मराठी साहित्य – मराठी कविता – ? *कदंब काव्य* २ ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

(“Kadamb” is one of the best poems of Ms. Jyoti Hasabanis ji. This poem is in two parts.  Yesterday, we published first part of the poem. 

You can feel her emotions.  In her own words –

I like the aura of that tree as it reminds me of the Krishna – Leela ! 
Its bloom time is Shrawan . 
I used to visit the tree in that period every year and witness the divine beauty n fragrance !)
  ?  *कदंब काव्य*२  ?
नभांगणी  शुक्रतारा
अन् उषेची अधीर साद
संगतीस पहाटवारा
अन् निःशब्द अंतर्नाद ।
मनी रूणझुणणारा
कदंब नाद खुळा
मनी रूमझुमणारा
सुरेल संवाद सोहळा  ।
वळे पाऊल नकळत
वाटेवर कदंबाच्या
तरळे आस डोळ्यांत
वाटेवर कदंबाच्या ।
रंध्र रंध्र आतुरले
दैवी गंध अनुभवण्या
सहस्त्राक्ष गात्र झाले
साज अनोखा टिपण्या  ।
बावरले मन माझे
झाले व्याकुळ
विद्ध नजर त्याची
नजरेत झाकोळ ।
रोमरोमी भिनलेला
गंध कोणी चोरला
अंगांगी खुललेला
साज कुठे गेला  ।
जणू सावळ्यासाठी आसावत
कदंब मनी झुरला
मूक आक्रोश त्याचा
पाकळी पाकळीतून स्त्रवला  ।
खच पाकळ्यांचा तळी
अन् गतवैभवखुणा अंगांगी
सावळ्याचे फोल स्वप्न मनी
अन् मूक रूदन सर्वांगी  ।
संवाद अबोल साधत
घायाळ कदंब उभा
पुनर्भेटीचे मज वचन देत
निस्तब्ध कदंब उभा  ।
© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ?  *कदंब काव्य*१ ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

(“Kadamb” is one of the best poems of Ms. Jyoti Hasabanis ji. This poem is in two parts.  Tomorrow, we will publish second part of the poem. 

You can feel her emotions.  In her own words –

I like the aura of that tree as it reminds me of the Krishna – Leela ! 
Its bloom time is Shrawan . 
I used to visit the tree in that period every year and witness the divine beauty n fragrance !)
?  *कदंब काव्य*१ ?
आषाढ सर कोसळली
श्रावण सर उजळली
नवचैतन्याने हिरवळली
तृप्त धरा नव्हाळली  ।
नव्या नव्हाळीचा
साज वसुंधरेला
नव नवोन्मेषाचे
कौतुकओझे तरूवेलीला
नवोन्मेषाच्या कौतुकात
सृष्टी रंगली
निसर्गाची वत्सल नजर
कदंबावर पडली
इवल्या इवल्या जिवांची
आस मनी होती
‘त्याच्या’ परिसस्पर्शाचीच
मात्र खोटी होती
लाभला परिसस्पर्श ,
चमत्कार झाला
हिरव्या पर्णसंभारातून ,
इवला जीव डोकावला ।
दिसामागून दिस ,
जाऊ लागले
कदंबाचे झाड ,
लेकुरवाळे झाले ।
वा-यासंगे झुलू लागले ,
मजेत जीव सानुले कोवळे
फांदी फांदी रंगू लागले ,
लपंडावाचे खेळ आगळे ।
झुलत मस्तीत ,
जीव ते बहरले
लेवून शुभ्र साज ,
अंगांगी मोहरले ।
शुभ्र साज त्यांचा ,
सोनपिवळ्या छायेतला
अलौकिक गंध त्यांचा ,
परिसरांस व्यापलेला ।
मोहरलेला कदंब आणि
बहरलेली रासलीला
अद्वैताचा बंध रेशमी
कदंब होता साक्षीला ।
तोच श्रावण तोच बहर ,
पण नाही मधुर बन्सीधून
तोच ध्यास तीच आस
पण नाही अधीर मीलन ।
मन वेडे कदंबाचे,
खुळे कान्ह्याच्या पदरवाचे
मन वेडे कदंबाचे ,
 पिसे गोपिकांच्या पैंजणांचे ।
सावळ्यासाठी आसावत
तृषित कदंब उभा
वैभव आपुले सावरीत
अदबीत कदंब उभा ।
© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – पाहुणा – सुश्री नीलम सक्सेना चंद्रा

सुश्री नीलम सक्सेना चंद्रा

पाहुणा

(जीवन के कटु सत्य को उजागर करती सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी की  मराठी कविता।)

मी स्वत: आली आहे या जगात

एखाद्या पाहुण्या सारखी,

मला कुठे हक्क आहे

घराला आपलं म्हणण्याचा,

सामानाला आपलं म्हणण्याचा,

दागिन्यांना आपलं म्हणण्याचा?

 

संबंध पण माझे नाहीत,

नातेवाईक पण माझे नाहीत,

तू पण माझा नाही,

मी पण तुझी नाही;

फक्त एक भ्रामक कल्पना आहे!

 

सत्य एकच आहे,

थोड्या वेळा साठी आपण आलो आहोत जगात,

आणि त्यात जर असेल,

फक्त प्रेम व स्मित हास्य,

की मग मी भरून पावले!

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता – स्मृति-गंध  – श्री सदानंद आंबेकर 

श्री सदानंद आंबेकर 

 

 

 

 

 

(श्री सदानंद आंबेकर जी की हिन्दी एवं मराठी साहित्य लेखन में विशेष अभिरुचि है।  गायत्री तीर्थ  शांतिकुंज, हरिद्वार के निर्मल गंगा जन अभियान के अंतर्गत गंगा स्वच्छता जन-जागरण हेतु गंगा तट पर 2013 से  निरंतर प्रवास

हम श्री सदानंद आंबेकर जी  के आभारी हैं इस अत्यंत  भावप्रवण मराठी कविता के लिए)

पाहुनि इवल्याश्या चोची,
              चीव-चीव ऐकोनि,
स्मृति उजळली आईची ती, अश्रु गेले वाहोनि।
स्नेहाची ती मधुर छाया,
                    वर्षणारी सतत माया,
निर्मिली माझी ही काया,
                    राहुनि तुझियाच पाया,
आज दरवळला स्मृतिंचा- गंध- दृश्य पाहोनि. . . . . .
हात धरुनि चालवीले,
                    कष्ट सोसुनि वाढवीले,
तम जगाचा घालवीला,
                    जन्म माझा सुखद झाला,
व्यक्त करितो भाव माझे- स्मृति तुझ्या रेखाटुनि. . . . .
©  सदानंद आंबेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता – मेघ सरले – सुश्री स्वप्ना अमृतकर

कवयित्री : स्वप्ना अमृतकर (पुणे)

आत्मकथ्य : लिखाणाच्या शैलीत, शब्दसुमनांच्या वेलीत, विचारांच्या स्वरचित, मनाच्या काल्पनिक, माझा प्रवास सुरु आहे.   साहित्यिक लिखाणांत कविता, चारोळी, गजल, लेख, कथा लिखाण, प्राचीन आणि नव नव्या गोष्टी, तंत्रज्ञान समजुन त्यावर स्वरचित विचारमांडणी करणे.

विशेष : पालकांकडुन लाभलेल्या स्वच्छ विचारसरणी आणि लिखाणाची कला शैली जोपासता यावी हाच प्रयत्न .. – स्वप्ना अमृतकर

 

मेघ सरले

 

मेघ सरले,

मोर हासले,

थेंब थांबले,

वादळ हरवले,

 

नकळत तेव्हांच तू माझ्याकडे पहिले,

आणि मी माझे सर्वस्व गमावले,

तुझ्या बघण्याचा इशारा होता जणू,

पाऊस पडल्यानंतर होणारा आनंद,

ओल्या मातीचाही चोहीकडे दरवळलेला सुगंध,

वाऱ्यानेही कहर केला होता मनी,

कोमल अंगालाही शहारल्या लहरी बेधुंद,

मनाला पालवी फुटावी एवढा गजर झाला त्या क्षणी,

हरवलेल्या राधेला मिळावा तिचा कृष्ण,

असाच काही आहे तू माझ्यासाठी परमानंद,

आपल्या दोघांमध्ये होत होता संवाद केवळ त्या मेघांमुळे,

आता शेवट जरी केला तरी तो केवळ तुझ्या माझ्या प्रेमामुळे,

 

म्हणूनच,

मेघ सरले,

मोर हासले,

थेंब थांबले,

वादळ हरवले….!

 

© स्वप्ना अमृतकर

 

Please share your Post !

Shares
image_print