मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण : विडंबन ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ कवितेचा उत्सव ☆ श्रावण : विडंबन ☆ 

नेहमीचा श्रावण:-

सुख वेचिन म्हणण्या आधी

घन दुःखाचा गहिवरतो

अन दुःख सावरु जाता

कवडसा सुखाचा येतो

या ऊन सावली संगे

रमण्यात ही मौज म्हणुनी

मी हसून हल्ली माझ्या

जगण्याला श्रावण म्हणतो….

 – गुरू ठाकूर –

सध्याचा श्रावण:-

बाहेर जाईन म्हणण्याआधी

‘मास्क’ नेहमीचा आठवतो

अन मास्क घालून जाता

भरवसा मनाला येतो

या ‘लाॅकडाऊन’ संगे

‘रम’ण्यात ही मौज म्हणूनी

मी बसून हल्ली माझ्या

जगण्याला ‘डरो-ना’ म्हणतो

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 10 ☆ कोरोना काळातील संवेदना…☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

(कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी)  मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “कोरोना काळातील संवेदना…)

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 10 ☆ 

☆ कोरोना काळातील संवेदना… 

 

कोरोना काळातील संवेदना

कैसी विशद करावी

अनपेक्षित या विपदेची

भरपाई कैसी मिळावी…१

 

विदेशी संक्रमण झाले

नेस्तनाबूत करून गेले

पडल्या प्रेताच्या राशी

अंत्यविधी, हात न लागले… २

 

मातृभूमी आठवताच

पदयात्रा कुठे निघाली

उपवास घडले अनेकांना

कित्येकांची कोंडमारी झाली… ३

 

अजगर रुपी विषाणू

मजूर वर्ग, हकनाक संपला

शेवटचे स्वप्न, रात्र न पुरली

रक्त, मांस सडा, शिंपल्या गेला… ४

 

आईचा पान्हा जसा आटला

अवकाळी देह पार्थिव बनला

स्वार्थ मोह, क्षणात सुटता

शेवटचा श्वास, कुणी घेतला… ५

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन,

वर्धा रोड नागपूर,(440005)

मोबाईल ~9405403117, ~8390345500

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उठ उठ पांडुरंगा ☆ सुश्री नीलम माणगावे

सुश्री नीलम माणगावे

संक्षिप्त परिचय:  कथा, कविता,कादंबरी, लोकसाहित्य,सामाजिक,वैचारिक लेख,संपादकीय,समीक्षणात्मक,संपादन – संशोधन,आत्मकथन,माहितीपर,बालसाहित्य, कुमार साहित्य वगैरे माध्यमातून विपुल लेखन। एकूण 61 पुस्तके प्रकाशित

सदर लेखन – केसरी, लोकमत, जनस्वास्थ्य, श्राविका,रानपाखरं, रोहिणी, ऋग्वेद वगैरेमधून सहा महिने सदर लेखन

सहसंपादक – प्रगती आणि जिनविजय,तीर्थंकर सल्लागार – मासिक इंद्रधनुष्य

अनेक साहित्य संमेलनांमधून कथाकथन, कवितावाचन,संमेलन अध्यक्ष म्हणूनही अनेक वेळा सहभाग

आकाशवाणी सांगली,कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद कथा, कविता वाचन. कौटुंबिक श्रुतिका लेखन

पुरस्कार

राज्य पुरस्कार – डॉलीची धमाल, शांती: तू जिंकलीस, निर्भया लढते आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक – बाबुराव बागूल पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे – कुसुमाग्रज पुरस्कार, याशिवाय इतर महत्वाचे 42 पुरस्कार

विशेष समावेश-

कर्नाटक राज्य दहावी पाठ्यपुस्तकांमध्ये ‘सत्कार ‘कथेचा समावेश, महाराष्ट्र राज्य बारावी पाठ्यपुस्तकांमध्ये ‘स्पर्श’, कथेचा समावेश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद बीए भाग एक ‘प्रसाद’ कथेचा समावेश, महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता पाचवी लोअर मराठी ‘कोणापासून काय घ्यावे’ समावेश, मुंबई विद्यापीठ भाग-2 ‘जसं घडलं तसं’या आत्मकथनाचा अभ्यासक्रमात समावेश, महाराष्ट्र राज्य अकरावी पाठ्यपुस्तकांमध्ये ‘पैंजण ‘कवितेचा समावेश, कविता आणि कादंबरीवर दोन प्राध्यापकांनी एम फिल केले आहे.

‘जसं घडलं तसं’ या आत्मकथनाचा कानडी अनुवाद प्रकाशित

☆ कवितेचा उत्सव : उठ उठ पांडुरंगा – सुश्री नीलम माणगावे☆

तुझ्या चिपळ्यांचा नाद

इथं फुंकणीची साद

तिथं भक्तीचा सोहळा

इथं उपाशी प्रल्हाद

 

तुझ्या पोथी पुराणात

समतेची वाहे गंगा

इथं चौकाचौकात

रोज रडतो तिरंगा

 

ऊठ ऊठ पांडुरंगा

वीट सोडून ये आता

इंद्रायणीच्या डोहातून

चल उचलुया गाथा

 

उभा आडवा डोह

घालूया पालथा

आता तरी उचलून

टाकू या ना सत्ता

 

आता तरी कुणब्यांना

मिळूदे भाकर

नाहीतर निवदाची

कडू होईल साखर

 

©  सुश्री नीलम माणगावे

जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – स्वप्नपाकळ्या # 21 ☆ बोचरे शब्द ☆ श्री प्रभाकर महादेवराव धोपटे

श्री प्रभाकर महादेवराव धोपटे

(श्री प्रभाकर महादेवराव धोपटे जी  मराठी साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। वेस्टर्न  कोलफ़ील्ड्स लिमिटेड, चंद्रपुर क्षेत्र से सेवानिवृत्त अधिकारी । अब तक आपकी तीन पुस्तकें प्रकाशित । दो काव्य संग्रह एवं एक आलेख संग्रह (अनुभव कथन) प्रकाशित । एक विनोदपूर्ण एकांकी प्रकाशनाधीन । कई पुरस्कारों /सम्मानों से पुरस्कृत / सम्मानित। समय-समय पर आकाशवाणी से काव्य पाठ तथा वार्ताओं का प्रसारण। प्रदेश में विभिन्न कवि सम्मेलनों में आपको निमंत्रित कवि के रूप में सम्मान प्राप्त । विदर्भ क्षेत्र की प्रतिष्ठित साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं के विभिन्न पदों पर सेवाएं  प्रदत्त । हाल ही में  काव्य संग्रह – स्वप्नपाकळ्या, संवेदना प्रकाशन, पुणे से प्रकाशित । इस साप्ताहिक स्तम्भ का शीर्षक इस काव्य संग्रह  “स्वप्नपाकळ्या” से प्रेरित है ।आज प्रस्तुत है  उनकी एक भावप्रवण कविता   “बोचरे शब्द“.) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  – स्वप्नपाकळ्या # 21 ☆

☆ बोचरे शब्द

 

टोचणी मनाला,चरे हृदयाला

पाझर फुटला,द्वय नयनाला ।।

 

शब्दांचे ते तीर,भिडे काळजाला

वाहू लागे मनी,जखम भळभळा ।।

 

तिरस्कारयुक्त ,नजरेचा भाला

जिव्हारी लागला,पूर आसवाला ।।

 

अंतरी गर्भातून,करुण स्वर आला

क्षतविक्षत भावना,घाव वेदनेला ।।

 

खोटे नातेगोते,बोलवू कुणाला

वाटे संपवून टाक,दुःखी जीवनाला ।।

 

संपल्या अपेक्षा,अर्थ ना जगण्याला

आता एकच सरण,हवे विसाव्याला ।।

 

©  प्रभाकर महादेवराव धोपटे

मंगलप्रभू,समाधी वार्ड, चंद्रपूर,  पिन कोड 442402 ( महाराष्ट्र ) मो +919822721981

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चांदणं – सुश्री मंजुषा मुळे

☆ कवितेचा उत्सव : चांदणं – सुश्री मंजुषा मुळे☆

 

चांदणे

आली पुनवेची रात

येई चांदवा डौलात

परी चांदणे कधीचे

उतरले या मनात ।।

 

बालपणासवे माझ्या

चांदणेही अवखळ

येण्या ओंजळीत माझ्या

सदा त्याची खळखळ।।

 

यौवनाच्या चाहुलीने

चांदणेही तेजाळले

हुरहूर अनामिक

चांदणेही बावरले।।

 

भेटे सखा तो जीवाचा

चांदणे नि मोहोरले

ओढ अनोळखी तरी

मन बहराला आले ।।

 

जोडीदाराच्या मागुनी

माझी चांदण पाऊले

आणि प्रेमळ चांदणे

पाठ राखणीस आले ।।

 

अंकुरता वंशवेल

तृप्त चांदणे हासले

दुडदुडती घरात

जणू त्याचीच पावले ||

 

असे चांदणे साजिरे

करी सोबत सतत

अंधारल्या वाटांचीही

मग भीती ना मनात ||

 

वाटे पुढचीही वाट

चांदण्यात चिंब व्हावी

ईशकृपेचे चांदणे,

त्याने पाखर धरावी ….

नित्य पाखर धरावी ||.

 

© सुश्री मंजुषा मुळे

मो ९८२२८४६७६२

Please share your Post !

Shares
image_print