मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सवाल जवाब… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?  कवितेचा उत्सव ?

☆ सवाल जवाब… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

 सवाल >>

अपत्यांना जन्मा घालणे धर्म असे हा नारीचा

लेकरांना पाजूनी पान्हा जीव तान्हा जगवायचा

सांगा कोणती जोडी अशी

अपवाद आहे नियमांना

जन्मा घाले माय परी पिता पाजीतो लेकरांना

 जबाब >>

गरोदर ती धरा होता सांगे आकाशाच्या कानी

जोमाने बाप लागे कामाला हर्ष त्याच्या मनोमनी

प्रसव वेळा नजिक येता समजे माता धरतीला

पान्हा तिच्या वक्षी नाही दोष तिच्या नशिबाला

बाप आकाशा माहित आहे प्रयत्नांती परमेश्वर

प्रयत्न त्याने नेटाने करता बाप हाच पान्हावला

जन्म लेकरांचा होणार म्हणून बापा धीर धरवेना

अमृताच्या सरी घेऊन पाजी आनंदे लेकरांना

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘श्रावण‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

हरिनामात दंगला, चिंब चिंब हा आषाढ,

दीपपूजेने उजळे, कसा सारा आसमंत!

 

बळिराजा गुंतलासे, काळ्या आईच्या सेवेत,

बीज रूजता मातीत, हिरवं सपान डोळ्यांत!

 

नाहू-माखूनी सचैल , भूमी झाली हो प्रसन्न ,

रानफुलांच्या गळ्यात, रंगे श्रावणाची धून!

 

सण पंचमीचा आला, सजे मेंदी हातावर,

नागोबाला पूजताना, कृतज्ञता हो मनात!

 

लेकी-सुनांच्या मनात,  भाऊरायाचा आठव,

रक्षाबंधनाचा सण,त्याच  प्रेमाची  खूणगाठ!

 

सागराला शांतविण्या, केले नारळ अर्पण,

नाच-गाण्यांच्या तालात, होड्या चालल्या पाण्यात!

 

व्रत-वैकल्ये, उपवास, गोड-धोडाची पंगत,

झिम्मा-फुगडीचा ताल, मंगळागौरीचा जागर!

 

कृष्णजन्म, दहीकाला, बाळगोपाळ रंगात,

बैलपोळा नि पिठोरी, सरे श्रावणाचा मास!

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – झाडाची पाहुणी… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?झाडाची पाहुणी– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

भवती सारे पाणी पाणी

हाकेवरती नाही कोणी

जीव वाचवण्यासाठी

झाली झाडाची पाहुणी ……

झाडाने तिज जवळ घेतले

फांद्यांनी तोलून धरले

फांद्यांना घट्ट पकडूनी

देहाला सावरून घेतले ……

ओठी पोटी काही नसेना

जीव वाचला खूप जाहले

दारासमोर झाड वाढवले

संकटसमयी त्यानेच तारले ,,….

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ त्रिवेणी रचना—- स्पर्शिका ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

त्रिवेणी रचना—- स्पर्शिका ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

तू होतीस स्पर्शिका माझी

तेंव्हा क्षण होते दरवळलेले

आता प्रश्र्न हाती फक्त अवघडलेले

****

बंध रेशमी तुझ्यासवे जुळूनी

स्पर्शिका तू रंग नवे लेऊनी

आता क्षितीज रंग विस्कटलेले

****

मी स्मरणाच्या वाटांनी फिरतो

क्षण भेटीचे आपल्या आठवतो

तू होतीस स्पर्शिका माझी

****

होतीस प्रेमले स्पर्शिका माझी

वाटले क्षितीजच आले हाती

पण सखे अंतरेच फसवी होती

****

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पाणी…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “पाणी …” ☆ श्री आशिष मुळे ☆

गर्भात भूमीच्या पाणी

दर्याच्या दिलात पाणी

कुशीत काळ्या पहाडाच्या

साठले अमृतावाणी

 

फुलांवर दाटते पाणी

साठते पानांवर पाणी

मुळांत वटवृक्षाच्या

कधीतरी घातलेले पाणी

 

ढगांच्या बाहूंत पाणी

आघातात विजांच्या पाणी

नजरेतून तिच्या थेट

कोसळते काळजात पाणी

 

खालून वाहते पाणी

वरून पडते पाणी

प्रवाहा विरुद्ध पोहणार्याच्या

मनात पाणीच पाणी

 

लेखणीत निळे पाणी

लिहणार्याच्या डोळ्यात पाणी

ओघळता कागदा वरून

वाचणारा पाणी पाणी…

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 168 – विज्ञानाची जादूगिरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 168 – विज्ञानाची जादूगिरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

विज्ञानाच्या गंमतीची

नवी जादू झाली सुरू।

कापराने प्लास्टिकचे

मासे लागतील फिरू।

 

पाण्यामध्ये लेझर रेss

उगा बसला रुसून।

दोन थेंब दूध देता

पुन्हा दिसला हसून ।

 

कार्बनडायआक्साईड

असे फार करामती।

पाण्यामध्ये  युनो टाका

अन् विझे  मेनबत्ती।

 

प्लेटवर सात रंग

आले ऐटीत सजून।

गरगरा प्लेट फिरे

पांढऱ्यात विरून।

 

चिमटीत कुंकवाचा

असा झाला कसा बुक्का।

लिंबातून रक्त येता

मज बसे मोठा धक्का ।

समजली विज्ञानाची

आता सारी जादुगिरी।

जादूटोणा भूलथापा

भूत दिवटी ना खरी।

 

विज्ञानाची कास धरू।

आता आम्ही सारी मुले।

ज्ञान विज्ञान जोडीला

सारे आवकाश खुले।

रंजना लसणे

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

आले आकाश भरून..

सौम्य ऊन परतता

गेले पुन्हा निवळून..

 

धडपडता ओलेता…

वारा थकला पळून

गंध वाटता वाटता…

 

ऊन पावसाचे सडे…

लेऊनीया दंव मोती

वाट हिर्वाळीत दडे…

 

वारा.. पक्षी..झाडे..पाणी…

धुंद सृष्टीची मैफल

श्रृंगारली वनराणी…

 

खेळ..सई.. झोक्यातून…

तिच्या आकाशा भेटून

येई माहेरवाशीण…

 

फुले पिसारा.. फुलोरा…

रंग..गंधाने..स्वराने

सजे मनांचा गाभारा…

 

मिळे चैतन्य प्राणास…

थांबलेला जीवनांचा

सुरु जाहला प्रवास…

 

हर्ष.. समृद्धी..तृप्तीचे..

आता ओसंडती घडे

आले दिस श्रावणाचे..

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  कवितेचा उत्सव  ☆ यान उतरले चंद्रावरती… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? कवितेचा उत्सव ?

☆ यान उतरले चंद्रावरती ☆ श्री सतीश मोघे

यान उतरले चंद्रावरती

आनंदाच्या सरी बरसती

  शरदऋतूच्या प्रारंभाला

  चंद्रभेटीची चांदणभरती

पहिला विक्रम केला आम्ही

उतरून दक्षिण ध्रुवावरती

  आले अपयश खचलो नाही

  पुन्हा नव्याने गेलो वरती

यश सारे हे शास्त्रज्ञांचे

जगी पसरली त्यांची ख्याती

  कवितेमधल्या चांदोबाची

  गाठ पडूनी होई भेटी

आनंदाची लहर देशभर

अभिमानाने फुगली छाती

  दूरदृष्टीचा अमुचा नेता

  लक्ष तयाचे सूर्यावरती

चंद्र आनंदे म्हणे धन्य मी

आज तिरंगा आला भेटी  🇮🇳

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य #188 ☆ रक्षा सूत्र ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 187 – विजय साहित्य ?

☆ रक्षा सूत्र ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

श्रावणाच्या पौर्णिमेला

रक्षा बंधनाचा‌ सण

रक्षा सूत्र अनमोल

घेई वेचूनीया मन…!

 

ताई तुझ्या भेटीसाठी

होते सालंकृत राखी

राग लोभ भांडणात

नाते गुंफतसे राखी…!

 

राखी कौटुंबीक बंध

करी राखण नात्याची

भावा बहिणीचा सण

पाठ राखण मायेची..!

 

एका‌ रेशीम धाग्यात

आठवणी विसावल्या

गोड घास मुखी तुझ्या

औक्षणाने सामावल्या..!

 

दीपज्योती स्नेहवाती

भावा बहिणीची जोडी

आठवांच्या चांदण्यात

आहे अमृताची गोडी…!

 

अमरत्व निर्भयता

राखी देते संजीवन

येता श्रवण नक्षत्र

करू नात्यांचे रक्षण..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संपर्क तुटला, संकल्प नाही… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

? कवितेचा उत्सव ?

संपर्क तुटला, संकल्प नाही… ☆ श्री राहूल लाळे

संपर्क तुटला, संकल्प नाही

खचून जाणारे आम्ही नक्कीच नाही

 

विक्रमाने हुलकावणी दिली

तरी प्रज्ञाना ची साथ सोडणार नाही

 

चंद्राचे आहे जुनेच आकर्षण..

श्रीरामाला ही त्याने घातली भुरळ

प्रेमाचे आमच्या तो प्रतीक आहे

शास्त्रज्ञांसाठी कुतूहल आहे

 

हनुमंताचे भक्त आम्ही

चंद्रच काय सुर्यालाही गवसणी घालू

वेडे प्रेमवीर आम्ही

पुन्हा पुन्हा फिरुन येऊ

 

तो तिथेच कायम असेल

 निर्धार आमचा दशपट होईल

 

संपर्क तुटेल, संकल्प नाही

खचून जाणारे आम्ही निश्चितच नाही

© श्री राहुल लाळे

०७-०९-२०१९

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print