मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 59 – मेघ बरसला आज…..☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  वर्षा ऋतू एवं श्रवण मास  पर आधारित  एक अतिसुन्दर कविता मेघ बरसला आज। श्री प्रभा जी की यह रचना  श्रवण मास का सजीव चित्रण है। मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

खुप सुंदर श्रावण  असायचा

बालपणीचा…झाडांचा..हिंदोळ्याचा..पानाफुलांचा …देवदर्शनाचा..मेंदीचा…झिम्मा फुगडीचा …..

सगळ्यांना नव्या श्रावणाच्या शुभेच्छा ☘

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 59 ☆

☆मेघ बरसला आज….. ☆

 

मेघ बरसला आज

आल्या श्रावणाच्या सरी

तुझी आठवण येता

झाले कावरी बावरी

 

मेघ बरसला आज

मन सैरभैर झाले

तुझ्या निघून जाण्याचे

दुःख पावसात ओले

 

मेघ बरसला आज

सखे रिकामे अंगण

मुके झाले आहे आज

माझ्या पायीचे पैंजण

 

मेघ बरसला आज

त्याला डोळ्यात जपला

तुझ्या नसण्याने एका

सारा खेळच संपला

 

© प्रभा सोनवणे

 *अनिकेत* -१९९७)

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]




मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य – हिरवा गाव – ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई

सुश्री मीनाक्षी सरदेसाई

(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य  प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६,  नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)

अब आप सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी के साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य को प्रत्येक बुधवार आत्मसात कर सकेंगे । आज प्रस्तुत है ग्राम्य संस्कृति की झलक प्रस्तुत कराती एक भावपूर्ण कविता  हिरवा गाव.

☆ साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य – हिरवा गाव – ☆

हिरव्या साडीतली कुलीन  केळ।

मांडवावरची  शालीन  वेल

हिरव्या  पोरी  मारताहेत  भाव

वसलाय तेथे हिरवा  गाव    ।।

 

गुलमोहोराचं गुलजार रूप

प्राजक्त भोळा  फुललाय खूप

पानांत रंगलाय पाखरांचा डाव

वसलाय तेथे ——–

 

शेवंती, चमेली, जाईजुई नाजुक

काट्यांतून हसतय गुलाबाचं कौतुक

कोरांटी, तगरीचा सरळ स्वभाव

वसलाय तेथे ——–

 

ऊंच माडांचे झुलताहेत पंखे

सलामी देताहेत अशोक उलटे

जास्वंद हसतेय लालम् लाल

वसलाय तेथे ——-

 

हिरव्या गावात पावसाचा उत्सव

फुलापानांचं, फळांचं वैभव

ढगांच्या भाराने वाकलंय आभाळ

वसलाय तेथे हिरवा गाव  ।।

 

 

© मीनाक्षी सरदेसाई

‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.

मोबाईल  नंबर   9561582372, 8806955070




मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 58 ☆ फुलं ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता  “फुलं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 58 ☆

☆ फुलं ☆

 

हसतात फुलं, डोलतात फुलं

काट्यांच्या सोबतीत वाढतात फुलं

निरागस नि कोमल असतात फुलं

रोजच रंगपंचमी खेळतात फुलं

भेटेल त्याला आनंद वाटतात फुलं…

कळ्या फुलतात, यवंनात आलेल्या मुलींसारख्या

नाचतात माणसांच्या तालावर

कुणी एखादा घरी घेऊन जातो फुलं

घर सुवासानं भरून टाकावं म्हणून

कुणी त्यांना देवाच्या पायावर वाहतो

तर कुणी माळतो प्रेयसीच्या केसात

कुणी फुलांच्या शय्येवर पोहूडतात

एखादा करंटा मनगटावर बांधून

घेऊन जातो त्यांना कोठीवर

वापरून झाल्यावर

पायदळी तुडवली जातात फुलं

कुणाच्याही अंतयात्रेवर उधळली जातात फुलं

सारा आसमंत दरवळू टाकतात फुलं

तरीही नशिबावर कुठं चिडतात फुलं…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८




मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ उत्सव कवितेचा # 13 – रात्र – चित्र २ ☆ श्रीमति उज्ज्वला केळकर

श्रीमति उज्ज्वला केळकर

(सुप्रसिद्ध वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उज्ज्वला केळकर जी  मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। आपके कई साहित्य का हिन्दी अनुवाद भी हुआ है। इसके अतिरिक्त आपने कुछ हिंदी साहित्य का मराठी अनुवाद भी किया है। आप कई पुरस्कारों/अलंकारणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी अब तक 60 से अधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं जिनमें बाल वाङ्गमय -30 से अधिक, कथा संग्रह – 4, कविता संग्रह-2, संकीर्ण -2 ( मराठी )।  इनके अतिरिक्त  हिंदी से अनुवादित कथा संग्रह – 16, उपन्यास – 6,  लघुकथा संग्रह – 6, तत्वज्ञान पर – 6 पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  हम श्रीमति उज्ज्वला केळकर जी के हृदय से आभारी हैं कि उन्होने साप्ताहिक स्तम्भ – उत्सव कवितेचा के माध्यम से अपनी रचनाएँ साझा करने की सहमति प्रदान की है। आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता  ‘रात्र – चित्र २ 

☆ साप्ताहिक स्तम्भ – उत्सव कवितेचा – # 13 ☆ 

☆ रात्र – चित्र २ 

रात्र

चंद्रबनातून

अलगद उतरणारी

मोगरीच्या सतेज ताटव्यात

घमघमणारी

पानांच्या चित्रछायेतून

तरंगत जाणारी

पुळणीवर जरा विसावणारी

हातांशी लगट करणारी

कानांशी कुजबुजणारी

आलीआलीशी

म्हणता म्हणता

पार…क्षितिजापार

होणारी

रात्र

 

© श्रीमति उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170



मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 9 ☆ किमया… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

(कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी) का ई- अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। आप मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता किमया…)

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 9 ☆ 

☆ किमया…

कोरड्या नदीला

अपेक्षा पावसाची

ओरडणाऱ्या पावश्याला

आशा एक पर्जन्य थेंबाची..

 

स्वाती नक्षत्र पाऊस

थेंब अगणित पडती

तरी एकाच थेंबाचे

शुभ्र वेधक मोती बनती..

 

गाईच्या कासेला

गोचीड बिलगती

सोडून पय अमृत

रक्त प्राशन करिती..

 

पडला साधा पाऊस

ओढ्यास पूर येई

उन्हाळ्यात महानदी

रखरखीत वाळवंट होई..

 

कुणास मिळे पुरणपोळी

कुणास चटणी भाकर

कुणी उपाशी तसाच

असाध्य दुःखाचा डोंगर..

 

गरीब गरीब राहिले

श्रीमंत, पैश्यात लोळले

नाहीच काही जवळ धन

कुणी मरण समीप केले..

 

खूप विचित्र गड्या

निसर्गाची माया

आलोत जन्मास भूवरी

साधू काही छान किमया..

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन,

वर्धा रोड नागपूर,(440005)

मोबाईल ~9405403117, ~8390345500




मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – स्वप्नपाकळ्या # 20 ☆ मामाचा गाव ☆ श्री प्रभाकर महादेवराव धोपटे

श्री प्रभाकर महादेवराव धोपटे

ई-अभिव्यक्ति में श्री प्रभाकर महादेवराव धोपटे जी  के साप्ताहिक स्तम्भ – स्वप्नपाकळ्या को प्रस्तुत करते हुए हमें अपार हर्ष है। आप मराठी साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। वेस्टर्न  कोलफ़ील्ड्स लिमिटेड, चंद्रपुर क्षेत्र से सेवानिवृत्त अधिकारी हैं। अब तक आपकी तीन पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं जिनमें दो काव्य संग्रह एवं एक आलेख संग्रह (अनुभव कथन) प्रकाशित हो चुके हैं। एक विनोदपूर्ण एकांकी प्रकाशनाधीन हैं । कई पुरस्कारों /सम्मानों से पुरस्कृत / सम्मानित हो चुके हैं। आपके समय-समय पर आकाशवाणी से काव्य पाठ तथा वार्ताएं प्रसारित होती रहती हैं। प्रदेश में विभिन्न कवि सम्मेलनों में आपको निमंत्रित कवि के रूप में सम्मान प्राप्त है।  इसके अतिरिक्त आप विदर्भ क्षेत्र की प्रतिष्ठित साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं के विभिन्न पदों पर अपनी सेवाएं प्रदान कर रहे हैं। अभी हाल ही में आपका एक काव्य संग्रह – स्वप्नपाकळ्या, संवेदना प्रकाशन, पुणे से प्रकाशित हुआ है, जिसे अपेक्षा से अधिक प्रतिसाद मिल रहा है। इस साप्ताहिक स्तम्भ का शीर्षक इस काव्य संग्रह  “स्वप्नपाकळ्या” से प्रेरित है ।आज प्रस्तुत है  उनकी एक भावप्रवण कविता   “मामाचा गाव“.) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  – स्वप्नपाकळ्या # 20 ☆

☆ मामाचा गाव

माह्या मामाचा थ्यो गांव

हाये लई लई दूर

मायले याद आली

चाल बापू लवकर।।

 

बापू पायटं निंगाला

माय व्हती संग संग

सुर्वे माथ्यावर आला

गांव किती दूर सांग।।

 

जरा धिरानं घे बाप्पा

पल्ला न्हायी हाये लांब

दम लागला मले गा

उली झाडाखाली थांब।।

 

माह्या भावाच्या गावाले

लई थंडगार वारा

तसा भावाचा माह्यावर

बापू लई रे जिव्हारा।।

 

आला गांव एकडाव

बरं वाटलं जिवाले

आंगणात  जवा गेलो

न्हायी कोणीच पुसाले।।

 

©  प्रभाकर महादेवराव धोपटे

मंगलप्रभू,समाधी वार्ड, चंद्रपूर,  पिन कोड 442402 ( महाराष्ट्र ) मो +919822721981




मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य – पंढरी माहेर . . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है  आपकी  एक भावप्रवण रचना “पंढरी माहेर . . . ! )

☆ विजय साहित्य – पंढरी माहेर . . . ! ☆

मुराळी होऊन

घेतसे विसावा

माये तुझ्या नेत्री

विठ्ठल दिसावा. . . . !

 

पंढरीची वारी

ऊन्हात पोळते

गालावरी माये

आसू ओघळते.. . . !

विठ्ठलाची वीट

उंबरा घराचा

ओलांडून येई

पाहुणा दारचा.

पंढरीची वारी

भेटते विठूला

आठवांची सर

आलीया भेटीला. . . . !

विठू दर्शनाची

घरा दारा आस

परी सोडवेना

प्रपंचाची कास.

पंढरीची वारी

हरीनाम घेई

माय लेकराला

दोन घास देई. . . . !

पंढरीची वारी

रिंगण घालते

माय शेतामधी

माया कालवते.. . . !

पंढरीची वारी

माऊलींच्या दारा

माय पदराचा

लेकराला वारा. . . . !

म्हणोनीया देवा

पंढरी माहेर

आसवांचे मोती

करती आहेर.

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.




मराठी साहित्य – कविता ☆ सुजित साहित्य – कॅनव्हास ☆ सुजित शिवाजी कदम

सुजित शिवाजी कदम

(सुजित शिवाजी कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है उनकी एक अतिसुन्दर भावप्रवण कविता  “कॅनव्हास”। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। ) 

☆  सुजित साहित्य  –  कॅनव्हास ☆ 

मी कॅनव्हास वर अनेक सुंदर

चित्र काढतो….

त्या चित्रात. . मला हवे तसे

सारेच रंग भरतो…

लाल,हिरवा,पिवळा, निळा

अगदी . . मोरपंखी नारंगी सुध्दा

आणि तरीही

ती.. चित्र तिला नेहमीच अपूर्ण वाटतात…

मी तिला म्हणतो असं का..?

ती म्हणते…,

तू तुझ्या चित्रांमध्ये..

तुला आवडणारे रंग सोडून,

चित्रांना आवडणारे रंग

भरायला शिकलास ना. .

की..,तुझी प्रत्येक चित्रं तुझ्याही

नकळत कँनव्हास वर

श्वास घ्यायला लागतील…

आणि तेव्हा . . .

तुझं कोणतही चित्र

अपूर्ण राहणार नाही…!

 

© सुजित शिवाजी कदम

दिनांक  5/3/2019

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६




मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 58 – गावाकडची कविता….. ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनके ही गांव पर आधारित एक अतिसुन्दर कविता कविता गावाकडची कविता…..। सुश्री प्रभा जी की यह रचना  उनके गांव का सजीव चित्रण है। काश हमारे सभी गांव इसी तरह हरित एवं श्वेत क्रांति के प्रतीक होते तो हमारा देश कितना सुन्दर देश होता ? सुश्री प्रभा जी द्वारा रचित  इस भावप्रवण रचना के लिए उनकी लेखनी को सादर नमन।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 58 ☆

☆ गावाकडची कविता….. ☆

(राहू हे आमचं गाव. दौंड तालुक्यातील….)

 

नदीकाठावर वसले आहे  आमचे राहू

मिडीयाला ही दिसले आहे  आमचे राहू

 

असे थोरांचे अन मोरांचे कोण कोणाचे

दलदली मध्ये फसले आहे  आमचे राहू

 

महादेवाचे,शिवशंभोचे ,गाव ऊसाचे

हरितक्रांतीने हसले आहे आमचे राहू

 

धवलक्रांती ही घडते,हे तर क्षेत्र दूधाचे

मनी लोकांच्या ठसले आहे आमचे राहू

 

इथे रानातच सळसळ चाले सर्प-नागांची

कुठे कोणाला डसले आहे आमचे राहू

 

‘प्रभा ‘त्याच्या ही स्वप्नी सजते पीक सोन्याचे

बळीराजाने कसले आहे  आमचे राहू

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]




मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य – किचनेशा – ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई

सुश्री मीनाक्षी सरदेसाई

(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य  प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६,  नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)

अब आप सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी के साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य को प्रत्येक बुधवार आत्मसात कर सकेंगे । आज प्रस्तुत है आपकी एक  मूल एवं विडंबन कविता  किचनेशा .

☆ साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य – किचनेशा – ☆

(ही कविता पूर्वींची आहे. तेव्हा कीचनमध्ये गँसची शेगडी नि लाल सिलेंडर म्हणजे महद्भाग्य वाटायचं. आधी गँस मिळवण्यासाठी नंबर नि नंतर तो महिन्याला मिळणे हेही कौतुकाचं.आता मा. पंतप्रधानानी गँस झोपड्यांमध्येही पोचवला, पण त्या काळात ? वाचुया कविता.” किचनेशा “)

विडंबन कविता —किचनेशा—

किती दिवसांनी तुला पाहिले गँसा

प्रिय माझ्या  रे  किचनेशा    ।।

तू गेल्याचा अजुनी आठवे दिवस

लावला हात कर्मास

पाहुणे  घरी  आले होते खास

मज आठवला  विघ्नेश

भोवती स्टोव्ह ते जमले

ते फरफरले, फुरफुरले

तोंडास लागले  काळे

मग रोजच रे असली अग्नि परिक्षा

प्रिय माझ्या      ।।

 

मूळ कविता—-

 

संदेश तुला कितीतरी पाठवले

नाही का ते तुज कळले?

की कोणि तुला मधुनच भुलवुन नेले?

मी येथे तिष्ठत बसले

भाकरी  नीट भाजेना

कुकरची  शिटी  होईना

झाली बघ दैना दैना

का विरहाची दिलीस असली शिक्षा

प्रिय माझ्या   ।।

 

आणि एके दिवशी  —

दूरात तुझा लाल झगा झकमकला

जिव सुपाएव्हढा झाला

मी लगबगले, काही सुचेना बाई

महिन्याने दर्शन  होई

ओटा धुतला, स्वच्छ शेगड्या केल्या

कौतुके तुला मी पुसला

ज्योत तुझी निळसर हसली ,

मुखकलिका माझी खुलली

महिन्याची शिक्षा सरली

मनमुक्त अता फिरेन मी दाहिदिशा

प्रिय माझ्या रे किचनेशा   ।।।।

 

© मीनाक्षी सरदेसाई

‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.

मोबाईल  नंबर   9561582372, 8806955070