मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || गणेश प्रार्थना ||☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ || गणेश प्रार्थना || ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

हस्त वदन तू लंबोदर 

वंदन तुला सर्वागोदर 

हस्त तुझ्या कृपेचा राहूदे 

अखंड माझ्या या डोईवर ||

*

हे विघ्नहर्त्या, विश्व नायका 

विनंती माझी ऐका बरका 

हे विश्व शांती सौख्याने नांदो 

वर मिळावा वर दायका ||

*

कर जोडूनी तुला सांगते 

सक्षम नारी व्हावी वाटते 

कर आता तूच जादू काही 

अभयदान तुला मागते ||

*

पद तुझे रे मी ना सोडीन 

श्वासासवे तुलाच स्मरेन 

पद तुझ्या या ध्येयासक्तीचे 

अविरत ओठी आळवीन ||

*

जपा उरी गणेश सर्वदा 

स्मरणाने सरती आपदा 

जपा कुसूम दुर्वा वाहून 

मिळविते निखळ प्रमोदा ||

*

अभंग, गाणी, ओवी लिखाणा 

स्फूर्ती द्यावीस विद्या दायका 

अभंग राहील स्रोत स्तुतीचा 

वचन तुला भव तारका ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #255 ☆ फुकाची कमाई… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 255 ?

☆ फुकाची कमाई ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नको काम धंदा फुकाची कमाई

विकू शेत खावू कुळाची कमाई

असे काम त्याचे नसे त्यास दर्जा

लुटारू म्हणे ही बळाची कमाई

 *

समाजास भोळ्या भले ठगविणारे

जिथे अंधश्रध्दा बुवाची कमाई

 *

कुठे काम नाही तरी आणतो हा

विचारी न कोणी कशाची कमाई

 *

जगी काम मोफत करी सिंचनाचे

कुठे होत आहे नभाची कमाई

 *

दुवा ईश्वराशी मला साधण्याला

दिली दक्षिणा ती भटाची कमाई

 *

करी कष्ट त्याला कुडे दाम मिळतो

मिळे ज्यास ठेका तयाची कमाई

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “फक्त एक सद्गुरू हवा…“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

 

☆ “फक्त एक सद्गुरू हवा…“  श्री सुहास सोहोनी ☆

राम हवा मज, कृष्ण हवा

अन् पंढरिचा विठुराय हवा

शिवहि हवा, गणराज हवा

अन् जेजुरीचा मल्हार हवा

*

ब्रह्म तसा विष्णूही हवा

अन् कश्मिरचा मार्तंड हवा

दक्षिणस्वामी कार्तिकेय अन्

करविरचा ज्योतिबा हवा

*

कालीमाता हवीच मजला

वंगदेशिची जी जननी

तुळजापुरची माय भवानी

जगदंबा यावी सदनी

*

सानसानुला मन गाभारा

ठेवु कुठे इतुक्या देवा

त्यापरि देइल क्षेम कुशल जो

फक्त एक सद्गुरू हवा…

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – विसर्जन…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – विसर्जन…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

गौरी महालक्ष्मी | झाले आगमन |

सुखावले मन | सणासुदी ||१||

विदर्भात लक्ष्मी | कोकणात गौरी |

येती घरोघरी | आगत्याने ||२||

माहेर वाशीण | सोन पावलांत |

आली आनंदांत | भेटावया ||३||

महालक्ष्मी गौरी | अखंड सावध |

असुरांचा वध | रक्षणासी ||४||

गौराई सजते | विविध रूपात |

वसे मखरात | आशिर्वादा ||५||

सुवासिनी हाती | मंगल पूजन |

नैवेद्य भोजन | भक्तीभावे ||६||

डोळे पाणावती | येता विसर्जन |

विराहत मन | निरोपासी ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सार्वजनिक गणपतीची प्रेरणा… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ सार्वजनिक गणपतीची प्रेरणा ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

होता ब्रिटिशांचा काळ 

भारतीय होते पारतंत्र्यात 

आली होती गुलामीची वेळ 

ठिणगी पेटली स्वातंत्र्याची मनात 

*

काय करावे कसे होईल 

देश स्वतंत्र करण्यासाठी 

कोण कसे साथ देतील 

सेवक राहतील उभे पाठी 

*

झेंडा घेतला हाती तरुणांनी 

फिरू लागले गावोगावी 

माफी मागितली लोकांनी 

जसे आहे आम्हा तसे ठेवी 

*

टिळक आले सोलापूरला 

आजोबा गणपतीची आरती 

सुरु झाली प्रचंड गर्दी जमली 

लोक आरती करून प्रसाद घेती 

*

प्रेरणा मिळाली टिळकांना 

विचारचक्र सुरु झाले मनात 

गणेश उत्सव सुरु करून 

स्वातंत्र्य मिळवू एकमत 

*

सुरु केला गणेश उत्सव 

जमू लागले भाविक फार 

टिळकांनी जनतेचा घेतला ठाव 

बदलले जनतेचे विचार 

*

झाला स्वातंत्र्यासाठी संघर्ष 

प्रेरणा मिळाली सोलापुरातून 

उत्साहात होते बाप्पाचे आगमन 

घराघरात बसती बाप्पा येऊन 

 – दत्तकन्या

© सौ. वृंदा गंभीर

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रे मोरया… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ रे मोरया…  सुश्री नीलांबरी शिर्के 

आद्य पुजेचा मान तुला

गणपती बाप्पा मोरया

*

गणनायक सर्वजनांचा

हे लंबोदर मोरया

*

सुखकर्ता तू दुःख निवारक

गजवदना तू मोरया

*

समाजातल्या अनास्थेला

आस्थेत बदला मोरया

*

भोवतीच्या चूक करणारा

नीट समज द्या मोरया

*

अपेयपान मंडळात करणारा

उलट्या होवो मोरया

*

गर्दीत महिलांना त्रास देती 

त्यांची बोटे झडो मोरया

*

कर्कश्य गाणी लावती त्यांची

सिस्टिम बंद पाड मोरया

*

वर्गणीत करी काळेबेरे तया

स्टेजवरून पाड मोरया

*

प्रसादात घडे हेराफेरी

उपास घडो त्या मोरया

*

भक्ती करतो मनापासुनी

तो आनंदी सदा असे

तूच तयाचा रक्षणकर्ता

तया जीवनी नीत सुख वसे…

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 189 ☆ऊन पावसाचा खेळ… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 189 ? 

☆ ऊन पावसाचा खेळ ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(अष्टाक्षरी…)

ऊन पावसाचा खेळ

जाणा जीवनाचा सार

नका करू वळवळ

वेळ आहे, थोडा फार.!!

ऊन पावसाचा खेळ

सुख दुःख रेलचेल

कधी हसावे रडावे

मन असते चंचल.!!

 *

ऊन पावसाचा खेळ

उष्ण थंड अनुभव

सर्व असूनी परंतु

राहे सदैव अभाव.!!

 *

ऊन पावसाचा खेळ

सुरु आहे लपंडाव

अश्रू येतात डोळ्याला

काय निमित्त शोधावं.!!

 *

ऊन पावसाचा खेळ

भासे दुर्धर कठीण

राज अबोल अबोल

तोही स्वीकारी आव्हान.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काही चारोळ्या… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

डॉ. मधुवंती कुलकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ काही चारोळ्या… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

१.

ओंजळभर वेचावीत सुगंधित फुले 

पडलाय मखमली अलवार प्राजक्तसडा

किती समजावलं मनाला हळुवार 

तरी एकटक पहात रहातो हा जीव वेडा

२.

श्रावणसरी बरसल्या अन् फुलले चाफे

चाफ्यातून डोकावते आरस्पानी सौंदर्य 

मनाच्या अंधुकशा गाभाऱ्यात तेवणारे 

तेजस्वी झळाळी आणणारे अवीट माधुर्य

३.

मंगळागौरीच्या खेळात सजते श्रावण गीत

झिम्मा फुगडी आनंदात सरी कोसळती

माहेरच्या अंगणात गोपींचा चढे थाटमाट 

कान्हा व्याकूळ आसवे गाली ओघळती

४.

सणांची ही रेलचेल गोपी माहेरात दंग

गाई गुरे कान्ह्यासाठी आणि आठवणींचा संग

कधी संपेल हा ऋतू कधी भेटेल प्रेमिका

मनातील सरींमध्ये कधी भिजेल राधिका

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊल खुणा… मनी रुजल्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

पाऊल खुणा… मनी रुजल्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

अलगद उचलून हात बाजूला

सोडून गेला कान्हा मजला !

साद तयाला घालीत गेले,

मनी उमटल्या पाऊलखुणा !

*

 एकटी राहिली यमुना तटी,

 राधा कदंब वृक्षाखाली,

 वाट पहाते कान्ह्याची मनी,

 मनात रुजे प्रीती आगळी !

*

 मोरपीस घेऊनी प्रीतीचे,

 सोडून गेला कान्हा तिला !

 पण कान्ह्याची प्रीत निराळी,

 शिरी घेई राधेच्या प्रीतीला !

*

 मनी रुजल्या प्रीतीचा गंध,

 आसमंती तो दरवळला !

 जेथे कान्हा, तेथे राधा,

 आनंद मनी तो फुलला !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अखंड फेरे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अखंड फेरे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

(प्रस्तुत काव्यविषयास सुप्रसिध्द हिंदी कवी ‘अज्ञेय’ (वात्सल्यायन) यांच्या हिंदी रचनेचा आधार.)

झेप पाखरा, घे नभात तू

पवित्र तृणपाती हाती घेऊन

असे घेरुनी टाक नभाशी

जीवन तुझे संकटे पार होऊन.

*

जाग्र झाली सृष्टी उषःप्रभा

तुच सोबती तुझ्या यशाचा

तृणपाती बळ जगण्याचे श्वास

मृदमाता झळक उषेचा.

*

पंखात भविष्य अजिंक्य भरारी

भय कुणाचे कशास मनी

उंच-उंच घे झेप चक्षुंनी दिव्य

अमर होई तव ती बांधणी.

*

दृढ निश्चय कापीत लक्ष व्यूह

उद्या सुखाचे निश्चिंत आयुष्य

व्यापून टाकशील नभ क्षितीजे

विश्वास तुझे तृणपाती सदृश्य.

*

आवाहन पेलणे जन्म सार्थकी

सातत्य भिरभिरणे कर्म तुझे

फळ तृणपाती पवित्र देईल

बघ किरण स्वागता तुला पुजे.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares