श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
☆ जीवनरंग : लघुकथा : धोका – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆
मोबाइल वाजला. घरात पोछा लावित असलेल्या बाईनी मोबाइल उचलला आणि घाई-घाईत चालत जाऊन बाहेर झाडांना पाणी देत असलेल्या वयस्क गृहस्थांना म्हणाली, ‘‘बाबूजी…फोन…!’’
वयस्क गृहस्थ अलजाइमरनी आजारी. थरथरत्या हातात फोन घेऊन नांव बघू लागले. नंतर संयमी स्वरांत बोलू लागले, ‘‘हैलो…हैलो…हैलो…आवाज येत नाही आहे…।’’
तिकडून पुन्हा आवाज आला, ‘‘हैलो…हैलो…बाबा…! तुम्ही लोकं घरी आहात काय बाबा…! हैलो…हैलो…बाबा…माझी घरी यायची इच्छा आहे बाबा…’’ उत्तराखातर वयस्क गृहस्थ फक्त हैलो…हैलो…हैलो करीत राहीले. ‘‘हैलो…हैलो…मला कांहीच ऐकायला येत नाही आहे…हैलो…!’’ आणि वयस्क गहस्थानी मोबाइल बंद करुन टाकला.
थोड्या वेळानी पुन्हा बेल वाजली. वयस्क व्यक्तिने नाव वाचले आणि स्वत: बंद होईपर्यंत बेल वाजू दिली.
‘‘आवाज तर येत होता. स्पीकर सुरु होता न! मी ऐकला. अनुरागचाच आवाज होता. तो घरी येतो म्हणतो. तिथे कोणत्या परिस्थितीत आहे आपला मुलगा कोण जाणे? …तुम्ही असं कां बरं केलं?’’ शेजारी मनी-प्लांट सावरत असलेली वयस्क स्त्री जवळ येऊन उभी झाली होती.
‘‘गौरी…पंचायतीनं कालच निर्णय घेतला आहे की जो पर्यंत हे कोरोना वायरस संपत नाही तोवर बाहेरुन कोणालाच गावांत येऊ दिलं जाणार नाही. आपला मुलगा ज्या शहरात आहे तिथे सर्वात जास्त केसेस पॉजिटिव निघालेल्या आहेत. अशा स्थितित त्याचे इथे येणे संपूर्ण गावाकरिता धोक्याचे ठरू शकते. ’’
‘‘आणि त्याचे तिथेच राहणे..?’’ थरथरत्या आवाजात एक प्रश्न हवेत गुंजारव करित राहीला.
वयस्क गृहस्थानी ऐकले खरे पण कांहीच उत्तर दिले नाही. बंडी च्या खिशातून एक रुमाल काढला आणि बाहेर आलेल्या अश्रुंना वाट मोकळी करुन देत पुन: झाडांकडे वळले.
© श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
संपर्क : मो. 9422856767, 8971063051 * E-mail: [email protected] * web-site: http://sites.google.com/view/bhagwan-vaidya
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈