला ग ?

 

(पुण्याहून कॅमेरामन  ? टूच सह मी ‘टुकार पूनावाला’, टवाळखोरी माझी ?)

 

©  श्री अमोल अनंत केळकर

१७/०१/२०२१

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 89 ☆ देहचा सागर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 89 ☆

☆ देहचा सागर ☆

नको उगाळूस दुःख

नाही चंदन ते बाई

दुःख माती मोल त्याला

गंध सुटणार नाही

 

तुझ्या कष्टाच्या घामाचे

नाही कुणालाच काही

पदराला ते कळले

टीप कागद तो होई

 

पापण्यांच्या पात्यावर

दव करतात दाटी

हलकासा हुंदका ही

फुटू देत नाही ओठी

 

तुझ्या देहचा सागर

सारे सामावून घेई

नाही कुणाला दिसलं

किती दुःख तुझ्या देही

 

संसाराला टाचताना

बघ टोचली ना सुई

कर हाताचा विचार

नको करू अशी घाई

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्याचं सार…. ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार 

 ☆ कवितेचा उत्सव ☆ आयुष्याचं सार…. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

आहे आयुष्याचं सार, घरातली ती बायको

तिच्या सारखी हो तिचं, तिची तुलनाच नको

आहे सुकाणू घराची, प्रेम देवताच आहे

घरातला हरएक, तिच्या प्रेमातच राहे…

 

किती प्रेम पतीवर, तळहाती ती झेलते

सारा मान नि सन्मान, तेथे कधी न चुकते

कर्तव्याला सदा पुढे,काम किती उपसते

हरएक नातं पहा,मनातून जोपासते…

 

जाते इतकी मुरून, सारे घरच पेलते

चिंता काळज्याही साऱ्या,तिच एकटी झेलते

सारी दुखणी खुपणी, नाही लागत हो डोळा

जीव टाकते इतका, असा कसा जीव खुळा….

 

सारे घेते ओढवून, घाण्या सारखी राबते

येता संकट जरासे, नवऱ्याला धीर देते

मुले लेकरे तिची हो, जणू तळहाती फोड

काटकसर करून, सारे पुरविते लाड…

 

कसा करावा संसार, तिच्या कडून शिकावे

जणू आधाराचा वड, साऱ्यांनीच विसावावे

ती कोसळता सारे, घरदारचं मोडते

ती गेल्यावर मग….

तिची किंमत कळते….

ती गेल्या.. वर…

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि: १३/२/२०२१

वेळ: रात्री १२:०६

(९७६३६०५६४२)

[email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares