मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वर्षाधारा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ वर्षाधारा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(राजा छत्रसाल यांनी महाराजांकडे कर्जाची मागणी केली होती आणि महाराजांनी त्यांना दान दिले आणि त्यांची अवस्था सुधारली अशी कथा आहे )

मी पावसावरील कविता लिहिताना त्यात प्रयोग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा त्यात कशा दिसतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशा 12 प्रसंगांवर मी कविता लिहिल्या आहेत. त्यातील एका प्रसंगावरील ही कविता….

वरूणराजा तो झाला, राजा शिवछत्रपती

ढगांच्या घोड्यावर आरूढ़,गड़गडाच्या नौबती

सौदामिनीचे दाणपट्टे, सूर्यकिरणाच्या तलवारी

अशा मोठ्या दलासवे,राजा शोभे तालेवारी

*

आता आमचा बळीराजा,झाला छत्रसाल राजा

ऋण फिटता फिटेना,भेटू म्हणे महाराजा

शेत जमीन नांगरून गार्हाणे हे घातले

यथाशक्ती मदत व्हावी, मागणे हे मागितले

*

छत्रसालाने पसरले बाहू,शिवराय सरसावले

उराऊरी ते भेटताच, दैन्य सारे हे संपले

मृद्गंधाचे अत्तर लावले,थेंबांची ती पुष्पवृष्टी

धरे पासुनी आसमंतापर्यंत, सारी सुखावली सृष्टी

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पाऊस पहिला…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “पाऊस पहिला” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

पाऊस पहिला,

भिजवून गेला,

थंडी अजून बाकी।

मनात शिरला,

स्मृतीत उरला,

आठव अजून बाकी।

वर्षा सरली,

वर्षे सरली,

इच्छा अजून बाकी।

पुन्हा भिजावे,

धुंद फिरावे,

जोश न आता बाकी।

धरती भिजली,

मनेही भिजली,

काय राहिले  बाकी?

वृत्ती थिजली,

गात्रे थिजली,

जीवन अजून बाकी।

© श्री सुनील देशपांडे

 

मो – 9657709640

 

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ डोहात हरवले… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ डोहात हरवले… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

काळिमा भासतो गोड,

काळ्याच आठवणींचा.

कृष्णमेघ नभी बरसतो,

तिमिरात श्याम थेंबांचा.

जळात सोडून पाय,

औदुंबर बसला कोणी.

डोहात खोल हरवले,

डोळ्यातील गहिरे पाणी.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्ग… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – निसर्ग – ? ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

निसर्ग ही तर खरी आठवण करून देतो 

मायावी आरसा होऊन तुझ्या समोर येतो 

ढळलेल्या मनाचा दु:खी माणूस तेव्हा

 आवेगाने  सावरून कसा सुखी होतो

*

अद्भुत किमया अचानक अशी उजागर होते 

बघणाराला ऐश्वर्याचे दृष्टी दान मिळते 

हीच अपार किमया असते परमेशाची

इथेच नात्यांची नात्याशी खरी नाळ जुळते

*

तू तुझा म्हण किंवा हवंतर माझा म्हण

पण हे जगच या जगाचा नित्य परिपोष करते 

हेच माणसांनी कधी काळी विसरू नये

येवढीच त्या अनंताची माफक अपेक्षा असते 

*

आपण काय आज आहेत उद्या कदाचित नाही 

विश्व त्याचे अफाट सौंदर्य कायम जपत राहील 

औदार्याच्या खुणा त्याच्या जगाला दिसतील कायम

पण मुक्तपणे जगणारा चिरंजीव आत्मा येईल जाईल

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लाडकी बहिण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ लाडकी बहिण... ☆ श्रीशैल चौगुले ☆

(विडंबन)

“लाडकी बहिण” आहे माझी एक

पंधराशे’तील देईल ना नाणी लाख.

.

किती प्रेमात वाढलो दोघे आम्ही

परि योजनेने केले नाते खाक.

.

आता देईल ना ती कागदी सही

मिरवीत फिरेल मिजास धाक.

.

बोंब झाली भावांची हक्कात कशी

झोकात शालू नि झुबे शोभे झॕक.

.

सत्तेसाठी केला डाव मात्र भारी

पुरुषांचे शौर्य वेशीवर ठोक.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #247 ☆ मी घसरते… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 247 ?

☆ मी घसरते ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नीज येता येत नाही चांदणे डोळ्यात सलते

रात्र आहे मख्ख जागी स्वप्न माझे दूर पळते

*

पेटलेला हा निखारा शांत झाला अन तरीही

थंड राखेच्या ढिगावर एक भाकर रोज जळते

*

काल घरघर करत होते एक जाते पाहटेला

आज तेही मूक आहे अन तरीही पीठ दळते

*

कोरड्या डोळ्यात माझ्या होय सागर त्यात लाटा

हे कुणाला कळत नाही पापण्यांना अश्रु छळते

*

चांदण्यांना पेंग आली झोपुनी गेल्या पहाटे

मी तशी जागीच आहे पाहुनी मज झोप हसते

*

तू बरसतो मी तुझ्यावर प्रेम करते पावसा रे

वाट होते ही घसरडी आणि त्यावर मी घसरते

*

सैल होताना मिठी ही हुडहुडी छळते गुलाबी

दामिनी धावून येता चूक झाली हेच कळते

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वारी आषाढीची… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ वारी आषाढीची ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

वारी आषाढीची,

निघे पंढरपूरी !

वारकऱ्यांची गर्दी,

दिसे वाटेवरी !

*

दिसे वाटेवरी ,

जथा वारकऱ्यांचा!

विठ्ठलाच्या भजनात,

वारकरी दंग होता!

*

वारकरी दंग होता,

टाळ चिपळीचा गजर!

साथीला मृदुंगाची थाप,

वारकरी रमले फार!

*

वारकरी रमले फार,

विठ्ठलाच्या त्या ओढीने!

गाठण्यास पंढरपूर,

जाती धावत वेगाने!

*

वारीच्या वाटेवर ,

असे वारकरी गर्दी!

विठ्ठलाच्या भजनाची,

जाई पंढरीस वर्दी !

*

 टाळ चिपळी मृदुंग,

 भक्त होती त्यात दंग!

 विठ्ठल नामाची ओढ,

 देई वारकऱ्यांस वेग !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कृपेचे आभाळ… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – कृपेचे आभाळ – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

सुंदर लोभस | सखा पांडुरंग |

जीवनात संग | श्वासापरी ||१||

*

ललाटी शीतल | चंदनाचा टिळा |

शोभे हार गळा | तुळशीचा ||२||

*

सावळा विठ्ठल | कटेवरी कर | 

उभा वीटेवर | युगे युगे ||३||

*

मकर कुंडल | कर्ण झळकती |

तेज उधळती | दिव्यत्वाचे ||४||

*

सुवर्ण मुकुट | भव्य शिरावरी |

पंढरीत हरी | वैष्णवांचा ||५||

*

कुंतल कुरळे | सावळी ही काया |

हृदयात माया  | माऊलीच्या ||६||

*

लेकरांचा करे | माऊली सांभाळ |

कृपेचे आभाळ | धरोनिया ||७||

(चित्र सौजन्य :कु.ह्रदया सखाराम उमरीकर ) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 230 ☆ कवी कालिदास दिन… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 230 – विजय साहित्य ?

कवी कालिदास दिन… ☆

जोडोनीया दोन्ही कर,

समर्पित शब्द फुले .

स्वीकारावी शब्दार्चना ,

लाभू देत विश्व खुले.

*

कुलगुरु कालिदास ,

काव्य शास्त्र अनुभूती .

शब्द संपदा संस्कृत,

अभिजात कलाकृती.

*

महाकवी कालिदास ,

काव्य कला अविष्कार .

निसर्गाचे सहा  ऋतू ,

ऋतू संहार साकार.

*

अलौकिक प्रेमकथा ,

मालविका अग्निमित्र.

खंडकाव्य मेघदूत ,

सालंकृत शब्द चित्र.

*

शिव आणि पार्वतीची,

कथा   कुमार संभव.

अभिज्ञान शाकुंतल ,

प्रेमनाट्य शब्दोच्चय.

*

राजा पुरूरवा आणि ,

नृत्यांगना  उर्वशीचे.

अभिजात कथानक ,

निजरूप प्रतिभेचे.

*

मेघा बनवोनी दूत ,

यक्षराज आराधना .

कालिदासे वर्णियेली,

प्रेमसाक्षी संकल्पना.

*

कवी कालिदास दिन,

आषाढाची प्रतिपदा .

काव्य शृंगार तिलक ,

प्रासादिक ही संपदा.

*

अग्रगण्य  अभिव्यक्ती ,

कालिदास साहित्याची.

शब्दोशब्दी सामावली,

शब्द शक्ती सृजनाची.

*

चित्रकार, शिल्पकार ,

यांचे वंदनीय स्थान .

साहित्यिक शिरोमणी ,

कालिदास दैवी  ज्ञान.

*

अशी प्रेरणा चेतना ,

व्यासंगात रूजलेली .

कालिदासी साहित्यात,

काव्यसृष्टी फुललेली.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निसर्गाचे रुप… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

निसर्गाचे रुप… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

असा कसा हा व्दाड निसर्ग

क्षणात पालटी रुप आपले

होती समोर नागमोडी वाट

कशी हरवली आता धुक्यात

*

मेघ उतरले धरणीवरती

दाटे काळोख सभोवती

सुटे सोसाट्याचा वारा

वाट कुठेच दिसेना

*

डोंगराच्या पायथ्याशी

दिसे एक टपरी चहाची

घेऊ चहासवे वाफाळत्या

भाजीव कणसे आणि भजी

*

भुरभुर पावसाची चाले

ढग हलके थोडे झाले

धुके बाजूस सरले

थोडे थोडे उजाडले

*

हरवलेली वाट धुक्यात

आता दिसाया लागली

दोन्ही बाजूच्या झाडातून

नागमोडी चाललेली

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares