मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खेळ नवा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ खेळ नवा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

वरवरचे हे वास्वत आहे, विस्तव सारा लपला आहे

फुंकर घालून पहा जरा तू भडका आता उडणे आहे

 *

मी सत्याची बाजू घेतो असे बोलणे सोपे आहे

जो तो जाणून आहे, बोलण्यातही गफलत आहे

 *

वचने देती तीच तीच अन् असे तीच ती मधाळ भाषा

मूर्ख जाहलो कितीदा तरी मनातील या सुटे न आशा

 *

चिखलफेकीचे खेळ चालता शिंतोड्यांना काय कमी

दिवसभराची नसता खात्री कशी द्यायची दीर्घ हमी

 *

सौदे जमती फिसकटती, शेंबड्यासही मुकुट हवा

सत्तेसाठी सत्य बदलती लोकशाहीचा खेळ नवा

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “२०२४ – २५“ ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

🙋२०२४ — 🤗२०२५ ☆ श्री सुहास सोहोनी

तीव्र उन्हाळे, ऊन कोवळे,

पूर राक्षसी, थेंब आगळे,

कंपित थंडी, सुखद गारवा,

दु:खापाठुन, सुख‌ शिडकावा..

*

सुख-दु:खांचे अनुभव देउन

वर्ष कालचे गेले वितळुन

नव वर्षाचे करु या स्वागत

नवी नवेली स्वप्ने घेऊन..

*

सौख्य सुखे द्यावी नववर्षा

रुचीपालटा थोडी दु:खे

असेच यावे हासत नाचत

रंग घेउनी इंद्रधनूचे

🌺

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ संध्याकाळ… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? संध्याकाळ… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

पैलतीर दिसे

संध्या समयी

ऐकू येते बघ

मंजूळ सनई…

*

थकला भास्कर

जाई अस्तास विसावया

आपुले बिंब पाहूनी

लागला हसावया…

*

सुख दु:खाच्या

लाटांवरी जणू

सैरभैर मन

पैलतीराची ओढ जणू…

*

निरव शांतता

चलचित्र आठवांचा

साद घाली पैलतीर

शाश्वत आनंदाचा…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 255 ☆ वाटा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 254 ?

☆ वाटा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

नकळतच आठवते….

आयुष्यात घडून गेलेली घटना,

या घटनेचा,

त्या घटनेशी काही संबंध ?

खरंतर नसतोच,

पण वाटतं उगाचच,

त्यावेळेस ही असंच घडलं होतं….

आपले आनंद,

शोधतच असतो की आपण,

फक्त वाटा बदलत

असतात!

एखादी वाट नसतेच रूचत,

तरीही पुन्हा पुन्हा,

त्या वाटेवरून जाणं,

नाही टाळता येत!

हा चकवा नसतोच,

वाटा अगदी स्वच्छ दिसतात,

पण चुकतोच वाट,

आणि घुटमळत राहतो

तिथल्या तिथे ,

इहलोकीचा प्रवास संपेपर्यंत!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्ष– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

नववर्ष– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

येणार ते जाणार हे कळायलाच हवं

गेल्यावरच तर येणार ना दुसरं काही नवं?

 *

नवं नवं नवलाईचं गुणगान गावं

गाता गाता नवलाईने भारावून जावं

नव्यामध्ये जुन्याच्या आठवणीत रमावं

जुनं ते सोनं हे तेव्हा समजावं

 *

म्हणूनच जुन्याचे बोट सोडायचं नाही

नव्याचे बोट पकडले तरी त्यात वाहून जायचं नाही

जुन्याच्या कडीत नव्याची कडी सांधायची

अशी साखळी गाठवून नव्याची कास धरायची

 *

नव्या वर्षाचा प्रत्येक क्षण खास व्हावा

आपला देह हर्षोल्हासाचा आस व्हावा

नव्यावर्षात नवं आव्हानांचा करण्या सामना

आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभ कामना ||

 *

Happy new year 2025

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #268 ☆ घडी मोडली… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 267 ?

☆ घडी मोडली ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

संसाराचा गाडा म्हणजे परवड असते

जबाबदारी खांद्यावरती जोखड असते

*

घडी मोडली तेव्हा नव्हता विचार केला

विस्कटलेली घडी घालणे अवघड असते

*

लाखाचा मी हिशेब करतो बसून येथे

दिवाणजी मी ती दुसऱ्याची रोकड असते

*

काही बाळे श्रावण झाली कलियुगात या

त्या बाळाच्या खांद्यावरती कावड असते

*

रांधा वाढा करते आहे आनंदाने

तिच्याच नशिबी तर उरलेली खरवड असते

*

असून पैसा साथ देइना शरीर माझे

या देहाची तेव्हा चालू तडफड असते

*

लंगोटाने सुरू जाहला प्रवास होता

अखेरीसही सफेद कोरे कापड असते

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दोन शुन्य दोन पाच… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ दोन शुन्य दोन पाच… ☆ श्रीशैल चौगुले ☆

दोन शुन्य दोन पाच

सावधान, एकदाच

पहा जरा मागे ठसे

विसरुन गत् जाच.

*

हळू-हळू चाला बोला

सांभाळून मोद स्वाद

निरोप टाळून वाद

नवे पाऊल आल्हाद.

*

दोन शुन्य दोन चार

बंद साल बंद दार

दुःख नको कसचेही

नव वर्षाने उध्दार.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नूतनवर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ नूतनवर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

दैनंदिनी

असे आत्मा

वर्षरुपी वसन

बदलून लागू कामा…

 

करु संकल्प

राहो साधनेतील सातत्य

नकोत विकल्पाचे

अधिपत्य…

 

एकचि सदगुरु

नकोत चोविस गुरु

आत्मोन्नतीचा ध्यास धरू

उन्मन हमखास..

 

तिळा तिळाने

जसा दिन होई मोठा

तसा चढू सोपान

श्रद्धेने धिराने…

 

सोप्प नाहीए

तरी मनात आहे विश्वास

या जन्मी सुरवात जरी

निश्चित होवू विलीन परमात्म्यासी…

 

आंग्ल नूतनवर्षाच्या अनंत शुभेच्छा.

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – जपावी वाचन संस्कृती… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जपावी वाचन संस्कृती? श्री आशिष  बिवलकर ☆

पुस्तकांचा मेळा | पुण्य नगरीत |

वाचनाची रीत | जगवाया ||१||

*

वाचन संस्कृती | वाढवते ज्ञान |

घालवी अज्ञान | माणसाचे ||२||

*

ग्रंथ हेच गुरु | बिंबवले मनी |

वाचुनिया ज्ञानी | घडवाया ||३||

*

प्राचीन भारत | प्रसिद्ध नालंदा |

ग्रंथांची संपदा | अगणित ||४||

*

आधुनिक जग | झालं डिजीटल |

ग्रंथांकडे कल | उदासीन ||५||

*

प्रकाशन झाला | आतबट्टा धंदा |

व्यवहारी वांदा | परिस्थिती ||६||

*

सुज्ञ वाचकांनो | जपावी संस्कृती |

वृद्धिंगत मती | वाचनाने ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बनाव… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ बनाव ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(जलौगवेगा)

भलेपणाचा प्रभाव आहे

तसाच येथे दबाव आहे

*

नवीन संधी लुटायची तर

तसाच केला सराव आहे

*

उगीच त्रागा करू नका ना

अशांत झाला जमाव आहे

*

विरोधकांच्या पराभवाचा

जमून केला ठराव आहे

*

दबून थोडे जपून वागा

बघून जेथे तणाव आहे

*

मिळेल ते तो नमून घेतो

मलूल ज्याचा स्वभाव आहे

*

सुखात नाही कुणीच येथे

सुधारणांचा अभाव आहे

*

फसाल तेव्हा कळेल सारे

कुणाकुणाचा बनाव आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares