मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझं जगणं ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

 ☆ कवितेचा उत्सव ☆ माझं जगणं ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

 

पापभीरू मी

 

स्वत:च्या सावलीला घाबरतो

पण पायरी धरून जगतो

 

अर्धा भाकरीत चंद्र शोधतो

तृप्तीने ढेकर देतो

 

जर कधी गजरा आणला

जाऊन येतो मनाने काश्मिरला

 

हक्काच्या छप्परासाठी झिजतो

कर्जाच्या वेताळाला पाठीवर घेतो

 

रोजच्या जगण्याला भिडतो

समाधानाची फोडणी देतो

 

मुलांसोबत गोकुळात रमतो

जन्मदात्याच्या सेवेत

विठूरुखुमाई  शोधतो

 

आणि

 

सुखाच्या कल्पनेला

मोत्यांची झालर लावून

दाराला तोरण बांधतो

घराला घरपण देत

माझं जगणं जगतो

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य – मी….! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है एक भावप्रवण कविता  “मी….!” )

☆ विजय साहित्य – मी….! ☆

मी….!

हरवतोय मी… की गवसतोय मी..

परीचितांना अपरीचित आणि

अपरिचितांना परीचित वाटतोय मी.

अविश्वासात विश्वास आणि

निस्वार्थात स्वार्थ गोवतोय मी

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

पुस्तकातले कुटुंब, समाज

त्यांच्यातच रमतोय मी.

माणूस माणूस जोडलेला

पुन्हा पुन्हा वाचतोय मी

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

गणिताची आकडेमोड

आकडेवारीत विस्तारतोय मी

माझ्याच गरजा, नी जबाबदा-या

कार्य कारण भाव निस्तरतोय मी.

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

चालतोय मी , थांबतोय मी

माझ्यातल्या मीला शोधतोय मी

लिहितोय मी, वाचतोय मी

विस्तारीत जगणे , आवरतोय मी.

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

कुणाच्या जमेत , कुणाच्या खर्चात

क्षणा क्षणाला साचतोय मी

ऊन्हातला मी, सावलीतला मी

चक्रवाढ व्याजात नाचतोय मी.

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

चुकतोय मी , मुकतोय मी

संसार नावेत, डुलतोय मी

कधी काट्यात , कधी वाट्यात

जीवन बाजारात , भुलतोय मी.

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

कधी भूतकाळात तर कधी

वर्तमानात जगतोय मी

अनुभूती वेचताना थकलो तर

तुझ्याच अंतरात वसतोय मी.

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 6 – कविता ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 6 ☆

☆ कविता ☆

 

आपण समजतो तेवढी सोपी नसते कविता

भावनांचा उद्रेक होतो तेव्हा जन्म घेते कविता

तुम्ही नाहीयेत तिचे जन्मदाते बाबांनो

उलट तिच्यामुळे तुमचा होतो जन्म  कवी म्हणून मित्रांनो

कविता म्हणजे असतं एखाद्याचं जिवंतपणे जळणं

कविता म्हणजे काळजातला खंजीर स्वतः ओढून मरणं

कविता असते बाणासारखी रुतणारी

छातीत घुसून पाठीतून आरपार निघणारी

कविता म्हणजे पायातला न दिसणारा काटा

कविता म्हणजे भावनांना हजार लाख वाटा

कविता म्हणजे असतो काळजावरचा घाव

कविता म्हणजे असतो एक मोडुन पडलेला डाव

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

17/05/20

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सखी ☆ श्री यशवंत माळी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ सखी ☆ श्री यशवंत माळी ☆ 

 

सखी

आयुष्यभर आपण

पुरवलेच ना

देहाचे डोहाळे ?

चांगलं -चुंगलं खायला

प्यायला ?

निदान ब-यापैकी.

रंग रंगोटीसाठी

जमेल तेवढी

कॉस्मेटिक्स.

कपडे अन् दागिने.

आता काय?

चेहऱ्यावर वर्दळ

सुरकुत्यांची.

आणि सैल बुरख्यासारखे

लोंबणारे कातडे

……शरीरभर.

काय करायचं या देहाचं?

आग्नीला स्वाहा…..?

…..मूठमाती?

की  देहदान ?

 

©  श्री यशवंत माळी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस होता होता ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

शिक्षक व साहित्यिक

शिक्षण:  DTM (Diploma in Textile Manufacturing), M.A. (English), M. Ed. (English), DSM (Diploma in School Management),

गुण नैपुण्य : काव्य लेखन, ललित लेखन, वक्तृत्व, चित्रकला, गायन, वादन.

विशेष : 1) विविध साहित्य संमेलनांत निमंत्रित कवी. 2) साहित्य संमेलनाचे आयोजन.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घडामोडींवर सातत्याने ललित व काव्य लेखन. जिल्हास्तरावर शैक्षणिक प्रशिक्षणांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकाची भूमिका.

मिळालेले पुरस्कार : (शिक्षण क्षेत्र) – 1) राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – साई समर्थ फौंडेशन, जयसिंगपूर 2) जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार – सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, सांगली 3) शिक्षकांची नवोपक्रम स्पर्धा (महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे) – राज्यस्तरावर निवड

नेशनल बिल्डर अॅवार्ड – इनरव्हील क्लब, सांगली गुणवंत शिक्षक पुरस्कार – केंद्र, बेडग कलाश्री पुरस्कार – चाणक्य नॉलेज अवर्स, कुरूंदवाड  कलाभूषण पुरस्कार – स्वामी विवेकानंद आर्ट पावर

साहित्य क्षेत्र पुरस्कार :

  • महाराष्ट्र भूषणपुरस्कार : जी. एस. प्रतिष्ठान (महाराष्ट्र – कर्नाटक)
  • राज्यस्तरीय नवसाहित्य रत्न प्रतिष्ठा गौरव पुरस्कार : प्रतिष्ठा फौंडेशन
  • राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार : कोल्हापूर
  • राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार : (पुस्तक : संस्कारांची सापशिडी) – ध्यास साहित्य संमेलन, पलूस
  • राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य गौरव पुरस्कार :  (काव्यसंग्रह : ओळंबा) – शब्दांगण साहित्य संमेलन, मिरज
  • दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (दमसा) विशेष ग्रंथ पुरस्कार – काव्यसंग्रह ”ओळंबा”
  • अग्रणी विशेष काव्यसंग्रह पुरस्कार : (काव्यसंग्रह-ओळंबा) अग्रणी प्रतिष्ठान, देशिंग.
  • उत्कृष्ट काव्यलेखन पुरस्कार : (काव्यसंग्रह-ओळंबा) ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, पलूस.

सन्मानपत्र : (बालसाहित्य-चौदाखडीची गाणी) अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला, क्रीडा मंच, सांगली.

प्रकाशित साहित्य ग्रंथ : 1) चला बनूया चित्रकार – बालसाहित्य 2) पहिला पाऊस – ललित संग्रह 3) संस्कारांची सापशिडी – बालसाहित्य 4) बाराखडीची गाणी – बालसाहित्य 5) ओळंबा – काव्यसंग्रह 6) चौदाखडीची गाणी – बालसाहित्य

 ☆ कवितेचा उत्सव ☆ पाऊस होता होता ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी ☆ 

थेंबात पावसाच्या होते आग वेडी

जाळूनिया स्वतःला ती होते पाऊस थोडी

 

पाऊस होताच मग ती फिरते माळ रानी

कानात डोंगराच्या घुमतात गुज गाणी

 

दुःख शुष्क तृणाचे सरते उजाड रजनी

पाकळ्यांच्या दर्प ओठी ती होऊन जाते लाली

 

तालात या पिकांच्या ती पेरते नृत्य बोली

ओंजळीत आयुष्याच्या सजतात फुल वेली

 

पाऊल वाट तिच्याने होते अबोल थोडी

गंधाळल्या चराची ती वाट नागमोडी

 

चोचीत पाखरांच्या ती गाते गीत अंगाई

पिलास छत्र देई ती होऊन जाते आई

 

खिन्न त्रासल्या जीवाची काढते ओढून ढलपी

ती जाते देऊन देहा नितळ नवेली कांती

 

पाऊस होता होता ती बोलते पाऊस वाणी

का आग तिला म्हणावे सांगेल मज कोणी?

 

©  श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

मिरज, जि. सांगली

मोबाईल : 9922048846

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनोगत ☆ श्री आदित्य

 ☆ कवितेचा उत्सव ☆ मनोगत ☆ श्री आदित्य ☆ 

 

भेटणं नाही, बघणं नाही, फक्त बोलता तरी यावं,

मैफिलीतलं गाणं, दूरून ऐकता तरी यावं.

 

आठवणींची किती पानं परत परत उलटली,

तूझ्याविना आयुष्य शून्य, याची ओळख पटली.

 

काय हवयं तूला? देवानं एकदा तरी पुसावं,

तूझ्या सोबतीचं दान माझ्या नशिबी लिहावं.

 

©️  श्री आदित्य

१०.०५.२०२०

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 64 – पूर्वज ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  एक समसामयिक विषय पर आधारित अतिसुन्दर रचना  पूर्वज। सुश्री प्रभा जी ने इस काव्याभिव्यक्ति में वरिष्ठतम पीढ़ी के माध्यम से अपने पूर्वजों का स्मरण किया है। जो निश्चित ही अभूतपूर्व है। मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 64 ☆

☆ पूर्वज  ☆

 

ते कोण असतात? कुठून आलेले??

आपल्याला माहित नसते त्यांच्याबद्दल फारसे काही…..

किंवा सांगीवांगी ,

ऐकून असतो आपण,

त्यांच्या पराक्रमाच्या गाथा!

मूळगावातला तो भग्न पडका वाडा पाहून—-

दाटून आली मनात अपार कृतज्ञता,

किती पराक्रमी होते आपले पूर्वज!

वारसदारांपैकी एकच आनंदी चेह-याची बाई,

तग धरून त्या वाड्यात—-

आपले म्हातारपण सांभाळत!

तिने सांगितले अभिमानाने—

आपला धडा आहे इतिहासात,

कोणत्या लढाईत मिळाली होती….सात गावं इनाम आणि हा बुलंद वाडाही!

आपण इनामदार, देशमुख,

अमक्या तमक्याचे वंशज—-

असे बरेच सांगत राहिली ती……

मुले शहरात बंगला बांधून सुखसोयीत रहात असताना…..

ती इथे एकटी….

 

वाड्याच्या वैभवशाली खुणा सांगत—-

किती ऊंट किती हत्ती घोडे, किती जमीन….किती पायदळ!किती लढाया!!

 

हे सारे खरे असले तरी,

पूर्वज ठेऊन जातात, जमीनजुमला, घरे,वाडे…..

ते कुठे राहते  टिकून काळाच्या प्रवाहात??

कुणी म्हणतही असेल तिला,

वाड्याची मालकीणबाई…

 

पण प्रत्येकाला जिंकायची असते आता….

आयुष्याची लढाई स्वतःच स्वतःसाठी…..

हेच सांगते ती ऐंशी वर्षाची म्हातारी,

चुलीवरचा चहा उकळत असताना !

लढण्याचं बळ देतात पूर्वज…..

 

हिच काय ती पूर्वपुण्याई !!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आस ☆ कवी आनंदहरी

☆ कवितेचा उत्सव ☆ आस ☆ कवी आनंदहरी ☆ 

तुझी लागलीसे आस

तुझ्याठायीं नाही वास

मन होई रे उदास

पांडुरंगा !!

 

जन्म वृथा जाई वाया

नाही भौतिकाची माया

तुजपायी झिजो काया

पांडुरंगा !!

 

ध्यानी मनी तुझे भास

जीवा राहो तुझा ध्यास

तुजमुळे श्वासोश्वास

पांडुरंगा !!

 

आता उराउरी भेटी

तुझी नाही जगजेठी

ऱ्हावे तुझे नाम ओठी

पांडुरंगा !!

 

© कवी आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 63 ☆ हळदीचा लेप ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “हळदीचा लेप ।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 63 ☆

☆ हळदीचा लेप 

माझ्या काळजाचा गाव

तेथे कालवाकालव

आले माहेरी सोडून

पूर्व संचिताचा डाव

 

माझं सोन्यावाणी रूप

त्याला हळदीचा लेप

ओलांडता उंबरठा

नव्या घराचा प्रभाव

 

प्रीतिच्या या सागरात

जलविहाराचा बेत

लाटांवर झुलण्याचा

आता होईल सराव

 

खेळ संसाराचा खेळू

अपवाद सारे टाळू

जेथे जमीन सुपीक

तेथे फुलण्याला वाव

 

कोंबडा हा आरवला

सूर्य उदयास आला

आनंदाला आज माझ्या

नाही उरलेला ठाव

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ असावा कोणी दुर्योधन ☆ श्री शुभम अनंत पत्की

 ☆ कवितेचा उत्सव ☆ असावा कोणी दुर्योधन ☆ श्री शुभम अनंत पत्की ☆ 

 

जाणून घ्यावी एकसूत्री

सधन असो वा निर्धन

कर्णाची साधण्या मैत्री

असावा कोणी दुर्योधन

 

तिरस्कार असे सोपा

स्वीकार असे दुर्लभ

शेवटी होई समाजप्रिय

मनुष्य असो वा गर्दभ

 

मैत्री पाहिली त्याने

नाही पाहिला वेश

मैत्री प्रती कर्तव्याने

बहाल केला अंगदेश

 

असला जरी सूर्यपुत्र

केला त्याग मातेने

वाचवण्या देवेंद्र पुत्र

साधला स्वार्थ देवाने

 

जेष्ठ कुंतीपुत्र असण्याचा

झाला जेव्हा साक्षात्कार

धर्मापुढे अभेद्य मैत्रीचा

झाला भव्य सत्कार

 

त्रिखंड गाजवित तो

आला जेव्हा कुरुक्षेत्री

युद्ध खेळला ऐसे तो

वसला अनुजांच्या नेत्री

 

पडला जेव्हा मृत्युमुखी

तेथेच हारले कौरवजन

होते पांडवजन सुखी

दुःखी होता दुर्योधन

 

लाभण्या ऐसा सखा

पुण्य असावे निरंजन

होई नेहमी पाठीराखा

असावा कोणी दुर्योधन…

 

©  श्री शुभम अनंत पत्की

7385519093 /9284656466

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print