☆ कवितेचा उत्सव ☆ लाटा ☆ श्री अनंत गाडगीळ ☆
(- अनंता.)
ज्या हळुवारपणे
लाटा पायाला
स्पर्श करतात
त्यावरून..
वाटतं नाही की
त्या कधीकधी..
मोठाल्या जहाजांना
पण बुडवतात.
बोध घ्यावा सर्वांनी
सामर्थ्य प्रत्येकाचे..
वेळप्रसंगीच येते
लक्षात आपल्या.
नाजूक कितीही..
बायका दिसल्या
संकटात त्यांना..
आपणच टाकतो.
मात्र अशा वेळी..
त्यांच्या उग्र रूपाने
जीवन संपू शकते..
संसार बुडू शकतो.
नाजूकपणा त्यांचा
व सामर्थ्य लाटांचे
दोन्ही आपणास..
माहीत असले पाहिजे.
जगण्याचा हक्क..
प्रत्येकालाच आहे
बायकांना आणि
लाटांना पण आहे.
© श्री अनंत गाडगीळ
सांगली.
मो. 92712 96109.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈